🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨
📃 *आजची प्रेरणादायी पोस्ट* 📜
*भाग* -3⃣3⃣8⃣
*द्रविडने डॉक्टरेट नाकारण्यामागे आईची प्रेरणा*
साभार - मटा ऑनलाइन वृत्त । बेंगळुरू
टीम इंडियाची 'वॉल' म्हणून ओळखला जाणारा क्रिकेटवीर राहुल द्रविडनं अलीकडेच बेंगलोर विद्यापीठाची मानद डॉक्टरेट नाकारून आपल्या 'जंटलमनगिरी'चं दर्शन घडवलं होतं. त्याच्या या निर्णयामागचं 'गोड गुपित' आता उघड झालं आहे. द्रविडच्या डॉक्टरेट नाकारण्याच्या निर्णयामागे आईची प्रेरणा आणि बायकोबद्दलचा आदर या दोन गोष्टी आहेत.
'माझ्या आईनं पीएचडीसाठी खूप मेहनत करून ५५व्या वर्षी डॉक्टरेट मिळवली. माझ्या बायकोनं सर्जन होण्यासाठी सात वर्षं अभ्यास केला. त्यामुळेच मलाही मानद डॉक्टरेटपेक्षा कष्ट करून ती पदवी मिळवणं जास्त आवडेल. अर्थात, असा विचार प्रत्येकानं करावा असा माझा अजिबात आग्रह नाही. मी माझ्या अनुभवावरून माझं मत मांडलं इतकंच', असा अत्यंत प्रांजळ खुलासा राहुल द्रविडनं केला आहे. त्यातून त्याचा सुसंस्कृतपणा, संस्कार, मातृप्रेम आणि वैचारिक प्रगल्भता सहज जाणवते.
भारतीय क्रिकेटमधील राहुल द्रविडच्या योगदानाचा गौरव करण्याच्या हेतूने त्याला डॉक्टरेट देण्याची इच्छा बेंगलोर विद्यापीठानं व्यक्त केली होती. २७ जानेवारीला ५२व्या पदवीदान सोहळ्यात त्याला हा सन्मान प्रदान केला जाणार होता. परंतु, कुठलंही संशोधन केलेलं नसताना डॉक्टरेट स्वीकारणं 'जंटलमन' द्रविडच्या मनाला पटलं नव्हतं आणि त्यानं ही डॉक्टरेट नम्रपणे नाकारली होती.
📚📕📗📘📙📔📒📚
*संकलन -*
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_