twitter
rss

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨
📃  *आजची प्रेरणादायी पोस्ट*  📜

*भाग* - 4⃣9⃣2⃣

*'त्या' तरुणीने तब्बल १८ हजार रुपयांचे पाकिट भर पावसात थांबून मालकाला केले परत!*

Published On: Jun 29 2019 7:28PM

*रिश्मा बाळासो नदाफ*

_शेजारून येणाऱ्या जाणाऱ्यास हे पाकिट तुमचे आहे का? असा प्रश्न करण्याऐवजी ही कार तुमची का? असा प्रश्न ती विचारत होती. दहा मिनिटांनी दोन व्यक्ती कारजवळ आल्या. त्यावेळी करिश्माने पुन्हा प्रश्न विचारला ही कार तुमची आहे का? असेल तर चालू करून दाखवा. त्या दोघांना कळेना एक युवती असा प्रश्न का करत आहे? त्यांनी कार सुरू केली, कारचा दरवाजा उघडून दाखवित, ही कार आमचीच आहे हे पटवून दिले. मग करिश्माने ते पाकीट दाखवून खात्री करून ते त्यांना परत दिले._

*लिंगनूर : प्रवीण जगताप;दैनिक पुढारी*

भारती विद्यापीठमध्ये बीएससी नर्सिंग कोर्सच्या दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या रिश्मा बाळासो नदाफ या विद्यार्थीनीला अठरा हजार रुपये आणि अनेक कार्ड्सने भरलेले पाकीट रस्त्यावर पडलेले मिळाले. ते पाकीट मूळ मालक येईपर्यंत तेथेच थांबून तिने परत केले. ज्या गाडीजवळ हे पाकीट पडले होते, त्या मूळ मालकाची खात्री होईपर्यंत तेथेच थांबून दाखविलेल्या चिकाटी आणि प्रमाणिकपणाबद्दल पाकीट मालकाने नुसता कौतूक केले नाही तर तिच्या घरी भेट घेऊन आईच्या हातात बक्षीस देत कोल्हापूरी दाद दिली.

हा प्रसंग आज (ता.२९) दुपारी एकच्या सुमारास घडला. सलगरे गावची करिश्मा नदाफ आपले नर्सिंग कॉलेज करून मिरज स्थानकानजीक ए पी बेकरीमध्ये खरेदीस गेली होती. परत येताना तिला एका कारच्या टायरखाली एक उघडे पाकीट पडलेले दिसले. त्यावेळी कारजवळ कोणीही नव्हते. त्यामुळे हे रस्त्यावर पडलेले पाकीट कोणाचे असेल? कार मालकाचे की अन्य कोणाचे? असा तिला प्रश्न पडला होता. तरीही तिने ते पाकीट उचलले. त्यात दोन हजारांच्या नोटा दिसत होत्या. पण त्या मोजल्या नाहीत. पाच सहा एटीएम आणि क्रेडिट कार्ड्स होती. पण पाकीटातून बाहेर काढली नाहीत.

शेजारून येणाऱ्या जाणाऱ्यास हे पाकिट तुमचे आहे का? असा प्रश्न करण्याऐवजी ही कार तुमची का? असा प्रश्न ती विचारत होती. जवळून जाणाऱ्या काहींनी हातातील पाकीट पाहून आम्ही त्या कार मालकास देतो म्हणून मागितले. कारण पाऊस सुरू होता. पण रिमझिम पावसात करिश्मा तशीच उभी होती. दहा मिनिटांनी दोन व्यक्ती कारजवळ आल्या. त्यावेळी करिश्माने पुन्हा प्रश्न विचारला ही कार तुमची आहे का? असेल तर चालू करून दाखवा. त्या दोघांना कळेना एक युवती असा प्रश्न का करत आहे? त्यांनी कार सुरू केली, कारचा दरवाजा उघडून दाखवित, ही कार आमचीच आहे हे पटवून दिले. मग करिश्माने ते पाकीट दाखवून खात्री करून ते त्यांना परत दिले. त्यानंतर पाकीट मालकाला घडलेला सारा प्रकार त्यांना सांगितला.

हे पाकीट होते कोल्हापूर येथील मेनन अँड मेनन कंपनीच्या असिस्टंट जनरल मॅनेजर अमर गुरव यांचे. आपल्या आईच्या गुडघेदुखीवर आयुर्वेदीक औषधांच्या शोधत ते तिथे आले होते. त्यांनी आश्चर्य व्यक्त करीत तिला पैसे बक्षीस म्हणून देण्याचा प्रयत्न केला. पण तिने ते टाळले. आग्रह करूनही करिश्मा केवळ मी मदत केली हेच बोलून दाखवत होती. ज्येष्ठ असलेल्या मॅनेजरनी तुझ्या घरी आम्ही तुला सोडतो असे सांगितले. पण त्यालाही करिश्मा तयार नव्हती. शेवटी माझी मुलगी तुझ्या वयाची आहे. माझ्या भाचीसारखी तू आहेस. पाऊस सुरू आहे तुला तुझ्या घरी सोडू किंवा तू हे बक्षीस घे असा आग्रह केला.

शेवटी बक्षीस घेण्याऐवजी घाबरत ती घरी सोडण्यास तयार झाली. पण माणुसकी आणि गुणांची पारख करणारी ती दोन कोल्हापूरची माणसं दुपारी तीनपर्यंत घरी आले. करिश्माची घरची परिस्थिती तशी साधारण. आई बांगड्या विकण्याचा व्यवसाय करते. वडील मिळेल ती मोलमजुरीचे काम करतात. यावेळी मॅनेजर गुरव यांनी आई आणि आजीची भेट घेतली. त्यांनी करिश्माचे वाघिण अशा शब्दांत कौतुक केले अन चार हजार रुपयांचे बक्षीस जबरदस्तीने तिच्या आईच्या हातात ठेऊन गेले.

एकीकडे गुडघे दुखीवर पस्तीस हजार रुपये किंमत सांगितल्याने फसवणूकीची भीती वाटल्याने औषध टाळणे, एकीकडे खात्री होऊन पटेपर्यंत पाकीट देणारी करिश्मा दोन्ही अनुभव एकाच दिवशी एकाच वेळी त्यांना आले होते. एखाद्या मालिकेत घडावा असा प्रसंग. इथे करिष्माचा फक्त प्रामाणिकपणा नव्हता तर सचोटी होती, चिकाटी होती आणि पारखही... तर अमर गुरव यांचीही माणुसकी, पारख आणि प्रामाणिकपणाला दिलेली दाद सुद्धा तितकीच कोल्हापुरी पद्धतीची. गरीब परिस्थितीत चांगले शिक्षण घेणाऱ्या करिश्मास केव्हाही मदतीची ग्वाही देत मॅनेजर गुरव परतीच्या वाटेने निघाले.

http://pudhari.news/news/Sangli/The-wallet-lying-on-the-road-is-given-back/m/

📚📕📗📘📙📔📒📚
*संकलन -* 
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨
📃  *आजची प्रेरणादायी पोस्ट*  📜

*भाग* - 4⃣9⃣1⃣

*पंक्चर काढणाऱ्याच्या मुलाची आयआयटीत भरारी*

विवेक मेतकर

Friday, 21 June 2019,

अकोलाः शांत समुद्र कुशल खलाशी बनवत नाही. उत्तम खलाशी होण्यासाठी खवळलेल्या समुद्रातच प्रशिक्षण घेतले पाहिजे, कारण, प्रवास करताना समुद्र नेहमीच शांत असेल असे नाही. मग जर कधी अशांत समुद्रातून इच्छितस्थळी जाण्याची वेळ आली तर आपला टिकाव लागणार नाही. कठीण परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी तशा प्रसंगातून जाणं आवश्यक असतं तेच आपल्याला नवनवीन धडे शिकवत असतात. असेच धडे आयआयटी ॲडव्हॉन्स परीक्षेला बसलेल्या शिवमने घेतले आणि देशात एससी प्रवर्गातून ३७ वा रॅन्क प्राप्त केला.

शिवम हा दर्यापूर तालुक्यातील पनोरा या छोट्याशा गावातला. गावातल्याच जिल्हा परिषद शाळेत त्याने चवथीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. पाचवी ते दहावीच्या शिक्षणासाठी तो दर्यापूरच्या प्रबोधन विद्यालयात दाखल झाला. कुशाग्र बुध्दीच्या शिवम इंगळे याने दर्यापूरसारख्या ठिकाणाहून दहावीत ९५ टक्के गुण प्राप्त केले.

शिवमचे वडील दर्यापूर येथे पंचरचे दुकान चालवितात. आई गावातच शिवणकाम व शेतीकामात त्यांना मदत करते. मराठी माध्यमातून शिकलेला मुलगा एवढी प्रगती करूच शकत नाही, अशी शहरात राहणाऱ्या पालकांची धारणा असते. परंतु, शिवमने या सगळ्या परिस्थितीवर मात करून भरघोस यश संपादन केले. खेड्यातील मराठी माध्यमातून शिकलेला. घरची आर्थी परिस्थिती साधरण, ना मोबाईल, ना गाडी, किंवा इतर कोणत्याही भौतिक सुविधा नसतानाही त्याने मोठी गरुडझेप घेतली.

दहावीनंतर त्याने अकोल्यात येवून जेईई ॲडव्हॉन्सची तयारी केली. त्याला वेळोवेळी मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांमुळेच तो भरारी घेऊ शकला असल्याचे सांगतो. कुठल्याही प्रकारचे फाऊंडेशन क्लास नाही, ट्यूशन क्लास नाही, कौटुंबिक परिस्थिती नाही. तशी कुटुंबात पुढील शिक्षणाबद्दलची माहितीही नाही. मात्र, या सर्व गोष्टींवर मात करून त्याने राष्ट्रीयस्तरावर संपादीत केलेले यश कौतुकास्पद आहे. आई-वडीलांचे आशिर्वाद, गुरुजनांचे मार्गदर्शन यासोबत कठीण परीश्रम आणि जिद्दीच्या जोरावर त्याने आयआयटीचा मार्ग सुकर केला असून भौतिक सुविधांच्या अभावामुळे अभ्यासात टाळाटाळ करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तो आदर्श ठरला आहे. एकूण काय, तर कुशल खलाशी होण्यासाठी खवळलेल्या सागरातही सफर केलीच पाहिजे.

http://www.yinbuzz.com/failure-pensioners-child-iit-11604?fbclid=IwAR1Hw65Z-xMcN5EwbvaLb_gr9nbQXTbRy7Xff5sfSmZ3Mz_JeqL7eLpcx7A

📚📕📗📘📙📔📒📚
*संकलन -* 
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_