🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨
📃 *आजची प्रेरणादायी पोस्ट* 📜
*भाग* - 4⃣8⃣1⃣
*🌀प्रामाणिकपणा असावा तर असा; विद्यार्थ्याने केले दीड लाख परत*
Published On: Feb 19 2019
दैनिक पुढारी,
वैराग (सोलापूर) : प्रतिनिधी
आज पैशाच्या मागे सर्वजण धावताना दिसतात. सख्या भावा भावात जमीन व पैशावरुन भांडणे हा प्रकार नवीन राहिलेला नाही. केवळ शेपाचशे रुपयांसाठी समाजात भांडणे लागल्याचे आपण पाहिले आहे. पण चक्क दीड लाख रुपयांची रक्कम सापडूनही परत करण्याचे औदार्य वैराग येथील महाविद्यालयीन विद्यार्थ्याने दाखवले आहे. स्वार्थी बनत चाललेल्या समाजात पैशांपेक्षाही प्रामाणिकपणा महत्वाचा असल्याचे या कष्टकऱ्या मुलाने सिद्ध केल्याने त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
वैराग येथील नागनाथ वाघ यांचा मुलगा निलेश नागनाथ वाघ हा डिप्लोमाचे शिक्षण घेत रसवंतीगृह चालवत आहे. मोहोळ - वैराग रस्त्यावर सुरू केलेल्या रसवंती गृहावर नेहमीप्रमाणे प्रवासी ग्राहकांची रेलचेल होती. रस काढता -काढता टेबलवर कुणीतरी बॅग विसरल्याचे लक्षात आले. मोहोळकडे जाणाऱ्या एका दुचाकीस्वाराने रस पिऊन बॅग इथेच विसरून गेल्याचे निलेशच्या नजरेतून सुटले नाही. त्याने तात्काळ रसवंतीगृह तसेच सोडून त्या व्यक्तीचा पाठलाग सुरू केला. पाच सहा किलोमीटर गेल्यावर ती व्यक्ती निलेशला सापडली. जेव्हा निलेशनी बॅग दाखवली तेव्हा त्या व्यक्तिला आपली बॅग विसरली होती हे कळले. निलेशनी ती बॅग त्यांच्या स्वाधीन करुन वस्तू तपासा म्हणून सांगितल्यावर बॅग उघडली. तेव्हा बॅगेत असणारे रोख एक लाख रुपये व दोन तोळे सोने आहे तसे होते.
निलेशच्या प्रामाणिकपणाचे कौतुक त्या माणसाने केले खरे, पण त्याची प्रामाणिक धावपळ बघून रसवंती गृहातील इतर ग्राहकांनीही त्याचे अभिनंदन केले आहे. शिक्षण घेत रसवंतीगृह चालवून कष्ट करणाऱ्या निलेशनी कसलेही लालसा न बाळगता प्रामाणिकपणे परत करुन समाजापुढे नवा आदर्श निर्माण केला आहे.
निलेशचे वडील नागनाथ कोकणात राज्य परिवहन महामंडळात वाहक म्हणून सेवा बजावत असताना दोनवेळा सोने सापडले होते. एकदा पाव किलो व एकदा शंभर ग्रॅम हे सोने त्यांनी ही प्रामाणिकपणे परत केले होते.
http://pudhari.news/news/Solapur/If-it-is-honesty-The-lacquer-returns-to-the-student/m/
📚📕📗📘📙📔📒📚
*संकलन -*
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_