twitter
rss

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨
📃  *आजची प्रेरणादायी पोस्ट*  📜

*भाग* - 4⃣4⃣4⃣

*👩🏻‍💼शाब्बास ययाती; 6 वर्षे शाळेला दांडी न मारण्याचा रेकॉर्ड*

Published On: Apr 21 2018

दैनिक पुढारी,

डहाणू ग्रामीण : वार्ताहर

शाळेमध्ये 100 टक्के हजेरी हा राज्यस्तरीय रेकॉर्ड डहाणूतील ययाती शैलेंद्र गावडच्या नावावर आहे. या शालेय वर्षातही तिने एकही दिवस गैरहजर न राहता सलग सहाव्या वर्षी हा पराक्रम करून स्वतः चाच रेकॉर्ड ब्रेक केला आहे.

राष्ट्रीयस्तरावरील रेकॉर्ड भोपाळच्या मानसी दास या विद्यार्थिनीच्या नावावर असून सलग9 वर्ष एकही दिवस ती शाळेत गैरहजर राहिलेली नाही. त्यामुळे तिच्या रेकॉर्डशी बरोबरी करण्यासाठी ययातीला आणखी तीन वर्षे कष्ट घ्यावे लागणार आहेत. शैक्षणिक वर्ष 2012 -13 सालापासून दुसरी इयत्तेत असताना हजेरीपटावर तिने 100 टक्के उपस्थिती नोंदवली होती. नुकतीच तिने सातवीची परीक्षा दिली आहे.

बोर्डीतील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या सुनाबाई पेस्तनजी हकीमजी विद्यालयाची विद्यार्थिनी असलेल्या ययातीने राष्ट्रीय विक्रमाशी बरोबरी करण्याचा विश्‍वास व्यक्त केलाआहे. विशेष म्हणजे ती महाराष्ट्र, गुजरात सीमेवरील चिखले या खेडेगावातील विद्यार्थिनी असून घर ते शाळा आणि शाळा ते घर हा सुमारे दहा किमीचा प्रवास ती एसटीने करते. नव्या विक्रमामुळे तालुक्यात तिचे कौतुक होत आहे.

पालकांचा सल्ला आणि शिक्षकांचे मार्गदर्शन यामुळे सलग सहाव्या वर्षी शाळेला एकही दिवस खाडा केलेला नाही. राष्ट्रीय विक्रमाला गवसणी घालण्याचा वसा घेतला असून आहार, खेळ आणि करमणुकीतून स्वतःला तंदुरुस्त ठेवण्याचा प्रयत्न करते.
- ययाती गावड

📚📕📗📘📙📔📒📚
*संकलन -* 
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨
📃  *आजची प्रेरणादायी पोस्ट*  📜

*भाग* - 4⃣4⃣2⃣

*🤼‍♂जत्रेतली कुस्ती ते राष्ट्रकुलचं सुवर्णपदक… राहुल आवारेचा प्रेरणादायी प्रवास*

_*कुस्तीचं मैदान गाजवणाऱ्या राहुलला लहानपणापासूनचं कुस्तीचं बाळकडू मिळालं आहे.*_

आप्पासाहेब शेळके ,लोकसत्ता April 12, 2018

सुवर्णपदक विजेता राहुल आवारे
ऑस्ट्रेलियातील गोल्ड कोस्ट येथे सुरु असलेल्या राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये महाराष्ट्राच्या राहुल आवारेने भारताला कुस्तीतलं पहिलं सुवर्णपदक मिळवून दिलं आहे. ५७ किलो वजनी गटात राहुलने कॅनडाचा प्रतिस्पर्धी स्टिव्हन ताकाशाहीवर मात करत भारताच्या खात्यावर आणखी एक सुवर्णपदकाची भर घातली. राहुलने सुवर्णपदक जिंकताच महाराष्ट्रात सर्वत्र जल्लोष करण्यात आला. पुण्याच्या आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलात राहुलचे प्रशिक्षक काका पवार व सर्व पाठीराख्यांनी एकच जल्लोष केला. २०१६ साली झालेल्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत राहुलला चांगली कामगिरी करुनही संधी नाकारण्यात आली होती. मात्र त्यानंतर दमदार पुनरागमन करत राहुलने आपली प्रतिभा सिद्ध करुन दाखवली आहे.
कुस्तीचं आंतरराष्ट्रीय मैदान गाजवणाऱ्या राहुलला लहानपणापासूनचं कुस्तीचं बाळकडू मिळालं आहे. राहुलचे वडील बाळासाहेब आवारे हे मराठवाड्यातल्या बीड परिसरातले नावाजलेले मल्ल होते. त्यामुळे आपल्या वडीलांकडून राहुलने लहान वयात कुस्तीचे अनेक डावपेच शिकले होते. आपल्या वडीलांनी दिलेल्या शिकवणुकीच्या जोरावर राहुलने लहानपणी, जत्रांमध्ये रंगणाऱ्या कुस्तीच्या आखाड्यांमध्ये सहभाग घेतला होता. यावेळी अहमदनगर येथील एका स्पर्धेत राहुलने ३२ किलो वजनीगटात तर वडील बाळासाहेब यांनी ६२ किलो वजनी गटात बाजी मारली होती. लोकसत्ता ऑनलाईनशी बोलताना राहुलचा भाऊ गोकुळ आवारेने ही आठवण सांगितली. सुरुवातीच्या काळात बीडच्या पाटोद्यात कुस्तीचे डावपेच शिकणाऱ्या राहुलने नंतर पुण्यात काका पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कुस्तीचे धडे गिरवायला सुरुवात केली.

सुरुवातीच्या काळात घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे, शेती आणि कुस्ती जिंकून मिळणाऱ्या पैशांमध्ये आवारे कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत होता. २०१६ साली रिओ ऑलिम्पिकमध्ये भारताचं प्रतिनिधीत्व करण्याची संधी हुकल्यानंतर राहुलच्या  मनात खंत कायम होती. मात्र जिद्द न सोडता राहुलने कुस्तीचा सराव सुरु ठेवला. याच जिद्दीच्या आणि सरावाच्या जोरावर राहुलने पदक मिळवल्याचं गोकुळने लोकसत्ता ऑनलाईनशी बोलताना स्पष्ट केलं. राष्ट्रकुल स्पर्धेनंतर २०२० टोकीयो ऑलिम्पीकमध्ये भारतासाठी पदक मिळवण्याचा राहुलचा प्रयत्न असल्याचंही गोकुळने स्पष्ट केलंय.

📚📕📗📘📙📔📒📚
*संकलन -* 
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨
📃  *आजची प्रेरणादायी पोस्ट*  📜

*भाग* - 4⃣4⃣1⃣

*🇮🇳 माउंट एवरेस्ट पर चढ़ाई करेंगे आदिवासी छात्र, फहराएंगे चंद्रपुर का झंडा ⛳*

BY- डिजिटल डेस्क ,चंद्रपुर।

माउंट एवरेस्ट पर चंद्रपुर का झंडा फहराने के लिए यहां के 10 आदिवासी छात्रों का चयन किया गया है। आदिवासी स्टूडेंट्स के सुप्त गुणों को विकसित करने की दृष्टि से मिशन चलाया जा रहा है जिसके तहत पर्वतारोहण करनेवाले 10 पर्वतारोहकों का स्वागत 8 अप्रैल को प्रियदर्शिनी सभागृह में किया जाएगा। इस मौके पर शुभकामनाएं देने के लिए पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहिर, आदिवासी विकास विभाग के मंत्री विष्णु सावरा, राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम प्रमुखता से उपस्थित रहेंगे।

*पर्वतारोहण मिशन के लिए चुने गए ये छात्र*

आकाश चिन्नु मड़ावी, अक्षय मलाका आत्राम, कविदास पांडुरंग काटमोड़े, प्रमेश सीताराम अले, शुभम रवींद्र पेंदोर, इंदू भाऊराव कन्नाके, उमाकांत सुरेश मड़ावी, विकास महादेव सोयाम, मनीषा धर्मा धुर्वे व छाया सुरेश आत्राम नामक चंद्रपुर के आदिवासी स्टूडेंट्स विश्व का सबसे ऊंचा एवरेस्ट पर्वत चढऩेवाले हैं। यह महाराष्ट्र समेत विशेष रूप से चंद्रपुर के लिये गौरव की बात होने की प्रतिक्रिया मंत्री सुधीर मुनगंटीवार ने दी है। बता दें कि आदिवासी विकास विभाग की ओर से सभी सरकारी आश्रमशालाओं को गत वर्ष ही पर्वतारोहण मिशन के संबंध में जानकारी दी गई।

*दिया गया प्रशिक्षण*

जिले के बोर्डा, देवाड़ा व जिवती स्थित आश्रमशालाओं के 50 स्टूडेंट्स को वर्धा में पर्वतारोहण का प्राथमिक प्रशिक्षण दिया गया। साथ ही यहां के जिला क्रीड़ा संकुल में भी इन्हें निवासी प्रशिक्षण दिया गया। इसके बाद हैदराबाद के भोणगिरी में उन्हें प्रशिक्षण के लिए भेजा गया। इसी कड़ी में हिमालय अंतर्गत दार्जिलिंग के माउंटेनियरिंग इंस्टीट्यूट के माध्यम से 18 हजार फीट ऊंचाई पर 25  दिन का पर्वतारोहण का प्रशिक्षण दिया गया। इस दौरान अ श्रेणी उत्तीर्ण स्टूडेंट्स को लेह में एक सप्ताह की एडवांस ट्रेनिंग दी गई। इस प्रशिक्षण में प्रथम आए 10  जांबाज आदिवासी स्टूडेंट्स को माउंट एवरेस्ट पर्वतारोहण के लिए चुना गया। इनमें 7 छात्र व 3 छात्राओं का समावेश है। इस प्रकल्प को सफल बनाने में आदिवासी विकास विभाग की सचिव मनीषा मिश्रा, जिलाधिकारी आशुतोष सलील एवं गोंदिया जिप में कार्यरत एम.आर. दयानिधि की महत्वपूर्ण भूमिका रही।  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के हाथों 9 अप्रैल को उपरोक्त विद्यार्थियों का सत्कार कर उन्हें भेंट स्वरूप टैब दिए जाएंगे। उत्तर पूर्व मार्ग (जो चीन की तरह है) से आदिवासी विद्यार्थियों की टीम एवरेस्टरोहण शुरू करेगी। आगामी 8 अप्रैल को होने वाले कार्यक्रम में जिले के सभी आश्रमशालाओं के स्टूडेंट्स ती उपस्थिति में पर्वतारोहकों के दल को हरी झंडी दिखाई जाएगी।

📚📕📗📘📙📔📒📚
*संकलन -* 
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨
📃  *आजची प्रेरणादायी पोस्ट*  📜

*भाग* - 4⃣4⃣0⃣

*रुपाली मेश्राम, बिबट्याशी झुंज देणारी भंडाऱ्याची वाघीण*

_*रक्तबंबाळ अवस्थेतील शेळी पाहून रुपाली भेदरली. मात्र तेवढ्यात बेसावध रुपालीवरच बिबट्याने हल्ला चढवला.*_

By: हरीश मोटघरे, एबीपी माझा, भंडारा | Last Updated: 03 Apr 2018

भंडारा : भंडाऱ्याच्या उसगावमध्ये शेळीच्या शिकारीसाठी घराच्या आवारात शिरलेल्या बिबट्याला मोठ्या हिमतीने एका युवतीने परतवून लावलं. बिबट्याशी झुंज करत स्वतःसह आणि आपल्या आईचे प्राण तिने वाचवले. रुपाली मेश्राम असं या वाघिणीचं नाव आहे.

*...आणि बिबट्याने रुपालीवर हल्ला केला*

24 मार्चला रुपाली मेश्राम आणि तिची आई जिजाबाई झोपलेल्या असताना, रात्री दहाच्या सुमारास बिबट्याने घरात प्रवेश केला. गोठ्यात बांधलेल्या शेळीच्या ओरडण्याचा आवाजामुळे रुपाली अंगणात आली. रक्तबंबाळ अवस्थेतील शेळी पाहून रुपाली भेदरली. मात्र तेवढ्यात बेसावध रुपालीवरच बिबट्याने हल्ला चढवला.

*बिबट्यावर दुहेरी हल्ला*

वेळेचं गांभीर्य ओळखून रुपालीने काठीने वाघावर प्रहार सुरु केले. जिवाच्या आकांताने तिने आरडाओरडा सुरु केला. त्या आवाजाने आईने तिथे धाव घेतली. अनपेक्षितपणे वाघावर दुहेरी हल्ला सुरु झाला. अखेर भेदरलेल्या वाघाने धूम ठोकली. यानंतर रक्तबंबाळ झालेल्या मायलेकींनी घरात धाव घेत कडी लावून घेतली.

*रुपालीच्या धाडसाचं कौतुक*

बिबट्याच्या हल्ल्यात रुपाली आणि तिची आई जखमी झाल्या. वनअधिकाऱ्यांनी सुरुवातील दोघींना प्राथमिक उपचारासाठी साकोली रुग्णालयात दाखल केलं होतं. मात्र रुपालीची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला नागपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आलं. रुपालीला आठवडाभरानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. मात्र रुपालीच्या धाडसाचं राज्यभर कौतुक होत आहे.

📚📕📗📘📙📔📒📚
*संकलन -* 
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_

अनाथांना एक टक्का आरक्षण, शासन निर्णय जारी
राज्य सरकारने 17 जानेवारी रोजी याबाबत निर्णय घेतला होता. त्यामुळे अनाथाश्रम सोडल्यानंतर शिक्षण आणि नोकरीमध्ये अडथळे येणाऱ्या समस्त अनाथ मुलांना त्याचा थेट फायदा होणार आहे.
By: ऋत्विक भालेकर, एबीपी माझा, मुंबई | Last Updated: 02 Apr 2018 09:58 PM
Share  

मुंबई : अनाथ, निराधारांना शिक्षण आणि शासकीय नोकरीत एक टक्का समांतर आरक्षण देण्यासंबंधी शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. राज्य सरकारने 17 जानेवारी रोजी याबाबत निर्णय घेतला होता. त्यामुळे अनाथाश्रम सोडल्यानंतर शिक्षण आणि नोकरीमध्ये अडथळे येणाऱ्या समस्त अनाथ मुलांना त्याचा थेट फायदा होणार आहे.

या निर्णयानुसार, आता शासकीय नोकरीतल्या अर्जावर जातीच्या रकान्यांसोबत अनाथ असाही रकाना असेल. ज्यामुळे शासकीय नोकरीत 1 टक्के आरक्षण तर मिळेलच, शिवाय अनाथ मुलांसाठी आता जातीची कटकट राहणार नाही.

अनाथ मुलांना त्यांचा संस्थेतील कालावधी संपल्यानंतर खुल्या जगात वावरताना प्रचंड अडचणींना सामोरं जावं लागतं. विशेषतः त्यांचा प्रवर्ग निश्चित नसल्याने शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक सवलती आणि लाभांपासून वंचित रहावं लागत होतं. अनाथ मुलांच्या या समस्या ध्यानात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना आरक्षणाचा लाभ मिळवून देऊ, असं आश्वासन दिलं होतं. त्यानुसार हा विषय मंत्रिमंडळ बैठकीत मांडण्यात आला आणि त्याला मंजुरीही देण्यात आली.

काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्र्यांनी अनाथ मुलांसाठी विशेष प्रवर्ग तयार करण्यात येईल अशी घोषणा केली होती. समाधानकारक गुण मिळूनही एमपीएससीला मुकलेल्या अमृता नामक मुलीच्या उदाहरणावरुन मुख्यमंत्र्यानी ही घोषणा केली होती.