...तरीही ‘ती’ एमआयटीत पोहोचली. मुंबईकन्या मालविका जोशीची उत्तुंग भरारी
म. टा. प्रतिनिधी, मुंबई
दहावी आणि बारावीचे
प्रमाणपत्र नसले की, कॉलेजामध्ये प्रवेश
ही मिळत नाही. मात्र
मुंबईची कन्या मालविका जोशीने हे
समीकरण मोडत देशाच्या
शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.
दहावी आणि बारावी
उत्तीर्णचे प्रमाणपत्र नसतानाही केवळ
आपल्या ज्ञानाच्या
जोरावर या मालविकाने चक्क मॅसॅच्युसेट्स
इन्स्टिट्यूट ऑफ
टेक्नोलॉजीमध्ये (एमआयटी) प्रवेश मिळवला
आहे. मालविकाचे
कम्प्युटरमधील ज्ञान आणि ऑलम्पियाड
स्पर्धेतील तिची
कामगिरी लक्षात घेता एमआयटीने
तिच्यासाठी शिक्षणाची
कवाडे खुली करून दिली आहेत.
मालविकाच्या
कामगिरीबद्दल सांगताना तिची आई सुप्रिया
जोशी म्हणतात, मालविकाने दादर पारसी युथ असेम्ब्ली या
शाळेत सातवीपर्यंत
शालेय शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर आता
ती एमआयटीत बॅचलर ऑफ
सायन्सचे शिक्षण घेत आहेत.
मालविकाने इंटरनॅशनल
ऑलिम्पियाड ऑफ इन्फॉरमेटिक या
स्पर्धेत दोन रौप्य आणि
एक कांस्य पदाची कमाई केली असून या
कामगिरीच्या जोरावर
एमआयटीने तिच्याशी संपर्क साधत
तिच्यासाठी शिक्षणाची
दालने खुली केली आहेत. यासाठी
तिला एमआयटीकडून
शिष्यवृत्ती देखील देण्यात आली आहे.
मालविकाला कॉलेजमध्ये
जाऊन शिक्षण घेण्यात
पहिल्यापासून फारसा
उत्साह नव्हता. त्यामुळे तिने सुरुवातीला
एमआयटीने दिलेला
प्रस्ताव फेटाळला होता. मात्र त्यानंतर
तिने संस्थेबाबत आणि
अभ्यासक्रमाबाबत माहिती गोळा केली,
आणि त्यानंतर होकार
कळवला,
असेही तिच्या आईने सांगितले.
तिच्याकडे दहावी आणि
बारावीची मार्कशीट नसली तरी
एमआयटीत प्रवेश घेताना
तिचे कयुटरमधील ज्ञानाचा एक
अहवाल मागवण्यात आला
होता. त्यानंतरच तिची निवड
करण्यात आली, असेही तिच्या आईने सांगितले.
आपल्या मुलांनी दहावी
आणि बारावीची परीक्षा दिली
नाही. तर पालकांमध्ये
चिंतेचे वातावरण निर्माण होते.
मालविकाचा आम्हाला
सार्थ अभिमान आहे, असेही तिच्या
आईने सांगितले. तर
मालविकाला आयआयटीत प्रवेश घ्यावायचा
होता. मात्र तिच्याकडे
बारावीचे प्रमाणपत्र नसल्याने तिला
तिथे प्रवेश नाकारण्यात
आला होता,
असे तिचे शिक्षक महेंद्र
करकरे यांनी सांगितले.
📚📕📗📘📙📔📒📚
संकलन
गुरुवर्य
ग्रुप कवठेमहांकाळ सांगली