twitter
rss

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨

📃  *आजची प्रेरणादायी पोस्ट*  📜

*भाग* - 4⃣0⃣8⃣

*👩🏻 नवरात्र विशेष 👩🏻*

*‘ती’च्या उद्योजकतेची सातासमुद्रापार भरारी*

साभार ~ Maharashtra Times

कोल्हापूर : पतीची चारचाकी वाहनांचे पार्ट‍्स‍ तयार करण्याची कंपनी. अचानक त्यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. एकवेळ अशी आली की, कारखाना बंद करण्याचा विचार आला. पण काही बँका, पतसंस्थांची कर्जे, सुमारे शंभर कामगारांच्या उदरनिर्वाहाची काळजी. त्यामुळे कारखाना पुन्हा सुरू करण्याचे प्रयत्न झाले. अनंत अडचणी आल्या आणि त्यावर जिद्द आणि कष्टाने मात करीत आज या उद्योगाची भरारी अमेरिकेपर्यंत पोहोचली आहे. स्त्री शक्तीची चुणूक दाखविणाऱ्या विद्या सुनील माने यांचा जीवनप्रवास थक्क करणारा आहे गोकुळ शिरगाव औद्योगिक वसाहतीमधील मे. सुनील इंडस्ट्रीज ही चारचाकी वाहनांचे सुटे पार्ट तयार करणारी कंपनी. विद्या यांचे पती सुनील यांचे सन २००० मध्ये हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यानंत बी.कॉम.पर्यंतचे शिक्षण झालेल्या विद्या यांनी उद्योग विश्वात केलेली कामगिरी नेत्रदीपक आहे. पतीच्या निधनावेळी मोठी मुलगी पाच वर्षांची आणि लहान मुलगी तीन वर्षांची होती.

पतींच्या निधनाने कारखाना बंद करण्याचा निर्णय झाला होता. पण बँका, पतसंस्थांचा कर्जाचा डोंगर, शंभर कामगारांचा संसार याची काळजी करीत कारखाना पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न विद्या यांनी केला. विद्या यांची कंपनी महिंद्रा अॅण्ड महिंद्रा कंपनीसाठी चारचाकी वाहनांचे सुटे पार्ट‍्स तयार करते. लेथ मशीनपासून सीएनसी, व्हीएमसी मशीन येथे आहेत.

सन २००० मध्ये कंपनीवर अनेक बँकांचे कर्ज होते. कामगारांचे दोन महिन्यांचे पगारही थकले होते. रॉ मटेरियल देणाऱ्या कंपनीचेही बिल थकित होते. त्यांनीही पैशासाठी तगादा लावला होता. त्यावेळी महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीतील काही अधिकारी, दीर मिलिंद माने यांच्या सहकार्याने कंपनी पुन्हा सुरू करण्याचा निर्णय विद्या यांनी घेतला. या निर्णयावर त्या ठाम राहिल्या विद्या या जेव्हा पहिल्यांदा कारखान्यात गेल्या, तेव्हा त्यांना एकाही पार्टचे नाव माहीत नव्हते. कंपनीचे कामकाज, उत्पादन, विक्री याचाही अनुभव नव्हता. कारखान्यात गेल्यानंतर पहिल्या दिवशीच सर्व बाबींची माहिती त्यांनी घेतली. महिनाभरात इंडस्ट्रीची तोंडओळख झाली. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही.

कंपनीवरील कर्ज फेडण्यासाठी सात वर्षांचा कालावधी लागला. त्यानंतर त्यांनी कंपनीचा विस्तारही केला. दोन युनिटचे आता पाच युनिट झाले आहेत. कच्च्या मालासाठी स्वतःची फाउंड्री सुरू केली. यामध्ये सध्या २०० कामगार कार्यरत आहेत. दररोज सुमारे ७५० मेट्रिक टनाचे उत्पादन होते. त्यांनी सन २००४ पासून उत्पादन एक्स्पोर्ट करण्यास सुरुवात केली. उत्पादनासाठी लागणारे आयएसओ, टीएस प्रमाणपत्रे मिळविली. सध्या कंपनीकडून अमेरिकेला सात ते आठ कंटेनर निर्यात केले जातात. अमेरिकेत त्यांच्याकडील या उत्पादनांचा वापर मायनिंगसाठी केला जातो. त्यासह देशभरातील चारचाकी वाहनांसाठी लागणाऱ्या सुट्या पार्ट‍्सची निर्मिती केली जाते.

विद्या या समाजातील महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा उपक्रम राबवतात. त्यांनी अनेक महिलांना सीएनसी मशीनवर प्रशिक्षण दिले आहे. उद्योगक्षेत्रात महिलांसाठी उपलब्ध असलेल्या संधीची माहिती देतात. त्यांच्या दोन्ही मुलींनीही उद्योग क्षेत्रात पाऊल ठेवले आहे. मुलगी सिद्धी हिने मेकॅनिकल इंजिनीअरिंग शिक्षण पूर्ण झाले असून दुसरी मुलगी सृष्टी ही मेकॅनिकल इंजिनीअरिंगच्या दुसऱ्या वर्षाला शिकत आहे. प्रतिकूल परिस्थितीत जिद्द, आत्मविश्वास आणि कष्टाच्या जोरावर त्यांनी उद्योगजगतात कर्त्तृत्वाचा ठसा उमटविला आहे.

*विविध पुरस्कार*

विद्या यांना उद्योगश्री, उद्योगरत्न पुरस्कार, उद्योगजननी कमल पुरस्कारासह विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. राष्ट्रीय उद्योगरत्न पुरस्कार, नॅशनल चेंबर ऑफ कॉमर्सचा क्वालिटी ब्रॅचचा इंटर पिनर ऑफ दि इयर, रोटरी करवीर भूषण पुरस्कारही त्यांना मिळाले आहेत. सध्या कारखान्याची उलाढाल सुमारे ५० कोटींची आहे.

📚📕📗📘📙📔📒📚

*संकलन -* 
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨

📃  *आजची प्रेरणादायी पोस्ट*  📜

*भाग* - 4⃣0⃣7⃣

*👩🏻 नवरात्र विशेष 👩🏻*

*मी जिंकेन, नव्हे जिंकणारच...!*

साभार ~ सकाळ

‘मी जिंकेन, नव्हे जिंकणारच’ अशी खूणगाठ मनाशी बाळगून अनेकांनी यशाची शिखरं पादाक्रांत केली. अशाच महिला व मुलींचे प्रतिनिधीत्व रेश्‍मा व त्यांची मुलगी प्रिया खोत करतात. आपल्या मूकबधिर मुलीला आत्मनिर्भर करण्यासाठी आणि त्याचवेळी स्वतः उच्चपदस्थ अधिकारी होण्यासाठी रेश्‍मा यांनी पदर खोचला आहे. या मायलेकींविषयी...

पोटची पोर प्रिया दोन-अडीच वर्षांची झाली आणि ती मूकबधिर असल्याचं लक्षात आलं. खोत दांपत्य थोडसं कोलमडून पडलं. पण, वास्तव स्वीकारून याच पोरीला शिकवून मोठं करायचं, तिला आवडत्या खेळात करिअर करू द्यायचं आणि तिच्या आत्मनिर्भरतेसाठी जे काही करता येईल, तेवढं सारं करायचं, हा निर्धार मनाशी घट्ट करून त्यांनी कोल्हापूर गाठलं. तिळवणी (ता. हातकणंगले) गावचे हे दांपत्य.

प्रिया विशेष मुलगी असल्याचं लक्षात आल्यानंतर तिला तेथीलच एका विशेष मुलांच्या शाळेत घातलं आणि त्या वेळी तिला खेळायला खूप आवडतं, त्यातही ज्यूदो हा खेळ तिला आवडतो, हे लक्षात आल्यानंतर रेश्‍मा यांनी इचलकरंजीत अनेक ठिकाणी त्याची माहिती घेतली. पण, त्यांना पाहिजे तसा वर्ग कुठे सापडलाच नाही. अखेर त्यांनी कोल्हापुरात येऊन प्रियाला ज्यूदो शिकविण्याचा निर्णय घेतला. त्यांचे पती संतोष इचलकरंजीत टेक्‍स्टाईल टेक्‍निशियन आहेत. त्यांनीही कोल्हापुरातून रोज अप-डाऊन करण्याचे ठरविले आणि हे दांपत्य कोल्हापुरात आले.

गेले एक वर्ष प्रिया बाबूजमाल येथील शिवाजी हॉलमध्ये आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक अपर्णा पाटोळे यांच्याकडे प्रशिक्षण घेते. सुरवातीला त्यांनाही प्रशिक्षण देताना अडचणी आल्या. त्याचवेळी मग रेश्‍मा यांनीही ज्यूदो खेळायचा निर्णय घेतला आणि प्रियासह त्यांनीही चार महिने सराव केला. प्रिया आता या ज्यूदो वर्गात आणि वि. म. लोहिया मूकबधिर विद्यालयात चांगलीच रमली आहे. तिला ज्यूदोची इतकी आवड की मोबाईलवरही ती ज्यूदोच्या विविध मॅच पाहण्यालाच अधिक पसंती देते. त्याशिवाय, तिच्या चौथीच्या वर्गातही ती नेहमी प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होते.

कोल्हापूर जिल्हा ज्यूदो असोसिएशनच्या जिल्हा संघ निवड चाचणी स्पर्धा नुकत्याच झाल्या. त्यात पहिल्याच प्रयत्नात प्रियाने १३ वर्षांखालील गटात सुवर्णपदक मिळविले आणि तिची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. आजच या मायलेकी गोंदिया येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी रवाना झाल्या. एकीकडे प्रियाच्या आत्मनिर्भरतेसाठी रेश्‍मा यांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी जे काही करायचं ते सर्व करण्याची त्यांची तयारी आहे आणि त्याचवेळी पदवी शिक्षण पूर्ण करून त्यांनी उच्चपदस्थ अधिकारी होण्याचा संकल्प केला आहे.

📚📕📗📘📙📔📒📚

*संकलन -* 
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨

📃  *आजची प्रेरणादायी पोस्ट*  📜

*भाग* - 4⃣0⃣5⃣

*👩🏻 नवरात्र विशेष 👩🏻*

*रोजंदारीतून रोजगार देण्यापर्यंत...!*

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई

मातीची ओढ आणि कष्ट करण्याची तयारी असेल तर नाठाळ जमिनीतून सोने पिकवता येतं, हे साधी अक्षरओळखही नसणाऱ्या जालन्यातल्या सीताबाई मोहितेंनी दाखवून दिले आहे. आवळ्याच्या औषधी गुणधर्माचे महत्त्व पटवून दाखवत जळगावमधल्या सीताबाईं मोहिते यांनी स्वतः शून्यातून धडाडीने व्यवसाय उभा केला आहे. स्वतःच्या संसाराला हातभार लावत असताना निरक्षर असलेल्या सीताबाई अनेक महिलांच्या खंद्या आधार झाल्या आहेत. अभियांत्रिकी, व्यवस्थापनामध्ये धडे गिरवणारे विद्यार्थीही सीताबाईंच्या लघुउद्योगताले मार्केटिंगचे तंत्र शिकून घेण्यासाठी मानाने त्यांना प्रशिक्षण शिबिरे घेण्यासाठी बोलावतात. थँक्यू, सॉरी हे अवघे दोन इंग्रजी शब्द माहीत असलेल्या मोहितेबाईंनी आत्मविश्वासाच्या जोरावर सहज परदेशी वारी करून लक्ष्मी, सरस्वती, दुर्गारूपाची जणू चुणूकच त्यांच्या कामातून दाखवून दिली आहे.
सीताबाई जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातल्या. घरात शिक्षणाचा गंध कुणालाच नाही. पण मातीवर, शेतीवर सगळ्याचा जीव. शेतीतून उत्पन्नाचे फारसे साधन नसल्याने सीताबाई व त्यांचे पती रोजंदारीवर अनेक वर्ष दुसऱ्यांच्या शेतात मजूर म्हणून राबत होते. शेतमळ्यांची राखण करताना सीताबाईंच्या मनात स्वतः खपून मातीतून काही मिळवावे, त्यातून स्वतःसारख्या काबाडकष्ट करणाऱ्या चारचौघींना रोजगार मिळवून द्यावा, ही इच्छा सतत धडका मारत होती. २००३मध्ये रोजंदारी सोडून त्यांनी कसेबसे २०० रुपये भांडवल गोळा केले, त्यातून आवळा कॅन्डी बनवायला सुरुवात केली. पाव
किलो, अर्धा किलो अशी आवळा कॅन्डी घेऊन त्या शाळेच्या बाहेर विकायला बसत, हळुहळू या घरगुती आवळा कॅन्डीच्या उत्कृष्ट चवीची चर्चा गावभर झाली, अन् सीताबाईंच्या कॅन्डीची मागणीही वाढत गेली. सहा-सात वर्षांच्या खडतर प्रयत्नानंतर भोलेश्वर फळ व भाजीपाला प्रक्रिया उद्योग या नावाने त्यांनी बचत खाते उघडले. उद्योगाचा विस्तार करण्यासाठी कर्ज मिळाले असले तरीही छोट्या कमाईतून त्याची परतफेड कशी करायची हा प्रश्न होताच. त्यावरही सीताबाईंनी पतीच्या मदतीने तोडगा शोधून काढला. जालन्यातल्या अनुसूया रोपवाटिकेतून आवळे घेऊन कच्च्या मालासाठी शोध सुरू ठेवला. कॅन्डी बनवण्यासाठी मशिन घेऊन सिंदीकाळेगाव येथे छोटी फॅक्टरी बांधली. त्यात पावसाचे पाणी साठवून उन्हाळ्यामध्ये या पाण्यावर शेती करायला सुरवात केली. जालनाच्या कृषी विज्ञान केंद्रातून शेतीविकासाचे प्रशिक्षण घेत आवळ्याच्या चौदा प्रकारच्या उत्पादनांची निर्मिती सुरू केली. आवळा गुलाब गुलकंद, ज्यूस, सुपारी, कॅन्डी अशा उत्पादनांच्या निर्मितीसाठी आता त्यांनी त्यांच्यासारख्याच गरजू, कष्टाळू महिलांची मदत घेऊन या उद्योगाचा विस्तार केला आहे.

बचतगटाच्या माध्यमातून गावातल्या निरक्षर महिलांना उद्योजिकता, आर्थिक साक्षरता, आत्मभानही मिळवून दिले आहे. त्यांच्या या प्रयत्नांची दखल घेत त्यांना ८८हून अधिक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. लघुउद्योगातून अनेकींना प्रेरणा देणाऱ्या सीताबाईंना नुकतेच आम्ही उद्योगिनी प्रतिष्ठानचाही पुरस्कार मिळाला आहे. ज्या गावात त्या इतरांच्या जमिनीवर काम करत होत्या, खपत होत्या तिथेच आज त्यांनी अनेकींच्या हाताला काम मिळवून दिले आहे.

📚📕📗📘📙📔📒📚

*संकलन -* 
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_

यापूर्वीचे भाग वाचण्यासाठी.......

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨

📃  *आजची प्रेरणादायी पोस्ट*  📜

*भाग* - 4⃣0⃣4⃣

*👩🏻 नवरात्र विशेष  👩🏻*

*गवंडी काम करणाऱ्या सुनिता गायकवाड यांची यशोगाथा*

साभार ~ रामदास वाडेकर

टाकवे बुद्रुक : कधी काळी घरात मूठभर धान्य नव्हते, खायला पावसाळ्यात शेताच्या बांधावरची कुर्डूची भाजी, आणि खेकडे पकडून दिवस निघायचे, त्याच घरात आर्थिक सुबत्ता आली आहे ,शिवाय दिमतीला चारचाकी वाहन आले, इतकी किमया हातात थापी, ओळंबा आणि रंधा घेऊन गवंडी काम करणाऱ्या सुनिता सुरेश गायकवाड यांनी साधली आहे.

आई एकवीरा देवीनेच हे बळ दिले आहे.त्यामुळेच तिच्या अखंड भक्ती पोटी ती नवरात्रात निराकार उपवास धरते. तिच्या वर माझी निस्सीम भक्ती व श्रद्धा आहे. म्हणूनच मी लढत राहिले, कष्ट करीत राहिले. त्या आईचीच आमच्या वर कृपा आहे.
कांब्रे आणि पंचक्रोशीतील अनेकांना निवारा बांधून, शौचालय बांधून देण्यात  त्यांचा हातखंडा आहे, पुरूषाला ही लाजवेल असा त्यांच्या कामाचा वेग आहे. मुळच्या साई गावातील छगन जाधव व सुमन जाधव यांची थोरली लेक,असल्याल्या सुनिता यांच्या पाठीवर जाधव दांपत्याला आणखी चारजणी झाल्या,मुलगा नाही अशी सुरूवातीला आई वडीलांना खंत,त्यातच वडील व्यसनाधीन झाले.

त्यामुळे जेमतेम पाचवी पर्यत मध्यावर  शिक्षण सोडून  सुनिता ला दहीवली या आजोळी राहून वयाच्या अकराव्या वर्षीच रोजंदारीवर जावे  लागले. पुढे चौदाव्या वर्षी कांब्रे तील  सुरेश गायकवाड यांच्याशी  विवाह होऊन जाधवांची लेक गायकवाडांच्या घराची लक्ष्मी झाली. नव्यानेच नऊ दिवस सरले, आणि विभक्त कुटुंबाच्या झळा पुन्हा पदरी पडल्या.

पाहुणे म्हणून आलेल्या माहेरच्या माणसांना चहा करायला घरात साखर आणि चहा पावडर नाही, म्हणून भिंतीच्या आडोशाला नवरा बायकोचे डोळे पाणावले, इतक्या काही संपले नाही. घरात मूठभर धान्य नाही, की आमटीला कडधान्य नाही. पावसाळयात खेकडे गिरवून त्यांची दोन वेळेला पुरले इतके कालवण करायचे, कधी कुर्डूची भाजी तर कधी माठाची भाजी खायची.

नवरा बायको सुरूवातीला गवंडयाच्या हाताखाली बिगारी म्हणून राबायला लागले, हे दिवस पलटायला पाहिजे, आपल्या घरात पसाभर धान्य शिजेल पाहिजे, पोटभर खायला तर मिळालेच पाहिजे पण आपल्याला प्रगती करायची आहे, पुढे जायचे आहे.
हा ध्यास घेत सुनिता गवंडी काम शिकण्याचा प्रयत्न करू लागल्या, एकनाथ नाणेकर या मिस्त्रीने त्यांच्यातील कलेला वाव दिला, सुरूवातीला वीटाचे बांधकाम,त्यानंतर त्यावर प्लास्टर, मग दगड काम शिकण्यास त्या रस घेऊ लागल्या, प्लास्टर करताना वाळू सिंमेटने भरलेली थापी सरळ मारता आली, पण हीच थापी उलटी मारता नाय आली,त्यावेळी त्यांनी हातांनी सिमेंट लावून भिंतीची गोठाई केली. अनेक कष्ट उपासत या कामात त्या आता तरबेज झाल्या आहेत. आज पुरुषाला अधिक चांगले घराचे बांधकाम त्या करीत असल्याचे गावकरी अभिमानाने सांगतआहेत. या कामात अधिक प्राविण्य मिळविण्यासाठी त्यांनी प्रशिक्षण ही घेतले आहे. कमीत कमी नफा मिळविल्याने त्यांना बाराही महिने काम मिळत राहिले.

शासनाच्या निर्मलग्राम योजनेसाठी त्यांनी पंचक्रोशीतील महिलांसाठी घराघरो माफक मजूरीत शौचालय बांधून दिली. त्याचा लाभ माझ्या मायमाऊल्यांना झाला, म्हणून या कामातील आवड अधिक वाढत गेली. वर्षाकाठी अडीच ते तीन लाखाचे उत्पन्न मिळाल्याने दूध व्यवसाय, पिठाची गिरणी सारखे व्यवसाय वाढवता आले. अडीच एकरात ऊस लावून तो संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याला जातो, हे त्या अभिमानाने सांगत आहेत. या सर्व कामात पतीराजांचे मोठे सहकार्य मिळत आहे. समीर १४वीत तर काजल १० वीत शिकलेली दोन अपत्यांची माय मोठ्या स्वाभिमानाने जगत आहे. माझ्या लेकाने  पुढे याच व्यवसायात करिअर करावे अशी माझी इच्छा आहे.

खेडया पाडयातील तरूण बांधकाम क्षेत्रात नगण्य आहे, ती उणीव त्याने भरून काढली पाहिजे.स्वतःचा प्रपंच सावरणा-या सुनिता गायकवाड इतरांसाठी धावत पळत आहेत. जानकीदेवी बजाज ग्रामविकास संस्थेच्या मदतीने त्या खेडयापाडयातील महिलांनी व्यवसायात उतरावे असा आग्रह धरीत आहे. त्यामुळे फावल्या वेळात महिलांना पनीर व साबण बनविण्याचे त्या प्रशिक्षण देत आहे.खेडया पाडयात हक्काचा निवारा  आणि शौचालय बांधून देण्याच्या कामात रोजगारही मिळाला आणि पुण्य प्राप्त झाले, म्हणूनच आज घरात सुखाचे चार दिवस दिसत आहे, याचे मोठे समाधान असल्याचे त्यांनी सांगितले.

सुनिता गायकवाड यांची आई सुमन जाधव व वडील छगन जाधव म्हणाले, "लेकींने घराचे नाव उजळले, त्यामुळे आम्हाला मुलगा नाही ही खंत आता वाटतच नाही, आमची लेक लेका पेक्षा सरस निघाली, त्याने आमचा ऊर अभिमानाने भरून येतो.

📚📕📗📘📙📔📒📚

*संकलन -* 
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_

┄─┅━━Guruvarya Group ━━┅─┄

*🖥♻ गुरुवर्य टिप्स् ♻🖥*

*पेनड्राइव्ह घेताना...*

बहुतांश व्यक्ती आपला डेटा साठविण्यासाठी पेन ड्राइव्हचा उपयोग करतात. पेनड्राइव्हचा वेग आणि डेटा साठविण्याची जागाच नाही तर, आणखी बऱ्याच काही गोष्टी आहेत की ज्या एका चांगल्या उपकरणासाठी महत्त्वाच्या ठरतात.

*पेनड्राइव्ह आहे तरी काय?*

सर्वसामान्यपणे पेनड्राइव्ह म्हणजे पेनप्रमाणे दिसणारे आणि माहिती साठवून ठेवणारे छोटेसे उपकरण होय. मात्र, पेनड्राइव्हचा उपयोग बऱ्याच कारणांसाठी करता येतो. डेटा साठवून ठेवणे, विंडोजचे बॅकअप घेण्याव्यतिरिक्त अन्य वस्तूंना सुरक्षित ठेवण्यासाठीही पेनड्राइव्हचा उपयोग केला जातो.

*वेगही असणे आवश्यक*

ज्यावेळी तुम्ही पेनड्राइव्ह खरेदी करायला जाता, त्या वेळी १६ जीबी साठवण क्षमता असणारे उपकरण १००० रुपयांना असल्याचे आढळून येते. तर, काही पेनड्राइव्हची किंमत पाचशे रुपयेही असल्याचे आढळते. साठवण क्षमता सारखी असूनही त्यांची किंमत वेगवेगळी असण्याचे सर्वांत महत्त्वाचे कारण म्हणजे त्यांचा वेगवेगळा असणारा वेग होय. या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते चांगल्या पेनड्राइव्हसाठी केवळ साठवण क्षमताच नाही तर अन्य वैशिष्ट्येही लक्षात घेण्याची गरज आहे.

*पेनड्राइव्हचे दोन प्रकार*

जेव्हा तुम्ही पेनड्राइव्ह खरेदी करता तेव्हा दुकानदार तुम्हाला दोनप्रकारची उपकरणे दाखविण्याची शक्यता आहे. तज्ज्ञांच्या मते पेनड्राइव्ह ३.० आणि २.० या दोन व्हर्शनमध्ये येतो. ३.० व्हर्शन २.० पेक्षा तुलनेने अधिक वेगवान मानले जाते. ३.०चे व्हर्शन नवे असून, त्याचा डेटा हस्तांतर करण्याचा वेग प्रति सेकंद १०० मेगाबाइट इतका आहे. तर, पेनड्राइव्हच्या २.० या व्हर्शनचा वेग प्रति सेकंद १० ते १५ मेगाबाइट इतका आहे.
पेनड्राइव्हचा आकारही महत्त्वाचा

दिवसेंदिवस पेनड्राइव्हचा आकारही कमीकमी होताना दिसून येत आहे. सध्या बाजारात अतिशय लहान आकाराचे पेनड्राइव्ह उपलब्ध आहेत. मात्र, आकारावर पेनड्राइव्हची कामगिरीही अवलंबून असते. त्यामुळे पेनड्राइव्ह खरेदी करताना त्याच्या आकारावरही लक्ष देणे गरजेचे असते. खरे पाहता, पेनड्राइव्हचा आकार जितका मोठा असेल, तितका त्याचा दर्जा आणि कामगिरी चांगली असते असे मानले जाते. पेनड्राइव्ह जितका वजनाने अधिक तितक्या चांगल्या वस्तूंचा त्याच्या निर्मितीसाठी वापर केला गेला आहे, असे मानले जाते. वजनाने आणि आकाराने कमी किंवा हलका असणारा पेनड्राइव्ह सहजरित्या एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेता येतो.
पासवर्ड सुरक्षित पेनड्राइव्ह

सध्या बाजारात पासवर्डद्वारे सुरक्षित पेनड्राव्ह उपलब्ध झाले आहेत. ज्या व्यक्ती पेनड्राइव्हच्या सुरक्षिततेविषयी अतिशय संवेदनशील आहेत, ज्यांना आपला डेटा कायम सुरक्षित रहावा, असे वाटत असेल त्यांच्यासाठी हे पेनड्राइव्ह अतिशय उपयुक्त आहेत. या माध्यमातून पेनड्राइव्हमधील संवेदनशील डेटा पासवर्डच्या मदतीने सुरक्षित ठेवता येऊ शकतो.

*संकलन -* 
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨

📃  *आजची प्रेरणादायी पोस्ट*  📜

*भाग* - 4⃣0⃣3⃣

*👩‍👧‍👦निराधार भावंडांचे विद्यार्थीच बनले पालक...!*

*- लिंगनूरच्या शाळेतील कहाणी*

*लिंगनूर : रक्ताच्या नात्यांचे बंध तुटतानाच नशिबी आलेल्या बेभरवशाच्या जीवनाला हृदयातून अंकुरलेल्या नव्या नात्याने हात दिला.*

By लोकमत न्यूज नेटवर्क

: _*हृदयाची नवी नाती गवसली; समाजासमोर माणुसकीचा नवा धडा*_

_*हातभार लावताना अप्रत्यक्षरित्या त्यांच्या पालकत्वाची जबाबदारीही स्वीकारली.*_
_*पाठच्या बहिणीच्या चेहऱ्याकडे त्याने पाहिले आणि आलेल्या संकटाला धैर्याने तोंड देण्याचा निश्चय या कोवळ्या मनाने केला.*_

साभार~ मोहन मगदूम ।
लोकमत न्यूज नेटवर्क

लिंगनूर : रक्ताच्या नात्यांचे बंध तुटतानाच नशिबी आलेल्या बेभरवशाच्या जीवनाला हृदयातून अंकुरलेल्या नव्या नात्याने हात दिला. मातृ-पितृ छत्र हरविल्यानंतर निराधार झालेल्या आठवीतील एका मुलाचे व त्याच्या बहिणीचे पालकत्व कोणी धनाढ्य व्यक्तीने नव्हे, तर त्यांच्याच शाळेतील बारावीच्या मुलांनी स्वीकारले. माणुसकीच्या वाटेवरची शाळेत जन्मलेली ही कहाणी नवा धडा बनून व्यावहारिक समाजासमोर आली आहे.
लिंगनूर येथील सेवा आश्रम विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेणाºया इयत्ता बारावीच्या मुलांनी दिलेला माणुसकीचा धडा चर्चेचा विषय बनला आहे. याच शाळेत आठवी इयत्तेत शिकणाºया सूरज चंद्रकांत नाईक या मुलावर काही वर्षापूर्वी संकट कोसळले. आई-वडिलांचे छत्र हरविल्याने त्याच्यावर आभाळ कोसळले. यातून सावरणं कोणालाही कठीणच. पण पाठच्या बहिणीच्या चेहºयाकडे त्याने पाहिले आणि आलेल्या संकटाला धैर्याने तोंड देण्याचा निश्चय या कोवळ्या मनाने केला.

स्वयंपाकपाण्यापासून सगळ्या जबाबदाºया त्याने स्वत:वर घेतल्या आणि शिक्षणाचे दोरही बळकट केले. काट्याकुट्यांचा हा प्रवास तो मूकपणे चालत राहिला. पाच किलोमीटर अंतरावरील शाळा शिकताना सुरू असलेला या बहीण-भावाचा हा खडतर प्रवास त्यांच्याच शाळेतील बारावीच्या मुलांना दिसला. त्यांच्या हिमतीला केवळ दाद देऊन हे विद्यार्थी थांबले नाहीत. सामाजिक परिपक्वतेचे दर्शन घडविताना या विद्यार्थ्यांनी त्यांना हातभार लावताना अप्रत्यक्षरित्या त्यांच्या पालकत्वाची जबाबदारीही स्वीकारली. स्वत:च्या खर्चासाठी आणलेल्या पैशातून वर्गणी काढून त्यांनी सूरज व त्याच्या बहिणीच्या शैक्षणिक वस्तूंची पूर्तता केली.

घरामध्ये आई, वडील असे मोठे कोणीच नसल्याने, घरातील सर्व कामे, तसेच लहान बहिणीसाठी व स्वत:साठीही जेवण तयार करण्याचे देखील काम सूरजलाच करावे लागते. हे सर्व करून परत शाळेला ५ कि.मी. चालत यावे लागते. त्यांची ही धडपड पाहून १२ वी मधील मुकुंद कुंभार, नितीन मगदूम, लक्ष्मण नाईक, प्रकाश पाटील, सदाशिव नाईक, बिरदेव गावडे, जोतिबा जाधव, विजय कांबळे या विद्यार्थ्यांनी पुढाकार घेऊन, मुकुंद कुंभार या विद्यार्थ्याच्या घरातील वापरात नसलेली सायकल दुरुस्त करून घेतली व सूरजला दिली. तसेच कपडे, वह्या, पेन, चप्पल आदी साहित्यदेखील त्यांनी घेऊन दिले.

सामाजिक संस्था, लोकप्रतिनिधी, तसेच शिक्षकांनी या निराधारांना आर्थिक अथवा वस्तुरूपी मदत करायला हवी. जे अपंग, अनाथ, निराधार, पीडित असतात, शिक्षणापासून वंचित असतात, जे प्रामाणिकपणे आपले कार्य करतात, अशा समाजातील मुलांना मदतीचा हात दिला पाहिजे. आपण केलेली मदत कुणा गरजूच्या आयुष्यातील आशेचा एक किरण बनू शकतो.

- प्रा. सुनील खुट्टे
(बारावीचे वर्गशिक्षक, लिंगनूर)

📚📕📗📘📙📔📒📚

*संकलन -* 
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_