twitter
rss

वार - मंगळवार

🌄 दिनांक - 31/01/2017


🎯 आजच्या शैक्षणिक बातम्या 🎯


-----------------------------------------------
साभार -Online पुढारी, लोकसत्ता,म.टा.,सकाळ.

-----------------------------------------------

संकलन - गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली

-----------------------------------------------
'                      
📚मराठी साहित्याला ई-बुक्सची साथ..

मराठीतील दुर्मीळ आणि नवीन पुस्तके आता ई-पुस्तकांच्या स्वरूपातही वाचता येणार आहेत.

प्रतिनिधी, मुंबई | January 31, 2017 3:15 AM


सहा मराठी प्रकाशकांची पुस्तके ‘मराठी रीडर’अ‍ॅपवर

मराठीतील दुर्मीळ आणि नवीन पुस्तके आता ई-पुस्तकांच्या स्वरूपातही वाचता येणार आहेत. किंडल आणि ई-बुक रिडर्सचा वापर वाढला तरी  चांगली मराठी पुस्तके ई-पुस्तकांच्या स्वरूपात नाहीत, याची अशी खंत वाचकांकडून गेल्या काही वर्षांत व्यक्त केली जात होती. त्यावर तोडगा काढण्यासाठी मराठीतील सहा प्रकाशकांनी एकत्र येऊन ‘मराठी रीडर’ नावाने वाचनाचे व्यासपीठ खुले केले आहे. मौज, राजहंस, ज्योत्स्ना, पॉप्युलर, रोहन, कॉन्टिनेन्टल या मराठीतील सहा नामांकित प्रकाशनांनी आपली पुस्तके ‘मराठी रीडर’ या अ‍ॅपवर वाचण्याची संधी वाचकांना उपलब्ध करून दिली आहे.
यासाठी ‘मराठी रीडर’  अ‍ॅपसाठी अ‍ॅण्ड्रॉइड मोबाइलमधील प्ले-स्टोअरमधून ‘मराठी रीडर’ (marathireader) नावाचे अ‍ॅप्लिकेशन डाऊनलोड करावे लागणार आहे.  त्यावरील नोंदणीवरून   पुस्तकांच्या यादीत देण्यात आलेली पुस्तके मिळविता येतील. सध्या ‘मराठी रीडर’मध्ये १२५ पुस्तके असून यात मर्ढेकरांची कविता, असा बालगंधर्व, सावरकरांचा बुद्धिवाद आणि हिंदुत्ववाद, अंधारातून प्रकाशाकडे यांसारखी पुस्तके वाचनासाठी उपलब्ध आहेत. डाऊनलोड केलेल्या पुस्तकातील अक्षरांचा आकार वाढवता आणि कमी करता येणार आहे. मराठी रीडर अ‍ॅपबरोबरच ई-पुस्तकांसाठी संकेतस्थळाची निर्मिती करण्यात आली आहे. ‘मराठी रीडर’चा वापर करीत असताना पडलेले प्रश्न किंवा समस्या वाचकांनी संकेतस्थळावर टाकावीत. या सूचनांच्या मदतीने ई-पुस्तक प्रणालीत बदल करता येणे शक्य होईल, असे रोहन प्रकाशनचे रोहन चंपानेरकर यांनी सांगितले. डोंबिवली येथील मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटनाच्या दिवशी ‘मराठी रीडर डॉट इन’ या ई-पुस्तकाची अधिकृत घोषणा होणार आहे आणि त्या वेळी २७९ स्टॉलवर ई-पुस्तकाचे प्रात्यक्षिकही दाखविण्यात येणार आहे. मराठी पुस्तकांना मागणी नाही, अशी ओरड सुरू असली तरी समाजमाध्यमांवरील संदेश, माहिती वाचणाऱ्यांची संख्या वाढली आहे. जर मराठी पुस्तके मोबाइलवर उपलब्ध झाली तर ई-पुस्तकांना चांगला प्रतिसाद मिळेल, असा विश्वास राजहंस प्रकाशनचे डॉ. सदानंद बोरसे यांनी व्यक्त केला.



*⛳गुरुवर्य ग्रुप,कवठेमहांकाळ,सांगली ⛳*

┄─┅━━Guruvarya Group ━━┅─┄
*🎂गुरुवर्य ग्रुप,वर्धापनदिनविशेष 🎂*

*🤔♻ प्रश्नमंजुषा स्पर्धा २०१७ ♻🤔*



*🎯🏵 अंतिम निकाल 🏵🎯*


     *🏆🏆 महाविजेता 🏆🏆*


*🎖सौ.संजीवनी उद्धव पाटील 🎖*

_*जिल्हा परिषद शाळा,मळणगांव ,ता.कवठेमहांकाळ*_


_*🎁🎉🎊 Congratulations 🎉🎊🎁*_