twitter
rss

_Guruvarya News_

*🎯शाळांनी गतवर्षीपेक्षा जादा फी मागितली तर करता येणार अधिकाऱ्यांकडे तक्रार*

*सांगली जिल्ह्यासाठी शिक्षणमंत्र्यांनी दोन अधिकाऱ्यांवर दिली जबाबदारी*

_*पालकांना मा.आर.जी.पाटील यांच्याकडे प्राथमिक शाळांची तर मा.पोपटराव मलगुंडे यांच्याकडे माध्यमिक शाळांची करता येणार तक्रार*_

गुरुवर्य न्यूज,सांगली: - दि.०१/०६/२०२०.

  कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व खाजगी प्राथमिक व माध्यमिक शिक्षण संस्थांनी शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये प्रवेश देताना विद्यार्थ्यांकडून कसलेच वाढीव शुल्क आकारू नये. असा शासननिर्णय महाराष्ट्र शासनाने जाहीर केला आहे.या शासननिर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी  शुल्कवाढीच्या संबंधात काही तक्रारी असल्यास पालकांनी आपल्या जिल्ह्याच्या संनियंत्रक अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी फेसबूकच्या माध्यमातून दिली. यासोबतच त्यांनी राज्यातील संनियंत्रक अधिकारी यांची विभाग/जिल्हानिहाय मोबाईल नंबरसह यादीही शेअर केली आहे.    
सांगली जिल्ह्यातील प्राथमिक शाळांसासाठी सांगली जिल्हा परिषदेचे उपशिक्षणाधिकारी मा.आर.जी.पाटील साहेब मोबाईल क्रमांक 8275592221 आणि  माध्यमिक शाळांसाठी सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक मा.पोपटराव मलगुंडे साहेब मोबाईल क्रमांक  9404243850 या नंबरवर पालकांनी तक्रार करावी असे आवाहन शालेय शिक्षणमंत्री मा.वर्षा गायकवाड यांनी फेसबूकच्या माध्यमातून केले आहे.

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨
📃  *आजची प्रेरणादायी पोस्ट*  📜

*भाग* - 5⃣3️⃣0️⃣

*कोरोना योद्ध्यावर शाबासकीची थाप; सापडलेले अडीच तोळ्याचे मंगळसूत्र केले परत*

Last Updated: May 29 2020 6:48PM

_*सुजाता सुहास रोकडे यांचे गहाळ झालेले मंगळसूत्र पोलिस कर्मचारी सचिन मोरे यांनी परत केले.*_

साभार : पुढारी ऑनलाईन

एकीकडे कोरोनाचे भयानक संकट समोर आहे. या संकटाचा सामना महाराष्ट्र पोलिस देखील डोळ्यात तेल घालून करत आहेत. तर मुंबई, पुण्यातील पोलिसांना कर्तव्य बजावताना कोरोनाची लागण झाली आहे. यात काही पोलिसांचा मृत्यूही झाला आहे. तर सांगली जिल्ह्यातील कुरळप पोलिस ठाण्यातील पोलिस कर्मचारी सचिन मोरे यांचा प्रामाणिकपणा समोर आला आहे. त्यांना सापडलेले अडीच तोळ्याचे मंगळसूत्र त्यांनी परत केले आहे. या मंगळसूत्राची किंमत साधारण सव्वा लाख रुपये आहे. त्या दांपत्यास ते सोने परत मिळाल्याने त्यांनी पोलिस कर्मचारी सचिन मोरे यांचे आभार मानले.

कोरोनामुळे राज्यात जिल्हाबंदी आहे. जिल्हाच्या सीमांवर पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे. सांगली जिल्ह्यातील चिकुर्डे येथे सांगली व कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमेवर पोलिसांचा बंदोबस्त आहे. या सीमेवरुन अत्यावश्यक सेवेसाठी लोकांची ये-जा सुरु असते. काल चिकुर्डे येथील चेकपोस्टवर मांगले गावचे रहिवासी सुहास रामचंद्र रोकडे व त्यांच्या पत्नी सुजाता सुहास रोकडे या कोल्हापूर येथे हॉस्पिटलला जाण्यासाठी चेकपोस्टवर आल्या होत्या. यावेळी गावी परत जाताना त्यांचे अडीच तोळ्याचे  मंगळसूत्र गहाळ झाले. ते कुरळप पोलिस ठाण्याचे कर्मचारी सचिन मोरे यांना सापडले.

याबाबत पोलिस कर्मचारी सचिन मोरे यांनी सर्व व्हॉटसअॅप सग्रुपला कल्पना दिली व ओळख पटवून घेऊन जाण्याचे आवाहन केले. संबंधीत मांगले या गावाच्या रोकडे दांपत्यास ओळख पटवून आज पोलिस कर्मचारी सचिन मोरे यांनी हा मोलाचा दागिना प्रामाणिकपणे कसलेही बक्षीस न स्वीकारता त्यांना दिला. हा दागिना घेताना अक्षरशः त्या दांपत्याला गहिवरुन आले होते. शाबासकीची थापही दिली. पोलिस कर्मचारी सचिन मोरे यांचे कौतुक होत आहे.

https://www.pudhari.news/news/Sangli/police-return-gold-sangli/m/

📚📕📗📘📙📔📒📚
*संकलन -*  
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_

यापूर्वीच्या पोस्ट वाचण्यासाठी आमच्या
https://guruvarykm.blogspot.com/?m=1
या ब्लॉगला अवश्य भेट द्या.

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨
📃  *आजची प्रेरणादायी पोस्ट*  📜

*भाग* - 5⃣2⃣9️⃣

*क्वारंटाइन तरुणांचे ‘वर्क फॉर आपली शाळा’*

Ganesh Pandurang Kadam | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 22 May 2020, 08:33:00 PM

_करोनाच्या पार्श्वभूमीवर गावाकडे परतलेल्या व शाळेत क्वारंटाइन झालेल्या उच्च शिक्षित तरुणांनी गावातील जिल्हा परिषदेची शाळा स्वच्छ करून वेगळा संदेश दिला आहे._

अहमदनगर: शाळेत क्वारंटाइन व्हावे लागेल म्हणून मुंबई-पुण्यातून लोक गावात यायला घाबरत आहेत. तर कोणी गावात राजकीय वजन वापरून शाळेत राहणे टाळण्यात यशस्वी होत आहेत. मात्र, राहाता तालुक्यातील लोणी बुद्रुक येथे उच्च शिक्षित तरुणांनी शाळेत राहणे पसंतच केले नाही, तर शाळेचे रुपडेही पालटून टाकले आहे.

महाराष्ट्रातील विरोधी पक्षाच्या डोक्यावर परिणाम झालाय: शिवसेना
पुण्या-मुंबईतून गावात आल्यावर शाळेत क्वारंटाइन झालेल्या काही तरुणांनी गावातील जिल्हा परिषदेची शाळा स्वच्छ करून वेगळा संदेश दिला आहे. लोणी बुद्रुक गावात १७ नागरीकांना उर्दू शाळा व जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत विभागणी करून क्वारंटाईन केलेले आहे. हे तरुण मूळचे याच गावातील असून विविध शहरांत चांगल्या कंपनीत नोकरीला आहेत. सध्या शाळेतूनच ‘वर्क फ्रॉम होम’ करीत आहेत. मात्र, त्यांनी जेवण, कपडे, स्वच्छतागृह अशा तक्रारींना दुय्यम स्थान देत शाळा स्वच्छतेचा निर्णय घेतला आणि कामाला सुरवात केली. उपलब्ध साधने वापरून त्यांनी शाळेचा परिसर स्वच्छ केला. झाडांना वाफे बनविणे, झाडांना पाणी घालणे, शाळा खोल्या धुऊन स्वच्छ करणे अशी कामे करत छोटीशी बागही फुलविली.
‘आम्ही याच शाळेत शिकलो. नोकरीला लागलो, शहरात गेलो, क्वारंटाइनमुळे नकळत आम्हाला या ज्ञान मंदिराच्या स्वच्छतेचे पाईक होण्याची संधी मिळाली,’ असे एका तरुणाने सांगितले. त्यांची उमेद पाहून ग्रामपंचायतीनेही स्वच्छतेसाठी गरजेचे असलेले साहित्य त्यांना पुरविले आहे. ग्रामपंचायतीच्या वतीने त्यांची राहण्याची व्यवस्था, झोपण्यासाठी गादी, वीज पुरवठा, फॅन, सॅनिटायझर, रोज औषध फवारणीचीही व्यवस्था करण्यात आली. सरपंच लक्ष्मण बनसोडे, उपसरपंच अनिल विखे, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामविकास आधिकारी कविता आहेर यांनी त्यांना मदत आणि प्रोत्साहन दिले.

https://maharashtratimes.com/maharashtra/ahmednagar-news/ahmednagar-quarantine-youth-clean-their-school-in-loni-budruk/articleshow/75884453.cms

📚📕📗📘📙📔📒📚
*संकलन -*  
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_