twitter
rss

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨

📃  *आजची प्रेरणादायी पोस्ट*  📜

*भाग* -3⃣9⃣9⃣

*सहकारी पळून जात असतानाही आंदोलकांसमोर न डगमगता उभी राहिली ती महिला आयएएस अधिकारी*

_*महाराष्ट्र कन्येच्या धाडसाचे कौतुकच*_

साभार - लोकसत्ता ऑनलाइन | Updated: August 30, 2017

*पंचकुला येथील उपायुक्त गौरी जोशी*

सीबीआयच्या विशेष न्यायालयाने गुरमित राम रहिम सिंग यांना गेल्या आठवड्यात बलात्काराच्या प्रकरणात दोषी ठरवले होते. १५ वर्षांपूर्वी दोन महिला अनुयायांवरील बलात्काराप्रकरणी बाबा राम रहिम यांना दोषी ठरवण्यात आले होते. न्यायालयाच्या निकालानंतर हरयाणासह पंजाबमध्ये हिंसाचार झाला होता. यात सुमारे ३८ जणांचा मृत्यू झाला तर २५० हून अधिक जण जखमी झाले होते. यावेळी हरयाणामध्ये उसळलेल्या दंगलीची परिस्थिती भीषण होत चालली होती.
आंदोलकांनी पोलिस स्टेशन, वृत्तवाहिन्यांच्या गाड्या तसेच रस्त्यावरील सामान्य नागरिक यांच्यावर थेट हल्ला चढविला होता.  परिस्थिती हाताबाहेर जात असल्याने पोलिसांनीही घटनास्थळावरुन पळ काढला होता. मात्र, त्यावेळी पंचकुलाच्या उपायुक्त गौरी पराशर जोशी यांनी पुढाकार घेत परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पुढाकार घेतला. यावेळी त्यांच्यावरही हल्ला झाला आणि त्या काही प्रमाणात जखमी झाल्या, तरीही त्यांनी मोठ्या धाडसाने परिस्थितीचा सामना केला. यावेळी योग्य तो निर्णय घेत त्यांनी त्वरीत लष्करी दलाला पाचारण करण्यास सांगितले.
काही काळाने परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर ११ महिन्यांच्या बाळाची आई असलेली ही अधिकारी महिला रात्री ३ वाजता घरी परतली. त्यामुळे एका महिला अधिकाऱ्याची आपल्या कामाप्रती असणारी निष्ठा आणि कर्तव्यदक्षतेचे दर्शनच यानिमित्ताने घडले. जोशी या २००९ च्या बॅचमधील अधिकारी असून त्यांनी याआधीही अनेक ठिकाणी आपली भूमिका चोखपणे पार पाडली आहे. मागील एक वर्षापासून त्या पंचकुला येथे कार्यरत आहेत. डेरा सच्चा सौदाचे प्रमुख राम रहिम यांना दोषी ठरवण्यात आल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी हरयाणात अक्षरश: हैदोस घातला होता. या हिंसाचारासाठी डेरा सच्चा सौदाने भाडोत्री गुंडांचा वापर केल्याचेही समोर आले होते. प्रशासनासावर दबाव टाकण्यासाठी डेरा सच्चा सौदाकडून शक्ती प्रदर्शनदेखील करण्यात आल्याच्या चर्चांनाही उधाण आले होते.

  गौरी जोशी यांना गुरुवर्य ग्रुपचा मानाचा मुजरा
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨

📃  *आजची प्रेरणादायी पोस्ट*  📜

*भाग* -3⃣9⃣8⃣

*हेलिकॉप्टरमधून तुरुंगात जाऊन निर्णय देणारे डॅशिंग जज : जगदीप सिंग!*

*_कुठल्याही धमकीला भीक न घालता, संविधानाचं काटेकोर पालन करत, जगदीप सिंग यांनी अबला साध्वीला न्याय दिला. बलात्कारी बाबा राम रहीमला कोर्ट रुममध्ये रडकुंडीला आणून, राजसत्ता, अर्थसत्ता पायदळी तुडवणाऱ्या राम रहीमला गुडघे टेकायला लावणारा न्यायाधीश म्हणजेच जगदीप सिंग होय._*

By: सचिन पाटील, एबीपी माझा, मुंबई | Last Updated: > Monday, 28 August 2017
     
नवी दिल्ली/हरियाणा: लाखो आंधळे आणि त्वेषाने पेटलेले अनुयायी, तोडफोड आणि जीवाची धमकी या सर्व बाबींना न जुमानता, हेलिकॉप्टरमधून तुरुंगात जाऊन, बलात्कारी बाबा राम रहीमला दहा वर्षांची शिक्षा सुनावणारा निर्भिड पण मितभाषी, डॅशिंग पण तितकेच सुसंस्कृत न्यायाधीश म्हणजे जगदीप सिंग.

कुठल्याही धमकीला भीक न घालता, संविधानाचं काटेकोर पालन करत, जगदीप सिंग यांनी अबला साध्वीला न्याय दिला. बलात्कारी बाबा राम रहीमला कोर्ट रुममध्ये रडकुंडीला आणून, राजसत्ता, अर्थसत्ता पायदळी तुडवणाऱ्या राम रहीमला गुडघे टेकायला लावणारे न्यायाधीश म्हणजेच जगदीप सिंग होय.

न्यायाधीश जगदीप सिंग यांनी पेटलेल्या रोहतकमध्ये क्रांतिकारी निर्णय दिला. न्यायासाठी वाट पाहावी लागू शकते, ती अनेक वर्षांची असू शकते, पण न्यायदेवता कुणालाही रिकाम्या हाती जाऊ देत नाही, हे आजच्या निर्णयाने दाखवून दिलं.

लाखो गुन्हेगार सुटले तरी चालतील, पण एका निर्दोषाला शिक्षा होऊ नये असं न्यायव्यवस्थेचं ब्रीद आहेच. पण आर्थिक बळ, राजकीय ताकद आणि प्रसंगी भाडोत्री गुंड घेऊन माज दाखवणारा कोणीही राम रहीम असो, न्यायदेवता त्याच्या पापाचा घडा आपल्या तराजूत तोलतेच आणि ती जगदीप सिंगांसारखे न्यायाधीश आपल्या निकालातून अशा गुंडांचा उन्माद उतरवतात.

*शिक्षा सुनावण्यासाठी हेलिकॉप्टरमधून जेलमध्ये*

जगदीप सिंग यांनी बाबा राम रहीमला 25 ऑगस्टला दोषी ठरवलं होतं.  या निकालानंतर बाबा राम रहीमच्या आंधळ्या अनुयायींनी हैदोस घातला. हरियाणात आगडोंब उसळला. या हिंसाचारात 38 जणांचे बळी गेले.

बाबा राम रहीमला दोषी ठरवणारा जज हा आंंधळ्या अनुयायींच्या केंद्रस्थानी होता. मात्र जगदीप सिंग हे कुचरले नाहीत. अनुयायी सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करत असतील, तर बाबाच्या आश्रमाकडून त्याची भरपाई करुन घ्या, पोलिसांनी प्रसंगी हत्यार चालवण्यासही मागे-पुढे पाहू नये, असे आदेश जगदीप सिंग यांनी दिले.

शिक्षेच्या सुनावणीचा आजचा दिवस उजाडला. न्यायाधीश जगदीप सिंह यांना कडेकोट सुरक्षा पुरवण्यात आली होती. भक्तांचा उन्मत्तपणा पाहता न्यायाधीश थेट हेलिकॉप्टरमधून जेलमध्ये जाणार होते.

आज दुपारी दीडच्या सुमारे न्यायाधीश जगदीप सिंह हेलिकॉप्टरमधून जेलकडे रवाना झाले.

जेलमध्ये 10-10 मिनिटांचा वेळ

जेल परिसरातील हेलिपॅड ते प्रत्यक्ष जेलमध्ये जाण्यास काळ या दरम्यानचा जगदीप सिंग यांचा प्रवासही काटेकोर सुरक्षेत होता. जेलमध्ये पोहोचल्यानंतर जगदीप सिंग यांनी दोन्ही पक्षाच्या वकिलांना युक्तीवादासाठी दहा-दहा मिनिटांचा वेळ दिला.

यावेळी जेलमध्ये सीबीआयकडून 2, बचावपक्षाकडून 2 अधिक 1 (राम रहीम) 3, स्टाफ 2 आणि न्यायाधीश जगदीप सिंग असे 8 जण उपस्थित होते.

जगदीप सिंग यांनी दोन्ही पक्षाचा युक्तीवाद ऐकल्यानंतर, आपला निर्णय जाहीर केला. दोषी बाबा राम रहीमला 10 वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली.

*कोण आहेत जगदीप सिंग?*

इमानदार पण कडक शिस्तीचा न्यायाधीश म्हणून जगदीप सिंग यांची ओळख आहे.

जगदीप सिंग यांनी 2002 मध्ये पंजाब विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली.

अल्पावधित वकिलीची चुणूक दाखवल्याने प्रकाशझोतात

2012 पर्यंत महत्त्वाचे दिवाणी आणि फौजदारी खटले लढवले

2012 मध्ये हरियाणा न्यायालयीन सेवेत रुजु

पहिल्यांदा सोनिपत कोर्टात नियुक्ती

हायकोर्टाने दखल घेत सीबीआयचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती

2016 मध्ये हिसार रस्त्यावर अपघातील जखमींना स्वत:च्या गाडीतून रुग्णालयात नेलं.

प्रामाणिक, मितभाषी, कडक शिस्तीचे आणि न्यायासाठी प्रसिद्ध

📚📕📗📘📙📔📒📚

*संकलन -* 
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨

📃  *आजची प्रेरणादायी पोस्ट*  📜

*भाग* -3⃣9⃣7⃣

*४०० मुलांचा जीव वाचविण्यासाठी प्राणांची पर्वा न करता धावला पोलीस*

भोपाळ | Updated: August 27, 2017

मध्यप्रदेशातील सागर जिल्ह्यात असलेल्या चितोरा गावातील एका शाळेत तोफगोळा आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. मात्र त्याचवेळी पोलीस कॉन्स्टेबल अभिषेक पटेल याने दाखवलेल्या धाडसामुळे या सगळ्या मुलांचा जीव वाचला आहे. अभिषेक पटेल या पोलिसाचा व्हिडिओ व्हायरल होतो आहे.
चितोरा गावातील शाळेत बॉम्ब सापडल्याची माहिती १०० या क्रमांकावर पोलीस कॉन्स्टेबल अभिषेक पटेल यांना मिळाली होती ते तातडीने शाळेत पोहचले तेव्हा त्या शाळेत एक तोफगोळा येऊन पडला आहे हे त्यांच्या लक्षात आले. तसेच शाळेत सुमारे ४०० मुले असल्याचीही माहिती त्यांना मिळाली. आता इतक्या सगळ्या मुलांचा जीव कसा वाचवायचा हा त्यांच्यापुढचा मुख्य प्रश्न होता.
तोफगोळा निकामी करणारे पथकही यायला वेळ होता. त्यामुळे त्यांनी अचानक एक निर्णय घेतला की हा तोफगोळा घेऊन शक्य तेवढ्या लांब जायचे. त्यांनी हा तोफगोळा आपल्या खांद्यावर घेतला आणि धावत सुटले. या गोळ्याचे वजन १० किलो आणि लांबी १२ इंच इतकी होती. एवढ्या वजनाचा बॉम्ब किंवा तोफगोळा फुटला तर ५०० मीटर परिसरात त्याचा परिणाम होतो हे अभिषेक यांना सांगण्यात आले होते. म्हणूनच त्यांनी हा तोफगोळा उचलला आणि ते सुमारे १ किलोमीटर लांब धावत गेले.

आपण बऱ्यापैकी अंतर पुढे आलो आहोत हे लक्षात येताच तातडीने अभिषेक पटेल यांनी हा तोफगोळा फेकून दिला. ते धावत असताना त्यांच्या टीमचे सदस्य त्यांना सांगत होते की हा तोफगोळा लगेच फेकून दे आणि लांब पळ, कारण हा तोफगोळा फुटला तर अभिषेक पटेल यांच्या शरीराच्या चिंधड्या उडाल्या असत्या. मात्र अभिषेक पटेल यांनी काहीही ऐकले नाही आणि एक किलोमीटर धावत गेले तिथे मोकळ्या जागेत गेल्यावर त्यांनी हा तोफगोळा फेकला. ४०० मुलांचा जीव वाचविण्यासाठी आपल्या प्राणांची पर्वा न करणाऱ्या या कॉन्स्टेबलचे आता चितोरा गावात कौतुक होते आहे. तसेच त्यांचा हा व्हिडिओही व्हायरल झाला आहे.
हा तोफगोळा या शाळेत कसा आला याचाही शोध सुरू आहे. शाळेच्या आवारात सैन्य दलाची एक फायरिंग रेंज आहे कदाचित त्याच भागातून हा तोफगोळा शाळेत येऊन पडला असावा अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. मात्र यासंदर्भातील चौकशी सुरू असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

📚📕📗📘📙📔📒📚

*संकलन -* 
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨

📃  *आजची प्रेरणादायी पोस्ट*  📜

*भाग* -3⃣9⃣6⃣

*👩🏻 ही आदिवासी मुलगी घडवणार इतिहास; पाड्यातून पहिलीच इंजिनिअर होणार!*

_*तिचा प्रवास नक्कीच सामान्य विद्यार्थ्यांसारखा नव्हता*_

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: August 22, 2017

JEE आणि Eamcet या परीक्षेत यश मिळवून तिने जवाहरलाल नेहरू तंत्रज्ञान विद्यापीठात प्रवेश निश्चित केला.

ज्या गावातील जवळपास सगळीच मुलं-मुली जेमतेम पाचवीपर्यंत शिकली आहेत, अशा आदिवासी पाड्यातून आलेल्या एका मुलीनं इंजिनिअर होण्याचं स्वप्न काही वर्षांपूर्वी पाहिलं होतं, हे स्वप्न कधी प्रत्यक्षातही येईल याची कल्पनाही कोणी केली नव्हती. पण ती मात्र आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करतच राहिली आणि अखेर यशालाही तिच्या जिद्दीपुढे नमतं घ्यावं लागलं. ही यशोगाथा आहे ती तेलंगणामधल्या आदिवासी कुटुंबात जन्मलेल्या कल्याणीची. तेलंगणामधल्या दुबारपेठ गावात अस्तंगत होत चाललेल्या थोटी या आदिवासी जमातीत तिचा जन्म झाला.

JEE आणि Eamcet या परीक्षेत यश मिळवून तिने जवाहरलाल नेहरू तंत्रज्ञान विद्यापीठात प्रवेश निश्चित केला. नुकतीच ती या विद्यापीठाच्या आवारात असणाऱ्या वसतिगृहात राहण्यासाठी आलीये. इथपर्यंत पोहोचण्याचा तिचा प्रवास नक्कीच सामान्य विद्यार्थ्यांसारखा नव्हता. कल्याणी आदिवासी पाड्यात लहानाची मोठी झाली, इथे शिक्षणाचं महत्त्व फार नाही, गावापासून शाळा खूपच लांब आहे. रोजचा प्रवास आणि शिक्षणाचा खर्च न परवडणाराच. त्यामुळे बहुतांश मुलींनी आपलं शिक्षण अर्ध्यावरच सोडलं. पण कल्याणीला मात्र शिकायचं होतं. अर्थात घरची परिस्थिती बेताची होती, वडिलांना घरखर्चातून शिक्षणाची फी परवडणारी नव्हती. पण वडील कृष्णा यांनी धडपड करून तिला शिकवलं. ‘इंडियन एक्स्प्रेस’नं कल्याणीशी तिच्या यशाबद्दल संवाद साधला. या यशाबद्दल आपल्याला खूपच आनंद होतो आहे. आदिवासी पाड्यातून इंजिनिअर होणारी मी पहिलीच मुलगी ठरणार आहे, असंही ती अभिमानानं सांगत होती.

📚📕📗📘📙📔📒📚

*संकलन -* 
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨

🍍🍅 *आरोग्य-MANTRA*  🍋🍉

*भाग -*  2⃣8⃣9⃣

*आपल्या मुलांना जर खरंच आपल्याला पुढे न्यायचं असेल तर त्यांच्या नाश्त्याकडे पुरवा जातीनं लक्ष*

By लोकमत न्यूज नेटवर्क 

ठळक मुद्देनाश्ता न केल्यामुळे मुलांच्या वाढीवर होतो विपरित परिणाम.३१.५ टक्के मुलांना किमान अत्यावश्यक प्रमाणातील लोह मिळू शकत नाही.१९ टक्के मुलांना किमान मात्रेतील कॅल्शियम मिळत नाही.२१.५ टक्के मुलांना त्यांच्या शरीराच्या वाढीसाठी जेवढ्या प्रमाणात आयोडिन पाहिजे तेवढंही मिळत नाही.

- मयूर पठाडे

आजकाल मुलांचं पण ना, किती करावं लागतं.. त्यांची शाळेची तयारी, अभ्यास, ट्यूशन, होमवर्क, एक्स्ट्रा करिक्युलर अ‍ॅक्टिव्हिटीज, स्पोर्ट्स.. मुलांचं करता करता पालकांचा, विशेषत: आयांचा जीव पार मेटाकुटीला येतो.

मुलंही वाघ पाठी लागल्याप्रमाणे धावत असतात. एक झालं की दुसरं, दुसरं झालं की तिसरं.. सगळ्याच गोष्टी करायच्या तर त्यासाठी धावावंच लागतं. पुढे जायचं तर त्याला गत्यंतर नाही, हे आता पालकांप्रमाणेच मुलांनाही माहीत झालं आहे आणि त्यासाठी सकाळपासून रात्रीपर्यंत त्यांची धावपळ सुरू असते.
मुलांच्या या साऱ्याच गडबडीत आणि पळापळीत पालकांनाही भाग घ्यावाच लागतो. त्याचबरोबर मुलांसोबतच नातं हेल्दी राहील यासाठीही त्यांना आटापिटा करावा लागतो. पण हा आटापिटा करत असताना मुलं खरोखरच हेल्दी आहेत का, याकडे बºयाचदा पालकांचं दुर्लक्ष होतं. काहीवेळा त्याला नाईलाजही असतो.
सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे नाश्ता. दिवसभराच्या पळापळीत नाश्ता ही अशी एक गोष्ट आहे जी मुलांच्या शरीर आणि मनाला ताकद पुरवू शकते, पण हीच गोष्ट अनेक मुलांच्या दिनचर्येतून सध्या हद्दपार होताना दिसते आहे. ‘उशीर होतोय, वेळ होतोय, आवडत नाही’ म्हणून मुलंही बºयाचदा नाश्त्याला दांडी मारुन शाळा, क्लासेसला पळतात.
संशोधकांनी याचबाबत पालकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. मुलांचा दररोज सकाळचा नाश्ता कधीही चूकवू नका असा सल्लाही त्यांनी पालकांना दिला आहे.

यासंदर्भात संशोधकांनी नुकताच एक अभ्यासही केला.

*काय सांगतो शास्त्रज्ञांचा अभ्यास?*

१) शास्त्रज्ञांनी अनेक शाळकरी मुलांची पाहणी केली. त्यात त्यांना दिसून आलं नाश्ता न केल्यामुळे अनेक मुलांचं आरोग्य धोक्यात आलं आहे.

२) नाश्त्याला दांडी मारल्यामुळे तब्बल ३१.५ टक्के मुलांना किमान अत्यावश्यक प्रमाणातील लोह मिळू शकत नाही.

३) १९ टक्के मुलांना किमान मात्रेतील कॅल्शियम मिळत नाही.

४) २१.५ टक्के मुलांना त्यांच्या शरीराच्या वाढीसाठी जेवढ्या प्रमाणात आयोडिन पाहिजे तेवढंही मिळत नाही.

५) ७.३ टक्के मुलांना किमान प्रमाणातील फोलेटही मिळत नाही.

त्याचवेळी जी मुलं दररोज नाश्ता करतात त्यांच्यात मात्र हे सारेच अत्यावश्यक घटक योग्य त्या प्रमाणात शास्त्रज्ञांना आढळून आले.
शास्त्रज्ञांनी हा अभ्यास करताना सकाळी सहा ते नऊ ही वेळ आणि शंभर कॅलरीचा नाश्ता हे घटक विचारात घेतले होते.
अनेक मुलं या चाचणीत फेल झाले. अर्थातच त्यांच्या भावी आणि वर्तमान आयुष्यातही त्यांना त्याचा फटका बसेल असं निरीक्षण नोंदवायलाही शास्त्रज्ञ विसरले नाहीत.

त्यामुळे एकवेळ मुलाचा क्लास बुडला तरी चालेल, पण त्याचा नाश्ता मात्र चुकू देऊ नका....

🍍🍎🍅🍇🍉🍋🍎🍍

*संकलन -* 
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_

यापूर्वीचे भाग वाचण्यासाठी.....

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨

📃  *आजची प्रेरणादायी पोस्ट*  📜

*भाग* -3⃣9⃣5⃣

🇮🇳 _*'या' गावात रोज म्हटलं जात राष्ट्रगीत*_

‘जन-गण-मन’ हे आपलं राष्ट्रगीत... शाळेत असताना आपण ते रोज म्हणत असायचो पण जसं आपली शाळा सुटते तसं आपण राष्ट्रगीत हे फक्त 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, 1 मे याच दिवशी म्हणत असतो. पण तुम्हाला माहिती आहे का? की, आपल्या देशात असं एक गाव आहे तेथे रोज राष्ट्रगीत म्हटलं जात. कोणतं आहे हे गाव आपण जाणून घेऊ...

हे गाव आहे आपल्या शेजारच्या तेलंगणा राज्यातील करिमनगर जिल्ह्यातील. 'जमिकुंटा' असं या गावाचं नाव. या उपक्रमास कोणताही शासकीय आदेश नाही किंवा कुणाची ऑर्डरही नाही. हा स्तुत्य उपक्रम पोलीस निरीक्षक पी. प्रशांत रेड्डी यांच्या संकल्पनेतून व शहरवासीयांच्या सहकार्याने साकारला आहे.

सकाळच्या वेळी 7.54 वाजले की, 52 सेकंदासाठी संपूर्ण जमिकुंटा शहर थांबतं. येथे रोज सकाळी राष्ट्रगीताचं सामूहिक गायन होतं. शहरातील महत्त्वाच्या 16 ठिकाणी असलेल्या ध्वनिक्षेपकांवरून ते वाजवलं जातं. हजारो लोक या उपक्रमात सहभाग घेतात. मग रस्त्यावरील परिवहन सेवेच्या बस, स्कूल बस, शाळेत जाणाऱ्या मुलांची गर्दी, पादचारी, मोटरसायकली, कारची वर्दळ, विक्रेते हे ही याला अपवाद नाहीत. विशेष म्हणजे नागरिक स्वतःहून या उपक्रमाला उस्फूर्त प्रतिसाद देत आहेत. अशा या अफलातून उपक्रमाचं कौतुक होणार नसेल तर नवलंच.

या शहरातील या उपक्रमाविषयी पोलीस निरीक्षक पी. प्रशांत रेड्डी यांनी बोलताना सांगितले की, 16 ऑगस्टपासून या उपक्रमाची सुरुवात झाली. देशभक्तीचं दर्शन या उपक्रमातून घडतंय. याला कारणही असंच होतं. गेल्या वर्षभरापासून मी येथील लोकांशी संवाद साधत आहे. या शहरातील 90 टक्के लोक राष्ट्रगीत गाऊ शकत नसल्याचं आढळून आलं. देशभक्ती जागृत करणं हाच केवळ या उपक्रमाचा हेतू नसून आपलं राष्ट्रगीत सर्वांनाच म्हणता यावं व देशासाठी आपणही काही करावं या जबाबदारीची जाणीव लोकांना व्हावी यासाठी प्रयत्न करत आहे, असंही त्यांनी सांगितलं. या उपक्रमाला सर्वच स्तरांतून चांगला प्रतिसाद मिळत असून कौतुकाची थापही मिळत आहे, असंही त्यांनी सांगितलं.

📚📕📗📘📙📔📒📚

*संकलन -* 
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_

लल

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨

📃  *आजची प्रेरणादायी पोस्ट*  📜

*भाग* -3⃣9⃣3⃣

_*कवठेमहांकाळमधील रस्त्यावरचा देवदूत – हनमंत व्हानमोरे यांची पैशापलीकडची माणुसकी*_

मित्रानो,कवठे महांकाळ मध्ये अथवा पंढरपूर हायवे वर कोणाची मोटारसायकल पंक्चरसाठी किंवा कोठेही बंद पडली तर हा देवदूत तिथे धावून जातो. पंक्चर काढून देतो, हे व्यवसाय म्हणून ठीक आहे; पण रात्री-अपरात्री कितीही वाजलेले असू देत, कितीही पाऊस पडत असू दे किंवा थंडीने सारा परिसर गारठलेला असू दे, याला कोणी फोन केला तर, नाही हे उत्तर त्याच्याकडून कधी येत नाही हे त्याचे वेगळेपण आहे. कारण सेवा देणे हीच ईश्वेराची सेवा आहे, अशी त्याची भावना आहे.

नवरा, बायको, मुले मोटारसायकलवरून जात असतील आणि आडमार्गाला मोटारसायकल पंक्चर झाल्यावर त्यांची काय अवस्था होत असेल किंवा रात्रीच्या वेळी मोटारसायकल पंक्चर झालेला कोणीही एकटा कशा अवस्थेत उभा असेल, हा विचार त्याला स्वस्थ झोपूच देऊ शकत नाही. एखादा माणूस आपल्या आयुष्याकडे कशा वेगळ्या प्रकाराने पाहतो, याचे हे उदाहरण आहे.
पोपट उर्फ हनमंत व्हानमोरेनां पंक्चर काढण्यासाठी दिवसा तर फोन येतातच; पण एक-दोन दिवसाआड रात्रीचेही फोन येतात. किती वाजले आहे ते न पाहता ते आपल्या मोटारसायकलीवरून बाहेर पडतात. पाऊस असू दे, थंडी असू दे, जाग्यावर पोचतात.

पोपट मिस्त्री चा मोबाईल क्रमांक पोलिसांकडेदेखील आहे.या कामाबद्दल हनमंत मिस्त्रीनां खूप धावपळ करावी लागते. झोप अर्धवट सोडून जावे लागते; पण या कामातून मिळणाऱ्या पैशापेक्षा एखाद्याच्या अडचणीच्या काळात आपणाला मदत करायला मिळाली म्हणून समाधान मानतात. म्हटलं तर ते अडचणीत आलेल्याकडून एका पंक्चरला दोनशे रुपये आकारू शकतात; पण असा पैसा कधी मिळवायचा नसतो, असे ते नम्रतापूर्वक सांगतात.

*अनुभवाचा खजिनाचं*

हनमंत व्हनमोरेनांच्याकडे अनुभवाचा खजिनाच आहे. एकदा भर पावसात कोगनोळीच्यापुढे एक मोटारसायकल पंक्चर झाली. मोटारसायकलवर पाठीमागे महिला व तिची दोन मुले होती. त्यांना हनमंत व्हानमोरेचां मोबाईल क्रमांक मिळाला, त्यांनी फोन केला. अर्ध्या तासात व्हनमोरे तेथे गेले. त्यांनी पंक्चर काढले. फक्तं ५० रुपये घेतले; पण त्या पुढचा प्रसंग असा की ज्यांची मोटारसायकल पंक्चर झाली होती ते अक्षरश: व्हानमोरेनां देवदूत समजून पाया पडू लागले.हनमंतन व्हनमोरे या एका पंक्चरवाल्याची ही लाखमोलाची कथा आहे.

मित्रानो, आज गल्ली ते दिल्लीपर्यंतचा प्रत्येक सामान्य माणूसही पैशाच्या मागे लागलेला आहे. संस्कार, नितीमत्ता हे सारे शब्द बासनात गुंडाळून येनकेन प्रकारेण माया गोळा करण्याच्या मागे लागलेल्या आपल्याच लोकांच्यात हनमंत व्हनमोरे यांच्या सारखे असंख्य लोक आहेत. दुर्दैवाने त्यांच्या कार्याची दाखल मिडीया कधी घेत नाहि. त्यामुळे असं काही आपणही करावं असं स्वप्न पाहणार्यांची संख्या मर्यादित आहे. माणुसकीचा दिवा तेवत ठेवणाऱ्या हनमंत व्हनमोरे दीर्घायुष्य लाभो आणि त्यांच्या हातून अशीच सेवा घडो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

📚📕📗📘📙📔📒📚

*संकलन -* 
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨

📃  *आजची प्रेरणादायी पोस्ट*  📜

*भाग* -3⃣9⃣3⃣

_*कवठेमहांकाळमधील रस्त्यावरचा देवदूत – हनमंत व्हानमोरे यांची पैशापलीकडची माणुसकी*_

मित्रानो,कवठे महांकाळ मध्ये अथवा पंढरपूर हायवे वर कोणाची मोटारसायकल पंक्चरसाठी किंवा कोठेही बंद पडली तर हा देवदूत तिथे धावून जातो. पंक्चर काढून देतो, हे व्यवसाय म्हणून ठीक आहे; पण रात्री-अपरात्री कितीही वाजलेले असू देत, कितीही पाऊस पडत असू दे किंवा थंडीने सारा परिसर गारठलेला असू दे, याला कोणी फोन केला तर, नाही हे उत्तर त्याच्याकडून कधी येत नाही हे त्याचे वेगळेपण आहे. कारण सेवा देणे हीच ईश्वेराची सेवा आहे, अशी त्याची भावना आहे.

नवरा, बायको, मुले मोटारसायकलवरून जात असतील आणि आडमार्गाला मोटारसायकल पंक्चर झाल्यावर त्यांची काय अवस्था होत असेल किंवा रात्रीच्या वेळी मोटारसायकल पंक्चर झालेला कोणीही एकटा कशा अवस्थेत उभा असेल, हा विचार त्याला स्वस्थ झोपूच देऊ शकत नाही. एखादा माणूस आपल्या आयुष्याकडे कशा वेगळ्या प्रकाराने पाहतो, याचे हे उदाहरण आहे.
पोपट उर्फ हनमंत व्हानमोरेनां पंक्चर काढण्यासाठी दिवसा तर फोन येतातच; पण एक-दोन दिवसाआड रात्रीचेही फोन येतात. किती वाजले आहे ते न पाहता ते आपल्या मोटारसायकलीवरून बाहेर पडतात. पाऊस असू दे, थंडी असू दे, जाग्यावर पोचतात.

पोपट मिस्त्री चा मोबाईल क्रमांक पोलिसांकडेदेखील आहे.या कामाबद्दल हनमंत मिस्त्रीनां खूप धावपळ करावी लागते. झोप अर्धवट सोडून जावे लागते; पण या कामातून मिळणाऱ्या पैशापेक्षा एखाद्याच्या अडचणीच्या काळात आपणाला मदत करायला मिळाली म्हणून समाधान मानतात. म्हटलं तर ते अडचणीत आलेल्याकडून एका पंक्चरला दोनशे रुपये आकारू शकतात; पण असा पैसा कधी मिळवायचा नसतो, असे ते नम्रतापूर्वक सांगतात.

*अनुभवाचा खजिनाचं*

हनमंत व्हनमोरेनांच्याकडे अनुभवाचा खजिनाच आहे. एकदा भर पावसात कोगनोळीच्यापुढे एक मोटारसायकल पंक्चर झाली. मोटारसायकलवर पाठीमागे महिला व तिची दोन मुले होती. त्यांना हनमंत व्हानमोरेचां मोबाईल क्रमांक मिळाला, त्यांनी फोन केला. अर्ध्या तासात व्हनमोरे तेथे गेले. त्यांनी पंक्चर काढले. फक्तं ५० रुपये घेतले; पण त्या पुढचा प्रसंग असा की ज्यांची मोटारसायकल पंक्चर झाली होती ते अक्षरश: व्हानमोरेनां देवदूत समजून पाया पडू लागले.हनमंतन व्हनमोरे या एका पंक्चरवाल्याची ही लाखमोलाची कथा आहे.

मित्रानो, आज गल्ली ते दिल्लीपर्यंतचा प्रत्येक सामान्य माणूसही पैशाच्या मागे लागलेला आहे. संस्कार, नितीमत्ता हे सारे शब्द बासनात गुंडाळून येनकेन प्रकारेण माया गोळा करण्याच्या मागे लागलेल्या आपल्याच लोकांच्यात हनमंत व्हनमोरे यांच्या सारखे असंख्य लोक आहेत. दुर्दैवाने त्यांच्या कार्याची दाखल मिडीया कधी घेत नाहि. त्यामुळे असं काही आपणही करावं असं स्वप्न पाहणार्यांची संख्या मर्यादित आहे. माणुसकीचा दिवा तेवत ठेवणाऱ्या हनमंत व्हनमोरे दीर्घायुष्य लाभो आणि त्यांच्या हातून अशीच सेवा घडो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

📚📕📗📘📙📔📒📚

*संकलन -* 
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_