twitter
rss


भारतीय कुस्तीपटूचा खिलाडूपणा

दिलदार योगेश्वर दत्तचा रौप्यपदक घेण्यास नकार

By: एबीपी माझा वेब टीम




*योगेश्वरला 2012 च्या लंडन ऑलिम्पिकचं कांस्यऐवजी रौप्यपदक मिळणार*

By: एबीपी माझा वेब टीम 

नवी दिल्ली : 2012 च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये कुस्तीत कांस्यपदकाची
कमाई करणाऱ्या योगेश्वर दत्तला रौप्यपदक मिळणार आहे. योगेश्वर दत्तनेच
या वृत्ताला आता दुजोरा दिला आहे. रौप्य पदक विजेता रशियन खेळाडू
बेसिक खुदोखोज हा डोपिंगमध्ये दोषी आढळला आहे. त्यामुळे त्याचं
रौप्यपदक आता भारताच्या योगेश्वर दत्तला मिळणार आहे.
2012 च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये 60 किलो वजनी गटात रशियाच्या
बेसिक खुदोखोजने हे रौप्य पदक मिळवलं होतं. त्यानंतर 2013 साली एका
कार अपघातात त्याचा मृत्यू झाला. मात्र, आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक
समितीने (आयओसी) लंडन ऑलिम्पिकदरम्यान गोळा केलेल्या नमुन्यांची
पुन्हा तपासणी केल्यानंतर त्यात खुदोखोज दोषी आढळला.


दरम्यान, रिओ ऑलिम्पिकमधून योगेश्वरला पहिल्याच फेरीत हार पत्कारून
रिकाम्या हाताने भारतात परतावं लागलं होतं. मात्र, आता लंडन
ऑलिम्पिकमधील कांस्यऐवजी रौप्य पदक मिळणार असल्याने योगेश्वरला
हा सुखद धक्का आहे. योगेश्वरने ट्वीट करुन लंडन ऑलिम्पिकचं रौप्य पदक
देशवासीयांना समर्पित केलं आहे.



मुंबई : लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदकाची कमाई करणारा पैलवान
योगेश्वर दत्तला रौप्यपदक मिळणार असल्याचं वृत्त मंगळवारी आलं. मात्र
त्यानंतर काही तासातच योगेश्वरने दिलदारपणा दाखवत ते पदक दिवंगत
पैलवान बेसिक खुदोखोजच्या कुटुंबीयांनीच ठेवावं असं म्हटलं आहे.
खुदोखोज हा आपला चांगला मित्र होता, त्यामुळे त्याचं रौप्यपदक घेणं
मला विचित्र वाटत आहे. लंडन ऑलिम्पिकपूर्वी दोन महिने मी रशियात
प्रशिक्षण घेत होतो. त्यामुळे बेसिकशी माझी खूप छान ओळख झाली
होती.’ असं योगेश्वर दत्त म्हणतो. बुधवारी योगेश्वरने ट्वीट करत
खुदोखोजच्या कुटुंबीयांनी त्यांच्या दिवंगत मुलाचं पदक स्वतःजवळ ठेवावं,
असं म्हणत मनाचा मोठेपणा दाखवला आहे.

*‘शक्य झाल्यास हे पदक खुदोखोजच्या कुटुंबीयांकडेच ठेवावं.*

 त्यांचा योग्य तो सन्मान राखायला हवा. माणुसकी माझ्या दृष्टीने सर्वात मोठी आहे’
2012 च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये 60 किलो वजनी गटात रशियन खेळाडू
बेसिक खुदोखोजला रौप्यपदक मिळालं होतं. मात्र खुदोखोज डोपिंगमध्ये
दोषी आढळला आहे.

2013 साली एका कार अपघातात खुदोखोजचा मृत्यू झाला. मात्र,
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (आयओसी) लंडन ऑलिम्पिकदरम्यान
गोळा केलेल्या नमुन्यांची पुन्हा तपासणी केल्यानंतर त्यात खुदोखोज
दोषी आढळला. त्यामुळे त्याचं रौप्यपदक आता भारताच्या योगेश्वर
दत्तला मिळणार आहे.
रिओ ऑलिम्पिकमधून योगेश्वरला पहिल्याच फेरीत हार पत्कारुन
रिकाम्या हाताने मायदेशी परतावं लागलं होतं. मात्र आता लंडन
ऑलिम्पिकमधील कांस्यऐवजी रौप्यपदक मिळणार असल्याने योगेश्वरला
हा सुखद धक्का आहे.

📚📕📗📘📙📔📒📚

संकलन   

गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली

सोनाली नवांगुळच्या जिद्दीची कहाणी



*_सोनाली नवांगुळचे आयुष्य सांगली जिल्ह्याच्या बत्तीस शिराळा या छोट्याशा गावात अगदी मजेत चालू होते. सोनालीचे आईबाबा शिक्षक, लहान बहीण संपदा, असे चौकोनी कुटुंब...!_*

सोनाली नऊ वर्षांची असताना, तिच्या पाठीवर बैलगाडी पडली आणि त्यामुळे तिच्या कंबरेतील व पायातील बळ गमावले गेले! ‘पॅराप्लेजिक’ झाल्यामुळे ना कमरेखाली संवेदना, ना नैसर्गिक विधींवर नियंत्रण! - पूर्ण परावलंबी झाली ती. तिच्या आयुष्याला विचित्र कलाटणी मिळाली ती उपचारासाठी मुंबईतील हॉस्पिटलमधे दीड वर्षें गेली तेव्हा. तेथे सोनाली एकटीच असे. सोनाली म्हणते, “वय वर्षे अवघे नऊ. पायाबरोबर घरही सोडावे लागण्याचा तो अनुभव.... न कळत्या वयातला. सर्वांची ओळख व स्वभाव (माझ्या त्या वेळच्या वयाचा विचार करता) जुळण्याआधीच, आपल्याला ‘असे काही’ झाल्याने सर्वांनी सोडून दिलंय, नि आता, मला घर नाही किंवा असेल तर हेच (डिस्चार्ज मिळेपर्यंत - हे कळत नव्हतं तेव्हा) असं मनाला फार दुखावून गेलं. यथावकाश रडारड संपून, एकट्यानं, हॉस्पिटलमधील सर्वांसोबत राहण्याची सवय लागली.”

सोनालीला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर ती गावी, बत्तीस शिराळ्याला गेली. शाळेत जाणे शक्य नव्हते. आईवडील, बहीण यांची शाळा चालू होती. ते तिघेहीजण सोनालीची काळजी मायेने घेत. पण तरीही तिला तिचे घर ‘अनोळखी’ वाटू लागले. सोनाली घरी बसून शाळेचा अभ्यास करू लागली. ती फक्त परीक्षेपुरती शाळेत जाई. सोनाली घरून अभ्यास करूनच दहावीमध्ये शाळेत पहिली आली. सोनाली घरच्या घरीच अभ्यास करून, इंग्रजी विषय घेऊन बी.ए. झाली. गंमत अशी की जी सोनाली शाळेत जाऊ शकली नव्हती तिच्या एका गोष्टीचा समावेश द्वितीय भाषा मराठी असणाऱ्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना गेली चार वर्षे पाठ्यपुस्तकात अभ्यासण्यासाठी म्हणून आहे. स्थूलवाचनासाठीच्या यादीत इतर नऊ पुस्तकांबरोबर 'ड्रीमरनर' हे तिचे पुस्तक सुचवले आहे.

सोनाली बी.ए.च्या शेवटच्या वर्षाला असताना, तिच्या एका मित्राने तिला प्रश्न विचारला, “आईबाबांनंतर तुझं काय?” सोनाली म्हणाली, “आजवर मी टाळत असलेला तो प्रश्न त्याने मला विचारताच, मी खूप अस्वस्थ झाले.”

सोनालीने विचार करून, आईवडील असतानाच ‘घर’ सोडण्याचा प्रयोग करून पाहण्याचे ठरवले. सोनाली म्हणते, की “जिथं मी काहीच मनात येईल ते करू शकत नव्हते, ते ठिकाण म्हणजे ‘घर’ सोडणं सोपं होतं का? नाही. मी मला मनाने सिक्युअर ठेवणारी घर ही गोष्ट नि माझी माणसं सोडणार होते. धाडसच होतं ते. पण ठरवलं अखेर....”

सोनाली कोल्हापूरच्या ‘हेल्पर्स ऑफ दि हँडिकॅप्ड’ या संस्थेच्या उंचगाव येथील, अपंग व्यक्तींच्या शारीरिक गरजांचा खोलात विचार करून बांधलेल्या ‘घरोंदा’ या वसतिगृहात राहण्यास गेली. स्वावलंबन – शारीरिक व आर्थिक स्वावलंबन शिकण्यास म्हणून. ती गोष्ट आहे २००० सालची.

सोनालीच्या आयुष्याच्या नव्या अध्यायाला त्या ठिकाणी सुरुवात झाली. तेथे वेगवेगळी विकलांगता असणाऱ्या मुली होत्या. लहानमोठ्या वयाच्या सात ते नऊ मुली एका खोलीत असत. सोनाली सर्वप्रथम व्हीलचेअर वापरण्यास शिकली. लघवी-संडासवरील नियंत्रण शक्य नाही हे तिने आधी स्विकारले होतेच, पण आता ती डायपर व टॉयलेटला जाण्यासाठीच्या वेळापत्रकाशी तिचा दिनक्रम बांधण्यास शिकली. त्यात साधारण आठवडा निघून गेला. “त्या सर्व गोष्टींत गढून गेल्यावर, आईबाबांवाचून राहणे हा विचार कमी त्रास देऊ लागला” असे सोनाली म्हणाली.

सोनालीने महिनाभरानंतर मुंबई-पुणे येथील शासकीय कामे कशी करावीत याचा अनुभव घेतला. तिने तिच्या अंगी प्रवासानिमित्तच्या रेल्वे रिझर्वेशनपासून खाणे-पिणे, औषधे इत्यादींचे नियोजन करण्याची सवयही बाणवून घेतली. पुणे, मुंबई, कोकणपट्टा, गोवा, हैदराबाद, दिल्ली, ओरिसा, भूज इत्यादी ठिकाणांपर्यंत प्रवास केला. गुजराथमधील भूज येथील भूकंपानंतर तेथील अपंग लोकांना स्वावलंबनाने कसे जगायचे, यासाठीचे प्रशिक्षण देण्याकरता सात दिवसांचे एक शिबीर आयोजित केले गेले होते, नसीमा हुरजूक यांच्या मार्गदर्शनाखाली. त्यावेळी सोनालीही तेथे प्रशिक्षण देण्यासाठी गेली होती. सोनालीच्या संवेदनक्षम आणि बोलक्या स्वभावामुळे तिचा अनेक उत्तम माणसांशी संपर्क झाला. ती विविध अनुभवांनी पक्व होत असताना, तिला स्वतःची स्वतःला ओळख होऊ लागली. सोनाली म्हणते, “माझ्या पळत्या, उत्सुक चाकांना भुई थोडी झाली!”

ती ‘हेल्पर्स’मध्ये काम करत असताना, कधी तिच्या नजरेला वर्तमानपत्र पडायचे. कोल्हापुरात राजर्षी शाहू स्मारक भवनात, कधी फिल्म सोसायटीमध्ये दाखवले गेलेले उत्कृष्ट चित्रपट, कधी कला प्रदर्शन, वेगवेगळ्या चित्रपटगृहात गाजलेले चित्रपट, केशवराव भोसले नाट्यगृहात होणारी नाटके, त्यांच्या जाहिरातींविषयी; तसेच, कवितांचे-गाण्यांचे-व्याख्यानांचे कार्यक्रम –
ते सर्व वाचून सोनालीला त्या सर्वांचा अनुभव घ्यावा असे वाटायचे. पण वसतिगृहात राहत असल्यामुळे तेथील नियमांनुसार रीतसर लेखी परवानगी घेणे, त्यासाठी आधी अर्ज करणे, सांगितलेली वेळ पाळणे ही सर्व बंधने असायचीच; शिवाय, संस्थेच्या कामांव्यतिरिक्त अशा अवांतर कार्यक्रमांना सातत्याने जाण्यास संस्था परवानगीही देत नसे. पैशाचा प्रश्न तर होताच. त्यामुळे सोनालीची तगमग होई. विकलांगतेवर मात करून व्यक्तिमत्त्व खुलवण्यासाठी सर्व सोयी वसतिगृहात होत्या. पण त्यापुढील व्यक्तिमत्त्व विकास- त्यासाठी आवडीचे वाचन, सिनेमे, उत्तम कलाकृती आणि सादरीकरणाचा आस्वाद, त्यावर मारलेल्या पोटभर गप्पा आणि त्यातील चिंतनातून रसिकांचे जगणे सोनालीला खुणावू लागले.

सोनालीने परत एकदा धाडस करण्याचे ठरवले. आईबाबांशी त्याविषयी बोलली. वसतिगृह सोडून ती ‘स्वतःच्या घरात’ राहण्यास गेली. कोल्हापुरातील शिवाजी पेठेतील तळमजल्यावरील ब्लॉक आईबाबांनी घेतला.  सोनाली म्हणते, “माझे पंख मजबूत करून, हे घरटं, माझ्या मनाच्या ताकदीनं विणणं हा आनंद मला उपभोगायचा होता.”

तिने स्वतःच्या घरासाठी टाईल्स निवडणे, खोल्यांसाठीचा रंग निवडणे, लाईटची बटणे (जमिनिपासून अडीच फुटांवर), व्हिलचेअर फिरवण्यासाठी भरपूर जागा असलेले फोल्डिंग कमोडचे प्रशस्त टॉयलेट कम बाथरूम, तेथे सोयीच्या उंचीवर नळ, कपड्यांसाठी बार, शिवाय त्यातच चेंजिंग स्पेस (त्यावेळी बेडवर झोपूनच कपडे घालावे लागायचे), किचनमधील कट्ट्याची उंची, वॉशबेसिन, गॅलरीला दार, रॅम्प, सर्व व्हीलचेअरवर बसून ऑपरेट करता येईल असे! हॉलमधील कॉम्प्युटर टेबलची उंची सुद्धा ... सोनालीने सारे काही, सर्व काही मनासारखे, कोणाची मदत लागू नये असे बनवून घेतले व तिने गृहप्रवेश १५ एप्रिल २००७ या दिवशी केला.

जे अपंग स्वावलंबनाने जगू इच्छितात व जगू शकतात अशांसाठी सोनालीचे घर आदर्श आहे. अनेक लोक त्या घरास भेट देतात, फोनवरूनही सोनालीला माहिती विचारतात.

पहिली दोन वर्षे घर, नवे जग व काम हे शिकण्यात जातील, तेव्हा पैसे कमावणे अशक्यच ... म्हणून आईवडिलांनी सुरुवातीची दोन वर्ष घरखर्च उचलावा मात्र तोवर ज्येष्ठ पत्रकार व गुरु उदय कुलकर्णींच्या मदतीने ती नक्की मार्ग शोधेल असे तिने सांगितले. कॉम्प्युटर शिकली; त्याच्याशी दोस्ती केली. सोनालीला त्या संदर्भातील व्यावसायिक कामे मिळू लागली. तिच्या स्वागत थोरात या मित्राने एक संधी तिला आणून दिली. भारतातील पहिल्या नोंदणीकृत ब्रेल पाक्षिकाची – 'स्पर्शज्ञान' हे त्याचं नाव – उपसंपादक म्हणून जबाबदारी सोनालीने स्वीकारली. सोनाली वृत्तपत्रात आधीपासून काहीबाही लिहित होतीच. उदय कुलकर्णी हे सोनालीचे पत्रकारितेतील गुरु व एरवीही तिचा दृष्टिकोन स्वच्छ करणारे तिचे आत्मीय.

स्वागत थोरातने २००८ साली लुई ब्रेल यांच्या व्दिजन्मशताब्दीच्या मुहूर्तावर ‘स्पर्शज्ञान’चा दिवाळी अंकही प्रसिद्ध केला. ‘स्पर्शज्ञान’चा २००९ सालचा दिवाळी अंक ‘जंगल, पर्यावरण, प्राणी-पक्षी जीवन’ या विषयांवर होता. त्याची पूर्ण जबाबदारी सोनालीवर होती. त्या अंकाला राज्यस्तरीय तीन पुरस्कार लाभले. आता गेली साडे पाच वर्षे ती 'रिलायन्स दृष्टी' या हिंदी ब्रेल पाक्षिकासाठीही सदर लिहिते आहे.

सोनालीला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील नवोदित कवींच्या काव्यसंमेलनाचे सूत्रसंचालन करण्याची संधी मिळाली. त्याशिवाय सोनालीने स्वतःला अनेक संस्थांशी जोडून घेतले आहे. उदा. कलामहर्षी बाबुराव पेंटर फिल्म सोसायटी, बी चॅनल, देवल क्लब, कोल्हापूर महोत्सव समिती, करवीरनगर वाचन मंदिर इत्यादी. त्या संस्थांच्या सोनालीच्या घरातून होणाऱ्या चर्चांमधून खूपशा कार्यक्रमांचे नियोजन अनौपचारिक रीत्या होत असायचे. व्याख्यानमालांचे विषय व वक्ते ठरायाचे. नव्या जगात पाऊल रोवताना या सगळ्याच गोष्टी महत्वाच्या ठरत गेल्या. आता जेव्हा क्षितीज आणखी विस्तारले आहे तेव्हा ती नव्या गोष्टीत गुंतून आपला आवाका वाढवते आहे. अनेक नामवंत लेखिका, लेखक, कलाकार, उद्योजक अशी मित्रमंडळी सोनालीला लाभली आहेत. सोनाली त्यामुळे फार बिझी असते. त्यातूनच 'ड्रीमरनर' या ऑस्कर पिस्टोरिअसच्या  (दोन्ही पाय नसताना वेगवान धावू शकणारा धावपटू) पुस्तकाचा मराठी अनुवाद, 'स्वच्छंद' नावाचे चिंतनात्मक ललित लेखाचे पुस्तक, कविता महाजन संपादित 'भारतीय लेखिका' मालेतील सलमा नावाच्या तामिळ लेखिकेच्या कादंबरीचा 'मध्यरात्रीनंतरचे तास' नावाचा अनुवाद अशी कामे पुस्तकरूपाने बाहेर पडली आहेत. गेल्या दोन वर्षात सोनालीने दोन पुस्तकांचे काम हातावेगळे केले आहे. पैकी एक आहे, मेधा पाटकरसंबंधी. वाढत्या वयातील मुलांना मेधाताईंची जडणघडण कळावी यादृष्टीने हे पुस्तक आहे. दुसरे पुस्तक विंग कमांडर अशोक लिमये यांची साहसी जीवनगाथा अशा प्रकारचे आहे. सोनालीने त्यासाठी खडकवासल्याच्या ‘राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी’त जाऊन
सर्व लष्करी तपशील जाणून घेतले.

अक्षयपात्र'तर्फे वीस लाख विद्यार्थांना भोजन


- सकाळ वृत्तसंस्था

बंगळूर - भारतातील लहान-मोठ्या गावांतील मुले शिक्षणापासून वंचित राहतात. या मुलांना शाळेकडे परत वळविण्यासाठी त्यांना दुपारच्या भोजनाची सेवा देण्याचे काम सुरू केले. या शिक्षणाच्या चळवळीमध्ये मोलाचे काम "अक्षयपात्र‘ फाउंडेशन करत आहे. विविध सरकारी शाळांमध्ये या संस्थेमार्फत दुपारचे जेवण पुरविले जाते. ही योजना त्यांनी 2001 ला सुरू केली. आजमितीला भारतातील तब्बल सुमारे 15-20 लाख मुलांना शाळेत भोजन मिळते.

या फाउंडेशनने नुकतेच त्यांचे हे यश साजरे केले. या उपक्रमाचे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी भरभरून कौतुक केले. ते म्हणाले, ""देशात भूकबळी ही अजूनही मुख्य समस्यांपैकी एक आहे. चौदा वर्षांपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण शासनाने करण्यासाठी घटनात्मक आश्‍वासन दिले आहे.‘‘

अक्षयपात्र फाउंडेशनचे अध्यक्ष आणि संस्थापक मधू पंडित दास म्हणाले, ""या उपक्रमाची सुरवात अवघ्या शंभर लोकांच्या मदतीने आणि दीड हजार मुलांना सेवा देण्यापासून झाली. 2030 पर्यंत पन्नास लाख मुलांपर्यंत ही सेवा देण्याचा निश्‍चिय केला आहे. देशात भुकेचा प्रश्‍न गंभीर असल्याचेही त्यांनी नमूद केले.

अक्षयपात्रचे पहिले स्वयंपाकघर पश्‍चिम बंगाल येथे सुरू झाले. सध्या देशात 26 परिपूर्ण स्वयंपाकघरे आहेत. जगातील सर्वांत मोठा माध्यान्ह भोजन कार्यक्रम आहे.

"या योजनेतील प्रत्येक डब्याची किंमत अवघी अकरा रुपये इतकी आहे. अक्षयपात्र पुरवत असलेल्या माध्यन्ह भोजनाच्या कार्यक्रमामुळे शाळेतील गळतीचे प्रमाण 18-20 टक्के कमी झाले असून, नोंदणीत मोठी वाढ झाली आहे. या उपक्रमामुळे मुलींच्या उपस्थितीत आणि त्यांच्या आरोग्यामध्ये चांगली सुधारणा घडत आहे,‘‘ असे अक्षयपात्रचे ट्रस्टी मोहनदास पै यांनी एका खासगी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.

मी जयपूरमधील अक्षयपात्रच्या स्वयंपाकघराला भेट दिल्यानंतर तेथील अन्नपदार्थांचा दर्जा, चव, स्वच्छता ही खरोखरच कोणत्याही पंचतारांकित हॉटेलपेक्षा कमी नव्हती. मी देशातील सर्व शाळांमधील शिक्षक, मुख्याध्यापकांना या स्वयंपाकघराला एकदा तरी भेट देण्याची विनंती करेन. माध्यान्ह भोजनासाठी अक्षयपात्रचे स्वयंपाकघर जरून पाहा आणि शिका,‘‘ असे केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी सांगितले.
---
या अक्षयपात्र संस्थेची दहा राज्यांत एकूण 27 स्वयंपाकघरे आहेत.
त्यांच्या या स्वयंपाकघरातील काम नक्की कसे चालते, हे पाहण्यासाठी या लिंक वर क्‍लिक करा.
👇

https://www.youtube.com/watch?v=I8FG5dlUtrE

सौजन्य : अक्षयपात्र फाउंडेशन

📚📕📗📘📙📔📒📚

संकलन   

गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली