twitter
rss

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨
📃  *आजची प्रेरणादायी पोस्ट*  📜

*भाग* - 4⃣3⃣3⃣

*🛩अवनी चतुर्वेदी : महिलांसाठी नवा आसमंत खुला करणारी भारतीय वायुदलाची पहिली फायटर पायलट*

BY-BBC MARATHI

_19 फेब्रुवारीला एका महिलेने प्रथमच एका लढाऊ विमानातून झेप घेतली. ही झेप ऐतिहासिक होती, कारण ही केवळ तिची वैयक्तिक झेप नव्हती तर तिच्यासारख्या हजारों महिलांची होती, ज्यांचं स्वप्न एक फायटर पायलट बनण्याचं असतं._

त्यांच्यासाठी हा नवा आसमंत खुला करणारी ही महिला पायलट म्हणजे फ्लाईंग ऑफिसर अवनी चतुर्वेदी. म्हणूनच गेल्या दोन दिवसांपासून त्या सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे.
24 वर्षांच्या अवनी यांनी MiG-21 विमानातून केलेल्या 30 मिनिटांच्या उड्डाणाने महिलांनी आणखी एक नवं शिखर पादाक्रांत केलं आहे, आणखी एक चौकट मोडली आहे. वायुदलाचे प्रवक्ते अनुपम बॅनर्जी यांच्या शब्दांत सांगायचं तर "आज आणखी एक ग्लास सिलिंग तोडलं गेलंय."

अवनी या भारतीय वायुदलात दाखल होणाऱ्या पहिल्या तीन महिला वैमानिकांपैकी एक आहेत. त्यांचं ऐतिहासिक उड्डाण जरी 19 फेब्रुवारीलाच पूर्ण झालं असलं तरी अगदी कालपर्यंत ही बातमी सार्वजनिक करण्यात आलेली नव्हती.

अवनी यांनी जून 2016 साली भावना कांत आणि मोहना सिंगसमवेत आपलं प्रशिक्षण पूर्ण केलं होतं. लवकरच या दोघीही अशाच विमानात आपापली पहिली उड्डाणं पूर्ण करतील, असं वायुदलाने सांगितलं आहे.
सर्वांसाठी समान संधी उपलब्ध करून देण्यास आम्ही तत्पर आहोत, असं वायुदलाने म्हटलं आहे. "आणि हा क्षण त्याच दिशेनं टाकलेलं एक मोठं पाऊल आहे," असं बॅनर्जी म्हणाले.
भारतीय लष्करात महिलांचं प्रमाण 2016 सालापूर्वी केवळ 2.5 टक्के होतं. त्यातही बहुतांश जणींना प्रत्यक्ष लढण्यास पाठवलं जात नाही.
दुसरीकडे, पाकिस्तान वायुदलाने 2006 पासून महिलांनाही प्रत्यक्ष लढाईसाठी दाखल करण्यास सुरुवात केली होती. आज त्यांच्या वायुदलात 20 महिला फायटर पायलट आहेत.

📚📕📗📘📙📔📒📚
*संकलन -* 
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨

📃  *आजची प्रेरणादायी पोस्ट*  📜

*भाग* - 4⃣3⃣2⃣

*चिमुकल्या अंधांनी व्हॅलेंटाईनचा दिला डोळस संदेश*

साभार - सकाळ वृत्तसेवा

मिरज - माय-बापाच्या पायावर त्यांनी फुलं अर्पिली... निर्विकारपणे नमस्कार केला... देवा माझ्या आई-बाबांना खूप आनंद दे, सुख दे... अशी प्रार्थना केली. ते कधीच मायबापाचा चेहरा पाहू शकणार नाहीत आणि हे रंगबीरंगी जगसुद्धा, मात्र त्यांच्या पदस्पर्शात त्यांनी जीवनाची अनुभूती घेतली.

डोळस माणसांच्या जगात प्रेम व्याख्या सोयीनुसार बदलत असेलही, मात्र काळाकुट्ट अंधार घेऊन जन्मलेल्या अंध मुलांसाठी  त्यांचं विश्‍व आई-बाबा आणि शिक्षक एवढंच! पण ही मुलं जन्मदात्यांचा ‘आधार’ होतील का, याचं उत्तर  नकोच आहे, इथं ‘आदर’ भावना वाढीस लावणारा हा उपक्रम डोळस समाजाच्या डोळ्यातच अंजन घालणारा आहे. ‘बदलत्या समाजाची गरज’ या गोंडस नावाखाली झपाट्याने वृद्धाश्रमाची संख्या वाढत असताना माता-पित्याबद्दलची अंधांची ही डोळस प्रेम भावना संत व्हॅलेंटाईनच्या प्रेमाची व्याख्या विस्तारायला लावणारी ठरावी..!

मिरजेतील लायन्सच्या नॅब संचालित घोडावत निवासी अंधशाळेतील साठहून अधिक चिमुकल्यांनी आज हा अनोखा व्हॅलेंटाईन साजरा केला. पाल्यांसाठी त्यांचे माय-बाप गावाकडून आले होते. आरतीचं ताट सजलं होतं. फुलांचा सुंगध दरवळत होता. दिसत नसलं म्हणून काय झालं, नाक आणि कान या दोन गोष्टीं त्यांच्याकडे होत्याच.

सुंगध हुंगत अंध मुलांनीच सुरू केलेल्या ऑर्केस्ट्राने संगीताचे सूर अंधाराचे जाळे दूर सारत मोकळं आकाश निर्माण करून गेल्या. अर्जुन वाघमारेची बोटं अंध असूनही ट्रमपेटवर अशी काही फिरली...अन्‌ सुरांची बहार छेडत सलमान शेखने ‘‘मैं कभी बतलाता नही पर अंधेरेसे डरता हूँ माँ...या गीताचे सूर हेलावून गेले. पुढचं दृश्‍य आम्हा सर्व डोळसांचे डोळे पानावणारे होते...चिमुकल्यांनी आपल्या आई-बाबांच्या पायावर  डोक ठेवून नमस्कार केला आणि आई-बाबांनी आनंद अश्रूंना वाट करत चिमुकल्या चोचीत पेढा भरवला... आज ज्यांनी हा दिन सुरू केला तेदेखील कृतार्थ झाले...एरव्ही फक्‍त प्रेमिकांना साद घालणारा तरुण-तरुणाईंच्या दंगामस्तीचा हा डे म्हणून अनेकांच्या टीकेचा लक्ष्य झालेला याला अंधांनीच असा डोळसपणा दिला...

नॅबचे अध्यक्ष डॉ. मुकुंद पाठक म्हणाले,‘‘आम्ही ही शाळा सरकारचे एक रुपयाही अनुदान नसताना लोकांच्या मदतीवर गेली १२ वर्षे चालविली आहे. संस्थेचे वसतिगृहही असून दहावीचा निकाल शंभर टक्‍के आहे. अंध असलेल्यांनीही ७५ टक्‍यांपर्यंत गुण मिळवत  बुद्धीची चमक दाखविली आहे.

प्रमुख पाहुणे व ‘सकाळ’चे सहयोगी संपादक शेखर जोशी म्हणाले, ‘‘अंधांच्या जीवनात प्रकाश वाट निर्माण करणाऱ्या या संस्थेस अनुदान मिळत नाही, ही शोकांतिका आहे. भविष्यात अनुदान मिळावे व समाजातून मोठी मदतही मिळावी यासाठी प्रयत्न करूया.’’

डॉ. मनोहर कुरणे, विजय लेले उपस्थित होते. या शाळेसाठी कोणताही मोबदला न घेता काही निवृत्त शिक्षक आपले योगदान देत आहेत. मुख्याध्यापक जी. व्ही. कुचेकर, उज्ज्वला हिरेकुडी, अनिता गायकवाड, अर्चना बारसे, यांनी या कार्यक्रमाचे नेटके संयोजन केले.

📚📕📗📘📙📔📒📚

*संकलन -*  
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_