twitter
rss

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨
📃  *आजची प्रेरणादायी पोस्ट*  📜

*भाग* - 4⃣8⃣2⃣

*LMOTY 2019: जिल्हा परिषद शाळेत डिजिटल क्रांती; हायटेक शिक्षकाचा 'लोकमत'कडून गौरव*

By ऑनलाइन लोकमत | Follow  | Published: February 20, 2019 06:35 PM

मुंबई : सरकारी शाळांमधून फळा आणि खडूच्या साह्याने शिकविले जाणारे धडे जिल्हा परिषदेच्या एका शिक्षकाने डिजिटल रुपात विद्यार्थ्यांना गिरवायला लावत मोठी क्रांती घडविली आहे. अशा या शिक्षक रणजितसिंह डिसले यांना 'महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कार प्रदान करण्यात आला. मुंबईत वरळीच्या भव्य एनएससीआय डोममध्ये रंगलेल्या दिमाखदार सोहळ्यात रणजितसिंह डिसले यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

रणजितसिंह डिसले हे सोलापूरमधील परितेवाडीयेथील जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षक आहेत. त्यांनी नाविन्यपूर्ण प्रयोगांनी फळा आणि खडूत अडकलेलं परंपरातगत शिक्षण बदलून टाकलं. देशाच्या शिक्षण क्षेत्रात तंत्रस्नेही क्रांतीची सुरुवात करणारे उपक्रम डिसले गुरुजींनी राबवले आहेत. 'क्युआर कोड' आणि 'व्हर्च्युअल फिल्ड ट्रीप'च्या स्मार्ट उपक्रमातून त्यांनी शिक्षण पद्धतीला डिजिटल रूप दिलं. त्यांच्या या उपक्रमाची दखल घेऊन जगप्रसिद्ध मायक्रोसॉफ्ट कंपनीने त्यांना 'मायक्रोसॉफ्ट इनोव्हेटिव्ह एज्युकेशन एक्सपर्ट' या किताबाने तब्बल चारवेळा गौरविलं आहे. प्रत्येक विद्यार्थ्याच्या पुस्तकातील प्रत्येक धड्यावर त्यांनी 'क्युआरकोड' चिकटवला आणि परितेवाडीच्या शाळेतील पुस्तकाच्या धड्यांना डिजिटल केले. या 'क्युआरकोड' समोर विद्यार्थ्याने मोबाईल धरला की धड्याची व्हिडीओ माहिती, कवितेची ऑडीओ क्लिप बोलू लागली. अभ्यासाच्या पद्धतीतील या बदलामुळे मुलांच्या समजण्या उमजण्याची क्षमता कैक पटीने वाढली.

याशिवाय 'व्हर्चुअल फिल्ड ट्रिप' द्वारे इतिहास जिवंत केला आहे. वर्गात शिकविलेल्या गोष्टीपेंक्षा अधिक माहिती विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून लाईव्ह ऐकली. विविध ठिकाणे, प्राण्यांची माहीती त्यांनी याद्वारे उपलब्ध करू दिली आहे. जगभरातील ८८ देशांच्या वेगवेगळ्या तज्ज्ञांनी परितेवाडीच्या मुलांशी लाईव्ह संवाद साधलाय. मुलांच्या प्रश्नांना उत्तरे देऊन शंका समाधान केलेय. अशा पध्दतीने ज्ञानदान करणारा भारत आठवा देश आणि भारतात परितेवाडी ही पहिली शाळा होती.

*हे होतं परीक्षक मंडळ*

केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, ज्येष्ठ गायिका आशा भोसले, पद्मभूषण डॉ. सुरेश अडवाणी, लोकमत ग्रूपचे चेअरमन विजय दर्डा, यूपीएल लिमिटेडचे ग्लोबल सीईओ जयदेव श्रॉफ, रॉनी स्क्रूवाला, फेसबुक इंडिया हेड(मीडिया) अंकुर मेहरा, क्रिकेटवीर अजिंक्य रहाणे, निर्माता-दिग्दर्शक महेश मांजरेकर, ज्येष्ठ अभिनेते सचिन खेडेकर, लोकमत समूहाचे एडिटोरियल अँड जॉइंट मॅनेजिंग डायरेक्टर ऋषी दर्डा, जेएसडब्ल्यू ग्रूपचे अध्यक्ष सज्जन जिंदल, आर के होम सोल्युशन्स मार्केटिंग आणि कन्सल्टन्सीचे एमडी राजेश खानविलकर.

http://m.lokmat.com/maharashtra/lokmat-maharashtrian-year-2019-ranjitsinh-disale-wins-best-teacher-award-education-category/?fbclid=IwAR1aMGDoI0uFQ-dKbqFKHjYX58M3jLd7pRF3IHh6XT5XSSm9atBMPm0U5dU

📚📕📗📘📙📔📒📚
*संकलन -* 
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_

यापूर्वीचे भाग वाचण्यासाठी आपल्या .....

http://guruvarykm.blogspot.in/     

या blog ला भेट द्या..

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨
📃  *आजची प्रेरणादायी पोस्ट*  📜

*भाग* - 4⃣8⃣1⃣

*🌀प्रामाणिकपणा असावा तर असा; विद्यार्थ्याने केले दीड लाख परत*

Published On: Feb 19 2019

दैनिक पुढारी,

वैराग (सोलापूर) : प्रतिनिधी  

आज पैशाच्‍या  मागे सर्वजण धावताना दिसतात. सख्या भावा भावात जमीन व पैशावरुन  भांडणे हा प्रकार नवीन राहिलेला नाही. केवळ शेपाचशे रुपयांसाठी समाजात भांडणे लागल्‍याचे आपण पाहिले आहे. पण चक्क दीड लाख रुपयांची रक्कम सापडूनही परत करण्याचे औदार्य वैराग येथील महाविद्यालयीन विद्यार्थ्याने दाखवले आहे. स्वार्थी बनत चाललेल्या समाजात पैशांपेक्षाही प्रामाणिकपणा महत्वाचा असल्याचे या कष्टकऱ्या मुलाने सिद्ध केल्याने त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

वैराग येथील नागनाथ वाघ यांचा मुलगा निलेश नागनाथ वाघ हा डिप्लोमाचे शिक्षण घेत रसवंतीगृह चालवत आहे. मोहोळ - वैराग रस्त्यावर सुरू केलेल्या रसवंती गृहावर नेहमीप्रमाणे प्रवासी ग्राहकांची रेलचेल होती. रस काढता -काढता टेबलवर कुणीतरी बॅग विसरल्याचे लक्षात आले. मोहोळकडे जाणाऱ्या एका दुचाकीस्वाराने रस पिऊन बॅग इथेच विसरून गेल्याचे निलेशच्या नजरेतून सुटले नाही. त्याने तात्काळ रसवंतीगृह तसेच सोडून त्या व्यक्तीचा पाठलाग सुरू केला. पाच सहा किलोमीटर गेल्यावर ती व्यक्ती निलेशला सापडली. जेव्हा निलेशनी बॅग दाखवली तेव्हा त्या व्यक्तिला आपली बॅग विसरली होती हे कळले. निलेशनी ती बॅग त्यांच्या स्वाधीन करुन वस्तू तपासा म्हणून सांगितल्यावर बॅग उघडली. तेव्हा बॅगेत असणारे रोख एक लाख रुपये व दोन तोळे सोने आहे तसे होते.

निलेशच्या प्रामाणिकपणाचे कौतुक त्या माणसाने केले खरे, पण त्याची प्रामाणिक धावपळ बघून रसवंती गृहातील इतर ग्राहकांनीही त्याचे अभिनंदन केले आहे. शिक्षण घेत रसवंतीगृह चालवून कष्ट करणाऱ्या निलेशनी कसलेही लालसा न बाळगता प्रामाणिकपणे परत करुन समाजापुढे नवा आदर्श निर्माण केला आहे.

निलेशचे वडील नागनाथ कोकणात राज्य परिवहन महामंडळात वाहक म्हणून सेवा बजावत असताना दोनवेळा सोने सापडले होते. एकदा पाव किलो व एकदा शंभर ग्रॅम हे सोने त्यांनी ही प्रामाणिकपणे परत केले होते.

http://pudhari.news/news/Solapur/If-it-is-honesty-The-lacquer-returns-to-the-student/m/

📚📕📗📘📙📔📒📚
*संकलन -* 
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨
📃  *आजची प्रेरणादायी पोस्ट*  📜

*भाग* - 4⃣8⃣0⃣

*👨🏻‍🏫बांधावर अभ्यास करून गुरुजी बनला उपजिल्हाधिकारी*

महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 15 Feb 2019,

पंढरपूर (सुनील दिवाण)

स्पर्धा परीक्षा हे अलीकडच्या काळातील विद्यार्थ्यांचे स्वप्न बनत असून यासाठी अनेक वर्षे हि मुले पुणे, मुंबई, दिल्ली अशा मोठ्या शहरात राहून या परीक्षांची तयारी करतात. यासाठी भक्कम फी असलेल्या नामांकित क्लासेसमध्ये प्रवेश घेत आपले नशीब अजमवतात. काल आलेल्या राज्य स्पर्धा परीक्षेच्या निकालात एका गुरुजीने नोकरी सांभाळत शेताच्या बांधावर अभ्यास करून राज्यात पहिला येण्याचा चमत्कार करून दाखवला आहे.

महेश जमदाडे हा पंढरपूर तालुक्यातील जैनवाडी गावच्या एका छोट्याशा शेतकरी कुटुंबातील तरुण. परिस्थितीमुळे बारावीनंतर डीएड करून रयतेच्या शाळेवर नोकरीला लागला. मुलांना शिकवताना त्याला शिक्षणाची आवड शांत बसू देत नव्हती आणि यातूनच त्याने मुक्त विद्यापीठातून बीएची पदवी घेतली. गेल्यावर्षी त्याची दहिवडी वरून गावाजवळील भाळवणी येथील शाळेवर बदली झाली आणि त्याला आपण स्पर्धा परीक्षेसाठी तयारी करावी असा विचार मनात आला. आणि त्या दृष्टीनं त्यानं प्रयत्नही सुरू केले. एका वर्षात दोन परीक्षांत तो पासही झाला आणि त्याची निवड देखील झाली.
दिवसभर शाळेत शिकवून घरी आल्यानंतर रात्री तो अभ्यासाला बसत असे. स्पर्धा परीक्षांसाठी खूप पुस्तकांचा अभ्यास लागतो यावर मात्र त्याचा विश्वास नव्हता आणि म्हणूनच मोजक्याच पुस्तकांचा व्यवस्थित अभ्यास करुन जुन्या प्रश्नपत्रिका सोडवण्यावर महेशने भर दिला. मुख्य परीक्षेसाठी शाळेतून एक महिना रजा घेऊन त्याने या काळात भरपूर अभ्यास केला. महेशचे कुटुंब त्याचा पगार आणि दोन एकर शेतातून येणाऱ्या उत्पन्नावर अवलंबून आहे. त्यामुळे आई वडील दिवसभर शेतात काम करीत तर त्याचा लहान भाऊ शेतातच स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करीत असे. महेशचे घर शेतातच असल्याने त्यानेही लहान भावाप्रमाणे शेताच्या बांधावर बसून अभ्यास केला. यावेळी त्याची सव्वा वर्षाची मुलगी हेच त्याचा विरंगुळा होता. या परीक्षेसाठी त्याला ना कोणती शिकवणी होती ना कोणाचे मार्गदर्शन मात्र आपल्या पास झालेल्या मित्रांशी बोलून त्याने सर्व तयारी केली आणि तो इतर मागास प्रवर्गातून राज्यात पहिला आला तर ओपन मधून दुसरा. महेशच्या यशाने मुलाने पांग फेडल्याची भावना त्याच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली आहे. शाळेतही महेशचे कौतुक होत असून सलग तीन परीक्षा पास झालेला महेश आजही शाळेत मुलांना शिकवण्यात तेवढाच रममाण होत असतो. स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करणाऱ्या मुलांनी कोणते क्लास लावले आणि किती पुस्तके वापरली यापेक्षा जो अभ्यास कराल तो मन लावून करा आणि जुन्या प्रश्नपत्रिकांवर भर द्या असा सल्ला महेशनं दिला आहे.

https://m.maharashtratimes.com/kolhapur-western-maharashtra-news/solapur/mpsc-result-2019-mahesh-jamdade-comes-first-in-state/articleshow/68009029.cms?utm_source=facebook.com&utm_medium=referral&utm_campaign=jamdade140219&fbclid=IwAR01mv1Uul3L0bCr1RK128pKik22lzw61t9cnPtmEH0HcHhQcL8MEwYRJ_c

📚📕📗📘📙📔📒📚
*संकलन -* 
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨
📃  *आजची प्रेरणादायी पोस्ट*  📜

*भाग* - 4⃣7⃣9⃣

*🌳⛏झाडे खिळेमुक्त करणारी ‘आंघोळीची गोळी’*

*_राज्यभरात ५ हजार झाडांमधून ५० हजार खिळे काढले_*

लोकसत्ता टीम | February 5, 2019

*नमिता धुरी, मुंबई*

झाडांना वेदनाही होतात, हे विसाव्या शतकात भारतीय शास्त्रज्ञ जगदीशचंद्र बोस यांनी सिद्ध केले होते. तरीही झाडांबाबतची संवेदनशीलता आजही आपल्यात हवी तशी रुजलेली नाही. मात्र महाराष्ट्रातील काही तरुणांना झाडांच्या वेदना जाणवल्या. त्यांच्या ‘अंघोळीची गोळी’ या संस्थेने वर्षभरात शेकडो झाडे खिळेमुक्त केली आहेत.
गेल्या वर्षी १ एप्रिलपासून ‘आंघोळीची गोळी’ या संस्थेने राज्यभरातील झाडे खिळेमुक्त करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. नजर लागू नये या अंधश्रद्धेपोटी झाडाला लिंबू आणि खिळे किंवा घोडय़ाची नाल ठोकली जाते. विविध राजकीय पक्षांचे तसेच जाहिरातींचे बॅनर्स लावण्यासाठीही खिळे ठोकले जातात. काही वेळा फेरीवाले आपल्या वस्तू टांगण्यासाठी किंवा छप्पर बांधण्यासाठी खिळे ठोकतात. यामुळे झाडांच्या आरोग्यावर परिणाम होतो. आतापर्यंत संस्थेने मुंबईतील १ हजार झाडांमधून ५ हजार खिळे काढले  आहेत. तर राज्यभरातील एकूण ५ हजार झाडांमधून ५० हजार खिळे काढले आहेत. झाडांचे खिळे काढले की संस्थेचे काम संपत नाही. तर जिथून खिळे काढले त्या ठिकाणी मेण लावले जाते, जेणेकरून वाळवी आणि इतर किडे लागू नयेत.
‘झाडांना खिळे ठोकल्याने त्यांच्या मज्जासंस्थेला हानी पोहोचते. माणसाच्या शरीरात जसे रक्त असते तसेच झाडांमध्येही एक प्रकारचा द्रवपदार्थ असतो. खिळे ठोकल्याने तो द्रव आणि इतर पोषक घटक यांच्या अभिसरणात अडथळा येतो. त्यामुळे झाडांच्या प्रत्येक अवयवापर्यंत पुरेसे अन्न पोहोचत नाही. तसेच बाहेरील इतर विषारी घटक झाडांच्या शरीरात प्रवेश करतात आणि त्यांचे आयुष्यमान खुंटते.
दोन वर्षांपूर्वी मुलुंड-गोरेगाव लिंक रोडवर एका कंपनीने खिळे ठोकून अनेक झाडांना मारले होते,’ अशी माहिती वनशक्तीचे स्टॅलिन यांनी दिली. भारतीय विज्ञान संस्थेच्या अहवालानुसार १९७० साली मुंबईचे हरित क्षेत्र ३५ टक्क्यांहून अधिक होते. मात्र आता ते १३ टक्क्यांपेक्षा कमी उरले आहे. नागरिकांना प्राणवायूचा पुरवठा होण्यासाठी हरित क्षेत्राचे प्रमाण किमान ३३ टक्के असणे आवश्यक आहे.
खिळेमुक्त झाडे उपक्रम राबवणाऱ्या तरुणांना काही ठिकाणी अतिशय धक्कादायक अनुभव येतात. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे एका झाडावर ५० खिळे आढळले होते. एकदा मालाड येथे काम करताना त्यांनी २८ झाडांमधून ५०० स्टॅपलर पिन्स काढल्या होत्या.

*पाणी बचतीची संकल्पना*

आठवडय़ातून एक दिवस म्हणजे रविवारी आंघोळ करायची नाही आणि पाणी वाचवायचे, अशी एक साधी-सोपी कल्पना पुण्याच्या माधव पाटील यांना सुचली. ज्या भागात पाणी नाही तेथील नागरिकांच्या भावना समजून घेणे हा त्यामागील उद्देश होता. यातूनच चार वर्षांपूर्वी ‘अंघोळीची गोळी’ संस्थेची स्थापना करण्यात आली. मात्र ही संस्था पाणीबचतीपुरतीच मर्यादित राहिली नाही. त्यांनी ‘खिळेमुक्त झाडे’ उपक्रमाला सुरुवात केली.

*_जे झाड आपल्याला प्राणवायू, पाऊस अशा जीवनावश्यक गोष्टी पुरवते त्याची काळजी आपणच घेतली पाहिजे. याच विचारातून आम्ही हा उपक्रम राबवीत आहोत. त्याला यश येत आहे. वसई-विरार महापालिका आणि पिंपरी-चिंचवड महापालिके ने अध्यादेश काढून झाडांना खिळे ठोकणाऱ्यांना २ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे._*

*– तुषार वारंग, मुंबई जिल्हा समन्वयक, अंघोळीची गोळी*

📚📕📗📘📙📔📒📚
*संकलन -* 
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨
📃  *आजची प्रेरणादायी पोस्ट*  📜

*भाग* - 4⃣7⃣8⃣

_*मराठी मुलगी देणार स्वीडनच्या पंतप्रधानांना सल्ला*_

*मराठी मुलीची स्वीडनच्या पंतप्रधानांच्या सल्लागारपदी नियुक्ती*

साभार - NEWS18 लोकमत,
   
दिल्ली, 7 फेब्रुवारी : देशात मराठी पंतप्रधान होणार की नाही याची चर्चा सुरू असतानाच एक मराठी मुलगी स्वीडनच्या पंतप्रधानांना सल्ला देणार आहे. भारतीय वंशाच्या असलेल्या नीला विखे पाटील यांनी भारताचा झेंडा अटकेपार लावला आहे. त्या स्वीडनच्या पंतप्रधांनांच्या सल्लागारपदी म्हणून काम करणार आहेत.

गेल्या महिन्यात स्टीफन लोफवन यांनी स्वीडनच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यांच्या सल्लागार म्हणून 32 वर्षीय नीला विखे पाटील काम करणार आहेत. त्या शिक्षणतज्ज्ञ अशोक विखे पाटील यांच्या कन्या आहेत.

स्वीडनच्या पंतप्रधान कार्यालयात नीला यांच्याकडे आर्थिक, कर, वित्तीय बाजार, अर्थसंकल्प आणि गृहनिर्माण खात्यांचे काम असणार आहे. नीला यांचा जन्म स्वीडनमध्येच झाला असून त्या महापालिकेच्या निवडणूक समिती सदस्य आहेत.

नीला या विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण पाटील यांच्या पुतणी आहेत. नीला यांनी गॉथेनबर्ग स्कूल ऑफ बिझनेसमधून अर्थशास्त्र आणि कायदा या विषयांसह एमबीए केले आहे. याशिवाय माद्रीदमधील कॉम्प्ल्यूटन्स विद्यापीठातूनही एमबीए केले आहे.

https://lokmat.news18.com/news/nila-vikhe-patil-as-a-swedish-prime-ministers-adviser-339411.html?fbclid=IwAR0qJXkrEKeOVWQDHsK-5PVK0qHVZKY3APivseq7GRfhTf9_4S1zHdmu5bc

📚📕📗📘📙📔📒📚
*संकलन -* 
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨
📃  *आजची प्रेरणादायी पोस्ट*  📜

*भाग* - 4⃣7⃣7⃣

*🏏मराठमोळी सांगलीची स्मृती जगात भारी!*

Published On: Feb 02 2019

दैनिक पुढारी,

दुबई : वृत्तसंस्था

भारतीय महिला क्रिकेट संघाची सलामीची फलंदाज स्मृती मानधनाने देशाची मान आणखी उंचावली असून, आयसीसीच्या महिला एकदिवसीय फलंदाजी क्रमवारीत स्मृती अव्वल स्थानावर विराजमान झाली आहे. आयसीसीने शनिवारी ही क्रमवारी जाहीर केली.

स्मृतीने न्यूझीलंड विरोधात तीन एकदविसीय सामन्यात दमदार फलंदाजी करत ‘प्लेअर ऑफ द सीरिज’चा पुरस्कार पटकावला होता. गतवर्षापासून चांगल्या फार्मात असलेल्या 2018 मध्ये स्मृतीने दोन शतकांसह आठ अर्धशतके झळकावली आहेत. नुकतेच तिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने 2018 वर्षातील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू म्हणून गौरविले आहे.

आयसीसीच्या क्रमवारीत स्मृतीने (751) 70 गुणांच्या आघाडीसह ऑस्ट्रेलियाच्या एलिसे पेरीला मागे टाकले आहे. ऑस्ट्रेलियाचीच मेग लॅनिंग 76 गुणांच्या पिछाडीसह तिसर्‍या स्थानावर आहे. भारतीय संघाची कर्णधार मिताली राज पाचव्या स्थानावर आहे. तिच्या खात्यात 669 गुण असून अव्वल दहा महिला फलंदाजांमध्ये भारताच्या दोनच खेळाडूंचा समावेश आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात नाबाद 81 धावा करणार्‍या जेमिमा रॉड्रीग्जच्या क्रमवारीतही सुधारणा झाली आहे. जेमिमाने 64 स्थानांची भरारी घेताना 61 वा क्रमांक पटकावला आहे. गतवर्षी मार्च महिन्यात वन-डे संघात पदार्पण करणार्‍या जेमिमाने आतापर्यंत केवळ सातच सामने खेळले आहेत.

भारताविरोधात तिसर्‍या सामन्यात उत्कृष्ट प्रदर्शन करणारी न्यूझीलंड संघाची कर्णधार एमी सॅटरवेटला दहा अंकाचा फायदा झाला आहे. एमी आता चौथ्या स्थानावर पोहोचली आहे. भारताची कर्णधार मितालीला एक क्रमचा फटका बसला आहे. मिताली चौथ्या स्थानावरून पाचव्या स्थानावर घसरली आहे.

📚📕📗📘📙📔📒📚
*संकलन -* 
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨
📃  *आजची प्रेरणादायी पोस्ट*  📜

*भाग* - 4⃣7⃣6⃣

*‘त्याने’ दाखविलेल्या सतकर्तमुळे ‘काळा’नेही पत्करली सपशेल शरणागती..*

_स्वत:चा जीव धोक्यात घालून प्रसंगावधानता बाळगल्यामुळे कोल्हापूर डेपोच्या नाशिक कोल्हापूर या शिवशाही गाडीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा जीव वाचवुन त्याने मोठा अपघात टाळला._

साभार - ऑनलाइन लोकमत | Follow  | Published: January 31, 2019

ओझर : काळ आला होता परंतु वेळ आली नव्हती अशा जीवघेण्या प्रसंगातुन एका तरुणाने स्वत:चा जीव धोक्यात घालून प्रसंगावधानता बाळगल्यामुळे कोल्हापूर डेपोच्या नाशिक कोल्हापूर या शिवशाही गाडीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा जीव वाचवुन त्याने मोठा अपघात टाळला. 
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोल्हापुर डेपोची नाशिक - कोल्हापुर  ही (एमएच- 09- एट-1876 ) क्रमांकाची गाड़ी  गुरुवारी (दि.३१) सकाळी सहा वाजता नाशिकवरुन कोल्हापुरला जाण्यासाठी निघाली होती.  ही बस नारायणगावच्या पुढे गाड़ी आलेली असताना जुन्नर येथील नवरंग मेडिकलचे मालक आलोक जंगम या तरुणाने शिवशाही बसच्या मागील डाव्या बाजुच्या चाकाचे बोल्ट निखळलेले पाहिले. आलोकने गंभीर अपघाताचा धोका ओळखून सतर्कता दाखवत चालकाला या गोष्टीची कल्पना देण्यासाठी शिवशाहीचा पाठलाग सुरु केला. भरधाव वेगात असलेल्या शिवशाहीला अखेर एकलहेरे गावाजवळ जीव धोक्यात घालून त्याने थांबविले. तोपर्यंत चाकाचे सहा बोल्ट पूर्ण निखळून गेले होते. चालक, वाहक व प्रवासी यांनी गाडीच्या खाली उतरुन  मागील चाकाची वस्तुस्थिती पाहिल्यावर अक्षरश: त्यांच्या पायाखालची वाळू सरकली. एका भयानक अपघातातुन आलोक या तरुणाने आपल्याला  वाचविले तो देवदुताच्या रुपात धावून आला असल्याच्या भावना त्यांनी व गाडीतील प्रवाशांनी व्यक्त केल्या. यावेळी गाडीमधे १७ प्रवाशी होते .


..........................
आमचे नशीब बलवत्तर म्हणुन आम्ही सर्व  जीवघेण्या अपघातातुन वाचलो   गाड़ी अजुन काही मीटर जरी पुढे  धावली गेली असती तर गाडीचे चाक पूर्ण निखळून  भीषण अपघात झाला असता चाकाचे  फक्त तीन बोल्ट राहिले होते चालक  एस आर भोसले यांनी नाशिक वरुण गाड़ी निघताना चारही चाके सुस्थितित असल्याची खात्री केली होती असे त्यांनी सांगितले.
-
शिवशाहीचे वाहक ए. जे. चौगुले

........................

   शिवशाहीची पाठलाग करणे माझ्यासाठी खूप कठीण होते. कारण सकाळी 9 च्या दरम्यान पुणे- नाशिक या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांंची गर्दी असते मी रस्त्यावर कसरत करुण गाडीचा पाठलाग केला. जीव धोक्यात घातला परंतु, शिवशाहीला मोठ्या अपघातातुन वाचविल्याचे मला समाधान आहे

-आलोक जंगम.

http://m.lokmat.com/pune/due-satisfaction-shown-he-black-also-sarcastically-surrendered/?fbclid=IwAR0PMbiBZ3zVld6bEdpqn27rW3JhsfZYFpf2vtUD5AVLaCx-xx85sfy_6RU

📚📕📗📘📙📔📒📚
*संकलन -* 
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_

यापूर्वीचे भाग वाचण्यासाठी आपल्या .....

http://guruvarykm.blogspot.in/     

या blog ला भेट द्या..