twitter
rss

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨
📃  *आजची प्रेरणादायी पोस्ट*  📜

*भाग* - 5⃣1⃣4⃣

*🇮🇳 जवानांना सलाम! लडाखमध्ये १७ हजार फुट उंचीवर फडकला तिरंगा*

Last Updated: Jan 26 2020 9:56AM

लडाख : पुढारी ऑनलाईन

संपूर्ण देशभरात प्रजासत्ताक दिनाचा उत्साह ओसंडून वाहत असताना, शौर्य, त्याग आणि साहसाचं प्रतिक असलेलं भारतीय सैन्य त्यापासून वेगळे कसे राहिल... लालकिल्यावर राष्ट्रपती तिरंग्याला मानवंदना देत असतानाच,  तिकडे हिमालयात रक्त गोठवणाऱ्या उणे २० अंश सेल्सिअस तापमानात इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलिसांनी मानाचा तिरंगा ध्वज फडकावला आहे.

देशभरात आज प्रजासत्ताक दिनाचा उत्साह आहे. मोठ्या उत्साहात ७१ वा प्रजासत्ताक दिवस साजरा केला जात आहे. प्रजासत्ताक दिनाचे अनेक फोटो, व्हिडीओ तुमच्या मोबाइलवर यायला सुरुवात झाली असेल, पण आता एएनआय या वृत्तसंस्थेने काही छायाचित्रे आपल्या ट्विटर हँडलवर प्रसिद्ध केली आहेत, जी पाहिल्यानंतर तुमच्या अंगावर अक्षरक्ष: काटा उभा राहिल. तुमची छाती अभिमानाने फुलेल आणि तुम्हाला भारतीय असल्याचा अभिमानही वाटेल.

हिमालयात १७ हजार फूट उंचीवर सर्व बाजूंनी बर्फाने वेढले असताना, उणे २० तापमानातही भारतीय जवानांनी आपले देशप्रेम दाखवून दिले आहे. इंडो-तिबेटिनयन सीमारेषा (आयटीबीपी) जवानांनी आज, रविवारी २६ जानेवारीला हाडे गोठवणा-या थंडीतही प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा केला. यावेळी जवानांनी तिरंगा फडकावला.

आयटीबीपीच्या शूर जवानांनी हातात तिरंगा घेतलेली काही छायाचित्र ट्विटरवर व्हायरल होत आहेत. फक्त ही छायाचित्रे पाहिल्यानंतर अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. इतक्या थंडीतही आपले जवान कसे काय सीमेची रक्षा करत असतील असे एक ना अनेक प्रश्न तुम्हाला पडल्याशिवाय राहणार नाहीत. छायाचित्रांमध्ये चारही बाजूला फक्त आणि फक्त बर्फ दिसत आहे. भारतीय जवान शिस्तबद्धपणे एका हातात बंदूक आणि तिरंगा घेऊन शांतपणे पुढे चालत जात आहेत.

https://www.pudhari.news/news/National/Ladakh-Indo-Tibetan-Border-Police-ITBP-soldiers-celebrating-RepublicDay-at-17000-feet-at-minus-20-degrees-Celsius-temperature/m/

📚📕📗📘📙📔📒📚
*संकलन -*  
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨
📃  *आजची प्रेरणादायी पोस्ट*  📜

*भाग* - 5⃣1⃣3⃣

*📜 सर्वधर्मीय ५५०० मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या मोहम्मद शरीफांना 'पद्मश्री'*

Last Updated: Jan 26 2020 6:18PM

दिल्ली : पुढारी ऑनलाईन

जाती-पाती आणि धर्मांची तमा न बाळगता सर्व भेदभाव बाजूला सारुन जवळपास ५५०० हून अधिक बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या अयोध्येतील मोहम्मद शरीफ यांची पद्मश्री पुरस्क़ारासाठी निवड करण्यात आली. गौरवपूर्ण कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना पद्म पुरस्क़ार देऊन भारत सरकार अशा व्यक्तीचा गौरव करीत असते. शनिवारी पद्म पुरस्क़ार प्राप्त व्यक्तींची यादी सरकार मार्फत जाहीर करण्यात आली. मोहम्मद शरीफ यांचा पद्मश्री पुरस्काराने सन्मान करुन त्यांच्या जाती - धर्माच्या भिंती उद्ध्वस्त करणाऱ्या कामगिरीची दखल सरकारकडून घेण्यात आली असेच म्हणावे लागेल.

सध्या देशामध्ये धार्मिक आणि जातीय तेढ निर्माण झाल्याची अनेक उदाहरणे आपणास पाहायला मिळाली असतील. वेगवेगळ्या कारणांमुळे अशा समस्या अनेकवेळा आपल्याकडे उफाळून येतात. पण मोहम्मद शरीफांसारखे अवलिये याच देशामध्ये आढळतात. ज्यामुळे अशा विघातक गोष्टींना आळा घालण्याची प्रेरणा आपणास या व्यक्तींकडून मिळत असते.

माणूस आपणास अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रत्येक व्यक्तीचा शेवट हा त्याच्या नातेवाईकांकडून सन्मानाने केला जातो. परंतु, बेवारस व्यक्तीचा शेवट सन्मानाचे होईल असे सागता येत नाही. म्हणून मोहम्मद शरीफ यांनी मरणानंतरही त्या माणसाचा सन्मान महत्त्वाचा ही एक भावना मनात ठेऊन बेवारस ५५०० लोकांचे अत्यंसंस्कार केले. ही गोष्ट करताना त्यांनी जात- पात- धर्म कधीही मध्ये येऊ दिला नाही.
याबाबत मोहम्मद शरीफ म्हणतात, ‘एका घटनेत माझ्या मुलाची २७ वर्षांपूर्वी हत्या करण्यात आली. याची माहिती मला एका महिन्यांनंतर कळाली. या घटनेनंतर मी बेवारस मृतदेहांचे अत्यंसंस्कार करु लागलो. आजपर्यंत मी ३००० हिंदू आणि २५०० मुस्लीम धर्मीयांच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले आहेत.

https://www.pudhari.news/news/National/Mohammed-Sharif-performed-funeral-rites-on-5500-unidentified-bodies-of-all-religions/m/

📚📕📗📘📙📔📒📚
*संकलन -*  
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨
📃  *आजची प्रेरणादायी पोस्ट*  📜

*भाग* - 5⃣1⃣2⃣

*🏅शौर्य पुरस्कारावर 'मराठी' मोहोर, दोन बालकांचा होणार सन्मान*

Last Updated: Jan 21 2020 5:02PM

मुंबई : पुढारी ऑनलाईन

दिल्ली येथे २६ जानेवारीला प्रदान करण्यात येणा-या शौर्य पुरस्कारावर महाराष्ट्राच्या दोन बालकांनी मोहोर उमटवली आहे. औरंगाबादच्या आकाश खिल्लारे व मुंबई येथील झेन सदावर्ते या दोघांची शौर्य पुरस्कारासाठी निवड झाली असून देशातील २२ मुलांना वीरता पुकस्कार जाहीर झाला आहे. यात १० मुली व १२ मुलांचा समावेश आहे.

आकाश खिल्लारे याने पाच वर्षीय मुलीचा व तिच्या आईचा जीव वाचवला होता. त्याला रस्त्यावरुन जाताना बुडणाऱ्या मायलेकी दिसल्या. स्वत:च्या जिवाची पर्वा न करता आकाशने या दोघींना वाचवले होते. कपडे धुण्यासाठी आई व मुलगी नदीवरती गेल्या होत्या. यावेळी मुलीचा पाय घसरुन पाण्यात पडली. मुलीला वाचवण्यासाठी आईनेही पाण्यात उडी मारली. या दोघीही पाण्यात बुडत होत्या. यावेळी आकाशने जीवाची पर्वा न करता पाण्यात उडी मारली व आई, व मुलीचा जीव वाचवला. या  धाडसामुळे आकाशला वीरता पुरस्कार जाहीर झाला आहे.

मुंबई येथील झेन सदावर्ते हीलाही वीरता पुरस्कार जाहीर झाला आहे. झेन सदावर्तेने १३ जणांचे प्राण वाचवले आहेत. मुंबईतील क्रिस्टल टॉवर या इमारतीला आग लागली होती . यावेळी तिने व्यक्तींच्या तोंडावर ओले कापड ठेवल्यास श्वास घेण्यास त्रास होत नाही. याच धड्यातील माहितीचा वापर करुन झेन सदावर्तेने १३ जणांचे प्राण वाचवले. दरवर्षी २६ जानेवारी ला वीरता पुरस्कार दिले जातात.

https://www.pudhari.news/news/National/national-bravery-award-to-two-children-from-maharashtra/m/

📚📕📗📘📙📔📒📚
*संकलन -*  
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ ,सांगली_

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨
📃  *आजची प्रेरणादायी पोस्ट*  📜

*भाग* - 5⃣1⃣1⃣

*अभिमानास्पद! मराठमोळे हरीश साळवे आता ब्रिटनच्या महाराणीचे वकील*

Last Updated: Jan 17 2020 10:26AM

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

आंतरराष्ट्रीय कोर्टात भारताची बाजू प्रभावीपणे मांडणारे वरिष्ठ वकील हरीश साळवे यांची ब्रिटनच्या महाराणीचे वकील (क्वीन कांऊसिल) म्हणून नियुक्ती झाली आहे. ब्रिटनच्या न्यायमंत्रालयाने १३ जानेवारी रोजी प्रसिद्ध केलेल्या नियुक्त्या संदर्भातील यादीत साळवे यांच्या नावाचा समावेश आहे. कौतुकाची बाब म्हणजे हरीश साळवे हे मराठमोळे आहेत. त्यांच्या नियुक्तीची अधिकृत घोषणा १६ मार्च रोजी होईल. हरीश साळवे ब्रिटनच्या महाराणीसाठी कोर्टस ऑफ इंग्लंड आणि वेल्ससाठी वकील म्हणून काम पाहतील.

कायदा क्षेत्रातील तज्ज्ञ आणि कौशल्य असणाऱ्या व्यक्तींना क्वीन कांऊसिल म्हणून बहुमान दिला जातो. हरीश साळवे यांनी कुलभूषण जाधव यांची आंतरराष्ट्रीय कोर्टात बाजू मांडली होती. साळवे यांचे आंतरराष्ट्रीय कायदा क्षेत्रात मोठे योगदान राहिले आहे. त्यामुळे त्यांना क्वीन कांऊसिल हा बहुमान मिळाला आहे.

हरिश साळवे यांचा जन्म धुळे जिल्ह्यातल्या वरुड या गावात झाला. त्यांनी नागपूर विद्यापीठातून एलएलबीचे शिक्षण घेतले आहे. त्यांची १९९२ मध्ये दिल्ली हायकोर्टात वरिष्ठ वकील म्हणून नियुक्ती झाली होती. त्यांनी १९९९-२००० दरम्यान भारताचे सॉलिसिटर जनरल म्हणून काम पाहिले आहे. त्यांनी अनेक महत्वाच्या प्रकरणात आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची बाजू मांडली आहे.

https://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Harish-Salve-appointed-as-Queen-s-Counsel-for-the-courts-of-England-and-Wales-/m/

📚📕📗📘📙📔📒📚
*संकलन -*  
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨
📃  *आजची प्रेरणादायी पोस्ट*  📜

*भाग* - 5⃣1⃣0⃣

*📖आता सलूनच्या दुकानातही वाचा पुस्तके, ध्येयवेड्या तरूणाचा उपक्रम*

साभार- धर्मवीर पाटील,सकाळ वृत्तसेवा.

इस्लामपूर (जिल्हा सांगली) : सोशल मीडियाचे अनेक दुष्परिणाम चर्चिले जात असले तरी त्याचा सकारात्मक प्रभाव नाकारता येणार नाही. तामिळनाडू राज्यातील सलूनच्या दुकानातील पुस्तकांचा एक उपक्रम व्हाट्सअप्पवर व्हायरल झाला आणि त्या उपक्रमाच्या प्रभावातून तोच उपक्रम इस्लामपुरात देखील सुरू झाला आहे. त्यासाठी विक्रम झेंडे या युवकाने उत्स्फूर्तपणे पुढाकार घेतला आहे. सलूनच्या दुकानात आलेले ग्राहक वेटिंग रूममध्ये पुस्तके वाचत बसल्याचे अत्यंत वेगळे चित्र आता अनुभवायला मिळणार आहे.

'वाचाल तर वाचाल' या मार्गावर वाटचाल करण्यासाठी आपल्या ग्राहकांना ग्रंथाचा सहवास मिळावा यासाठी उपलब्ध जागेत आपल्या कल्पकतेने सलूनचा व्यवसाय सांभाळत विक्रम झेंडे यांनी आपल्या ग्राहकांसाठी पुस्तके उपलब्ध करून दिली आहेत. त्याच्या या विधायक उपक्रमाची परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे.

इस्लामपूर शहरातील आष्टा नाका परिसरात ओम जेन्टस् पार्लर नावाने विक्रम झेंडे यांचे सलूनचे दुकान आहे. केशकर्तन करण्याचा व्यवसाय असला तरी विक्रम उच्चविद्याविभूषित आहे. त्याने हिंदी विषयातून एमएबीएडची पदवी प्राप्त केली आहे. काही काळ शिक्षक म्हणूनही काम केले; परंतू संभाव्य संधी आणि वास्तव परिस्थिती याचा अंदाज घेऊन त्याने आपला पारंपारिक व्यवसाय निवडला. हा व्यवसाय करत असताना सुरवातीपासूनच ग्राहकांना अत्याधुनिक सुविधा आणि काहीतरी वेगळे देण्याची भूमिका घेतली. त्याच्यातील शिक्षक स्वस्थ बसू देत नव्हता. काही मित्रांच्या सल्यानुसार या जागेत नविन काही करावे असा संकल्प होता. यावेळी त्यांच्या डोक्यात तामिळनाडूतील तुतीकोरीन शहरातील केशकर्तनालयातील उपक्रमाची माहिती त्याला व्हाट्सअप्पवरून मिळाली. या विषयावर काही जाणकार लोकांशी चर्चा करून नव्या वर्षाच्या सुरुवातीला हा उपक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला. वाचकांची भुक भागवण्यासाठी खारीचा वाटा उचलण्यासाठी विक्रमने स्वखर्चातून विविध प्रकारची पुस्तके संकलीत केली. आपण हा उपक्रम राबविणार असल्याचे त्याने इतरांशी चर्चा केल्याने स्वतःहून काही मित्रांनी त्याला स्वतःजवळची पुस्तकेही देऊ केली. सलून मध्येच आतील बाजूस छोट्याशा जागेत वेटिंगरूम तयार करून त्यात या पुस्तकांसाठी कपाट थाटले. यात विविध विषयांवरील सुमारे १५ हजार रूपये खर्चाची पुस्तके उपलब्ध केली आहेत. कथा, कादंबरी, विनोदी, स्पर्धा परिक्षांच्या पुस्तकांचा त्यात समावेश आहे. त्याला सचिन खंडागळे, संतोष चौधरी, विजय भोसले, रामचंद्र बंडगर यांचे विशेष सहकार्य आहे. विक्रमने दुकानात यापूर्वी असलेला टीव्ही आता पूर्ण बंद केला आहे. केस, दाढी करण्यासाठी आलेले ग्राहक आता आपला नंबर येईपर्यंत पुस्तके चाळणार आहेत. यातून काही प्रमाणात का होईना लोकांना वाचनाची आवड निर्माण होईल, असा विश्वास विक्रमने बाळगला आहे.

*ग्राहकांना ज्ञानदान केल्याचे समाधान*

"सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या तामिळनाडूच्या पोन मारिअप्पन यांचा आदर्श घेऊन हा उपक्रम सुरू केला आहे. ग्राहकांना ज्ञानदान केल्याचे समाधान मिळेल शिवाय इथे येणाऱ्या ग्राहकांना काही प्रमाणात वाचनाची गोडी निर्माण होण्यास मदत होईल."

-विक्रम झेंडे, सलून व्यावसायीक.

https://www.esakal.com/paschim-maharashtra/books-salon-shops-sangali-249144

📚📕📗📘📙📔📒📚
*संकलन -*  
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨
📃  *आजची प्रेरणादायी पोस्ट*  📜

*भाग* - 5⃣0⃣9⃣

*🏇🏻सांगलीच्या तलवारबाज मर्दानीची ऑलिंपिकसाठी घोडदौड...*

साभार- सकाळ वृत्तसेवा

_सांगलीची तलवारबाज राधिका आवटी आर्थिक परिस्थितीचा मुकाबला करत भारतातील ‘टॉप’ ची खेळाडू बनली आहे. सांगलीच्या या तलवारबाज मर्दानीची २०२२ मधील एशियन्स गेम्स आणि २०२४ ची ऑलिंपिक स्पर्धा जिंकण्यासाठी घोडदौड सुरू आहे._

सांगली - केवळ तलवारबाजीसाठी आई-वडिलांनी नववीतल्या राधिकाला शेकडो किलोमीटर दूर अनोळखी केरळ प्रांतात पाठवले. तिनेही जिद्दीने तलवारबाजी शिकताना अनेक अडचणींची खिंड लढवत आर्थिक परिस्थितीचा मुकाबला सुरू ठेवला. आज ती भारतातील ‘टॉप’ ची खेळाडू बनली आहे. सांगलीच्या या तलवारबाज मर्दानीची २०२२ मधील एशियन्स गेम्स आणि २०२४ ची ऑलिंपिक स्पर्धा जिंकण्यासाठी घोडदौड सुरू आहे. मात्र तिच्या पाठीशी आर्थिक पाठबळाची कोणतीच संरक्षक ढाल नाही.

असा झाला राधिकाचा प्रवास

राधिका प्रकाश आवटी तिचे नाव

.. आवटी कुटुंब मूळचे अकिवाट (ता. शिरोळ) येथील आहे. शेती हेच त्यांचे पारंपरिक उदरनिर्वाहाचे साधन आहे. राधिका आणि मोठा भाऊ अभिषेकच्या शिक्षणासाठी १९ वर्षांपूर्वी कुटुंब सांगलीत आले. राधिका कुपवाडमधील नवकृष्णा व्हॅली स्कूलमध्ये मराठी माध्यमात शिकू लागली. पाचवीत असताना तिने शालेय खेळासाठी तलवार हाती घेतली. तलवारबाजीतील फॉईल प्रकार ती शिकू लागली. हरिपूरचे प्रशिक्षक सागर लागू यांनी तिच्यातले कौशल्य आणि कसब हेरले. तिला सर्व प्रकारचे डावपेच शिकवण्यास सुरवात केली.

तिला हवीय आर्थिक पाठबळाची ढाल

पहिल्याच वर्षी सब ज्युनिअर नॅशनल स्पर्धेत तिने कास्य पदक पटकावले. त्यानंतर तिची तलवार आणखीनच तळपू लागली.२००६ मध्ये तिचे प्रशिक्षक सागर लागू स्पोर्टस्‌ ॲथोरिटी ऑफ इंडिया (साई)च्या केरळ येथील प्रशिक्षण केंद्रात रुजू झाले. २००७ मध्ये श्री. लागू यांनी नववीतील राधिकाला केरळ येथे ‘साई’ कडून खेळण्यासाठी निमंत्रण दिले. आई-वडिलांची भेट घेऊन तिच्या करिअरसाठी पाठवण्याची विनंती केली. आई-वडिलांनी धाडस करून राधिकाला नववीत असताना २००७  मध्ये केरळला पाठवले. शेकडो किलोमीटर दूर गेलेल्या राधिकासाठी केरळ नवखाच होता. मराठीतून शिक्षण घेतलेल्या राधिकाला तिथे इंग्रजी माध्यमातून आणि स्थानिक मल्याळम भाषा शिकण्याचे खडतर आव्हान होते. पहिले सहा महिने ती रडतच होती. परंतु आई-वडील, भाऊ आणि प्रशिक्षकांच्या प्रेरणेतून तिने अडचणींवर देखील तलवार चालवली. खेळात आणि अभ्यासात ती सफाईदारपणे तलवार चालवत राहिली. दहावीत ८५ टक्के, बारावीत ८०  टक्के गुण मिळवले. केरळमधून ती बी.ए. (फंक्‍शनल इंग्लिश) आणि तमिळनाडूच्या अण्णा विद्यापीठातून एमबीए झाली आहे.

राधिकाने परदेश ही गाजवला

श्री.लागू हे देशातले अग्रेसर प्रशिक्षक असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली  राधिका आज देशातील टॉपची तलवारबाजपटू बनली आहे. नेपाळमधील काठमांडूत नुकतेच ६ ते ९ डिसेंबर अखेर झालेल्या आंतरराष्ट्रीय साऊथ एशियन गेम्समध्ये तिने संघाला सुवर्णपदक मिळवून देताना वैयक्तिक रौप्य पदक पटकावले. राधिकाने सिंगापूर, फिलीपाईन्स, बॅंकॉक, स्कॉटलंड, सिंगापूर, मंगोलिया, चीन, टोकियो, हाँगकाँग, लिपझिंग, बार्सिलोना, कॅनबेरा, बुडापेस्ट आदी ठिकाणच्या २१ आंतरराष्ट्रीय स्पर्धातून संघाला तीन सुवर्ण, वैयक्तिक रौप्य आणि तीन कास्य पदके पटकावली. ३५ राष्ट्रीय स्पर्धेत १३ सुवर्ण, १७ रौप्य आणि १५ कास्य पदके पटकावली आहेत. गतवर्षीच्या ऑस्ट्रेलियातील कॉमनवेल्थ गेम्समध्ये तिने सातवे स्थान मिळवले.नववर्षात एप्रिलमध्ये होणाऱ्या एशियन्स चॅंपियनशीप, २०२२ मधील एशियन गेम्स आणि ऑलिंपिक २०२४ मध्ये पदक पटकावण्यासाठी राधिका कसून सराव करतेय.

https://www.esakal.com/paschim-maharashtra/radhika-awati-fencing-player-hard-work-olympics-sangli-marathi-news-248312



📚📕📗📘📙📔📒📚
*संकलन -*  
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_