🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨
📃 *आजची प्रेरणादायी पोस्ट* 📜
*भाग* -3⃣3⃣6⃣
*🛰 ही आहे अंतराळ मोहिमेवर जाणारी तिसरी भारतीय महिला अंतराळवीर 👩🏻*
_*शवना पंड्या या अंतराळ मोहिमेवर जाणार असल्याने भारताच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा खोवला जाणार आहे.*_
By Amit Ingole
भारतीय वंशाची अंतराळात जाणारी प्रथम महिला अंतराळवीर म्हणून कल्पना चावला आपणा सर्वांना माहिती आहे. त्यानंतर अंतराळात जाणारी दुसरी भारतीय महिला अंतराळवीर ही सुनिता विल्यम्स ठरली. आता भारताचा आंतरराष्ट्रीय स्तरावर सन्मान उंचावण्यासाठी आणखी एक भारतीय महिला अंतराळवीर चर्चेत आली आहे. डॉ. शवना पंड्या या कॅनडामध्ये जन्मलेल्या भारतीय वंशाच्या महिला अंतराळवीर आता अंतराळात जाणा-या तिस-या भारतीय महिला ठरणार आहे. शवना पंड्या या अंतराळ मोहिमेवर जाणार असल्याने भारताच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा खोवला जाणार आहे.
कॅनडामध्ये जन्मलेल्या डॉ. शवना पंड्या या सध्या कॅनडाच्या युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमध्ये जनरल सर्जन म्हणून कार्यरत आहेत. त्यासोबतच त्या दोन स्पेस मिशनवर जाण्याची तयारीही करीत आहेत. एकाच वेळी अनेक क्षेत्रात काम करणा-या शवना पंड्या अंतराळ मोहिमेवर जाणा-या तिस-या भारतीय महिला अंतराळवीर ठरणार आहेत. याआधी कल्पना चावला आणि सुनिता विल्यम्स यांनी अंतराळ मोहिमेवर जाऊन भारताची शान वाढवली आहे. ३२ वर्षीय शवना पंड्या या सिटीझन सायन्स अॅस्ट्रोनॉट मोहिमेसाठी ३ हजार २०० लोकांमधून निवडलेल्या दोघांमध्ये होत्या. त्यात त्यांची निवड झाली. या मोहिमेवर त्या त्यांच्या आणखी ८ अंतराळवीरांसोबत जाणार असून ही मोहिम २०१८ मध्ये होणार आहे.
शवना पंड्या या सध्या कुटूंबियांना भेटण्यासाठी मुंबईत आल्या आहेत. त्यांनी त्यांच्या अंतराळ मोहिमेच्या आवडीबद्दल हिंदुस्थान टाईम्सशी संवाद साधला. त्यांनी यावेळी सांगितले की, मला बालपणापासूनच अॅस्ट्रोनॉट होण्याची इच्छा होती. पण मल मेडिसीनही आवडायचं’. पंड्या या केवळ डॉक्टरच आहेत असं नाहीतर त्या ऑपेरा सिंगर, लेखिकाही आहेत. त्या सांगतात की, तुमच्यात प्रॉयोरिटी ठरवण्याची ताकद आणि पॅशन असेल तर तुम्ही खूप काही मिळवू शकता’.
या मोहिमेवर त्या काय करणार आहेत याबद्दल सांगताना त्या म्हणाल्या की, ‘मी बायो मेडिसीन आणि मेडिकल सायन्सवर प्रयोग करणार आहेत. यासोबतच त्या वातावरणातील बदल याचाही अभ्यास करणार आहेत. सध्या त्या मुंबईत आल्या असून स्थानिक डॉक्टर्स आणि विद्यार्थ्यांशी त्या संवाद साधत आहेत. त्यांच्या या संवादाचा भारतीय विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष लागले आहे ते त्यांच्या अंतराळ मोहिमेकडे.
📚📕📗📘📙📔📒📚
*संकलन -*
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_
यापूर्वीचे भाग वाचण्यासाठी.......
- http://guruvarykm.blogspot.in/
या आपल्या Blog ला भेट द्या.....