twitter
rss

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨

📃  *आजची प्रेरणादायी पोस्ट*  📜

*भाग* -3⃣8⃣1⃣

*मित्रानो,ज्याचं नाव घेतलं तरी सांगली ते सोलापूरपर्यंतच्या वाळू तस्करांच्या पायाखालील वाळू सरकते अशा डॅशिंग लेडी सिंघम म्हणजे कवठे महांकाळच्या तहसीलदार शिल्पा ठोकडे होय. त्याच्या कार्याची दाखल घेवून राज्य शासनाने यंदाचा आदर्श तहसिलदार पुरस्कार त्यांना  प्रदान केला आहे.त्यांचे मनपूर्वक अभिनंदन...!*

शिल्पा ठोकडे या मुळच्या कुर्डूवाडीच्या. सोलापुरात पदवीचे शिक्षण पूर्ण करून mpsc द्वारे PSI झाल्या.पुढे त्यांनी महसूल खात्याची परीक्षा देवून राज्यसेवेत प्रवेश केला.सोलापुरात तहसीलदार म्हणून त्यांनी जी कर्तव्यदक्षता दाखवली त्याची दखल राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी देखील घेतली होती .पर्यावरणाच्या दृष्टीने बेकायदा वाळू वाहतुकीला लगाम बसणे गरजेचे आहे.याचा विचार करून  त्यांनी वाळूतस्करी रोखण्यासाठी अव्याहत मोहीम आखली.या कारवाईतून शासनाकडे तब्बल ३ कोटीहून अधिक  महसूलाची भर पडली.

रात्री-अपरात्री त्या स्वत: मोहिमेवर जातात.एकदा वाळूतस्करी पकडताना शिल्पा ठोकडे यांना धावत्या ट्रकमधून उडी मारावी लागली होती. सोलापूरजवळील माळकवठे गावी वाळूची चोरटी वाहतूक करणारा ट्रक ताब्यात घेत असतानाच ट्रकमालक व त्याच्या साथीदारांनी ट्रकचा एअरपाइप हळूच कापला.त्याची कल्पना तहसीलदार ठोकडे यांना नव्हती. ट्रक ताब्यात घेऊन पोलीस ठाण्याकडे आणत असताना ट्रकचा ब्रेक न लागता वेग वाढून ट्रकवरील नियंत्रण सुटले.त्यावेळी त्यांना ट्रकमधून उडी मारावी  लागली..सुदैवाने किरकोळ दुखापत वगळता त्यांचा जीव बचावला.

वेशांतर करून बेकायदा वाळू पकडली:

मागच्या वर्षी डिसेंबरला स्वत:सह सरकारी तलाठी महिलांना कर्नाटकी साडी आणि अधिकाऱ्यांना सदरा-धोतर असे वेशांतर करायला लावून त्यांनी वडापच्या गाडीतून जतमार्गे भीवघाटात ठाण मांडले. रात्री बारा वाजता पंढरपुर हायवेवरून वाळू वाहतूक करणाऱया ट्रकचालकांना वाटले कि  या महिला जतच्या यात्रेतील असाव्यात.म्हणून त्यांनीही गाडय़ा थांबवल्या.मात्र तहसीलदारांसह तलाठी महिला असल्याचे कळताच चालकांचे अवसानच गळाले.एका रात्रीत १३ ट्रक पकडून त्यांनी एक कोटी ६० लाखांचा दंड वसूल केला.हि घटना राज्यभर गाजली होती. या त्यांच्या धडक कारवाईमुळे सोलापूर, सांगली जिल्ह्यातून वाळू तस्करी करणाऱ्या तस्करांना बेकायदा वाहतूक बंद करणे भाग पडले होते.
वाळू तस्कराकडून अधिकाऱ्यांना धमकावण्याचे  प्रमाण महाराष्ट्रात नेहमी पाहावयास मिळते. तहसीलदार शिल्पा ठोकडे यांच्या घरावर वॉच ठेवणे, कुटुंबाला धमकी देणे, मुलांच्या गाडय़ांचा पाठलाग करून दमदाटी करणे,भीती निर्माण करण्याचे प्रकारही सोलापूर जिल्हय़ात तहसीलदार असताना झाले होते.पण शिल्पा ठोकडे यांनी या सगळ्या गोष्टीना कधीच भिक घातली नाही.

१०० हून  पुरस्कारांचे मानकरी :
प्राणाची पर्वा न करता भ्रष्टाचार थांबविणे, वाळूचोरी थांबविणे, अवैध धंद्यांना आळा घालणे, महसूल वाढविणे यांसह अनेक कार्य पूर्ण क्षमतेने करणाऱ्या या दुर्गेचा तब्बल १०० हून  अधिक  पुरस्कारांनी सन्मान  झाला आहे.अधिकारी म्हणून कार्याव्यतिरिक्त  सामाजिक बांधिलकी म्हणून अनेक उपक्रम ते राबवत असतात.

मित्रानो आपल्या राज्यात पोत्याने  बुद्धिमान सरकारी अधिकारी आहेत, पण अपवाद वगळता  स्वतःशिवाय ते कधी कसला विचार करताना दिसत नाहीत. त्यामुळे एखादाच गो.रा.खैरनार, एखादाच भाटीया, एखादाच टी.ए.शेषन किंवा एखादाच तहसीलदार शिल्पा ठोकडे सारखा अधिकारी १०-१५ वर्षात समोर येतो  ज्यांचं कार्य जनतेने जयजयकार करावा इतकं अफाट असतं. तरीही त्यांचा आदर्श समोर ठेऊन एकही मायचा लाल एकामागून एक तयार होत नाही हे या देशाचे दुर्दैव. त्यामुळे मला तहसीलदार शिल्पा ठोकडे यांचं कौतुक केल्यावाचून राहवत नाही.

✍ किरण शानभाग

📚📕📗📘📙📔📒📚

*संकलन -* 
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_