🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨
📃 *आजची प्रेरणादायी पोस्ट* 📜
*भाग* - 4⃣7⃣0⃣
*🧑🏻थेट चौथीत प्रवेश घेतलेला विद्यार्थी बाल साहित्य संमेलनात चमकला*
Published On: Jan 05 2019
साभार - दैनिक पुढारी,
सांगली : प्रतिनिधी
जिल्हा परिषदेच्या दूधगाव प्राथमिक शाळेत थेट चौथीत प्रवेश घेतलेला ओंकार सिद्ध हा विद्यार्थी लिहायला, वाचायला शिकला. त्याने केलेल्या कवितांमधून त्याची संवेदनशीलता आणि प्रतिभा कर्नाळ येथील बाल साहित्य संमेलनातून समोर आली. संवेदनशील गुरूमुळे हा विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात आला आहे. बुद्धीमत्तेच्या जोरावर त्याने गुणवत्ता सिद्ध केली आहे. हा विद्यार्थी सध्या बाबासाहेब कुचनुरे विद्यालयात दहावीत शिकत आहे. ओंकार सिद्ध हा पहिली, दुसरी, तिसरीत शाळेला आलाच नाही. जन्मापासून घरच्यांच्या धार्मिक श्रद्धेमुळे ओंकारचे केस कापले नाहीत.तो मेंढरामागे जात होता.
शाळेच्या जवळून मेंढ्या घेऊन जात असताना शिक्षक रघुनाथ हेगणावर यांचे लक्ष त्याच्याकडे गेले. हेगणावर यांनी शिक्षक जगदीश नलवडे यांच्या मदतीने ओंकारला चौथीच्या वर्गात दाखल करून घेतले. ओंकार त्याच्या लांब केसासह शाळेत दाखल झाला. तो शाळेत नियमित येऊ लागला.वाचू, लिहू लागला. कविताही करू लागला. शिक्षक हेगणावर यांचे हस्ताक्षर सुरेख आहे. ओंकारचेही हस्ताक्षर गुरूसारखेच सुरेख आहे. ओंकार आज दहावीच्या वर्गात पहिल्या तीन मुलांमध्ये आहे.
शाळाबाह्य मुलगा ते शाळेतील पहिल्या तीन मुलात येण्यापर्यंतचा ओंकरचा प्रवास थक्क करायला लावणारा आहे. हा प्रवास एक शिक्षक किती मोठे काम करू शकतो याची प्रचिती देणारा आहे. शाळाबाह्य मुले शिक्षण प्रवाहात आणण्यासाठी अनेक योजना आहेत. काही शिक्षणतज्ञ आकड्यांची मांडणी करून चर्चेत राहतात. पण शाळाबाह्य मुलांना शिक्षण प्रवाहात आणून त्यांना घडवणारे हेगणावर मात्र अपवादानेच असतात. कर्नाळ येथील बाल साहित्य संमेलनात ओंकारच्या कवितेला दाद मिळाली. त्याचा जीवनप्रवासच दाद घेऊन जाणारा आहे.
📚📕📗📘📙📔📒📚
*संकलन -*
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_