twitter
rss

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨
📃  *आजची प्रेरणादायी पोस्ट*  📜

*भाग* - 4⃣5⃣6⃣

*👨‍👩‍👧‍👧गावकुसाबाहेरील मुलांसाठी गावकऱ्यांचा पदर*

By लोकमत न्यूज नेटवर्क | Follow | Published: July 15, 2018

शरद जाधव ।
लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : सुया घे, पोत घे म्हणत भटकणाºया मरिआईवाले समाजातील पिढ्यान् पिढ्या शिक्षणापासून दूर परंपरेच्या अंध:कारात भटकत आहेत. अन्य समाजातील मुलांच्या शिक्षणाचा दरवळ त्यांच्यापर्यंत पोहोचत असला तरी त्यांच्या स्वप्नांना परिस्थितीने तडे जात असल्याचेही वास्तव पाहायला मिळते. बेळंकीतील ग्रामस्थांच्या हृदयाला या मुलांच्या स्वप्नांनी ‘इरादा’ या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून साद घातली आणि गावकुसाबाहेरील या मुलांच्या स्वप्नांना साकार करण्यासाठी त्यांनी त्यांना पदरात घेतले.
दररोज सुया, बिब्बे, पिना, कंगवे, टिकल्या विकून कुटुंबाची होणारी गुजराण...आजच्या आधुनिक जमान्यात सुया, बिब्बे या वस्तूंनाही कमी झालेली मागणी...ज्याचा संपूर्ण गावाला आदर त्या मरिआईचा गाडाही आता विसावलेलाच...त्यामुळे हाताचा आणि पोटाचा मेळ घालताना होणारी घुसमट गावकुसाबाहेरचा मरिआईवाले समाज भोगत असतो.

बेळंकीमध्ये मरिआईवाले समाजातील काही कुटुंबे वास्तव्यास आहेत. या समाजातील छाया भगवान मरिआईवाले या मुलीचे सातवीपर्यंतचे शिक्षण बेळंकीतील जिल्हा परिषद शाळेत पूर्ण झाले. आता पुढेच खरा संघर्ष छायाला अनुभवास येणार होता. तिला हायस्कूलला जाण्याची इच्छा होती. दररोज सुया, बिब्बे, टिकल्या विकून तिची आई कुटुंब चालवित आहे. शाळा नसताना छायासुध्दा आईबरोबर जात असे.

हातावरचे पोट असणाऱ्या उपेक्षित समाजातील छायाला शिक्षणासाठी वह्या, शैक्षणिक साहित्य, गणवेशाचीही भ्रांत होती. त्यामुळे तिला शिक्षण बंद करण्याशिवाय पर्याय नव्हता. ही बाब जिल्हा परिषद शाळेतील उपक्रमशील शिक्षक मनोज बनकर यांनी इरादा सामाजिक संस्थेच्या पदाधिकाºयांना सांगितली. यावर ‘इरादा’चे स्वप्नील कोरे, सुभाष जाधव, डॉ. शरद गायकवाड, अनिरुध्द गवाणे, अक्षय कांबळे, वैभव रणदिवे या तरुणांनी गावातील प्रतिष्ठित नागरिकांशी संपर्क साधत मदतीचे आवाहन केले. या आवाहनाला प्रतिसाद मिळाल्याने ग्रामस्थांनी त्या समाजातील मुलांना वर्षभर पुरेल इतके शैक्षणिक साहित्य वाटप केले.
बेळंकीचे सरपंच राजाराम गायकवाड, माजी सरपंच पांडुरंग कोरे, श्रीराम उद्योग समूहाचे राजू गवाणे, पोलीस पाटील चंद्रकांत पाटील, ग्रामपंचायत सदस्य नेताजी गडदरे, सुरेश कौलापुरे, केंद्रप्रमुख सुभाष पवार, मुख्याध्यापक पुष्पा मुळे, बेळंकी शाळेचे उपक्रमशील शिक्षक मनोज बनकर, नवनाथ नरळे आदींच्या उपस्थितीत छायाला शैक्षणिक साहित्य देण्यात आले. या समाजातील मुलांपर्यंत शिक्षणाची गंगा निरंतर पोहोचविण्याचा इरादा बेळंकीकरांच्या दानशूरपणाचे उदाहरणच ठरले आहे.

*🔸‘त्या’ मुलांना शिक्षित करणार*

परिस्थिती आणि आर्थिक अडचणीमुळे शिक्षण घेण्याची इच्छा असूनही शिक्षणापासून वंचित राहणाºया मुलांना शोधून त्यांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्याचा ‘इरादा’चा एक प्रयत्न सुरू आहे. त्याची सुरुवात छायाच्या शाळाप्रवेशापासून झाली. गावातील मरिआईवाले समाजातील १२ मुले शिक्षण घेत आहेत. इयत्ता ७ वी पर्यंतच्या प्राथमिक शिक्षणानंतर इयत्ता ८ वी ते १२ वी पर्यंतच्या त्यांच्या शिक्षणाची संपूर्ण जबाबदारी ‘इरादा’ने घेतली आहे.

*🔸‘छाया’ ठरणार आदर्श*

बेळंकीतील मरिआईवाले या समाजाच्या संपूर्ण पिढीतील ‘छाया’ ही पहिली मुलगी इयत्ता सातवीपुढील शिक्षण घेत आहे. तिच्यानंतर विविध इयत्तेत आठ ते दहा मुले, मुली शिक्षण घेत आहेत. त्या सर्वांपुढे ‘छाया’ आदर्श ठरणार आहे.

📚📕📗📘📙📔📒📚
*संकलन -* 
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨
📃  *आजची प्रेरणादायी पोस्ट*  📜

*भाग* - 4⃣5⃣5⃣

*👨🏻‍🏫अवलिया शिक्षकाने संपूर्ण गावालाच केले शहाणे*

Published On: Jul 15 2018 3:21PM

दैनिक पुढारी,

नाशिक : जिजा दवंडे

सुविधा नसलेल्या गाव, पाड्यावर नियुक्ती मिळाल्यास शहरी भागात आणि त्यातही घरापासून जवळ बदली करून घेण्यासाठी वरिष्ठ अधिकारी, राजकारण्यांचे उंबरठे झिजविणारे अनेक शिक्षक आपल्या आवती-भोवती सहज दिसून येतात. मात्र, अत्यंत मागास गावात बदली करून घेत अवघ्या चार वर्षांत तेथील विद्यार्थ्यांबरोबरच संपूर्ण गावालाच शहणे करण्याची किमया नाशिक जिल्ह्यातील राजेवाडी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक पंकज दशपुत्रे यांनी साधली आहे. त्यामुळे कधीकाळी मागास आणि उणाड म्हणून ओळखले जाणारे हे गाव आदर्श गाव म्हणून नावारूपाला येऊ पाहत आहे.

नाशिक तालुक्यातील राजेवाडी हे त्र्यंबकेश्‍वर परिसरातील डोंगरमाळावर बसलेलं बाराशे लोकवस्ती असलेला गाव. वनराई लाभल्याने निसर्ग संपन्न आहे. नाशिक शहरापासून जवळ असतानाही या गावाला शहराचा फारसा गंध नव्हता. त्यामुळे शिक्षण, आरोग्य, रोजगार, राहणीमान या सगळ्याच बाबतीत गाव कोसे दूर होते. नेमक्या याच उणिवा हेरून शिक्षक दशपुत्रे यांनी आपल्या शिक्षक कारकिर्दीतील तीन-चार वर्षाचा काळ कळवण तालुक्यात घालविल्यानंतर थेट जिल्हा परिषदेकडून राजेवाडी येथे बदली करण्याची विनंती केली. 31 ऑक्टोबर 2013 मध्ये राजेवाडीत गेलेल्या या अवलिया शिक्षकाने येथील जनतेचे जीवनमान सुधारण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचा परिपाक म्हणून शाळेबरोबरच गावात अमुलाग्र बदल अनुभवायाव येत आहेत. विशेष म्हणजे दशपुत्रे यांनी गाव सुधारणेची कुठल्याही सरकारी निधीवर विसबून  न राहता सामाजिक संस्था, संघटनांच्या मदतीने ही किमया केली आहे. त्याचा हा शाळेबरोबरच गाव सुधारणेचा उपक्रम प्रेरणादायी ठरत आहे.

*🔸स्वच्छतेसाठी दिले 11 रुपयांचे नियमित बक्षीस*

शिक्षणाचे महत्व पटवून देतानाच शाळेत येणारी मुले टापटीप यावीत त्यांना स्वच्छतेचे महत्व कळावे यासाठी दशपुत्रे यांनी विद्यार्थ्यांसाठी शाळेतच दररोज एक स्वच्छ, सुंदर नावाचा उपक्रम सुरु केला. यामध्ये दररोज एका स्वच्छ आणि टापटीप आलेल्या विद्यार्थ्याला अकरा रूपयांचे बक्षीस सुरू केले. त्यासाठी अनेक दिवस स्व:ताच्या खिशातून तर हळूहळू गावातीलच नागरिकांना बोलावून त्यांच्याकडून स्वच्छ विद्यार्थ्याची निवड करून बक्षीस देण्यात आले. तसेच या अकरा रूपयातून दहा रूपयांची साबण आणि एक रूपयांचे चॉकलेट हा नियम घालून दिला.  त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छते विषयी आवड झाली आहे.

*🔸व्यसनमुक्‍तीच्या उंबरठ्यावर*

राजेवाडीचा संपूर्ण परिसर वनराईचा असल्याने या भागात मोह प्रजातीची झाडे मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यापासून निर्माण होणार्‍या दारूचे व्यसन केवळ येथील मोठ्यानाच नाही, तर लहान मुलांनाही चांगलेच जडलेले होते. मात्र, याबाबतही घरोघरी जावून व्यसनामुळे होणारे दुष्षपरिणामाबाबत माहिती देत त्यांनी संपूर्ण गावालाच व्यसनमक्तीच्या मार्गावर नेले आहे. आता गावातील मोठी माणसेही मोहाच्या मोहापासून दूर होऊन झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.

*🔸स्वच्छतेचे हळदी-कुंकू*

पंकज दशपुत्रे यांनी विद्यार्थ्यांनी स्वच्छतेचे धडे देतानाच गावालाही चांगल्या आरोग्यासाठी स्वच्छतेचे धडे दिले आहेत. त्यासाठी त्यांनी स्वतःच्या आई विजया दशपुत्रे यांना बरोबर घेऊन गावात स्वच्छतेचे हळदी-कुंकू हा उपक्रम सुरु केला. यामध्ये गावातील महिलांना एकत्र करून विविध संस्थाच्या माध्यमातून येथील महिलांना हळदी-कुंकासोबत स्वच्छतेची किट भेट दिली. यामध्ये साबण, शाम्पू, तेल अशा स्वच्छतेबाबतच्या साधनांचा समावेश केला. अशा नियमित कार्यक्रमातून प्रत्येक घरात स्वच्छतेची किट पाहचल्याने गावातील गावकर्‍यांना आपोआपच स्वच्छतेची गाडी निर्माण होण्यास मदत होत आहे. हा उपक्रम प्रत्येक महिन्याला घेतला जात आहे.

*🔸अंधश्रद्धा निर्मूलनासाठी जनजागृती*

अज्ञानामुळे गावात मोठ्या प्रमाणावर अंधश्रध्दा जोपासली जात असल्याची बाब लक्षात आल्याने दशपुत्रे यांनी राजेवाडीसह परिसरातील अन्य बुवा-बाबांना एकत्र आणून त्यांच्या प्रमुख उपस्थितीत अंद्धश्रद्धा निर्मूलन समितीचे चमत्काराचे कार्यक्रम घेऊन अंधश्रद्धा कमी करण्यासाठी प्रयत्न केले. असे कार्यक्रम सातत्याने होत असल्याने अंधश्रद्धा कमी करण्यात त्यांना बर्‍याच अंशी यश आले आहे. त्यामुळे गावातील महिला आरोग्याच्या बाबतीत जागरूक झाल्या आहेत.

*🔸पत्र्याच्या शाळेचे इमारतीत रूपांतर*

गावाला शाहणपणाचे धडे देतानाच दशपुत्रे यांनी शाळाची गुणवत्ता सुधारत भौतिकदृष्ट्या कायापालत केला आहे. शाळेत रुजू झाल्यानंतर पत्र्यांच्या दोन खोल्यामध्ये भरणारी शाळा मुबंई येथील एम्पथी फाऊंडेशनच्या मदतीने इमारतीत रूपांतरित झाली आहे. त्यामुळे पावसाळ्यात विद्यार्थ्यांना बसायलाही नीटशी जागा नसलेल्या राजेवाडी शाळेच्या चार खोल्या डिजिटल झाल्या आहेत. तर एक संपूर्ण खोली कॉम्प्युटर रूम बनविण्यात आली आहे. या ठिकाणी 12 संगणकांवर विद्यार्थी शिक्षणाचे धडे गिरवत आहेत. तर एका खोलीत सुसज्ज कार्यालय सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे खासगी शाळेला लाजवेल असे रूप या जि.प. शाळेचे पालटले आहे.

*🔸विद्यार्थ्यांची मनी बँक*

पुस्तकी ज्ञानाबरोबरच विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञान मिळावे यासाठी शाळेतच विद्यार्थ्यांची बँक सुरु करण्यात आली आहे. या बँकेत विद्यार्थी आपल्याकडे आलेले खाऊसाठी असलेल्या पैशातील काही पैसे बँकेत ठेवतात. हे जमा झालेले पैसा विद्यार्थ्यांना पाचवीनंतर शाळा सोडताना बँकेच्या नियमाप्रमाणे व्याजासहीत परत केले जातात. त्यामुळे पुढील शिक्षणासाठी या पैशांचा त्यांना उपयोग होतो. तसेच विद्यार्थ्यांना बचतीची सवय लागत आहे.

*🔸गावकर्‍यांच्या स्वयंरोजगारासाठी प्रयत्न*

गावातील नागरिकांना रोजगार उपलब्ध झाल्यास आर्थिक उन्‍नती होऊनच गावाची प्रगती होणार असल्याची जाणीव झाल्याने दशपुत्रे यांनी गावातील महिलांना स्वयंरोजगारासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. त्यासाठी महिला बचत गट स्थापन करून त्र्यंबकेश्‍वर येथे होमहवनसाठी लागणार्‍या जंगली वनस्पतीच्या काड्या जमा करून  त्या पुजाविधीसाठी विक्रीचा प्रस्ताव त्र्यबंकेश्‍वर देवस्थानाला दिला आहे. यामुळे गावातूनच पर्यावरणाचा र्‍हास न करता पडलेल्या गाड्यातून आर्थक उन्नतीचा मार्ग शोधला आहे. यातून गावकर्‍यांची मोठी उलाढाल होण्याची शक्यता आहे.

*🔸खुले ग्रंथालय संकल्पना*

शाळेत खुले ग्रंथालय संकल्पना राबविण्यात आली असून हे ग्रंथालय विद्यार्थ्यांसाठी नियमित खुले ठेवले जाते. येथे विद्यार्थ्यांना स्वतःच्या हाताने हवी ती पुस्तके घेता येतात. घेतलेली पुस्तके विद्यार्थी वाचन झाल्यानंतर परत आणून ठेवतात. त्यातून विद्यार्थ्यांच्या मनात आत्मविश्‍वास वाढीस लागण्यास मदत झाली आहे. तसेच विद्यार्थ्यांना नियमित अभ्यासाशिवास इतर पुस्तके वाचनाची गोडी निर्माण झाली आहे.

*🔸शाळेसाठी एक कुंडी उपक्रम*

शाळा परिसरात वृक्षलागवड करतानाच रंगीबेरंगी फुलांच्या सजावटीसाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून एक कुंडी राजेवाडी शाळेसाठी उपक्रम राबवून शहरातील विविध सामाजिक संस्थाच्या माध्यमातून अनेक सुंदर वृक्षवेलींची कुंड्या मिळविल्या आहेत. त्यामुळे शाळेत चांगली बाग फुलली आहे.

*🔸शिकारी मुलांना लावली शाळेची गोडी*

आदिवासी समाज असल्याने येथील बहुतेक मुले शाळेत न जाता परंपरागत पध्दतीने जंगल भागात फिरून शिकार करण्यात धन्यता मानत होती. त्यासाठी पालकांकडूनही मुलांना शाळेचा फारसा आग्रह होत नव्हता. त्यामुळे गावात असलेली जिल्हा परिषदेची शाळा असूनही नसल्यागत होती. मात्र, शिक्षक दसपुत्रे यांनी राजेवाडीत आल्यानंतर येथील समाजिक परिस्थितीचा अभ्यास करत तेथील मुलांशी गट्टी जमवून त्यांना शाळेसाठी प्रवृत्त केले. प्रत्येक कुटुंबात जावून शाळेचे आणि शिक्षणाचे महत्व पटवून दिले. त्यामुळे हळूहळू येथील बहुसंख्य मुले शिकार सोडून शाळेकडे वळली.

_*देशाची प्रगती साधताना कुठलाही घटक मुख्य प्रवाहापासून वंचित ठेवता येणार नाही, शहरी आणि ग्रामीण भागातील विशेषता आदिवासी भागातील शिक्षण, आरोग्य, रोजगार याबाबत असलेले मागासलेपण विचार करावला लावणारे आहे. राजेवाडी हे गाव यापैकीच एक आहे. मात्र, केवळ सरकारी योजनांची वाट पाहत बसून या गावांचा कायापालट होणार नाही यांची जाणीव झाल्याने स्व:ता या गावात नियुक्तीची मागणी करून शाळेबरोबरच गावच्या सर्वार्गिण प्रगतीसाठी प्रयत्न करत आहे. येत्या काही वर्षात राजेगाव आदर्श ग्राम म्हणून ओळखले जाईल यांचा पूर्ण विश्‍वास आहे. त्याषवष्टीने काम गरत आहे.*_

- *पंकज दशपुत्रे, शिक्षक,जि.प. शाळा. राजेवाडी, ता.नाशिक*

📚📕📗📘📙📔📒📚
*संकलन -* 
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨
📃  *आजची प्रेरणादायी पोस्ट*  📜

*भाग* - 4⃣5⃣3⃣

*Thai Cave : ‘शेत वाहून गेलं, पण मुलं वाचली ना!’*

साभार - लोकसत्ता ऑनलाइन | July 13, 2018

थायलंमधल्या चिअँग राय गुहेत अडकलेल्या फुटबॉल टीममधील १२ मुलांना गुहेतून बाहेर काढण्यात यश आलं. ही मुलं सुखरुप बाहेर यावी यासाठी जगभरातील लोकांनी प्रार्थना केल्या. संपूर्ण जगाचं लक्ष या बचाव मोहीमेकडे लागून राहिलं होतं. ही बचाव मोहीम सुरू असताना माई चायच्युन यांचं शेत त्यांच्या डोळ्यादेखत वाहून जात होतं. पीकांची नासाडी होत होती. जर शेतच वाचलं नाही तर पुढच्या काळात खाण्याची अबाळ होईल, आर्थिक संकट उभं राहिलं याची जाणीव त्यांना होती. मात्र मुलांच्या आयुष्यापेक्षा त्यांना काहीच महत्त्वाचं नव्हतं. बचाव मोहीम सुरू असताना गेले दोन आठवडे सतत  दर मिनिटांला हजारो लिटर पाणी गुहेतून बाहेर सोडलं जात होतं. या पाण्यामुळे माई यांच्या शेताचं मोठं नुकसान झालं. पाच एकर शेती वाहून गेली.

पण त्या हसत म्हणाल्या, ‘पीक काय पुन्हा घेता येईल. पण या मुलांचा जीव गेला तर मात्र तो परत येणार नाही. म्हणूनच पिकांपेक्षा मला या मुलांच्या जीवाची जास्त काळजी होती. मी जेव्हा शेतात आले तेव्हा दोन फुट पाणी शेतात साचलं होतं. भाताचं पिक वाहून गेलं होतं पण, ही मुलं वाचली याचं मला समाधान आहे.’ असं माई म्हणाल्या. मुलं गुहेत अडकल्याची बातमी समजताच माई हातातली कामं टाकून गुहेकडे धावत गेल्या. गेल्या दहा दिवसांपासून त्या गुहेकडेच थांबल्या होत्या. बचाव मोहीमेसाठी काम करणाऱ्या टीमसाठी आणि इतर लोकांसाठी जेवण तयार करण्याची जबाबदारी त्यांनी स्विकारली.

क्रिकेटर विरेंद्र सेहवाग यानंही नुकताच माईचा फोटो ट्विट करत तिचं कौतुक केलं आहे.

📚📕📗📘📙📔📒📚
*संकलन -* 
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨
📃  *आजची प्रेरणादायी पोस्ट*  📜

*भाग* - 4⃣5⃣2⃣

*⛳थायलंड : गुहेतील मुलांच्या मदतीला धावला ‘सह्याद्री’*

Published On: Jul 11 2018

साभार -सांगली : पुढारी ऑनलाईन

थायलंडमधील थाम लुआंग गुहेत अडकलेल्या मुलांची तब्बल १५ दिवसानंतर सुखरुप सुटका करण्यात बचावपथकाला यश आले. पावसाच्या पाण्यामुळे गुहेतील बाहेर येण्याचे मार्ग बंद झाल्याने २३ जून रोजी गुहेत गेलेली प्रशिक्षकासह १३ मुलांची फुटबॉल टीम गुहेत अडकली होती. त्यांना बाहेर काढण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावरुन मदत केली गेली. यात महाराष्ट्रातील अभियंत्यानेही महत्त्वाची भूमिका पार पाडली. गुहेतील पाणी उपसण्यासाठी किर्लोस्कर ब्रदर्स कंपनीने तयार केलेल्या फ्लड पंपाचा वापर करण्यात आला. त्यासाठी कंपनीचे मीरज येथील अभियंता प्रसाद कुलकर्णी आणि त्यांच्या पथकाने काम केले.  यामुळे मुलांना गुहेतून लवकर बाहेर काढण्यात यश आले.

गुहेतील मुलांच्या बचावकार्यात पावसामुळे अडथळा निर्माण झाला होता. पावसाचा जोर वाढल्याने गुहेतील पाणी पातळीत वाढ होत होती. यामुळे मुलांना बाहेर काढण्यासाठी कदाचित ऑगस्ट किंवा सप्टेंबरपर्यंत वाट पहावी लागली असती. मात्र पाणी उपसण्यासाठी फ्लड पंपांचा वापर केल्याने बचावकार्य वेगाने करता आले. यासाठी थायलंड सरकारने भारत सरकारला विनंती करून किर्लोस्कर ब्रदर्सचे (केबीएल) फ्लडपंप्स पाठवण्यास सांगीतले होते. त्यावर भारत सरकार व किर्लोस्कर कंपनीने युद्ध पातळीवर हालचाल करून डिझाईन प्रमुख व मिरजेचे प्रसाद कुलकर्णी यांची टीम तातडीने (शुक्रवार दि. ०६)  थायलंडला रवाना केली होती.

सांगली जिल्ह्यातील मिरज येथील अभियंता प्रसाद कुलकणी हे फ्लड पंप्स तंज्ञनातील तज्ञ आणि कुशल अभियंता आहेत. गेल्या २५ वर्षांपासून ते किर्लोस्कर कंपनीत काम करत आहेत. थायलंडमध्ये आपल्या अनुभवाचा आणि कौशल्याचा वापर करत प्रसाद कुलकर्णी यांनी गुहेतील पाणी पातळी कमी करण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली. त्यामुळे १२ मुलांची प्रशिक्षकासह सुखरुप सुटका झाली.

📚📕📗📘📙📔📒📚
*संकलन -* 
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨
📃  *आजची प्रेरणादायी पोस्ट*  📜

*भाग* - 4⃣5⃣1⃣

*🌌Thailand Cave Rescue – थायलंडच्या मदतकार्यातील महाराष्ट्राचे कनेक्शन*

_*किर्लोस्कर ब्रदर्समधील इंजिनीअर व फ्लड पंपातील तज्ज्ञ प्रसाद कुलकर्णी (मिरज) बचावकार्यात सहभागी झाले आहेत.*_

By -लोकसत्ता ऑनलाइन | July 10, 2018

ही मुलं 23 जूनपासून गुहेत अडकली आहेत.
थायलंडमध्ये गुहेमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना सोडवण्यासाठी जगभरातून मदतीचा हात पुढे येत आहेत. यामध्ये महाराष्ट्राचीही भर पडली असून किर्लोस्कर कंपनीमध्ये इंजिनीअर असलेले प्रसाद कुलकर्णी थायलंडला रवाना झाले आहेत. डिझाईन हेड असलेले व पाण्याचा उपसा करणाऱ्या पंपांमध्ये तज्ज्ञ असलेले प्रसाद गुहेमध्ये विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी अडसर ठरलेले पाणी काढण्यासाठी थायलंड सरकारला मदत करत आहेत.
प्रसाद यांचे बंधू किशोर कुलकर्णी यांनी लोकसत्ता डॉट कॉमशी बोलताना सांगितले की, प्रसाद किर्लोस्कर कंपनीत इंजिनीअर असून प्रतिकूल परिस्थितीमध्ये पंपांचं काम कसं करावं, मुलभूत सोयी नसताना पंप वापरायचे असतील तर काय करायला हवं आदी तांत्रिक बाबींमधले ते तज्ज्ञ आहेत. त्यामुळे उरलेल्या पाच विद्यार्थ्यांनाही सुखरूप बाहेर काढण्यात प्रसाद यांची मदत होईल असा विश्वास कुलकर्णी यांनी व्यक्त केला.
थायलंडमधे एका दुर्गम व सुमारे दहा किमी लांबी असलेल्या गुहेत बारा मुले व त्यांचा फुटबॉलचा प्रशिक्षक अपघाताने 23 जूनपासून अडकले आहेत. हे 13 जण बेपत्ता झाले होते, परंतु बाहेर आढळलेल्या सायकलींवरून ते आत अडकल्याचे समजले. नंतर ते सगळे जिवंत असल्याचे व अचानक आलेल्या नदीच्या पुरामुळे ते गुहेत अडकल्याचे निष्पन्न झाले. थायलंड सरकारने लगेचच आपत्कालीन यंत्रणा कामाला लावली व मदतकार्य सुरू केले. दुर्दैवानं एका माजी सील कमांडोला आपला जीव गमवावा लागला आहे. आत्तापर्यंत आठ जणांना बाहेर काढण्यात यश आले असून पाच जणांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आतमध्ये पुरेसा ऑक्सिजन व खाद्यपदार्थ पोचवण्यात आले असून त्यांच्या जीवाला धोका नसल्याचे सांगण्यात येत आहे. पुरामुळे फुगलेली नदी व तिच्या पाण्याचे प्रवाह हीच एक अडचण असून तिच्यावर मात करणं सगळ्यात महत्त्वाचं आहे. महाराष्ट्रामधील मिरजेतील किर्लोस्कर ब्रदर्सचे प्रसाद कुलकर्णी व त्यांचा सहकारी मोलाची भूमिका बजावत असून बाकिच्या पाच जणांनाही सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळेल अशी आशा आहे.
महत्त्वाच्या बातम्या
हाय ग्रेड कॅन्सरसाठी सोनालीची 'ही' चूक पडली महागात
4 रुपयांत 55 इंच एलईडी टीव्ही आणि स्मार्टफोन, आजपासून Xiaomi चा धमाकेदार सेल
रणबीर-आलियाच्या रिलेशनशिपविषयी महेश भट्ट काय म्हणाले ऐकलं का?
किर्लोस्कर ब्रदर्सची थायलंडमध्येही शाखा असून त्यांनी सहकार्याचा हात पुढे केला होता. थायलंड सरकारनेही आभार मानत भारत सरकारला विनंती करून किर्लोस्कर ब्रदर्सचे (केबीएल) फ्लडपंप्स पाठवण्यास सांगितले. भारत सरकारने व केबीएलने युद्ध पातळीवर हालचाल करून त्यांचे डिझाईन प्रमुख व मिरजेचे प्रसाद कुलकर्णी यांची टीम तातडीने शुक्रवारी रात्री थायलंडला रवाना केली. थायलंडला पोहोचताच या टीमने लगोलाग कामास सुरूवात केली आणि फ्लड पंप्स सुरू केले आहेत. पाणी उपसा झाल्याचा सुखद परीणाम असा झाला की रविवारी चार मुलांची तर सोमवारी आणखी चार मुलांची गुहेतून सुखरूप सुटका झाली असे किशोर कुलकर्णी यांनी सांगितले.

📚📕📗📘📙📔📒📚
*संकलन -* 
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_

यापूर्वीचे भाग वाचण्यासाठी आपल्या .....

http://guruvarykm.blogspot.in/     

या blog ला भेट द्या..