twitter
rss

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨
📃  *आजची प्रेरणादायी पोस्ट*  📜

*भाग* - 4⃣3⃣8⃣

*भारतातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाईंना मानवंदना*

*👩🏻‍⚕डॉक्टर होण्याचा संघर्ष प्रेरणादायी*

साभार -मंदार गुरव,दैनिक लोकसत्ता

Updated: March 31, 2018

नेतृत्वगुण विकसित करण्यासाठी आणि त्यायोगे कोणत्याही क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी बजावण्यासाठी शिक्षण हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. शिक्षणामुळे माणसाचा बौद्धिक, आर्थिक आणि सामाजिक विकास होतो. शिक्षण हे समाज प्रबोधनाचे एक उत्तम माध्यम आहे. अठराव्या शतकात शिक्षणाचे महत्त्व जाणणाऱ्या आनंदीबाई जोशी यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत भारतातील पहिल्या महिला डॉक्टर होण्याचा मान मिळवला. आणि त्यांना आज गुगलने ३१ मार्च रोजी त्याच्या जन्म दिवसाचे निमित्त साधुन मानवंदना दिली आहे. ज्या काळात स्त्रियांना शिक्षणाचा हक्कच नव्हता. त्या काळात सामाजिक व कौटुंबिक विरोधावर मात करत अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत प्रगतीच्या दिशेने उचललेले एक क्रांतिकारी पाऊल म्हणजे आनंदीबाई होय.
त्यांचा जन्म ३१ मार्च १८६५ रोजी पुण्यात एका सधन कुटुंबात झाला होता. परंतु तत्कालीन रुढी परंपरानुसार वयाच्या अवघ्या ९व्या वर्षी त्यांचा विवाह त्यांच्या वयापेक्षा तब्बल २० वर्ष मोठ्या गोपाळराव जोशी यांच्याशी करण्यात आला. स्वत: शिक्षित असल्यामुळे गोपाळराव अठराव्या शतकातील भारतीय विचारधारेपेक्षा बरेच पुढारलेले होते. त्यांनी आनंदीबाईंना शिक्षणासाठी प्रोत्साहीत केले. पुढे प्राथमिक शिक्षण सुरु असतानाच वयाच्या १४ व्या वर्षी आनंदीबाईंनी एका मुलाला जन्म दिला. दरम्यान त्यांचे शिक्षण काहीसे बारगळले. परंतु वैद्यकिय सुविधांच्या अभावामुळे त्यांचे ते मुल काही जगू शकले नाही. आणि या घटनेचा गोपाळरावांच्या मनावर पार खोलवर परिणाम झाला. आणि अशी वेळ इतर दुसऱ्या कोणावर येऊ नये यासाठी आनंदीबाईंनाच तंत्रशुद्ध वैद्यकिय शिक्षण देण्याचा निर्णय गोपाळरावांनी घेतला. परंतु उच्च शिक्षणाच्या योग्य सोयी भारतात नसल्यामुळे आनंदीबाईंना शिक्षणासाठी थेट अमेरिकेत पाठवण्याचा घाट गोपाळरावांनी घातला.

पुढे ४ जून १८८३ साली आनंदीबाई उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत पोहोचल्या. परदेशात जाउन शिक्षण घेणाऱ्या भारतीय इतिहासातील पहिल्या महिला होण्याचा मान यामुळे आनंदीबाईंना मिळाला. अत्यंत हिन दर्जाची वागणूक आणि प्रचंड हाल अपेष्टा सहन करुन त्या अमेरिकेत तर पोहोचल्या परंतु बौद्धिक व वैचारिकदृष्ट्या पुढारलेल्या अमेरिकन समाजानेही त्याचा मानसिक छळ सुरुच ठेवला. परंतु आनंदीबाईंचे मनोधैर्य तुटले नाही. त्यांनी पेंसिलवेनिया मधील महिला वैद्यकिय महाविद्यालयात अत्यंत आत्मविश्वासाने आपले शिक्षण सुरु ठेवले.
पाहता पाहता आपली जिद्द, मेहनत, चिकाटी आणि महत्वाकांक्षेच्या जोरावर ११ मार्च १८८६ रोजी त्यांनी वैद्यकिय पदवी मिळवत भारतातील पहिली महिला डॉक्टर होण्याचा मान मिळवला. पुढे १८८६ साली त्या भारतात परतल्या. आणि कोल्हापुरातील एल्बर्ट एडवर्ड हॉस्पिटलमध्ये काम करण्यास सुरवात केली. त्यांनी आपल्या ज्ञानाची चुणुक दाखवण्यास सुरवात केलीच होती. पंरतु त्यांची किर्ती सर्वदूर पसरण्याआधीच २६ फेब्रुवारी १८८७ साली वयाच्या अवघ्या २१व्या वर्षी त्यांचे निधन झाले.

  *_आनंदीबाईंचा थक्क करणारा प्रवास हा प्रतिकुल परिस्थितीतुन प्रगतीच्या दिशेने जाउ इच्छिणाऱ्यांसाठी प्रेरणादायी आहे. या पहिल्या महिला डॉक्टरला गुरुवर्यचाही मानाचा मुजरा!_*

📚📕📗📘📙📔📒📚
*संकलन -* 
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨
📃  *आजची प्रेरणादायी पोस्ट*  📜

*भाग* - 4⃣3⃣6⃣

*स्टीफन हॉकिंग हे जगभरातील अभ्यासकांचे प्रेरणास्त्रोत होते. हॉकिंग बोलणारं एक एक वाक्य हे प्रेरणादायी विचार म्हणून नोंदलं गेलं.*

*स्टीफन हॉकिंग यांचे 10 प्रेरणादायी विचार*

केंब्रिज (इंग्लंड) : जगप्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ प्रा. स्टीफन हॉकिंग यांचं केंब्रिजमधील राहत्या घरी निधन झालं. वयाच्या 76 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बिग बँग थिअरी, कृष्णविवरावरील हॉकिंग यांचं संशोधन भौतिकशास्त्रासाठी मोठं योगदान आहे.

*स्टीफन हॉकिंग यांचे 10 प्रेरणादायी विचार*

1. गमती नसतील तर आयुष्य एक शोकांतिका ठरेल : स्टीफन हॉकिंग

2. जरी मी हालचाल करु शकत नसलो, मला बोलण्यासाठी कॉम्प्युटरची मदत घ्यावी लागत असली, तरीही मी माझ्या मनातून मुक्त आहे – स्टीफन हॉकिंग

3. नेहमी आकाशातील ताऱ्यांकडे पाहा, आपल्या पायाखाली पाहू नका. जे पाहाल, त्याचा अर्थ समजण्याचा प्रयत्न करा. कुतूहल जागरुक ठेवा.

4.आयुष्य कितीही कठीण असलं तरी, त्यावर तुम्ही मात करु शकताच. तुम्ही यशस्वी व्हाल! : स्टीफन हॉकिंग

5. आपल्याला जे जे करता येईल ते सर्व करायला हवं. मात्र जे आपल्या हातात नाहीत, त्याबाबत पश्चाताप करु नये : स्टीफन हॉकिंग

6.दिव्यांगांना माझा सल्ला आहे, तुम्ही त्या गोष्टींवर लक्ष द्या, ज्या करण्यापासून तुम्हाला तुमचं अपंगत्व रोखू शकणार नाही, किंवा तुमचं अपंगत्व त्याआड येणार नाही. लक्षात ठेवा आत्म्या आणि शरीर दोन्हीही अपंग होऊ देऊ नका. : स्टीफन हॉकिंग

7. आक्रमकता मनुष्याची सर्वात वाईट सवय आहे. आक्रमकता सभ्यतेचा नाश करते. : स्टीफन हॉकिंग

8.कधीही करु शकत नाही असं काहीही नाही : स्टीफन हॉकिंग

9. जे आपल्या बुद्ध्यांकाबद्दल/ IQ बद्दल दावा करतात, ते अयशस्वी असतात : स्टीफन हॉकिंग

10. ब्रह्माण्डापेक्षा मोठं आणि जुनं काहीच नाही : स्टीफन हॉकिंग

📚📕📗📘📙📔📒📚

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨
📃  *आजची प्रेरणादायी पोस्ट*  📜

*भाग* - 4⃣3⃣5⃣

*माणूसकीचा पाझर; सीरियात भारतीयांचे मदतकार्य* 🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳

Published On: Mar 02 2018 7:08PM

नवी दिल्लीः पुढारी ऑनलाईन

गेल्या दोन आठवड्यात रशियाकडून झालेल्या बॉम्ब हल्ल्यात सिरीयातील 674 नागरिक ठार झाले आहेत. यामध्ये लहान मुलांचाही मोठ्या प्रमाणात समावेश आहे. सिरीयातील अंतर्गत वाद संपण्याच्या मार्गावर नसल्याने सिरियातील नागरिक मोठ्या प्रमाणात शेजारील देशात स्थलांतरीत होत आहेत. या स्थलांतरीतांच्या मदतीला भारतीय धावले आहेत. शीख समुदायाच्या खालसा एड या संस्थेने या विस्थापितांना मदतीचा हात दिला आहे.

सिरीयन लोकांना मदत करण्यासाठी जगभरातून विविध सामाजिक मदत गट समोर येत आहेत. पंजाबच्या 'खालसा' या सामाजिक गटाने याप्रकारच्या अत्याचारित लोकांना मदत करण्यासाठी नेहमीच पुढाकार घेतला आहे. सिरीयातील निर्वासितांना या गटाकडून 14 टन अन्न आणि लहान मुलांसाठी चप्पल मदत म्हणून देण्यात आले. गेल्या काही वर्षांपासून या सामाजिक संस्थेद्वारे अशा प्रकारे निर्वासित लोकांना मदत केली जाते. त्यांच्या या कार्याचे सर्व स्तरातून कौतूक होत आहे.

पूर्ण बातमी आणि छायाचित्रे पाहण्यासाठी लिंक 👇

http://pudhari.news/news/International/Sikh-charity-Khalsa-Aid-is-helping-Syrian-refugees/m/

📚📕📗📘📙📔📒📚
*संकलन -* 
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨
📃  *आजची प्रेरणादायी पोस्ट*  📜

*भाग* - 4⃣3⃣4⃣

*सलाम वीरपत्‍नीच्या धैर्याला..!*

Published On: Feb 24 2018 6:08PM

साभार : पुढारी ऑनलाईन

सर्वात जवळ असणाऱ्या व्यक्तीचे निधन झाल्याचे वृत्त आल्यास भल्या-भल्याना सावरणं अवघड होऊन जातं. अशातच नुकतेच एका बाळाला जन्म दिलेल्या मातेला तिच्या पतीच्या निधनाचे वृत्त समजले तेव्हा तिच्या मनावर होणाऱ्या आघाताची आपण कल्पनाही करू शकत नाही. मात्र, याही परिस्थितीत ती स्वत:ला सावरते आणि खंबीरपणे सर्व परिस्थितीचा समाना करते. याचीच प्रचिती आसाममधील एका प्रसंगाने संपूर्ण देशाला आली.

देशसेवा बजावत असताना विंग कमांडर डी वत्स यांचा अपघाती मृत्यू झाला. त्यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले. या अंत्यसंस्कारावेळी त्यांची पत्नी पाच दिवसाच्या नवजात बाळासोबत हजर झाली. ‘खंबीर राहणं म्हणजे काय असतं’ याचीच प्रचिती डी वत्स यांच्या पत्नीकडे पाहणार्‍या प्रत्येकाला आली. बाळाला घेऊन लष्करी गणवेशात अंत्यसंस्कारासाठी पोहोचलेल्या या ‘वीरपत्नी’चा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

डी वत्स यांची पत्नी मेजर कुमूद डोगरा लष्कर अधिकारी आहेत. पाचच दिवसांपूर्वी त्यांच्या घरी बाळाचं आगमन झालं आहे. आसाममध्ये १५ फेब्रुवारीला मजुली आयर्लंडवर भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टरचा अपघात झाला होता. यात हेलिकॉप्टरमधील दोन्ही पायलट शहीद झाले. यामध्ये डी वत्स हेही होते. दु:खद बाब म्हणजे, डी वत्स आपल्या मुलीचा चेहराही पाहू शकले नाहीत.

या वीरपत्नीला देशवासीयांनी अनोख्या पद्धतीने ‘सलाम’ केला आहे. अनेकांनी सोशल मीडियवर ट्विट आणि पोस्ट शेअर करून डी वत्स यांच्या या चिमुकलीला आशीर्वादही दिले आहेत.

या वीरपत्‍नीच्या धैर्याला गुरुवर्यचा सलाम....!

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

*संकलन -* 
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_