twitter
rss

*॥गुरुवर्य ग्रुप टिप्स ॥*

_*व्हॉट्सअॅप ; टू-स्टेप व्हेरिफिकेशन लाँन्च*_

सर्वाधिक वापरले जाणारे मेसेंजिग अॅप व्हॉट्सअॅपने आपलं नवं टू-स्टेप व्हेरिफिकेशन फिचर लाँन्च केले आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून व्हॉटसअ‍ॅप टू-स्टेप व्हेरिफिकेशन या फीचरचं टेस्टिंग करत होते. या टेस्टिंगनंतर आता अँड्रॉईड, आयफोन आणि विंडोजच्या सर्व यूजर्ससाठी हे फीचर उपलब्ध करण्यात आले आहे. टू-स्टेप व्हेरिफिकेशनमुळे तुमचे अकाऊंट सुरक्षित होते. या फीचरमुळे 6 अंकाचा पासवर्ड टाकल्याशिवाय कोणीही तुमचा नंबर अॅक्टिव्हेट करु शकत नाही.

पाहूयात कशाप्रकारे करता येईल हे फीचर सुरु : व्हॉटसअ‍ॅपवरील सेटींगमध्ये जात अकाऊंटवर क्लिक करावे लागेल. या विभागात आपल्याला 'टू-स्टेप-व्हेरिफिकेशन' हा पर्याय दिसेल. याच्या खाली असलेल्या ‘इनेबल’वर क्लिक करून आपण या सुरक्षा फीचरचा वापर करू शकता. हे फीचर अॅक्टिव्ह झाल्यानंतर यूजर्सला याचा 6 आकडी पासवर्ड तयार करावा लागेल. तसेच सोबत तुमचा ईमेलही द्यावा लागेल. पासवर्ड विसरल्यास त्याच्या रिकव्हरीसाठी ईमेलचा वापर करता येईल.

जर तुम्ही या टू-स्टेप-व्हेरिफिकेशन फीचरचा पासवर्ड विसरलात आणि तो पासवर्ड ई-मेलच्या माध्यमातून रिकव्हर करण्याचा प्रयत्न देखील केला नाही. तर आपण 7 दिवसांपर्यंत आपल्या मोबाईलवर व्हॉट्सअ‍ॅपला ‘रिव्हेरिफाय’ करून वापरू शकणार नाहीत.
*संकलन -* 
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_

  http://guruvarykm.blogspot.in/

या आपल्या Blog ला अवश्य भेट द्या.