twitter
rss

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨

🍍🍅 *आरोग्य-MANTRA*  🍋🍉

*भाग* -2⃣6⃣8⃣

*✍ परीक्षेतला आहार 🍛*

साभार - पुणे टाइम्स टीम

परीक्षांचा हंगाम सुरू झाला आहे. आता दिवसागणिक उन्हाचा कडाकाही वाढत जाणार. या काळात हलका आणि ऊर्जादायी आहार घेणं गरजेचं असतं. अनेकांच्या पेपरच्या वेळा दुपारच्या असल्याने खूप जेवण केलं, की आळसावल्यासारखं होतं. त्यामुळेच या काळात आहार आणि झोप यांचा समन्वय साधणं सर्वाधिक गरजेचं असतं. जागरण, अभ्यासाच्या तणावातही योग्य झोप आणि आहार घेतलात तर पेपरला जाताना तुम्हाला उत्साही वाटेल एवढं निश्चित. त्यासाठीच काही गोष्टींची काळजी घ्या आणि निवांत पेपरला सामोरं जा. या तणावांच्या दिवसातही आरोग्य राखण्यासाठी आहाराविषयीच्या या टिप्स.....

या दिवसांमध्ये जंक फूड आणि बाहेरचं तेलकट खाणं टाळा.
परीक्षेच्या काळात दुपारी आणि रात्री जास्तीचा आहार टाळा.
आहाराचं वेळापत्रक ठरवून दर दोन किंवा तीन तासांनी हलका आहार घ्या.
आहारात फळांचा समावेश करा. पेपरला जाण्यापूर्वी लिंबूपाणी आवर्जून घ्या.
जागरणांमुळे अॅसिडिटीचा त्रास होतो. त्यामुळे दिवसाला एका शहाळ्याचं पाणी नक्की घ्या.
पेपरला जाताना एखादी कॅडबरी खाणं उत्तम. त्यासह सोबत ड्रायफ्रूट आणि ग्लुकोजयुक्त बिस्कीटं ठेवा.

🍍🍎🍅🍇🍉🍋🍎🍍

*संकलन -* 
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_

यापूर्वीचे भाग वाचण्यासाठी.....

http://guruvarykm.blogspot.in/

या आपल्या Blog ला भेट द्या  .

*📋 बारावीच्या परीक्षार्थींमध्ये यंदा एक लाखांनी वाढ*

_*राज्यभरात २ हजार ७१० केंद्रांवर परीक्षा घेण्यात येणार आहे.*_

मुंबई | February 28, 2017

महाराष्ट्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्यमंडळ) घेण्यात येणाऱ्या बारावीची परीक्षा आजपासून (मंगळवार) सुरू होत असून यावर्षी राज्यातून १५ लाख ५ हजार ३६५ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा १ लाख १६ हजार परीक्षार्थी वाढले आहेत, अशी माहिती राज्यमहामंडळाचे अध्यक्ष गंगाधार म्हमाणे यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, ठिकठिकाणच्या परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांचे औंक्षण करून स्वागत करण्यात आले.
राज्यमंडळाच्या ९ विभागीय केंद्रांच्या माध्यमातून बारावीची परीक्षा घेण्यात येते. या वर्षी २८ फेब्रुवारी ते २५ मार्च या कालावधीत ही परीक्षा होत आहे. गेली दोन वर्षे दहावीचा निकाल जास्त लागतो आहे. त्याचप्रमाणे दहावीला अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी जुलैमध्येच पुनर्परीक्षा घेण्यात येत असल्यामुळे त्यातील काही विद्यार्थ्यांचे वर्ष वाचते. त्यामुळे आता बारावीच्या परीक्षेसाठी नोंदणी वाढली आहे. यावर्षी १५ लाख ५ हजार ३६५ विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. गेल्यावर्षी ही संख्या १३ लाख ८८ हजार ४६७ होती. दरवर्षी बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत ४० ते ५० हजारांची वाढ होत असते. यावर्षी मात्र १ लाख १६ हजार ८९८ अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी केली आहे. यावर्षी बारावीच्या सुधारित अभ्यासक्रमानुसार ही परीक्षा होत आहे. यावर्षी परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांमध्ये ८ लाख ४८ हजार ९२९ विद्यार्थी आणि ६ लाख ५६ हजार ४३६ विद्यार्थिनी आहेत. राज्यभरात २ हजार ७१० केंद्रांवर परीक्षा घेण्यात येणार आहे.

*शाखानिहाय विद्यार्थीसंख्या*

विज्ञान- ५ लाख ५९ हजार ४२३

कला-५ लाख ९ हजार १२४

वाणिज्य- ३ लाख ७३ हजार ८७०

एमसीव्हीसी- ६२ हजार ९४८

एकूण- १५ लाख ५ हजार ३६५

*📞विद्यार्थ्यांसाठी हेल्पलाइन*.

मुंबई ०२२- २७८९३७५६,

पुणे ०२०- ६५२९२३१६,

नागपूर ०७१२- २५५३५०७,

औरंगाबाद ०२४०- २३३४२२८,

नाशिक ०२५३- २५९२१४३,

कोल्हापूर ०२३१- २६९६१०३,

अमरावती ०७२१- २६६२६०८,

लातूर ०२३८२- २२८५७०,

कोकण ०२३५२- २३१२५०

🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃

आजपासून बारावीची परीक्षा*
Maharashtra Times | Updated Feb 28, 2017
म. टा. प्रतिनिधी, मुंबई
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणारी बारावी बोर्डाची परीक्षा मंगळवारपासून सुरू होत आहे. यंदा या परीक्षेसाठी सुमारे १५ लाख ५ हजार विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी केली असून यंदा मुंबई विभागातून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ६ टक्क्यांनी वाढली आहे. राज्यातील एकूण ९ हजार १४३ ज्युनिअर कॉलेजातील विद्यार्थी यंदा ही परीक्षा देणार आहेत.
*आऊट ऑफ टर्नचा पर्याय*
बारावीच्या परीक्षेदम्यान कोणत्याही विद्यार्थ्याला ऐनवेळी काही वैद्यकीय अथवा इतर काही अपरिहार्य कारणांमुळे प्रात्यक्षिक परीक्षेच्या कालावधीत या प्रात्यक्षिक परीक्षेला बसता आले नाही, त्यांना पुन्हा एक संधी देण्याचा मंडळाने नवीन पर्याय यावेळी दिला आहे. ही परीक्षा २७ ते २९ मार्च या कालावधीत जिल्हानिहाय केंद्रावर घेतली जाईल.
*शिक्षकांना मोबाइल बंदी*
गेल्यावर्षी बारावी परीक्षे दरम्यान बुक किपींग या विषयाचा पेपर परीक्षा सुरू होण्याच्या वेळेत व्हॉटस अॅपवर आढळून आला होता. याची गंभीर दखल घेत यंदा परीक्षा केंद्रातील परिक्षकांना मोबाइल बंदीचा निर्णय बोर्डातर्फे घेण्यात आला आहे. या निर्णयाची सक्तीची अंमलबजावणी करण्याची सूचना सर्व विभागीय मंडळांना देण्यात आल्या आहेत.


✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨
  *आजची प्रेरणादायी पोस्ट*  
*भाग* -3⃣4⃣2⃣
*आमुच्या मनामनात दंगते…...!*
Maharashtra Times
*_इंग्रजी व्यवहाराची भाषा असल्याने मराठी भाषा मागे पडल्याचं नेहमी बोललं जातं. पण मराठी भाषा तुम्हाला उत्तम रोजगार मिळून देऊ शकते हे काळींनी आपल्या कर्तृत्वातून दाखवून दिलं आहे. अशाच काही मंडळींविषयी…!_*
उत्कृष्ट भाषांतरकार, कॉपी रायटर, कवयित्री असणाऱ्या *आदिती जहागिरदार* यांनी आपल्या लेखणीची जादू दाखवून दिली आहे. तिने आत्तापर्यंत अनेक उत्कृष्ट गाणी लिहिली आहेत. तसंच जाहिरात कंपन्यांसाठी कॉपी रायटर म्हणून देखील तिने काम केलं आहे. 'मनोगंध' नावाचं तिचं पुस्तक देखील प्रकाशित झालं आहे. मराठी लघुपट तसंच मराठी आणि हिंदी चित्रपटांसाठी तिने गाणी लिहिली आहेत. मराठी विषयात एमए करणाऱ्या अदितीने स्वतंत्र अल्बम आणि वेबसीरिजसाठी देखील काम केलं आहे. आपल्या भाषेतील नैपुण्याच्या बळावर अदिती आज स्वतःच्या पायावर ठामपणे उभी आहे. याबाबत ती सांगते की, " ‘लिखाणाच्या क्षेत्रात आज अनेक संधी उपलब्ध आहेत. कल्पक विचार आणि ते मांडण्यासाठी मराठीचं सखोल ज्ञान असेल तर इथे यश नक्कीच मिळू शकतं. मात्र अनेक मराठी तरुण-तरुणींना या क्षेत्राच्या विस्ताराची माहिती नसते. त्यामुळे संधी असूनदेखील त्याचं सोनं करण्यात आपण मागे पडतो. भाषेवर प्रभुत्व असणाऱ्या आणि वेगळा विचार करणाऱ्या सर्जनशील लोकांना इथे खूप मागणी आहे याची नोंद घेणं आवश्यक आहे.'


✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨
 *आरोग्य-MANTRA*  
*भाग* -2⃣6⃣7⃣
संपूर्ण आयुर्वेद लिहिलंय शॉर्ट मध्ये,
हे वाचल्यावर अक्षरशः काही वाचायची गरज नाही!
वाचा आणि पालन करा.
|| शरीराला आवश्यक खनिजं ||
*कॅल्शिअम*
कशात असतं?
शेंगदाणे, तीळ, दूध, खोबरं, मुळा, कोबी. ज्वारी, राजगिरा, खरबूज, खजूर
कमतरतेमुळे काय होतं?
हृदयरोग, ऑस्टियोपोरोसिस, दंतरोग, केस गळणे
कार्य काय असतं?
शरीरातील सर्वात मुख्य खनिजं असून ते हाडांची मजबुती आणि शरीराच्या निर्मितीसाठी आवश्यक असतं.
फेसबुक/पुणेरी टोमणे
*लोह*
कशात असतं?
खजूर, अंजीर, मनुका, सफरचंद, डाळिंब, पालक, सीताफळ, उस, बोर, मध, पपई आणि मेथी
कमतरतेमुळे काय होतं?
शरीरात रक्ताची कमतरता भासते. अशक्तपणा, कावीळ किंवा पोटात मुरडा येतो.
कार्य काय असतं?
शरीराच्या वाढीसाठी अतिशय आवश्यक असतं.
फेसबुक/पुणेरी टोमणे
*सोडिअम*

⛳बारावीच्या परीक्षांमुळे मुंबई येथे होणाऱ्या मराठा क्रांती मोर्चाला स्थगिती*

*'विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन मराठा क्रांती मोर्चा समितीने घेतला निर्णय'*

मुंबई | February 26, 2017 7:10 PM

परीक्षांमुळे मोर्चा स्थगित करण्यात आल्याचे संयोजकांनी म्हटले
बारावीच्या परीक्षांमुळे मराठा क्रांती मोर्चाला तूर्तास स्थगिती देण्यात आली असल्याचे मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी म्हटले आहे. ६ मार्च रोजी मुंबईमध्ये मोर्चा आयोजित करण्यात आला होता. पुढील तारिख बैठकीनंतर जाहीर करण्यात येईल असे या मोर्चाचे समन्वयक विनोद पोखरकर यांनी म्हटले. मराठा क्रांती मोर्चा ज्या दिवशी होणार आहे त्या दिवशी बारावीची परीक्षा आहे. त्यामुळे परीक्षा होईपर्यंत मोर्चे काढले जाणार नसल्याचे वृत्त आहे. ६ मार्च रोजी बारावीच्या विद्यार्थ्यांचा गणित, सांख्यिकी आणि हिंदीचा पेपर आहे. मराठा क्रांती मोर्चा या दिवशी झाला असता तर विद्यार्थ्यांना अडचण झाली असती. त्या दिवशी महाराष्ट्रातून लाखो लोक येणार होते. तसेच या दिवशी दुचाकी रॅली काढण्यात येणार होती. असे झाले असते तर विद्यार्थ्यांना वाहतुकीमध्ये अडकण्याचा धोका वाटत होता. विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेऊन समन्वय समितीने हा मोर्चा पुढे ढकलला असल्याचे म्हटले जात आहे. त्या दिवशी पेपर असल्यामुळे पालकांनी शिक्षण मंत्री यांच्या कानावर देखील हा प्रश्न घातला होता.

कोपर्डी बलात्काराच्या घटनेच्या निषेधार्थ आणि मराठा समाजाच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी राज्यभर मराठा समाजाचे मूक मोर्चे काढण्यात आले होते. या मोर्चात लाखोंच्या संख्येने लोक सहभागी होत असून अत्यंत शांततेत व शिस्तबद्ध निघणारे हे मोर्चे देशभर चर्चेचा विषय ठरले आहेत. विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान मराठा समाजाच्या मोर्चाचे वादळ उपराजधानी नागपूरमध्ये धडकले होते. मराठा समाजाच्या मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी विधान भवनावर मराठा-कुणबी मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चासाठी विदर्भासह उर्वरित महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणावर समाजबांधव आले होते. या मोर्चाचे नेतृत्व तरुणींनी केले. विशेष म्हणजे या मोर्चात सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी सहभागी झाले होते. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, त्यांना नोकरीमध्ये संधी मिळावी ही मागणी देखील होत आहे. याआधी निवडणूक असल्यामुळे मोर्चांना स्थगिती देण्यात आली होती. निवडणूक संपल्यानंतर हा मोर्चा निघणार होता परंतु मुलांच्या परीक्षांमुळे हा मोर्चा पुढे ढकलण्यात आला आहे.

🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃

🌱शिष्यवृत्ती’साठी चक्क भारतीय बैठक!*

Maharashtra Times | Updated Feb 27, 2017

*जटवाड्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांना रविवारी शिष्यवृत्ती परीक्षा जमिनीवर बसून द्यावी लागली.*

म. टा. प्रतिनिधी, औरंगाबाद

शिक्षण विभागाच्या नियमानुसार परीक्षेत विद्यार्थ्यांना बसवण्यासाठी बाकांची व्यवस्था असावी. केंद्र देखील जवळ असावे, असा नियम आहे, मात्र रविवारी झालेल्या पाचवी आणि आठवीच्या पहिल्याच शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थ्यांना चक्क जमिनीवर बसून पेपर सोडवावा लागला. त्यामुळे उत्तरपत्रिका लिहिताना अवघडल्यासारखे झाल्याची प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी व्यक्त केली, तर आडवळणात दिलेले परीक्षा केंद्र शोधणे देखील अवघड झाल्याचे पालकांनी सांगितले.

गेल्यावर्षी शिष्यवृत्ती परीक्षा झाली नव्हती, मात्र शासनाने यंदापासून चौथीऐवजी पाचवी आणि सातवीऐवजी आठवीसाठी शिष्यवृत्ती परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेने नव्या नियमानुसार पाचवी आणि आठवीसाठी पहिली शिष्यवृत्ती परीक्षा आज औरंगाबाद जिल्ह्यातील ३३३ केंद्रांवर घेण्यात आली. प्राथमिक व माध्यमिक या दोन्ही परीक्षांसाठी ५३ हजार ६१६ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. पाचवीसाठी ३० हजार ३०२, तर माध्यमिक म्हणजे आठवीसाठी २३ हजार ३१४ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. जिल्ह्यातील ९ तालुक्यांमधून प्राथमिकची परीक्षा १८३ परीक्षा केंद्रांवर, तर पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा आठवीसाठी १५० केंद्रांवर विद्यार्थ्यांची व्यवस्था करण्यात आली होती. सकाळी ११ ते सायंकाळी ५पर्यंत अशा दोन सत्रात हे पेपर होते. ओव्हर जटवाडा येथील जिल्हा परिषद केंद्रीय शाळा ओव्हर जटवाडा आणि भारतमाता नगर बीड बायपास येथील स्व.शि वनारायण जैस्वाल प्राथमिक विद्यालयात विद्यार्थीसंख्येच्या तुलनेत सुविधांचा अभाव होता. मुलांना पेपर सोडविण्यासाठी खाली बसवण्यात आले होते. शिवनारायण जैस्वाल शाळेकडे जाण्यासाठी नीट रस्ता नाही. बसायला बाक नाहीत. काही विद्यार्थी बाकांवर, तर काहींना त्यामुळे खाली बसून परीक्षा द्यावी लागली. जमिनीवर बसून लिहिताना अवघडल्यासारखे होत असल्याची प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिली.

वर्षभर तयारी करायची, परीक्षेसाठीचे शुल्क भरायचे, निमानुसार विद्यार्थ्यांना सुविधा असायला हव्यात. मुलांना खाली बसावे लागले. जटवाडा येथे केंद्रप्रमुखांना विचारणा केली असता त्यांनी व्यवस्थित उत्तरे दिली नाहीत, असे पालकांनी सांगितले.

🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃

🖥  सरकारी कार्यालयांचा ‘युनिकोड’ला ठेंगा*

Maharashtra Times | Updated Feb 27,2017

AAAChintamani.Patki

@timesgroup.com
Tweet : @chintamanipMT

पुणे : कम्प्युटर, मोबाइल, तसेच टॅब या साधनांवर सहज-सोप्या मराठीसाठी युनिकोडचा वापर वाढला असला तरी सरकारी कार्यालये जुनाट कारभारातून बाहेर आलेली नाहीत. आजही बहुसंख्य कार्यालयांचे काम अवघड अशा मराठीत चालू आहे. त्यामुळे एखादी फाइल पुढे पाठवताना फाँटचा प्रश्न निर्माण होतो आहे. युनिकोड वापरणे अनिवार्य या सरकारच्या आदेशाला सरकारी कार्यालयांनीच ठेंगा दाखवला आहे.

सरकारी कामकाजात मराठी वापर वाढावा, तसेच सोपी व सुस्पष्ट भाषा असावी, यासाठी युनिकोड ही संकेतप्रणाली वापरण्याचे सरकारचे धोरण आहे. सरकारी कार्यालयातील मराठी अवघड असल्याने ती सोपी करण्याबरोबरच आधुनिक करण्यासाठी हे धोरण आखण्यात आले होते. मात्र सरकारी कार्यालयांनी आपला जुनाट कारभार बदलेला दिसून येत नाही. राज्याची सर्व प्रमुख शिक्षण कार्यालये पुण्यात असून या सर्व कार्यालयांमध्ये जुन्या पद्धतीने काम केले जाते.

कम्प्युटरच्या पडद्यावर मराठी मजकूर दिसण्यासाठी, तसेच मजकूर मुद्रित करून घेण्यासाठी आवश्यक असणारे युनिकोड-आधारित मराठी फाँट संख्येने बरेच कमी प्रमाणात उपलब्ध आहेत. तसेच त्यातील बहुसंख्य फाँट महाराष्ट्र सरकारने मान्य केलेल्या वर्णमाला-वर्णलिपीविषयक शासन निर्णयात निकषांप्रमाणे नसल्यामुळे ४ ते ५ देखणे युनिकोड आधारित मराठी फाँट तयार करण्याचे काम सरकारची राज्य मराठी विकास संस्था करत आहे. हे फाँट नागरिकांना मोफत उपलब्ध करून देण्याचे काम संस्थेने हाती घेतले आहे. यापैकी दोन फाँटचे काम पूर्ण झाले असून ते संस्थेच्या वेबसाइटवर उपलब्ध आहेत. महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृत्यर्थ या दोन फाँटना ‘यशोमुद्रा’ आणि ‘यशोवेणू’ अशी नावे देण्यात आली आहेत. पुण्याच्या सीडॅक या संस्थेने ही निर्मिती केली आहे. महाराष्ट्र सरकारनेही कम्प्युटरवर मराठी भाषेचा वापर वाढावा यासाठी युनिकोड वापरून काम करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत.

मंत्रालयात सर्वत्र युनिकोड वापरली जात आहे. ती वापरात नसेल, तर भाषेत तांत्रिक चुका होतात. हे टाळण्यासाठी राज्यभरातील विविध सरकारी कार्यालयांमध्ये युनिकोडचे प्रशिक्षण देण्यात येत आहे.

- महेश कुलकर्णी, सहसंचालक, सीडॅक

युनिकोडच्या वापरासाठी कार्यशाळा घेण्यात येत आहेत. तसेच युनिकोडसाठी मराठी राजभाषा दिनाच्या निमित्ताने एक माहितीपट तयार केला असून तो सर्वांपर्यंत पोहचवत आहोत.

- डॉ. आनंद काटीकर, संचालक, राज्य मराठी विकास संस्था

🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃

📋महाराष्ट्र सीईटी परीक्षा ११ मे ला होणार*

Last Updated: Sunday, February 26, 2017

मुंबई : राज्यातील इंजिनिअरिंग आणि मेडीकल अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षाच्या प्रवेशासाठी अनिवार्य असलेली सीईटी परीक्षा ११ मे रोजी होणार आहे. सीईटी परीक्षेचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरले जात आहेत.

सीईटी अर्ज भरण्याची मुदत २३ मार्चपर्यंत ठेवण्यात आली आहे. या परीक्षेसाठी सर्वसाधारण प्रवर्गासाठी ८०० रुपये तर मागास प्रवर्गासाठी ६०० रुपये परीक्षा शुल्क असणार आहे.

🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃

आरटीईला मुदतवाढ २ मार्चपर्यंत*
Maharashtra Times | Updated Feb 26, 2017
नागपूर : आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील बालकांसाठी राबविण्यात येत असलेल्या आरटीई प्रक्रियेंतर्गत ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. आरटीईंतर्गत प्रवेश घेण्यासाठी पालकांना आता २ मार्चपर्यंत अर्ज सादर करता येणार आहे.
आरटीईसाठी ऑनलाइन अर्ज सादर करण्याची प्रक्रिया ९ फेब्रुवारीपासून सुरू करण्यात आली. राज्यस्तरावरील https://rte25admission.maharashtra.gov.in या संकेतस्थळाच्या माध्यमातून पालकांना आपल्या पाल्यांचे अर्ज सादर करता येणार आहेत. याआधी हे अर्ज सादर करण्यासाठी २५ फेब्रुवारीपर्यंतची मुदत देण्यात आली होती. मात्र, अधिकाधिक बालकांना या प्रक्रियेत समाविष्ट होता यावे, यासाठी प्रक्रियेला मुदतवाढ देण्यात आली आहे. आता पालकांना २ मार्चपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करता येणार आहेत. पालकांच्या आणि त्यांच्या संघटनांच्या मागणीनंतर ही मुदतवाढ करण्यात आली असल्याचे प्राथमिक विभागाचे शिक्षण संचालक गोविंद नांदेडे यांनी सांगितले.
जिल्ह्यातील विविध ठिकाणी असलेल्या केंद्रांमधून पालकांनी आरटीईचे अर्ज भरण्यास प्रारंभ केला आहे. हे अर्ज भरण्यासाठी आरटीईच्या संकेतस्थळावर सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी विविध शाळांमध्ये २५ टक्के जागा राखून ठेवण्यात येतात.


✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨
 *आरोग्य-MANTRA*  
*भाग* -2⃣6⃣6⃣
* ऊन वाढतंय... म्हणून......*
थंडीला निरोप देता देता वातावरण काहीसं उन्हाळा-हिवाळा झालं आणि सध्या अचानक उन्हाचा कडाका वाढल्याचं चित्र आहे. दुपारी घराबाहेर पडताना अनेकांना सूर्यमहोदयांचं तापणं त्रासदायक ठरत असल्याचं चित्र आहे. कोही छोट्या गोष्टींची काळजी घेतलीत; तर हा कडाका काही प्रमाणात का होईना सुसह्य होईल. ऊन वाढतंय; म्हणून या गोष्टींचा वापर घराबाहेर पडताना आवर्जून करा.

🚌  शाळेच्या बसेससाठी नवी मार्गदर्शक तत्त्वे*

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

विद्यार्थ्यांचा प्रवास अधिक सुरक्षित व्हावा यासाठी सीबीएसईने प्रसिद्ध केलेल्या नव्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार शाळेच्या बसेसमध्ये जीपीएस आणि सीसीटीव्ही बसवणे बंधनकारक असेल. केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या सूचनेनुसार ही मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यात आली आहेत. उत्तर प्रदेशात शाळेच्या बसला झालेल्या अपघातनंतर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

‘सर्व बसेसच्या खिडक्यांना तारांच्या जाळ्या लावणे बंधनकारक असले, तसेच बसचा वेग जास्तीतजास्त ४० असावा. प्रत्येक बसमध्ये जीपीएस प्राणली आणि सीसीटीव्ही असावेत. सर्व बसेस कायम सुस्थितीत असाव्यात,’ असे सीबीएसईच्या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.
‘बसला अपघात अथवा विद्यार्थ्यांना इजा झाल्यास शाळेच्या व्यवस्थापनाला आणि मुख्याध्यापकांना जबाबदार धरण्यात येईल. सर्व बसेसमध्ये गजर आणि भोंगा असणे बंधनकारक आहे. शिक्षकांनीही या सूचनांचे पालन होईल याकडे लक्ष द्यावे. तसेच प्रत्येक बसमध्ये योग्य व्यवस्था आहे, याची खात्री करून घेण्यासाठी किमान एका पालकाने उपस्थित राहवे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी एक व्यवस्थापक आणि प्रशिक्षित महिला कर्मचारी नियुक्त करण्यात यावी. बसमध्ये एक मोबाइल फोन असावा. बसमधील सुविधांबाबत विद्यार्थ्यांकडून अभिप्राय घेतला जाईल,’ असेही या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.

🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃

🌱तहसीलपुढे मृतदेह ठेवून शिक्षकांचे आंदोलन*

सकाळ वृत्तसेवा
09.48 AM

एटापल्ली (जि. गडचिरोली)

   - वैद्यकीय प्रमाणपत्र देऊनही रजा मंजूर न करता निवडणुकीच्या कामावर सक्तीने पाठविलेल्या एका शिक्षकाचा मृत्यू झाला.त्यामुळे संतप्त शिक्षकांनी गुरुवारी (ता. 23) एटापल्ली येथील तहसील कार्यालयासमोर शिक्षकाचा मृतदेह ठेवून चार तास आंदोलन करून दोषींवर कारवाईची मागणी केली.

आंदोलनात हजारो शिक्षक सहभागी झाले होते. एटापल्ली तालुक्‍यातील भगवंतराव आश्रम शाळा, भापडा येथील शिक्षक नामदेव ओकटु ओंडरे यांचा रक्तदाब वाढल्याने चंद्रपूर येथे उपचारादरम्यान बुधवारी मृत्यू झाला. ओंडरे यांनी प्रकृती चांगली नसल्याने निवडणुकीच्या कामावर पाठवू नये, अशा विनंतीचा अर्ज केला होता. सोबतच वैद्यकीय प्रमाणपत्रही जोडले होते. मात्र, त्यानंतरही ओंडरे यांना निवडणुकीच्या कामासाठी पाठविण्यात आले. मतदान प्रक्रियेसाठी गेदा ते एटापल्ली असा सोळा किलोमीटरचा प्रवास ओंडरे यांना चालत करावा लागला. यातच प्रकृती खालावल्याने त्यांना एटापल्लीतील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती गंभीर झाल्याने चंद्रपूरला हलविण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. रस्त्यात विश्रांती घेण्याचा प्रयत्न केला असता पोलिस उपनिरीक्षक विश्राम मदने यांनी मारहाण केल्याचा आरोप मृत ओंडरे यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.

ओंडरे यांच्या मृत्यूची चौकशी करून दोषींवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत त्यांच्या नातेवाइकांनी गुरुवारी तहसील कार्यालयासमोर मृतदेह ठेवून आंदोलन केले. आंदोलनात जिल्ह्यातील हजारो शिक्षक सहभागी झाले होते. उपविभागीय अधिकारी व उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांना लेखी आश्वासन दिल्यानंतर मृत्युमुखी पडलेल्या शिक्षकावर बुर्गी या गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. शिक्षकाच्या मृत्यूला जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिक्षक संघटनेने दिला आहे.

🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃

📚 पुस्तकांचे गाव अजूनही दूरच*

*यंदाच्या मराठी भाषा दिनीही प्रत्यक्षात नाही*

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई

मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने दोन वर्षांपूर्वी दिलेले पुस्तकांच्या गावाचे आश्वासन प्रत्यक्षात येईल, अशी मराठी वाचकांची अपेक्षा होती. मात्र हे गाव वसण्याचा मुहूर्त यंदाही मराठी भाषा दिनी प्रत्यक्षात येणार नाही, असे चित्र आहे. पाचगणीपासून जवळ असलेले हे भिलार हे पुस्तकांचे गाव प्रत्यक्षात यायला आणखी किमान दोन-अडीच महिने लागतील, अशी माहिती मराठी भाषामंत्री विनोद तावडे यांनी दिली. पुस्तकांच्या गावाचे काम लांबण्यासाठी मुंबई महापालिकेच्या निवडणुका आणि भिलार जिल्हा परिषद निवडणुका काही प्रमाणात कारणीभूत ठरल्याचे सांगण्यात येत आहे.

‘पुस्तकांचे गाव’ या प्रकल्पाअंतर्गत भिलारमधील घरे निवडण्यात आली आहेत आणि त्यांना अंतिम मान्यता मिळाली आहे. त्याशिवाय थीमनुसार पुस्तक खरेदीसाठी बैठकाही झाल्या आहेत. या प्रकल्पासाठी अपेक्षित असलेली पुस्तके सर्व प्रकाशकांकडून महिन्याभरात खरेदी करण्यात येतील, अशी माहिती तावडे यांनी दिली. याबद्दल प्रकाशकांशी चर्चाही झाली आहे. घरांनाही पुस्तकांच्या गावाच्या संकल्पनेला साजेशी रंगरंगोटी करण्याबद्दल निर्णय झाला आहे. त्याचप्रमाणे या गावामध्ये शिल्पे उभारण्यात येणार आहेत. या शिल्पांच्या किमतीबद्दल चर्चा सुरू आहे. आयआयटीकडून या जमिनीचे सर्वेक्षणही झाले आहे. त्यामुळे गावाचे काम अंतिम टप्प्यात आहे, असे सांगण्यात येत आहे.

भाषामंत्री विनोद तावडे महापालिका निवडणुकीत, तर भिलारमधील स्थानिक जिल्हा परिषद निवडणुकांच्या तयारीत अडकले होते. त्यामुळे प्रकल्पाचे काम अपेक्षितरित्या पुढे सरकू शकले नाही. त्याचबरोबर २७ फेब्रुवारीला मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने गेट वे ऑफ इंडियावर भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईप्रमाणाचे राज्यात विविध ठिकाणी विद्यापीठांच्या मदतीने मराठी भाषा दिनाचे कार्यक्रम आखण्यात आले आहेत. या कार्यक्रमांमध्येही अनेक जण अडकल्याने पुस्तकांच्या गावाचे काम करायला पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध झाले नाही. मात्र मराठी भाषा दिनाचे कार्यक्रम झाला की पुन्हा एकदा त्याच उत्साहाने पुस्तकांच्या गावाचा प्रकल्प पुढे नेला जाईल, असे आश्वासन या निमित्ताने दिले जात आहे.

मालगुंड प्रकल्पही ‘लवकरच’

भिलारचे पुस्तकांचे गाव साकारले की, मग कोकणातील मालगुंडच्या पुस्तकांच्या गावाच्या प्रकल्पालाही दिशा मिळू शकेल. यासंदर्भात कोकण मराठी साहित्य परिषदेने ‘एक तुतारी’ या सध्या कोकणात सुरू असलेल्या उत्सवाच्या निमंत्रणाच्या वेळी तावडे यांच्याकडे विचारणा केली होती. तेव्हा या उत्सवादरम्यान याबद्दल चर्चा करण्याचे आश्वासन तावडे यांनी दिल्याचे कोमसापकडून सांगण्यात आले आहे.

🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃

💶 *देशभरातील प्राध्यापकांना सातव्या वेतन आयोगात २० टक्के वाढीची शिफारस*

*अहवालात २० टक्के वाढीची शिफारस केल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.*

वार्ताहर, यवतमाळ  | February 25, 2017

देशातील प्राध्यापकांना सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी युजीसीने गठीत केलेल्या वेतन पुनíनर्धारण समिती (पीआरसी) ने युजीसीला सादर केलेल्या  अहवालात २० टक्के वाढीची शिफारस केल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. ७ फेब्रुवारीला पीआरसीने अहवाल सादर केला होता. तो आयोगाने केंद्र सरकारच्या मानव संसाधन विकास मंत्रालयाला सादर केल्यावर मंत्रालय आयोगाच्या शिफारसी स्वीकारणार असल्याचेही वृत्त आहे.
प्राध्यापकांची कामावर आधारित पदोन्नती पध्दत आणि संशोधनावर विशेष भर या शिफारशींमध्ये देण्यात आला आहे. प्राध्यापकांचे सेवानिवृत्ती वय ६५ राहील, असे म्हटले आहे. सातव्या वेतन आयोगाचा लाभ देशातील केंद्रीय विद्यापीठातील ३० हजार आणि इतर राज्यांमधील विद्यापीठातील व संलग्न खासगी अनुदानित महाविद्यालयांमधील ४ लाखांवर प्राध्यापकांना मिळणार आहे. आयोगाच्या शिफारशी १ जानेवारी २०१६ पासून लागू करण्यात याव्या, असेही युजीसीने म्हटले आहे. सहायक प्राध्यापकाला ५९ हजार रुपये, सहयोगी प्राध्यापकाला १ लाख २६ हजार आणि प्रोफेसरला १ लाख ४४ हजार रुपये वेतन सातव्या वेतन आयोगात मिळेल. युजीसीच्या शिफारशी केंद्र सरकारने लागू केल्यास त्या राज्यांना स्वीकारणे बंधनकारक नाही, तरीही सामान्यत राज्य सरकारे त्या स्वीकारत असतात. महाराष्ट्र सरकारने सहावा वेतन आयोग लागू केला होता. त्यामुळे सातवा आयोगही लागू करणार आहे. उज्जन येथे पीआरसीची शेवटची बठक झाल्यावर हा अहवाल ७ फेब्रुवारीला सादर करण्यात आला होता. उल्लेखनीय म्हणजे, येथे ३१ जानेवारी २०१७ पर्यंत अहवाल सादर न केल्यास एआयफुक्टो राष्ट्रव्यापी आंदोलन करणार असल्याचा इशारा या संघटनेच्या राष्ट्रीय कार्यकारी परिषदेने समितीला ३ फेब्रुवारीला दिल्यावर आठवडाभरात अहवाल सादर होईल, अशी हमी समितीने दिल्याची माहिती एमफुक्टोचे उपाध्यक्ष डॉ. प्रवीण रघुवंशी यांनी शुक्रवारी लोकसत्ताला दिली.

🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃

🎳🎲 टाकाऊ वस्तूंपासून शैक्षणिक साहित्य*

By pudhari | Publish Date: Feb 25 2017

पिंपरी : पूनम पाटील

सध्या बाजारात नवनवीन तंत्रज्ञानावर आधारित शैक्षणिक साहित्य उपलब्ध असून,   त्याद्वारे मुलांना शिकवणे सोपे झाले आहे; मात्र असे असताना घरातील टाकाऊ वस्तूंचाच प्रभावीपणे शैक्षणिक साहित्य म्हणून वापर करून मुलांना हसत- खेळत शिक्षण देण्याचा प्रयत्न चिंचवड येथील शिक्षिका योगीता परबत या करत आहेत.

परबत या थेरगाव येथील  यशवंतराव चव्हाण प्राथमिक शाळेत प्राथमिक शिक्षिका आहेत. गेल्या तीन वर्षांपासून त्या विविध टाकाऊ वस्तूंवर  वैविध्यपूर्ण प्रयोग करत मुलांना शिक्षणाची गोडी लावण्याचे काम करत आहेत.  सर्वप्रथम त्यांनी संक्रांतीच्या सणाला वापरण्यात येणार्‍या बोळक्यांचा शैक्षणिक  साहित्य म्हणून प्रयोग सुरू केला. इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांना त्यांनी ही बोळकी टिकल्या व रंगांच्या साह्याने रंगवायला सांगितली. त्यानंतर त्यावर घोटीव कागदापासून बनवलेली कमळाची फुले ठेवली. वर्ग सजावटीसाठी या बोळक्यांचा  वापर होई शकतो, हे त्यांनी सर्वप्रथम मुलांना पटवून दिले. त्यानंतर डिसेंबर महिना संपल्यानंतर  जुने कॅलेंडर काढल्यानंतर त्याचे करायचे काय हा प्रश्‍न पडतो.  त्यावर त्यांनी एक नवीन प्रयोग म्हणून कॅलेंडरवरील तारखा व्यवस्थित कापून बोळक्यांवर चिकटवल्या. त्यातून त्यांनी विद्यार्थ्यांना एकक, दशकाची संकल्पना शिकवण्यास सुरवात केली. संख्यांचा चढता, उतरता क्रम, त्यांची स्थानिक किंमत, संख्यांचे विस्तारीत रूप या संकल्पना समजावून सांगण्यासाठी या बोळक्यांचा खूप उपयोग होतो, हे परबत यांनी पटवून दिले.

बोळक्याप्रमाणेच घरगुती हळदी- कुंकू व समारंभातील वापरात नसलेल्या प्लॅस्टीकच्या ग्लासचा वापरही शैक्षणिक साहित्य म्हणून परबत यांनी करण्यास सुरुवात केली. त्यावर कॅलेंडरच्या तारखा चिकटवून संख्या मोजणीसाठी त्याचा उपयोग विद्यार्थी करत आहेत. त्याचप्रमाणे निरुपयोगी पृष्ठ्यांचे नळकांडे बनवून त्यावर कोलाज काम करून त्याचे

फ्लॉवरपॉट बनवणे, तसेच घरी किंवा शाळेत वृत्तपत्रांबरोबर येणारे जाहिरातीचे कागदांपासून    वर्गसजावटीसाठी आकर्षक चक्रे बनवण्याचे प्रशिक्षण मुलांना देत असल्याचे परबत यांनी सांगितले.

पर्यावरणपूरक कोपर्‍यांची निर्मिती

परबत या नेहमी प्रात्यक्षिकांद्वारे मुलांना शिक्षण देण्याचा प्रयत्न करतात. त्याचाच एक भाग म्हणून विद्यार्थ्यांना पर्यावरणाचे महत्त्व समजावून सांगण्यासाठी त्यांनी वर्गातच पर्यावरण कोपर्‍यांची निर्मिती केली आहे. या कोपर्‍यांत त्यांनी ज्वारी, बाजरी, द्विदल धान्य व चिनी गुलाबाची लागवड करून त्याद्वारे मुलांना बीजारोपण कसे करावे, तसेच रोपांत बदल कसे होतात याबरोबरच प्रकाश संश्‍लेषणाची प्रक्रियाही समजावून सांगितली जाते.  या पद्धतीने शिकवल्यास मुलांना कुठलीही गोष्ट त्वरित आत्मसात करता येते,  त्यामुळे असे अभिनव उपक्रम कायम करत असल्याचे परबत  यांनी सांगितले.

🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज 🍃🍂🍃

*📚 साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान*

First Published :25-02-2017

मुंबई : ग्रामीण शैलीच्या लिखाणासाठी प्रसिद्ध असलेले लेखक व पत्रकार आसाराम लोमटे यांना त्यांच्या ‘आलोक’ या कथा संग्रहासाठी वर्ष २०१६चा साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आला. १ लाख रुपये रोख,ताम्रपत्र आणि शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्कारप्राप्त साहित्यामध्ये ८ काव्यसंग्रह, ७ लघुकथा संग्रह, ५ कादंबऱ्या, २ समीक्षा, १ निबंध यासह १नाटक यांचा समावेश आहे.नवी दिल्ली येथील कमानी सभागृहात साहित्य अकादमी २०१६च्या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे मुख्यअतिथी भौतिक शास्त्रज्ञ तसेच मराठी लेखक जयंत विष्णु नारळीकर, साहित्य अकादमीचे अध्यक्ष विश्वनाथ प्रसाद तिवारी, साहित्य अकादमीचे उपाध्यक्ष चंद्रशेखर कंबार, सचिव के. श्रीनिवासराव तसेच साहित्य अकादमी पुरस्कार विजेते मंचावर उपस्थितहोते. देशातील २४ प्रादेशिक भाषांतील विविध साहित्य प्रकारांत सर्वोत्कृष्ट पुस्तकांच्या लेखकांनाही यासोहळ्यात पुरस्कृत करण्यात आले.आसाराम लोमटे यांना त्यांच्या ‘आलोक’ कथासंग्रहासाठी मराठी भाषेतील सर्वोत्कृष्ट पुस्तक म्हणून साहित्य अकादमी पुरस्काराने पुरस्कृत करण्यात आले. ‘आलोक’ मध्ये महाराष्ट्रातील ग्रामीण जीवनशैली मांडली आहे. ग्रामीण भागातील जीवनशैलीमध्ये आलेले व्यापक परिवर्तन हे सशक्त तसेच वस्तुनिष्ठरीत्या प्रस्तुत केलेले आहे. लोमटे यांनी मराठी साहित्यात पदव्युत्तर तथा डॉक्टरेट पूर्ण केली आहे. लोमटे यांचे ‘इडा पीडा टळो’, ‘आलोक’ हे कथासंग्रह आणि ‘धूळपेर’ हा लेखसंग्रह प्रकाशित झाले आहेत. त्यांनी लिहिलेल्या कथा पुणे विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ, स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठातील अभ्यासक्रमात आहेत. लोमटे यांना महाराष्ट्र फाउंडेशनचा ‘ग्रंथ गौरव’, पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील साहित्य पुरस्कार, भैरव रतन दमानी पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषदेचा जी.एल. ठोकळ पुरस्कार, पा.वा. गाडगीळ पुरस्कार आणि मानवी हक्कवार्ता पुरस्काराने सन्मानित केलेले आहे.

🍃🍂🍃गुरुवर्य न्यूज🍃🍂🍃