twitter
rss

*🤼‍♀महाराष्ट्र कबड्डी संघाची कर्णधार सोनाली हेळवीचे पंतप्रधानांकडून कौतुक*

Published On: Jan 28 2019 6:16PM | Last Updated: Jan 28 2019 7:19PM

दैनिक पुढारी,

वारणावती (सांगली) : आष्पाक आत्तार

भटक्या विमुक्त समाजातील मुला मुलींसाठी सुरू करण्यात आलेल्या आश्रमशाळेत शिक्षण घेवुन त्याच शाळेच्या मैदानावर आपल्या भविष्याचा पाया मजबूत करणार्‍या सोनाली हेळवी हिचा मन की बात या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नामोल्लेख करून तिच्या खेळाचं तोंडभरुन कौतुक केले.

खेलो इंडिया खेलो या युवा क्रीडा स्पर्धा नुकत्याच संपन्न झाल्या. या स्पर्धेत अठरा खेळांमध्ये सहा हजार खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. यातील एकविस वर्षाखालील महिला कबड्डी संघाची महाराष्ट्राची कर्णधार सोनाली हेळवी हिने नेत्रदीपक कामगिरी करत आपल्या संघाला फायनलपर्यंत धडक मारून दिली होती.

प्रजासत्ताक दिनादिवशी मन की बात या कार्यक्रमात खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोनालीच्या या खेळाचं कौतुक केलं. ते म्हणाले अत्यंत कमी वयात सोनालीने क्रीडा क्षेत्रात नेत्रदीपक कामगिरी केली. कबड्डीसारख्या खेळांमध्ये मुलींना जास्त प्रेरणा मिळत नाही मात्र सोनालीने कबड्डी हा खेळ निवडून उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले आहे. 

भटक्या  विमुक्त समाजात जन्मलेल्या सोनालीची घरची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. आईने मोलमजुरी करून तिचा सांभाळ केला आहे. शेरे (ता. कराड) येथील सद्गुरू आश्रमशाळेत 2008 साली चौथीच्या वर्गात तिने प्रवेश घेतला. अभ्यासात जेमतेम असणारी सोनाली खेळात करिअर करू शकते. तिच्यात प्रचंड इच्छाशक्ती अचूक निर्णयक्षमता, आक्रमकता  उत्कृष्ट गती  हे गुण आहेत हे तिच्या क्रीडा शिक्षकांनी हेरलं. मुख्याध्यापक मिलिंद बनसोडे, विष्णू खरात, संजय धुमाळ या शिक्षकांनी तिला विशेष मार्गदर्शन केले त्यांच्या मार्गदर्शनाचं तिने चीज करून दाखवले.

उत्कृष्ट खेळ करून शालेय स्पर्धा ती गाजवू लागली. आठवीत असताना औरंगाबाद येथे झालेल्या चौदा वर्षांखालील शालेय क्रीडा स्पर्धेमध्ये मुलींच्या कबड्डी संघाचं तिने महाराष्ट्राचे नेतृत्व केले. यातही तिने महाराष्ट्राला विजेतेपद मिळवून दिलं इथून पुढेच तिच्या प्रगतीची घोडदौड गतीने सुरू झाली. सध्या ती शाळेची माजी विद्यार्थिनी आहे .
एका मोलमजुरी करणार्‍या कुटुंबात जन्मलेल्या मुलीने आश्रमशाळेत शिक्षण घेऊन क्रीडा क्षेत्रात  लौकिक मिळवणं आणि खुद्द देशाच्या पंतप्रधानांनी तिच्या खेळाचं कौतुक करणं ही गोष्ट सर्वांनाच प्रेरणा देणारी आहे हे मात्र निश्चित .

http://pudhari.news/news/Sangli/Prime-Minister-Narendra-Modi-praises-Sonali-Helvi/m/

474

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨
📃  *आजची प्रेरणादायी पोस्ट*  📜

*भाग* - 4⃣7⃣4⃣

_*पद्मश्री पुरस्कार जाहिर झालेले, चहा विकणारे डी. प्रकाश राव!*_

*_by - LetsUp | Inspirational_*

▪ नुकतेच पद्म पुरस्कार जाहिर झाले, ज्यात 4 जणांना पद्म विभूषण, 14 जणांना पद्म भूषण आणि 94 जणांना पद्मश्री पुरस्कार जाहिर झाले आहेत. यामध्ये एक नाव फार वेगळं आहे आणि ते आहे डी. प्रकाश राव यांचं.

▪ ओडिशाच्या कटकमध्ये राहणारे डी. प्रकाश राव चहा विकतात आणि याच पैश्यातून त्यांनी शाळा उभी केली आहे. गेल्या 60 पेक्षा अधिक वर्षांपासून ते चहा विकतायत आणि यातून येणारी कमाई 70 पेक्षा अधिक गरीब मुलांच्या शिक्षणासाठी वापरतायत. आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीसुद्धा त्यांच्या 'मन कि बात'मध्ये डी. प्रकाश राव यांचा उल्लेख केलेला.

▪ आपल्या सगळ्यांसाठीच प्रेरणादायी ठरणारे डी. प्रकाश राव यांच्याकडून सगळ्यात मोठी शिकवण मिळते ती म्हणजे आपण काय काम करतोय हे महत्वाचं नसून त्यातून मिळणाऱ्या मोबदल्याचा आपण कसा उपयोग करतो यावर आपलं कर्तृत्व ठरतं! असे जगावेगळे काम करणाऱ्या डी. प्रकाश राव यांना सलाम!

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

*संकलन -* 
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨
📃  *आजची प्रेरणादायी पोस्ट*  📜

*भाग* - 4⃣7⃣3⃣

*🇮🇳'या' महिलांमुळे भारतीय सेनेचा इतिहास बदलला!*

Published On: Jan 26 2019 2:41PM

नवी दिल्ली: पुढारी ऑनलाईन

देशाच्या ७० व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त शनिवारी (दि.२६) राजधानी दिल्लीतील राजपथावर परेड संचलन पार पडले. यावेळी देशाचे शौर्य, सामर्थ्य, संस्कृती आणि विविधतेतील एकतेचे दर्शन घडविण्यात आले. याबरोबर आजच्या दिवशी नवा इतिहास रचला गेला. भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाचे नेतृत्व महिला अधिकाऱ्यांनी केले. त्यामुळे भारतीय सेनेचा इतिहास बदलला आहे.

भावना कस्तूरी

दिल्लीतील राजपथावर परेड संचलनामध्ये १४४ पुरूष सैन्य दलाचे नेतृत्व लेफ्टनंट भावना कस्तूरी यांनी केले आहे. भारताच्या इतिहासात सैन्य दलाचे नेतृत्व करणारी पहिलीच महिला अधिकारी भावना कस्तूरी बनली आहे. २६ वर्षाची भावना हैदराबाद येथील आहे. उस्मानिया विश्वविद्यालयमध्ये त्यांनी शिक्षण घेतले आहे.



खुशबू कंवर

पहिल्यांदाच संचनलमध्ये महिला अर्ध्यसैनिकांच्या तुकडीने सहभाग नोंदविला. ही तुकडी आसाम रायफलचा एक भाग आहे. या तुकडीचे नेतृत्त्व लेफ्टनंट खुशबू कंवर यांनी केले. आसाम रायफल्सच्या इतिहासात पहिल्यांदाच प्रजासत्तादिनाच्या संचलनमध्ये आसाम रायफल्स तुकडीचे नेतृत्व एका महिलेने केले आहे.

शिखा सुरभी

डेयरडेविल मोटरसायक तुकडीतील कॅप्टन शिखा सुरभीने सर्वांचीच मने जिंकली. राजपथावर बाईकवर उभा राहुन ध्वजाला सलामी देणारी शिखा सुरभी ही पहिली महिला ठरली. पहिल्यांदाच डेयरडेविल तुकडीने एका महिला अधिकाऱ्याला आपल्या तुकडीच सहभागी करून घेतले होते. २८ वर्षाच्या शिखाने पहिल्यांदाच बाईकवर उभा राहुन राजपथावर ध्वजाला सलामी दिली आहे.

अंबीका सुधाकरण

समुद्र सीमाभागाची कमांडन लेफ्टनंट अंबीका सुधाकरण यांनी राजपथावर नौदल संचलन पथकाचे नेतृत्व केले.

http://pudhari.news/news/National/With-many-firsts-India-displays-military-might-Nari-Shakti-on-70th-Republic-Day/m/

📚📕📗📘📙📔📒📚
*संकलन -* 
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_

यापूर्वीचे भाग वाचण्यासाठी आपल्या .....

http://guruvarykm.blogspot.in/     

या blog ला भेट द्या..

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨
📃  *आजची प्रेरणादायी पोस्ट*  📜

*भाग* - 4⃣7⃣2⃣

*🇮🇳 १८ हजार फूट उंचीवर फडकला तिरंगा!*

Published On: Jan 26 2019

*नवी दिल्‍ली : पुढारी ऑनलाईन*

देशभरात ७० वा प्रजासत्ताक दिवस उत्‍साहात साजरा करण्‍यात येत आहे. देशभरात उल्‍हासपूर्ण वातावरण आहे. देशाच्‍या सीमेवरील सुरक्षारक्षकांनी देखील प्रजासत्ताक दिन अनाख्‍या पद्धतीने साजरा केला आहे. लडाखमध्‍ये जोश आणि उत्‍साहापूर्ण वातावरणात भारतीय इंडो तिबेटियन बॉर्डर पोलिसांच्‍याकडून (आईटीबीपी) मायनस ३० डिग्री तापमान असताना देखील १८हजार फूट उंचीवर देशाचा तिरंगा फडकवून देशाच्‍या शिरपेचात मानाचा तुरा रोवण्‍याची कामगिरी केली आहे. त्‍यांच्‍या धाडसाला, शौर्याला सलाम.

या सैनिकांनी जम्‍मू काश्‍मीरमधील लडाखमध्‍ये तिरंगा फडकविला आहे. विशेष म्‍हणजे उणे ३० अंश सेल्सियस (-30 Degree) तापमान असतानाही १८ हजार फूट उंचीवर देशाचा तिरंगा फडकविला आहे. या सैनिकांच्‍या साहसीपणाचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. त्‍यांच्‍या धाडसाला सलाम.

इंग्रजाच्‍या जोखडातून भारत १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली भारताची राज्यघटना २६ जानेवारी १९५० रोजी अंमलात आली. भारतात लोकशाहीचे एक नवे पर्व सुरू झाले म्हणून हा दिवस ‘प्रजासत्ताक दिन’ म्हणून ओळखला जातो. २६ जानेवारी १९३० रोजी लाहोर येथे पार पडलेल्या अधिवेशनात पंडित जवाहरलाल नेहरू यांनी तिरंगा फडकवून संपूर्ण स्वराज्याची घोषणा केली. म्हणून राज्यघटनेच्या अंमलबजावणीसाठी २६ जानेवारी हा दिवस निश्चित करण्यात आला होता. भारतात पहिला प्रजासत्ताक दिन १९५० साली साजरा करण्यात आला होता.

📚📕📗📘📙📔📒📚
*संकलन -* 
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_

अन् सेमी इंग्रजीमुळे बंद मराठी शाळा पुन्हा बहरली....

🖋दीपक माळी ,९६६५६१६५७२.

१ जून २०१३ रोजी तब्बल दोन वर्षे पटाअभावी बंद असलेली जि.प.शाळा,माळीवस्ती(हरोली) ही शाळा आव्हान म्हणून स्विकारली. या शाळेच्या माध्यमातून शून्यातून विश्व निर्माण करण्याची संधी होती पण शाळेत मुले आलीच नाहीत तर आगीतून फुफाट्यात पडण्याचा धोकाही होता.
श्री.अजित वांडरे सर आणि मी दोघांनी मिळून आव्हान स्विकारले ,एक नवी सुरुवात करण्यास सज्ज झालो, शाळा सुरु होण्यापूर्वी १५ दिवस अगोदर सर्व पालकांची बैठक घेतली,दाखलपात्र पालकांच्या घरी जावून सर्वांनी विनंती केली ,' आम्ही चांगले शिकवतोय ' असे आयुष्यात पहिल्यांच कोणास तरी सांगावे लागले...
साखरेवस्तीवरील सर्व पालकांची आमच्या आवाहनास साथ दिली,
जवळच असलेल्या शिवगंगा पाईप फँक्टरीमधील कामगारांची मुले हायवे चालत परगावी जात होती त्या पालकांनाही आम्ही भेटलो ,त्यांचीही साथ मिळाली
तेव्हा कुठे जेमतेम १६- १७ विद्यार्थी मिळाले आणि आमची शाळा सुरु झाली .
e-learning, डिजिटल वर्ग ,अध्यापनात तंत्रज्ञानाचा वापर, विविध शैक्षणिक साहित्य ,क्षेत्रभेटी,सहली ,मातापालक मेळावा असे अनेक शालेय आणि सहशालेय उपक्रम राबविले,वर्गखोल्या नसताना व्हरांड्यात,किचनशेडमध्ये ,कधी झाडाखाली विद्यार्थ्यांना अध्यापन केले ....
या सर्वाचे फलित म्हणून दरम्यानच्या काळात शाळेचा पट १६ वरुन ३१ पर्यंत वाढत गेला..
क्रीडा स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी जिल्हा स्तरापर्यंत यश संपादन केले,विविध स्पर्धापरीक्षांमधूनही विद्यार्थी चमकले.. आमच्या शाळेच्या या यशात मोठा वाटा आहे तो सेमी इंग्रजी माध्यमाचा....

🆎 सेमी इंग्रजी माध्यमातून शिक्षण
आमची शाळा सुरु करताना घेण्यात आलेल्या पालकभेटीं मधून असे लक्षात आले की, या भागामधील पालकांचा ओढा इंग्रजी आणि सेमी इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्याकडे वाढलेला आहे , वस्तीवरील मुले शेजारच्या गावातील खासगी व्यवस्थापनाच्या सेमी इंग्रजीच्या शाळेत जात आहेत , त्या शाळेमध्ये मिळणारे शिक्षण कोणतीही फी न घेता आपल्या शाळेत मिळू शकते हे पालकांना पटवून दिले. पुढील वर्षापासून इयत्ता पहिलीसाठी सेमी इंग्रजी माध्यम सुरु करण्याचा निर्णय घेतला.आमचे गटशिक्षणाधिकारी मा.आर.जी.पाटील सर तसेच सर्व अधिकाऱ्यांनी आम्हांस सहकार्य केले, सांगली जिल्हा परिषदेने परवानगी दिल्यानंतर सन २०१४-१५ पासून पहिलीचा सेमी इंग्रजीचा वर्ग सुरु केला. नंतर टप्प्या टप्याने नैसर्गिक वाढीने पुढील वर्ग सुरु झाले ,अशाप्रकारे सन २०१७-१८ अखेर पहिली ते चौथीपर्यंतचे सेमी इंग्रजीचे वर्ग पूर्ण झाले.
आता शासननिर्णयानुसार सेमी इंग्रजी माध्यमासाठी इयत्ता पहिली ते पाचवी पर्यंत गणित हा एकच विषय इंग्रजीतून शिकवावा लागतो ,यापूर्वी आमच्या शाळेत English Wordsbank ,दररोज 5 इंग्रजी शब्द पाठ करणे या सारखे उपक्रम सुरु होतेच त्यामुळे विद्यार्थ्यांची इंग्रजीची भिती दूर झाली होती . तरीही आम्ही अध्यापनासाठी द्विभाषिक पद्धतीचा अवलंब केला. सेमी इंग्रजी माध्यमामुळे इंग्रजीतून गणित आलेच पाहिजे पण आपल्या ग्रामीण भागात व्यवहारासाठी मराठीतून अंकगणिताचे ज्ञान आवश्यक ठरतेचं. त्यामुळेचं आम्ही इंग्रजी सोबत मायबोलीतून शिकवण्याचा प्रयत्न केला ,तसेच ज्या शाळांनी सेमी इंग्रजी सुरु केले आणि काही कालावधीनंतर बंद पडले अशा शाळांमध्ये इंग्रजीची सक्ती करण्यात आली होती,असा अनुभव आहे. त्यामुळे bilingual Method ही पद्धत उपयोगी ठरु शकते.पहिली दुसरीतील मुले इंग्रजीतील शाब्दिक उदाहरणे वाचू शकणार नाहीत पण तिथे मराठीतून भाषांतर करुन सांगितल्यास ते अचूक उत्तर शोधू शकतात. मात्र चौथीच्या वर्गातील विद्यार्थी इंग्रजीतील शाब्दिक उदाहरणे स्वत: वाचून सोडवू शकतात.
सेमी इंग्रजी माध्यम आपल्या ग्रामिण भागात स्थानिक स्वराज्य संस्थाच्या शाळेतही यशस्वी होवू शकते पण त्यासाठी वेळ द्यावा आणि थोडी वाट पहावे लागते.
सेमी इंग्रजीमुळे विद्यार्थ्यांना गणिताची गोडी लागतेच त्यासोबत इंग्रजीचा आत्मविश्वासही वाढतो.पुढे पाचवी नंतर नवोदय विद्यालय आणि सैनिक शाळेत सेमी इंग्रजीत शिकावे लागते,याची तयारी जर पहिलीपासूनच झाली तर नंतर विद्यार्थ्यांवर दडपण येणार नाही. इंग्रजीमुळे ज्ञानाची कक्षा रुंदावते तसेच मातृभाषेमुळे आपल्या मातीशी नाळ कायम राहते. त्यामुळे मराठी ,इंग्रजी आणि गणित या तीनही विषयाची उत्तम प्रगती करावयाची असेल तर सेमी इंग्रजी हे उत्तम माध्यम आहे. याचे उदाहरण म्हणजे English speaking Training नंतर त्याच्या feedback घेण्यासाठी आंग्ल भाषा संस्था ,औरंगाबाद हून कमिटी आली होती,प्रत्येक तालुक्यातील एका शाळेत ही कमिटी अनुधावन घेणार होती आणि त्यामध्ये आमच्या शाळेची कवठेमहांकाळ तालुक्यातून निवड झाली होती. सेमी इंग्रजी माध्यमाच्यामुळे आमची मुले मोठ्या आत्मविश्वासाने त्या समितीला सामोरे गेली आणि त्या समितीने आमच्या ग्रामिण भागातील मुलांचे कौतुक केले.
आज मराठी शाळा पर्यायाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा पटाअभावी कमी होत असताना सेमी इंग्रजी माध्यम हा आपल्या शाळा वाचविण्यासाठी उत्तम उपाय आहे . इंग्रजी माध्यमांच्या शाळांशी स्पर्धा करावयाचे असेल तर आपणही सेमी इंग्रजीचा स्विकार करायला हवा ,आणि ती काळाची गरजही आहे, जर आपण या मार्गाचा वापर केला; योग्य मार्गदर्शन ,पालकांची साथ घेतली तर नक्कीच आपण यशस्वी होवू शकतो,आणि हेच आमच्या शाळेने सिद्ध केले आहे.
धन्यवाद....

🖋दीपक महादेव माळी ,सहा.शिक्षक,
जि.प.शाळा ,माळीवस्ती (हरोली)
ता.कवठेमहांकाळ,जि.सांगली.
📱९६६५५१६५७२


🌴 नारळाची मलई 🥥

पुण्यातील आझम कॉलेजचा कॅम्पस् , वेळ दुपारी दोनची....
आमच्या प्रशिक्षणातील मधला ब्रेक झाला . कमी वेळेत खायला जवळ काही मिळत नसल्याने आम्ही दुपारच्या ऊसाचा रस प्यायचो,
पण आज नेमके रसवंतीगृह बंद होते , त्यावेळी काही जन चहा घेण्यासाठी गेले, मी आणि श्रीकृष्ण माळी सरांनी नारळपाणी प्यायचे ठरवले, दोघांनी दोन नारळ घेतले तितक्यात तिथे MPSC online ची परीक्षा देवून एक मुलगा जवळ आला, त्यानेही एक नारळ घेतला आम्ही तिघेही नारळपाणी प्यायलो, या विक्रेत्याचे असे वैशिष्ट्य होते की तो नारळपाणी प्यायले की त्यातील खोबरे (इथे त्याला मलई म्हणतात) काढून देत असे . आम्ही त्याच्याकडे नारळ देणार तितक्यात त्या तरुणाचे लक्ष त्याच्या नारळाकडे गेले तर त्याच्या नारळात खोबरे नव्हते ,त्याने माझ्याकडे नारळाकडे पाहून म्हणाला ,'' सर,तुमच्या नारळात लई मलई आहे .'' नारळविक्रेत्याने त्याला त्याचे खोबरे काढता येत नाही असे सांगितले आणि आमच्या दोन नारळातील खोबरे काढून दिले ,त्यावेळी श्रीकृष्ण माळी सरांनी एक नारळ त्या तरुणास दिला आणि उरलेला आम्ही खाल्ला..
त्या तरुणाने त्याची *मलई* संपल्यानंतर प्रसन्न चेहऱ्याने आम्हांस खुणावून तो निघून गेला.

....... नंतर श्रीकृष्ण माळी सरांनी मला असे सांगितले की नारळाचे तीन प्रकार असतात, पहिला पाण्याचा ,दुसरा खोबरे असलेला आणि तिसरा खोबरे व पाणी दोन्ही असलेला... _पण ढिगातील नारळापैकी कोणता नारळ कोणत्या प्रकारचा आहे हे फक्त त्या विक्रेत्यालाचं माहित असते...._

_असचं काही तरी आपल्या जीवनाच्या बाबतीत असते ना, कधी कोठे जन्म घ्यायचा कोणाच्याच हातात नसते . पण आपल्याला मिळालेल्या मलईचा थोडा भाग ज्याला काहिच मिळालेला नाही त्यांला दिला तर.जग नक्कीच थोड फार बदलेल . ...._

🖋 श्री.दीपक माळी .
May 27, 2018 ·

गुरुजी घडविणारे मंदिर- गोसलिया अध्यापक विद्यालय,मिरज .

🖋श्री.दीपक माळी  📱९६६५५१६५७२.

  महाराष्ट्रात असंख्य शाळा आहेत,जिथे आदर्श विद्यार्थी घडविले जातात पण असेही एक विद्यालय आहे जिथे सर्वगुणसंपन्न गुरुजी घडविले जातात ते म्हणजे मिरज येथिल शेठ र.वि.गोसलिया अध्यापक विद्यालय .

  मिरजेहून सांगलीला जाताना कृपामयी हॉस्पिटल समोरील विद्यालय दिसायचे त्याचवेळी ठरविले होते की याच अध्यापक विद्यालयातून शिक्षक बनायचं , १२ वीचा निकाल लागला, मार्क्स् ही चांगले मिळाले पण आमच्या सुदैवाने-दुर्दैवाने आमच्यावेळी प्रवेशप्रक्रिया न्यायप्रविष्ठ झाली,न्यायालयाने राज्यस्तरीय प्रक्रिया करावयास सांगितले .औरंगाबाद शहरामधून संपूर्ण महाराष्ट्राची प्रवेश प्रक्रिया पार पडली. मला पहिल्या राउंडमध्ये प्रवेश मिळाला अर्थातच मी माझ्या स्वप्नातल्या विद्यालयाची निवड केली , डिसेंबर २००० मध्ये माझा प्रवेश निश्चित झाला ,फेब्रुवारीच्या १ तारखेपासून आमचे कॉलेज सुरु झाले तेव्हा आम्ही फक्त ९ जण सांगली जिल्ह्यातील प्रशिक्षणार्थी होतो.. त्यानंतर एक - एक करीत आमचे दुसऱ्या जिल्ह्यातील मित्र हजर होवू लागले. आमची ४० ची बॅच पूर्ण व्हायला मे २००१ उजाडला .
    या विलंबाने झालेल्या प्रवेश प्रक्रियेमुळे आमचा फायदा असा झाला की, जो कोर्स दोन वर्षात पूर्ण व्हायचा तो पूर्ण करावयास आम्हांला तीन वर्षे लागली, या विद्यालयाचा सर्वाधिक सहवास लागला , विद्यालयाचे सर्वात जास्त प्राध्यापकांच्या सहवासाचे भाग्य लाभले . प्राचार्य फडणीस सर, आपटे सर,वाडीकर सर,खोत सर,पांढरे सर,मोटकट्टे सर,वांगीकर मॅडम् ,कोटीभास्कर मॅडम् , मनिषा कोरे मॅडम् , चौगुले मॅडम् ,दोन महिन्यांसाठी आलेले मिरजकर सर आणि सेकंड इयरच्या शेवटी लाभलेले चित्रकलेचे प्राध्यापक या सर्व तज्ञ गुरुजनांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही घडलो गेलो.(सध्याचे प्राचार्य शिंगे सर त्यावेळी डाएटला प्रतीनियुक्तीवर असल्याने त्यांचा सहवास चुकला.)
   आणखी एक फायदा झाला तो म्हणजे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले मित्र मिळाले. आमच्या बॅचचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे आमच्या बॅच पासून अध्यापक विद्यालयात पुन्हा मुलींना प्रवेश सुरु झाला. आम्ही ३२ मुले आणि ८ मुलींची ही बॅच म्हणजे आठवणींचा खजिनाचं आहे.

    अध्यापक विद्यालयातील प्रत्येक दिवस सुरु व्हायचा परिपाठाने त्या अगोदर आमचे पांढऱ्या शुभ्र गणवेशातील प्रशिक्षणार्थी बांधव मा.पांढरे मार्गदर्शनाखाली झाडू घेवून परिसर १५ मिनिटात स्वच्छ करायचे , त्यानंतर प्राचार्य फडणीस सरांच्या संगीतसाथीने आमच्या परिपाठाची सुरुवात व्हायची.
     फडणीस सरांना या कामांत सर्वप्रथम विश्रांती दिली ती आमच्या जयकुमार पवार या मित्राने .जयकुमार पवार,सचिन माळी , वाल्मिकी फाळके यांची संगीत क्षेत्रात घौडदौड सुरु झाली. मी मात्र खोत सरांचा सल्ला ( ' गाढवाच्या मागे आणि साहेबाच्या पुढे कधी उभे राहू नये.' ) शिरसावंद्य मानून प्राचार्यांपासून चार हात दूरचं राहिलो आणि अजूनही हा सल्ला पाळायचा प्रयत्न करतोय.
   आमचे आपटे सर मला फार आवडायचे , सरांनी पहिल्या दिवशी वर्गातील सर्वांची नावे विचारली की ती कायमची त्यांच्या लक्षात रहायची ,एकाचेही नाव चुकायचे नाही. चार वर्षापूर्वी आमचे गेटटुगेदर झाले त्यावेळी सरांना आम्ही भेटलो तरी सरांनी सर्वांना नावासहित ओळखले. साधारण शरीरयष्टीचे आपटे सर क्रीडाशिक्षक असतील हे कोणाला पटणारही नाही पण  B.PEd & M.PEd च्या प्राध्यापकांना ज्यावेळी समस्या यायच्या त्यावेळी आपटे सरांचा ते धावा करायचे. माझ्या कित्येक मित्रांचे फलकलेखन आपटे सरांनी सुबकतेने घडविले. सचिन जरी महान असला तरीही राहुल द्रविड किती ग्रेट होता हे आपटे सरांच्यामुळेचं समजले . आजही शिक्षणक्षेत्रात चमकणाऱ्या सचिन पाठीमागे कितीतरी द्रविड झाकोळले जातात... पण माझी नजर त्या द्रविडला शोधत असते. ही सवय लागली ते आपटे सरांचे व्यक्तिमत्व पाहूनचं...

या विद्यालयातील सर्वकालिन विद्यार्थ्यांपैकी सर्वात नशिबवान म्हणजे खोत सर .. खोत सरांनी आपले डी.एड्.येथेच पूर्ण केले ,पुढे प्रयोगशाळा परिचर म्हणून काम करीत असताना उच्चशिक्षण पूर्ण करुन ते याच अध्यापक विद्यालयात प्राध्यापक बनले , शेवटी या विद्यालयातील प्राचार्य या सर्वोच्च पदावर विराजमान होवून सेवानिवृत्त झाले. आजही सर YCMOU च्या माध्यमातून मार्गदर्शन करतात. या वयातही Whats App , Facebook या सारख्या माध्यमातून सोशल मीडीयावर active असणारे खोत सर आपल्या चुकणाऱ्या विद्यार्थ्यांना तिथेही कानपिचक्या देवून ठिकाणावर आणतात.
   प्रथम वर्षाचे वर्गशिक्षक आणि कार्यनुभवाचे तज्ञ पांढरे सर शिस्तप्रिय असायचे , योग्य जागेवर योग्य ठिकाणी उपाय करावा तो पांढरे सरांनीच...'फुटात बारा इंचाचा फरक ' कसा असतो ते नेमके पांढरे सरांनी शिकविले.
     ' नदीचे मूळ आणि ऋषीचे कूळ कधी शोधू नये ' असे सांगत महाराष्ट्रातील विविध भागातून आलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या बोलीभाषेकडून प्रमाणभाषेकडे अचूक नेणाऱ्या आपल्या कोटीभास्कर मॅडम मराठी सोबत हिंदीही सांभाळायच्या .....कोणत्याही कार्यक्रमाचे अचूक नियोजन कसे करायचे ,तो कार्यक्रम कसा पार पाडायचा याचे धडे कोटीभास्कर मॅडम् यांनी दिले.
     _मी असे म्हणेन की_ या अध्यापक विद्यालयात सर्व विद्यार्थ्यांना एक हक्काची आई मिळायची जी सर्वांना आईच्या मायेने समजून घ्यायची प्रसंगी कठोर व्हायची त्या म्हणजे ' पाच पैशाच्या गारेगार पासून पाचशे रुपयाच्या आईस्क्रिमचा आस्वाद घेतलेल्या ' आमच्या वांगीकर मॅडम् ... आम्हाला एका तासात भारताची नव्हे _तर मी असे म्हणेन की_ संपूर्ण जगाची सैर करुन आणायच्या. डी.एड्.चे क्लिष्ट इंग्रजी इंग्रजीतून शिकणारी पहिली बॅचही आमचीच.. वांगीकर मॅडम् यांनी आमचे हे दिव्यही सहज पार केले.

आम्ही प्रशिक्षणार्थी म्हणून घडत असताना काही प्राध्यापकही घडत गेले. नवीन आलेल्या सुरुवातीला विद्यार्थ्यांनी शंका विचारल्यावर चिढणाऱ्या चौगुले मॅडम् नंतर सेवांतर्गत वर्गातही मार्गदर्शन करणाऱ्या अनुभवी पाटील मॅडम् बनल्या.
   संस्थेच्या माध्यमिक शाळेतून बदलून आलेले मोटकट्टे सरांनी (यांना फर्स्ट इयरची मुले आबा म्हणायची ) हिंदी आणि इतिहास विषयाचा विढा उचलला. सोबत आम्हांला महाबळेश्वर दर्शन घडवून सहल विभागही पार पाडला. पाठ निरीक्षण करताना A+ आणि A- आतील फरक मात्र आम्हीच सरांना सांगितला...

आमच्या बॅचपासून स्पर्धांचे स्वरुपही बदलले, विद्यालयातंर्गत स्पर्धाऐवजी आमचे प्राचार्य फडणीस सरांच्या नियोजनाखाली सांगली जिल्ह्यातील सर्व अध्यापक विद्यालयांच्या आंतर अध्यापक विद्यालयीन स्पर्धा सुरु झाल्या. वैयक्तिक क्रीडा स्पर्धांचे आयोजन आमच्या विद्यालयाकडे होते. पहिल्या वर्षी सांघिक स्पर्धा आष्ट्याला झाल्या तर दुसऱ्या वर्षी तासगांवला झाल्या.दोन्हीही वर्षी आमच्या तळणे सरांच्या नेतृत्वाखालील कबड्डी संघाने सुयश मिळवले. गोडभरले, वाडिले यांनी वैयक्तिक स्पर्धा गाजवल्या...
KWC वर बौद्धिक स्पर्धा व्हायच्या. गायन स्पर्धेत पहिला क्रमांक काढून आमचा सचिन माळी दोन्ही वर्षाचा लेटकमरचा शिक्का अलगद पसून टाकायचा. मला कथाकथन सादर करायची संधीही या स्पर्धेमुळेच मिळाली.

   या दोन अडीच वर्षाच्या कालावधीत अनेक जिवाभावाचे मित्र भेटले , सेकंड इयरमध्ये आमचे 'रक्षाबंधन ' करणाऱ्या भगिनीही लाभल्या. यापैकी श्याम गोडभरले आज गटविकास अधिकारी झाले आहेत तर दत्तात्रय वाघ पोलिस उपनिरीक्षक पदावर आहेत. उरलेले बांधव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्या शिक्षण सेवा बजावत आहेत.

दरम्यानच्या काळात शिक्षण क्षेत्रातील चुकीच्या निर्णयामुळे महाराष्ट्रातील अध्यापक विद्यालयांना उतरती कळा लागली .२००७ -०८ दरम्यान निर्माण झालेली मृगजळे लयास गेली पण आमचे ही मंदिर आजही भक्कम उभे आहे..
    येणाऱ्या काळात 'पवित्र ' शिक्षक भरती लवकर होवून पुन्हा एकदा या क्षेत्राकडे युवकांचा ओढा वाढून अध्यापक विद्यालयास पुर्वीचे सुवर्णयुग येवो ही अपेक्षा करतो. विद्यालयाच्या माजी विद्यार्थी मेळाव्यास माझ्या खूप खूप शुभेच्छा...!

अंबाबाई तालीम संस्थेच्या ज्ञानरुपी मंदिरास माझे त्रिवार वंदन....!

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

🖋श्री.दीपक महादेव माळी.
📱९६६५५१६५७२.
मु.पो.खरशिंग.ता.कवठेमहांकाळ.
जि.सांगली.