🎯शाळांनी गतवर्षीपेक्षा जादा फी मागितली तर करता येणार अधिकाऱ्यांकडे तक्रार सांगली जिल्ह्यासाठी शिक्षणमंत्र्यांनी दोन अधिकाऱ्यांवर दिली जबाबदारी पालकांना मा.आर.जी.पाटील यांच्याकडे प्राथमिक शाळांची तर मा.पोपटराव मलगुंडे यांच्याकडे माध्यमिक शाळांची करता येणार तक्रार
_Guruvarya News_
*🎯शाळांनी गतवर्षीपेक्षा जादा फी मागितली तर करता येणार अधिकाऱ्यांकडे तक्रार*
*सांगली जिल्ह्यासाठी शिक्षणमंत्र्यांनी दोन अधिकाऱ्यांवर दिली जबाबदारी*
_*पालकांना मा.आर.जी.पाटील यांच्याकडे प्राथमिक शाळांची तर मा.पोपटराव मलगुंडे यांच्याकडे माध्यमिक शाळांची करता येणार तक्रार*_
गुरुवर्य न्यूज,सांगली: - दि.०१/०६/२०२०.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व खाजगी प्राथमिक व माध्यमिक शिक्षण संस्थांनी शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये प्रवेश देताना विद्यार्थ्यांकडून कसलेच वाढीव शुल्क आकारू नये. असा शासननिर्णय महाराष्ट्र शासनाने जाहीर केला आहे.या शासननिर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी शुल्कवाढीच्या संबंधात काही तक्रारी असल्यास पालकांनी आपल्या जिल्ह्याच्या संनियंत्रक अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी फेसबूकच्या माध्यमातून दिली. यासोबतच त्यांनी राज्यातील संनियंत्रक अधिकारी यांची विभाग/जिल्हानिहाय मोबाईल नंबरसह यादीही शेअर केली आहे.
सांगली जिल्ह्यातील प्राथमिक शाळांसासाठी सांगली जिल्हा परिषदेचे उपशिक्षणाधिकारी मा.आर.जी.पाटील साहेब मोबाईल क्रमांक 8275592221 आणि माध्यमिक शाळांसाठी सहाय्यक शिक्षण उपनिरीक्षक मा.पोपटराव मलगुंडे साहेब मोबाईल क्रमांक 9404243850 या नंबरवर पालकांनी तक्रार करावी असे आवाहन शालेय शिक्षणमंत्री मा.वर्षा गायकवाड यांनी फेसबूकच्या माध्यमातून केले आहे.