twitter
rss

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨
📃  *आजची प्रेरणादायी पोस्ट*  📜

*भाग* - 5⃣3️⃣2️⃣

*एक दोन्ही डोळ्यांनी अंध, तर दुसरा शारीरिकदृष्ट्या दिव्यांग. गेल्या दोन महिन्यांपासून कुठलीही सुट्टी न घेता बजावताहेत आपले कर्तव्य!*

_*मुख्यमंत्र्यांनी केला थेट सेंट जॉर्ज रुग्णालयात कॉल; अंध ऑपरेटरला दिली शाबासकी*_

by Team DGIPR   जून 23, 2020  1 min read

मुंबई, दि २३ :  _दुपारी साडेबाराची वेळ. सेंट जॉर्ज रुग्णालयात आलेला कॉल नेहमीप्रमाणे राजू चव्हाण यांनी उचलला. टेलिफोन ऑपरेटर म्हणून चव्हाण यांचा नेहमीप्रमाणे हा व्यस्त दिवस होता. त्यात कोरोनामुळे चौकशीसाठी येणाऱ्या दूरध्वनींचे प्रमाणही वाढलेले. पण हा आलेला कॉल होता थेट महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांकडून…. राजू चव्हाण यांचे अभिनंदन करण्यासाठी !!_

दोन्ही डोळ्यांनी अंध असलेले राजू चव्हाण एक दिवसही रजा न घेता गेल्या दोन महिन्यांपासून  रोज कामावर येतात. आणखी एक शारीरिकदृष्ट्या दिव्यांग ऑपरेटर संदीप शिंदेदेखील नियमितपणे मीरा रोड येथून  सेंट जॉर्जला पोहोचतात आणि कर्तव्य बजावतात. श्री.चव्हाण हे दिवसपाळी तर श्री.शिंदे हे रात्रपाळीवर असतात. यासंदर्भात वृत्तपत्रांतील बातमीची दखल घेऊन स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या कोविड योद्ध्यांशी बोलून त्याचे अभिनंदन करायचे ठरविले. त्याप्रमाणे ते श्री.चव्हाण यांच्याशी बोलले. मुख्यमंत्री आपले कौतुक करताहेत म्हटल्यावर आश्चर्याचा धक्का बसलेल्या श्री.चव्हाण यांनी त्याही स्थितीत या सगळ्यांचे श्रेय आपल्या वरिष्ठांना दिले आणि मी आपला खारीचा वाटा उचलला असे उद्गार काढले. “तुम्ही खूप चांगले काम करीत आहात. अशा परिस्थितीत जिथे रुग्णालयांत कर्मचाऱ्यांची गरज आहे, तुम्ही  दिव्यांग असूनही कुठेही सुट्टी न घेता काम करता हा इतरांसाठी आदर्श आहे. असा सर्वांनी खारीचा वाटा उचलला तर मोठ्या लढाया जिंकता येतात” असे मुख्यमंत्री म्हणाले.

ऑपरेटरचे काम करताना केवळ दूरध्वनी जोडून देणे एवढेच काम आम्ही करीत नाही तर अनेकदा ज्यांचे कॉल येतात ते लोक रुग्णांचे नातेवाईक असतात, गोंधळलेले आणि घाबरलेले असतात. अशा वेळी त्यांना आम्ही धीर देतो त्यांना मार्गदर्शन करतो असेही श्री.चव्हाण यांनी सांगितले.

*ज्ञात अज्ञात कोविड योद्धे*

कोरोना काळात मदतीला धावून जाणाऱ्या अनेक लोकांनी वेळप्रसंगी कशाचीही पर्वा न करता काम केले आहे, मदत केली आहे. त्यांनी कुठलीही अपेक्षादेखील व्यक्त केलेली नाही, कसलाही मोबदला त्यांना यासाठी मिळालेला नाही. अशा ज्ञात-अज्ञात लोकांमुळे कोरोनाचा हा लढा आपण जिंकू. विशेषत: मुंबईसारख्या गजबजलेल्या ठिकाणी विविध आपत्तींमध्ये लोक माणुसकीने इतरांच्या मदतीला धावतात. ही आपत्ती निराळी आहे. या वैद्यकीय आणीबाणीत आरोग्याला धोका आहे हे माहित असूनही अशी माणुसकी न सोडता तसेच कर्तव्य बजावणाऱ्या व्यक्तींच्या प्रति आदर वाटतो असे मुख्यमंत्री आपल्या प्रतिक्रियेत म्हणतात.

https://mahasamvad.in/?p=15930&fbclid=IwAR2KXlYXb6Nr2G8RQaHb4AppfgRFFoVJjSahjLCy0GAw_f7zlCzByUd0t90

📚📕📗📘📙📔📒📚
*संकलन -*  
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨
📃  *आजची प्रेरणादायी पोस्ट*  📜

*भाग* - 5⃣3️⃣1️⃣

*चक्रीवादळ आणि कोरोनाच्या संकटात मुंबईत घडले ‘देवदूता’चे दर्शन!*

by Team DGIPR   June 4, 2020

_‘आकाश, तुझा आम्हाला अभिमान आहे’, अशा शब्दांत गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडून पोलीस हवालदार आकाश गायकवाड यांचे अभिनंदन_

मुंबई, दि.४: कोरोना विषाणूच्या दहशतीमुळे आधीच विरळ झालेले मुंबईतील रस्ते कालच्या चक्रीवादळामुळे अगदी निर्मनुष्य झाले होते. या पार्श्वभूमीवर मुंबईत एका ‘देवदूता’चे दर्शन घडले. जनतेच्या रक्षणासाठी नेहमीच अग्रेसर असणाऱ्या पोलीस दलातील हवालदार आकाश गायकवाड यांनी ऐन गरजेच्या वेळी रक्तदान करून एका लहान मुलीला जीवदान दिले.

गृहमंत्री अनिल देशमुख यांना याची माहिती मिळताच त्यांनी हवालदार गायकवाड यांना दूरध्वनी करून ‘आकाश तुझा आम्हाला अभिमान आहे’, अशा शब्दांत त्याचे अभिनंदन केले. श्री. गायकवाड यांच्यासारख्या योद्ध्यांना माझा सलाम! पोलीस कुटुंबाचा प्रमुख म्हणून मला आपल्या पोलीस दलाचा अभिमान आहे, असे भावोद्गारही त्यांनी यावेळी काढले.

हिंदुजा रुग्णालयात बुधवारी (दि.३) सना फातिम खान या १४ वर्षाच्या छोट्या मुलीवर हृदयशस्त्रक्रिया सुरू होती. तिच्यासाठी ‘ए पॉझिटिव्ह’ रक्ताची तातडीने गरज होती. आई आणि वडिलांचा रक्तगट जुळत नव्हता. त्यामुळे संभाव्य सर्व ठिकाणी रक्ताची शोधाशोध सुरू झाली. मुंबईमध्ये निसर्ग चक्रीवादळ व कोरोनामुळे रक्त देण्यासाठी वैद्यकीयदृष्ट्या योग्य असे कोणीही रुग्णालयात येऊ शकले नाही, अशा गंभीर परिस्थितीत दवाखान्यात नेमणुकीस असलेले ताडदेव पोलीस ठाण्याचे ऑन ड्युटी पोलीस हवालदार आकाश बाबासाहेब गायकवाड स्वत:हून पुढे सरसावले. पोलीस ब्रीदवाक्यास अनुसरून त्यांनी रक्तदान केले आणि या मुलीला जीवनदान मिळाले. स्वप्नवत घडणाऱ्या या घटनेतून माणुसकी हाच धर्म श्रेष्ठ असल्याची प्रचिती रुग्णालयातील उपस्थितांना आली. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हवालदार आकाश गायकवाड यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचे अभिनंदन केले.

https://mahasamvad.in/?p=14306&fbclid=IwAR0lniZIJ-eOoBSO4kdgvVwiQTsizof8t8darA_vlj5bmmQJgU8X3CmWoWc

📚📕📗📘📙📔📒📚
*संकलन -*  
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_

*आधुनिक महाराष्ट्राचा जाणता राजा - शरद पवार*

_*🖋️ श्री.दीपक माळी. 📲९६६५५१६५७२.*_

      महाराष्ट्र आणि शरद पवार साहेब या दोन अशा बाबी आहेत की ज्यांना शब्दात बांधणे ही सोपी गोष्ट नाही. पण आपल्या प्रतिष्ठान मार्फत मिळालेल्या संधीमुळे हा प्रयत्न करु पाहतोय.
   आधुनिक महाराष्ट्राचा किंबहुना स्वातंत्रोत्तर महाराष्ट्राचा विचार करता ज्यांनी महाराष्ट्राच्या उभारणीत मोलाचे योगदान दिले आहे त्यामध्ये आदरणीय पवारसाहेबांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. इ.स.१९४७ ते २०२० दरम्यान महाराष्ट्रात जे नेतृत्व उदयास आले त्यामध्ये स्वर्गिय यशवंतराव चव्हाण साहेब,बाळासाहेब ठाकरे साहेब आणि शरद पवार साहेब यांचा समावेश होता.
      ''जाणता राजा म्हणजे ज्याला सर्व प्रश्नांची जाण आहे असा राजा'',आणि ''आधुनिक महाराष्ट्राचा जाणता राजा म्हणजे आधुनिक महाराष्ट्राच्या सर्व प्रश्नांची जाण असणारा राजा'' म्हणजचे महाराष्ट्रातील सामाजिक,राजकिय,आर्थिक,शैक्षणिक आणि सर्वात महत्वाचे म्हणजे कृषी क्षेत्रा संबंधी खडान् खडा माहिती असणारे नेतृत्व म्हणजे आदरणिय शरद पवार साहेब होय. चांद्यापासून बांद्यापर्यंत प्रत्येक मराठी माणसाची नस माहित असणारी एकमेव व्यक्ती म्हणजे पवार साहेब होत.

*साहेब - राजकारणाची एक  कार्यशाळा*

   पवार साहेब स्व.यशवंतराव चव्हाण साहेबांच्या तालमीत तयार झाले तर वसंतदादा पाटील,बाळासाहेब ठाकरे यांच्याबरोबरीने त्यांचे राजकिय नेतृत्व विकसित होत गेले.त्यांच्या पन्नास वर्षाच्या कारकिर्दीत कित्येक विरोधक आले आणि गेले पण पवारसाहेब वटवृक्षासारखे अजून टिकून आहेत.माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी,लालकृष्ण अडवाणीं पासून देवेंद्र फडणवीस ,चंद्रकांत पाटील यांच्यापर्यंत मोठ्या 'बॅटींग लाईन'चा पवारांच्या गोलंदाजीपुढे टिकाव लागलेला नाही.
  पवार साहेबांनी आपल्या तालमीतही अनेक मोहरे घडविले. आर.आर.(आबा)पाटील तर पवार साहेबांनी घडविवेला अनमोल हिरा .आज आबा आपल्यात नाहीत हे आपले दुर्दैव आहे.आबांच्या प्रमाणे छगन भुजबळ साहेब, अजितदादा,जितेंद्र आव्हाड साहेब,जयंतराव पाटील ही अनमोल रत्ने साहेबांच्यामुळेच महाराष्ट्राला लाभली .डॉ .अमोल कोल्हे,रोहित दादा पवार,अमोल मिटकरी 'हे 2020 चे खेळाडू' पवार साहेबांनी योग्य वेळी बाहेर काढले. आत्ताच्या कोरोना विषाणू विरोधात लढणारा योद्धा आरोग्यमंत्री राजेश टोपे साहेब हेही पवार साहेबांचे अनमोल रत्नचं आहेत. आज कोणत्याही तालुक्यातील कार्यकर्त्याला पवार साहेब नावानिशी ओळखतात.दहा वर्षीपुर्वी भेटलेल्या व्यक्तीचे नावही त्यांना तोंडपाठ असते,असा नेता महाराष्ट्रातचं नाही तर भारतात दुर्मिळ आहे.

*साहेब पुरोगामी महाराष्ट्राची ओळख*

    आज जगभरात महाराष्ट्र फुले,शाहू आणि आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र म्हणून ओळखला जातो.पवारसाहेबांना आपल्या आईकडून पुरोगामी विचारांचा वारसा मिळाला.त्यामुळेच या महान महापुरुषांचे विचार पुढे नेण्याचे कार्य पवार साहेबांनी केले.पवार साहेबांनी त्यांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत पुरोगामी चळवळीला बळ देणारी अनेक विधायक व महत्वाची कामे केली.

  महात्मा फुले जन्मशताब्दी वर्षानिमित्त राज्य सरकारने फुले चरित्र समितीची स्थापना केली होती. तत्कालिन मुख्यमंत्री शरद पवार या समितीचे अध्यक्ष होते. या समितीने 16 खंडात महात्मा फुले यांचे समग्र वाङमय इंग्रजी, हिंदी व मराठी या तीन भाषांत प्रसिद्ध केले.
    त्याचबरोबर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे समग्र साहित्यही पवार साहेबांनी 18 खंडात व इंग्रजी, मराठी या दोन भाषांमध्ये प्रसिद्ध केले.  तसेच पवार साहेबांनी या फुले-आंबेडकर समग्र साहित्य खंडांच्या जनआवृत्त्या काढायचे ठरवले. त्यामुळे हे साहित्य मुबलक प्रतींमध्ये व अत्यल्प दरात सामान्य वाचकांसाठी उपलब्ध झाले.
महात्मा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या साहित्याचे क्रांतिकारी मूल्य व स्वरूप पाहता हे साहित्य जर राज्य शासनाने प्रसिद्ध केले नसते तर कदाचित त्यापैकी अनेक पुस्तके आज उपलब्ध नसली असती.

   मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर होऊन डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ असे नवीन नाव होण्यामागील साहेबांचे योगदान नाकारता येत नाही.

  दुसरे उदाहरण म्हणजे ज्यांनी मुस्लीम सत्यशोधक समाजाची स्थापना करुन मुस्लीम समाजात सुधारणेचा पाया घातला, मुस्लीम समाजात प्रगती व्हावी म्हणून आयुष्यभर लढले असे समाजसुधारक हमीद दलवाई यांना पवारसाहेबांनी नेहमी सहाय्य केले. त्यांच्या आजारापणात त्यांना आपल्या बंगल्यावर ठेवून त्यांना सर्व वैद्यकीय मदत दिली.दुर्दैवाने आज हमीद भाई आपल्यात नाहीत पण हमीद भाईंचे बंधू हुसेनभाई आजही पवार साहेबांच्या सोबत सावलीप्रमाणे आहेत.
    मा.छगन भुजबळ साहेब आणि जितेंद्र आव्हाड साहेब यांच्या रुपातून पवार साहेबांनी पुरोगामी महाराष्ट्राची ओळख अधिक गडद केली आहे.

*क्रांतीकारी महिला धोरणाचा पाया घालणारे साहेब*

  आपल्या आजींकडून पुरोगामी विचारांचा वारसा मिळवणाऱ्या पवारसाहेबांनी क्रांतीकारी महिला धोरणाचा पाया घालून महिलांना सक्षम बनिवले.

    साहेबांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात १९९३ साली महिला आणि बालविकास खात्याची सुरवात केली. त्याच वर्षी आणखीन एक महत्वाचे पाऊल म्हणजे राज्य महिला आयोगाची स्थापना करण्यात आली.
  महिला सक्षमीकरणासाठी ही महत्वाची दोन पावले उचलल्यानंतर पवार साहेबांनी  त्याच्या पुढच्या वर्षी म्हणजे १९९४ साली महिलांसाठी स्वतंत्र धोरण तयार करून त्याची प्रभावी अंमलबजावणी देखील केली.

   त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात मुलींना वडिलांच्या संपत्तीत समान वाटा देण्याचा कायदा १९९४ साली महाराष्ट्रात अस्तित्वात आला. त्यानंतर २००५ साली हा कायदा भारत सरकारनेही व्यापक स्तरावर राबविला. या कायद्यामुळे स्त्री-पुरुष समानतेच्या तत्वाला अधिकच गती मिळाली.

  याशिवाय सर्वात महत्वाची बाब म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महिलांना ३० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय स्त्री पुरुष समानतेला बळकटी देणारा आहे. पुढे २०११ साली हे आरक्षणाचं प्रमाण ५० टक्के एकरण्यात आले.
  आज राजकिय क्षेत्रात सर्वत्र महिलांचा वावर दिसतोय .स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमांतून अनेक महिलांनी आपले नेतृत्व सिद्ध केले आहे याचे श्रेय अर्थातच पवारसाहेबांना जाते.
   पवार साहेबांनी भारताचे संरक्षणमंत्री असताना महिलांना तिन्ही सैन्यदलात ११ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. त्यांचा हा निर्णय त्याकाळातील क्रांतिकारी निर्णय ठरला. याच काळात साहेबांनी महिलांना हवाई दलात वैमानिक म्हणून संधी देण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्यामुळेच आज भारतीय नारी आकाशात उत्तुंग भरारी मारताना दिसत आहे.
     हे झाले महिला सक्षमीकरणासाठी साहेबांनी केलेले कार्य .पण या कार्याची सुरुवात पवार साहेबांनी स्वत:पासून केली.फक्त एका मुलीनंतर स्वत:ची कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करुन सर्वांचा समोर आदर्श ठेवला आहे.
  खरोखरचं, स्त्री-पुरुष समानतेच्या तत्वाचा पुरस्कार करुन त्यादृष्टीने पावले उचलण्याच् धैर्य पवार साहेबांनी आपल्या कृतीमधून जगाला दाखवून दिले आहे.

*साहेब - शेतकऱ्यांसाठी बळीराजाच*

साहेब,एक शेतकरीपुत्र असून त्यांनी नेहमी शेतकऱ्यांच्या हिताचाच विचार केलेला आहे. त्यामुळेच बारामती हे एक भारतातील खरेखुरे शेती विद्यापीठ बनले आहे. ज्याला भेट  देण्याची इच्छा भारताचे पंतप्रधानही टाळू शकत नाहीत.
पण हे साहेबांनी आपल्या अचूक निर्णयांनी अत्यंत प्रयत्नपूर्वक साध्य केले आहे.
   ज्येष्ठ बंधू अप्पासाहेब पवार यांच्या नेतृत्त्वाखाली १९७१ साली बारामती कृषी प्रतिष्ठानची स्थापना केली.अनेक पथदर्शी प्रयोग राबवले. ‘घर तेथे संकरित गाय’, ‘गाव तेथे सहकारी दूध सोसायटी’ या सूत्राने बारामती तालुक्यात व नंतर हे मॉडेल राज्यभर नेऊन दुग्ध व्यवसाय वृद्धींगत केला.
      १९९० मध्ये शरद पवारांनी महाराष्ट्रात फलोत्पादन कार्यक्रम राबवला. हा कार्यक्रम यशस्वी झाल्यानंतर केंद्र सरकारनेही स्वीकारला. त्यामुळेच प्रसिद्ध कृषीशास्त्रज्ञ एम.एस.स्वामीनाथन श्री. पवारसाहेबांचा गौरव फलोत्पादन क्रांतीचे जनक असा करतात. भारताच्या इतिहासातील सर्वात मोठी शेतकरी कर्जमाफी पवार साहेबांनी केंद्रीय कृषीमंत्री असताना केली. देशातील 3 कोटी 69 लाख शेतकऱ्यांना याचा फायदा झाला. त्यानंतर पुढील काळात शेतीकर्जावरील व्याजदर १२% वरुन ४ % पर्यंत कमी करुन कर्जफेड करणे सोपे केले.
दुसऱ्या हरित क्रांतीचे शिल्पकार म्हणून देश आज साहेबांच्याकडे गौरवाने पाहतो.
  भारताने गहू आणि तांदळाच्या उत्पादनात कृषिमंत्री शरद पवार यांच्या कार्यकाळात यशस्वी झेप घेतली.
   भारताचे माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी एका कार्यक्रमात म्हणाले होते,'' भारताला जागतिक स्तरावर अन्न-धान्यात निर्यातदार देश बनविण्यात शरद पवारांचे मोलाचे योगदान आहेे. केंद्रीय कृषीमंत्री म्हणून सलग १० वर्षे काम करताना त्यांनी देशाच्या शेती विकासासाठी रचनात्मक कार्य केले. एके काळी भारताला तांदूळ आयात करावा लागत असे, देशाची या गंभीर समस्येतून मुक्तता करण्यासाठी पवारांनी वैज्ञानिक व तज्ज्ञांची मदत घेतली. याकरिता शेतकर्‍यांचे प्रबोधन केले. याचा परिपाक म्हणून जगात प्रथम क्रमांकाचा तांदूळ निर्यातदार देश म्हणून भारताची नवी ओळख निर्माण करून दिली. जागतिकस्तरावर गहू निर्यातीतही देशाला अव्वल स्थानावर पोहचविले.'' या विधानावरुन पवारसाहेबांच्या कृषीविषयक कार्याची प्रचिती येते.
   आजही ज्यावेळी शेतकऱ्यांवर नैसर्गिक आपत्ती येते त्यावेळी पवारसाहेब कुठेही असले तरी दुसऱ्या दिवशी सरळ शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचतात आणि त्यांना मदत करण्याच्या सूचना करतात. त्यामुळेच पवारसाहेब मला खरेखुरे बळीराजा वाटतात.

*पवारसाहेब - शिक्षण क्षेत्रातील भीष्माचार्य*

   आज शिक्षणाविषयी आणि शिक्षकांविषयी जाण असणारे जे थोडेफार राजकीय नेते आहेत ,त्यामध्ये पवारसाहेबांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. पवारसाहेबांनी स्वत: खडतर परीस्थितीत आपले शिक्षण पूर्ण केले असल्यामुळे त्यांना गोरगरीबांच्या मुलांविषयी कळकळ आहे.
   एका शैक्षणिक कार्यक्रमात शरद पवारसाहेब शालेय आयुष्यातील आठवणींना उजाळा देत म्हणाले होते की,''आम्ही सातही भावंडे शिकलो. आई आमच्यासाठी एसटीमधून डबा पाठवायची. तसेच आम्ही नीट शिकतो आहोत ना हे पाहण्यासाठी स्वतः जातीने यायची. हे शिक्षणाचे संस्कार पहिल्यापासूनच आमच्यावर झाले.''
   पवारसाहेब महाविद्यालयीन काळात विद्यार्थी प्रतिनिधी होते,तत्कालिन काळातही विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम युवा पवारसाहेबांनी केले.
   आपल्या मुख्यमंत्रिपदाच्या कालावधीत शिक्षणक्षेत्रातील समस्या सोडविण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केला.जर शिक्षक चिंतामुक्त झालाच तर तो पूर्ण क्षमतेने वर्गात अध्यापन करु शकेल .यासाठी त्यांनी शिक्षकांच्या प्रश्नांचा निपटारा करण्यास प्राधान्य दिले. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षकांचे प्रश्न मांडण्यासाठी विधान परिषदेत त्यांचे शिक्षक आमदार आहेत परंतु प्राथमिक शिक्षकांचे तिथे प्रतिनिधी नाहीत ,त्यामुळे त्यांचे प्रश्न शासनापुढे येऊ शकत नाहीत.त्यासाठी पवारसाहेबांनी शिवाजीराव पाटील यांच्यारुपाने प्राथमिक शिक्षकांच्या नेत्यास विधान परिषदेवर संधी दिली. पुढे शिक्षकांचे अधिवेशन आणि पवारसाहेब यांचे समिकरण तयार झाले.शिक्षकांचे,विद्यार्थ्यांचे प्रश्न पवारसाहेबांच्या उपस्थितीत शिक्षकांच्या अधिवेशनामधून सुटू लागले. ही परंपरा सन २०२०पर्यंत अजून सुरु आहे. भाजप सरकारच्या कालावधीत महाराष्ट्राच्या दुर्गम भागातील कमी पटाच्या १३०० शाळा बंद करायचा शासनाने निर्णय घेतला.पवारसाहेब आणि सुप्रियाताईंनी यास कडाडून विरोध केला त्यामुळे तत्कालिन शासनास हा निर्णय मागे घ्यावा लागला.
  यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या ,शिक्षण विकास मंचच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रातील नवीन प्रवाहांचा  आढावा पवारसाहेब सतत घेत असतात.शिक्षण विकास मंचच्या वार्षिक शिक्षण परिषदेच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्राचा आढावा घेत असतात.

  कर्मवीर भाऊराव पाटलांनी लावलेल्या रोपट्याचे म्हणजे रयत शिक्षण संस्थेचे पवारसाहेब अध्यक्ष झालेनंतर संस्थेच्या शाळा, महाविद्यालये, आश्रमशाळांमध्ये मोठी भर. आणि त्यातून अनेक विद्यार्थी मोठमोठ्या हुद्द्यावर रुजू आहेत. आज रयत शिक्षण संस्था ही महाराष्ट्रातील एक नंबरची शिक्षण संस्था आहे. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टी रुजावी, संशोधक तयार व्हावेत यासाठी साहेबांच्या पुढाकाराने रयत विज्ञान परिषदेची स्थापना केली.
   काम करीत शिकणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यापीठाची नाशिक येथे स्थापना करण्यात पवारसाहेबांचा सिंहाचा वाटा आहे.
  या शिवाय शाळांचे पर्यवेक्षण करण्यासाठी केंद्रप्रमुख हे नवे पदनिर्मितीसाठी साहेबांनी पुढाकार घेतला तसेच या पदावर पदवीधर प्राथमिक शिक्षकाची निवड व्हावी असा निर्णय घेतला.
   ज्या ज्या वेळी शिक्षण आणि शिक्षक अडचणीत येतील त्यावेळी पवार साहेबांनी मदत केली आहे,मग तो शिक्षकांच्या बदलीचा विषय असो वा नवीन शिक्षकभरतीचा विषय असो पवारसाहेब नेहमीच शिक्षकांच्याबाजूने ठामपणे उभे राहिले आहेत.
    महात्मा फुले, शाहू, आंबेडकर आणि कर्मवीर भाउराव पाटील यांच्यानंतर बहुजन समाजाला शिक्षण देण्याचे काम शरद पवार यांनी केले. काळाच्यापुढे जाऊन शिक्षणाचा विचार करणारे, ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान, संगणक, डिजिटल कृषी, आयटी, उद्योग, संशोधन अशा सर्व स्तरावर शिक्षणाची उभारणी करणार् दूरदृष्टी ठेवणारे पवार साहेब आहेत. त्यामुळेच पवारसाहेब सर्वांना शिक्षण क्षेत्रातील भीष्माचार्य वाटतात.

*अष्टपैलू खेळाडू -पवारसाहेब*

   देशाच्या राजकारणातील अष्टपैलू खेळाडू असलेले शरद पवार कधी कुणाची विकेट घेतील सांगता येत नाही. त्यामुळेच त्यांना 'तेल लावलेला पैलवान' म्हणतात.साहेबांचे सासरे सदू शिंदे हे कसोटीपटू होते. साहेबांना कब्बड्डी,खो-खो,कुस्ती,फुटबाँल या खेळांची आवड आहे. साहेबांनी आजपर्यंत अनेक खेळांच्या संघटनांचे अध्यक्षपद स्विकारले आहे.
   साहेबांनी मुंबई क्रिकेट असोसिएशन, महाराष्ट्र कुस्ती असोसिएशन, महाराष्ट्र कबड्डी असोसिएशन, महाराष्ट्र खो-खो असोसिएशन, महाराष्ट्र ऑलंपिक असोसिएशन, भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड  आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद या संघटनांचे अध्यक्षपद भुषविले आहे. पवारसाहेब ICC चे अध्यक्ष झाले तरी त्यांची देशी खेळांशी असलेली नाळ कधीही तुटली नाही. कुशल क्रीडा संघटक अशी त्यांची आजही ओळख आहे. राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष असताना लाल मातीसोबतच गादीवरील कुस्तीला शरद पवार यांनी सुरुवात केली.देशातील सर्वश्रेष्ठ कुस्ती स्पर्धा अशी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला शरद पवार यांनीच प्रतिष्ठा मिळवून दिली.
   खो-खो खेळासाठी त्यांनी केलेल्या प्रयत्नांमुळे शरद पवार  साहेबांचा वाढदिवस खो-खो दिवस म्हणून साजरा केला जातो.
  पवार साहेबांच्या प्रयत्नांमुळे १९९० साली बिजिंगमधील एशियाड स्पर्धेत कबड्डीचा समावेश झाला .
   १९९३ साली पुण्यात राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचं आयोजन झाले होते, त्यावेळी साहेबांच्या प्रयत्नांमुळे ११ महिन्यात शिवछत्रपती क्रीडा नगरीची उभारणी केली.
   भारतामध्ये IPL सुरू झालं याचं श्रेय खरं शरद पवार यांनाच द्यावं लागेल, IPL सुरू करण्यासाठी ललित मोदींनी प्रयत्न केले, पण त्याला शरद पवारांचं पाठबळ मिळालं नसतं, तर हे केवळ अशक्य होतं.शरद पवार हे 2005 ते 2008 या काळात BCCIचे अध्यक्ष होते. त्याचवेळी IPLला सुरुवात झाली. देशी खेळापासून ICC पर्यंत आपल्या कामाचा ठसा उमटवणारे पवार साहेब हे एक अष्टपैलू खेळाडू आहेत.

*साहेब - आपत्ती व्यवस्थापन गुरु*

    शरद पवारसाहेब आपत्ती दूर करणारे व्यक्तीमत्व म्हणून ओळखले जातात. मग ती राजकीय आपत्ती असुद्या की नैसर्गिक.साहेबांनी त्यापुढे कधीच हार मानली नाही.

  ३० सप्टेंबर १९९३ सालची ती काळरात्र … लातूरमध्ये ६.४ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. त्यावेळी साहेबांनी या संकटावर यशस्वीरित्या मात केली. लातूर भूकंपाबाबत रेडिओवर बातमी येण्याआधीच मुख्यमंत्री शरद पवार हे लातूरात दाखल झाले होते.

  गावात प्रचंड भीषण परिस्थिती होती, इतकी की प्रसंगी साहेबांनी स्वतः काही मृतदेह बाहेर काढले. अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकून होते. अनेक घरांचे,शेतीचे, पशुधनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.

साहेबांनी आपले मुख्यमंत्री कार्यालयच काही दिवसांसाठी लातूरला हलवले. अधिकाऱ्यांना हव्या त्या सूचना दिल्या.इतकेच नव्हे तर शेतीसाठी, शेतकऱ्यांसाठी,  पशुधनासाठी साहेबांनी त्याकाळी कोट्यवधी रुपये अवघ्या काही दिवसांत जमवले होते.
  त्यांच्या या कामाची दखल घेऊन अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारने २००१ रोजी स्थापन केलेल्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शरद पवारांना केले होते.
   गुजरातमध्ये जेव्हा भुकंप आला तेव्हा पवारसाहेब धाऊन गेले आणि त्यांच्या अनुभवाचा उपयोग गुजरात प्रशासनाला झाला.
   बाबरी विध्वंसानंतर मुंबईत जातीय दंगल उसळली तेव्हा हा महाराष्ट्रपुत्र धावून आला अन् काही दिवसात मुंबई शांत झाली.

   आता आलेल्या कोरोना आपत्तीला दुर करण्यासाठी साहेब कोरोना योद्ध्यांच्या सोबत आहेत. सोशल मिडीयाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधून धीर देणे ,त्यांना मदत कशी करता येईल याचे नियोजन करणे ,तसे सरकारला सुचना करणे ,मार्गदर्शन करण्याचे काम शरद पवार करताना दिसत आहेत.

ज्या ज्या वेळस महाराष्ट्रावर संकट आले, तेव्हा सत्ता असो वा नसो,पवार साहेबांनी महाराष्ट्राचे रक्षण केले आहे,यामध्ये साहेबांचे आपत्ती व्यवस्थापन कौशल्य दिसून येतो.

*साहित्यप्रेमी साहेब*

   साहेबांना त्यांचे गुरु यशवंतराव चव्हाण साहेबांप्रमाणे साहित्याची आवड आहे,साहेबांनी स्वत: लिहिलेले त्यांचे आत्मचरित्र 'लोक माझे सांगाती' त्यांच्या लेखनकौशल्याची साक्ष देते.बारामती येथील शिक्षणसंस्थेत त्यांनी वाचलेली पुस्तके, ग्रंथ वाचकांसाठी ठेवलेले आहेत. ती पाहिली तरी साहेबांचे साहित्यप्रेम दिसून येते.
शाहीर अमर शेख यांच्या नावाने पुरस्कार सुरु करण्याची कल्पना साहेबांनीच आहे.सहित्य अकादमी पुरस्कार मिळाल्यावणाऱ्या मराठी कलाकारांना राज्याकडून १लाख रुपये देण्याचा निर्णय साहेबांनीच घेतला.कवी ना.धों. महानोर, लक्ष्मण माने यांसारख्या साहित्यिकांचा विधान परिषदेत प्रवेश साहेबांच्यामुळेच झाला.घाशीराम कोतवाल नाटकाच्या बंदीविरोधात पवारसाहेब ठाम उभे राहिले. जयंत नारळीकरांचे 'आकाशाशी जडले नाते' या पुस्तक साहेबांनी शाळातून वाटले.त्यामुळेच निसर्गकवी ना. धो. महानोर साहेबांचा उल्लेख 'जाणता राजा' असा करतात.

     _साहेबांचे कार्य,त्यांचे विचार यांचा आढावा घेण्याचा छोटासा प्रयत्न केला पण शब्दांनाही मर्यादा आहेत अन् महाराष्ट्राचा आधारवड शब्दांच्या कवेत मावणारा नाही.खरोखर साहेबचं 'आधुनिक महाराष्ट्राचा जाणता राजा' आहेत._

धन्यवाद....!

🖋️दीपक माळी. 📲९६६५५१६५७२.