🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨
📃 *आजची प्रेरणादायी पोस्ट* 📜
*भाग* - 4⃣3⃣4⃣
*सलाम वीरपत्नीच्या धैर्याला..!*
Published On: Feb 24 2018 6:08PM
साभार : पुढारी ऑनलाईन
सर्वात जवळ असणाऱ्या व्यक्तीचे निधन झाल्याचे वृत्त आल्यास भल्या-भल्याना सावरणं अवघड होऊन जातं. अशातच नुकतेच एका बाळाला जन्म दिलेल्या मातेला तिच्या पतीच्या निधनाचे वृत्त समजले तेव्हा तिच्या मनावर होणाऱ्या आघाताची आपण कल्पनाही करू शकत नाही. मात्र, याही परिस्थितीत ती स्वत:ला सावरते आणि खंबीरपणे सर्व परिस्थितीचा समाना करते. याचीच प्रचिती आसाममधील एका प्रसंगाने संपूर्ण देशाला आली.
देशसेवा बजावत असताना विंग कमांडर डी वत्स यांचा अपघाती मृत्यू झाला. त्यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले. या अंत्यसंस्कारावेळी त्यांची पत्नी पाच दिवसाच्या नवजात बाळासोबत हजर झाली. ‘खंबीर राहणं म्हणजे काय असतं’ याचीच प्रचिती डी वत्स यांच्या पत्नीकडे पाहणार्या प्रत्येकाला आली. बाळाला घेऊन लष्करी गणवेशात अंत्यसंस्कारासाठी पोहोचलेल्या या ‘वीरपत्नी’चा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
डी वत्स यांची पत्नी मेजर कुमूद डोगरा लष्कर अधिकारी आहेत. पाचच दिवसांपूर्वी त्यांच्या घरी बाळाचं आगमन झालं आहे. आसाममध्ये १५ फेब्रुवारीला मजुली आयर्लंडवर भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टरचा अपघात झाला होता. यात हेलिकॉप्टरमधील दोन्ही पायलट शहीद झाले. यामध्ये डी वत्स हेही होते. दु:खद बाब म्हणजे, डी वत्स आपल्या मुलीचा चेहराही पाहू शकले नाहीत.
या वीरपत्नीला देशवासीयांनी अनोख्या पद्धतीने ‘सलाम’ केला आहे. अनेकांनी सोशल मीडियवर ट्विट आणि पोस्ट शेअर करून डी वत्स यांच्या या चिमुकलीला आशीर्वादही दिले आहेत.
या वीरपत्नीच्या धैर्याला गुरुवर्यचा सलाम....!
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
*संकलन -*
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_