twitter
rss

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨
📃  *आजची प्रेरणादायी पोस्ट*  📜

*भाग* - 5⃣1⃣3⃣

*📜 सर्वधर्मीय ५५०० मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या मोहम्मद शरीफांना 'पद्मश्री'*

Last Updated: Jan 26 2020 6:18PM

दिल्ली : पुढारी ऑनलाईन

जाती-पाती आणि धर्मांची तमा न बाळगता सर्व भेदभाव बाजूला सारुन जवळपास ५५०० हून अधिक बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या अयोध्येतील मोहम्मद शरीफ यांची पद्मश्री पुरस्क़ारासाठी निवड करण्यात आली. गौरवपूर्ण कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना पद्म पुरस्क़ार देऊन भारत सरकार अशा व्यक्तीचा गौरव करीत असते. शनिवारी पद्म पुरस्क़ार प्राप्त व्यक्तींची यादी सरकार मार्फत जाहीर करण्यात आली. मोहम्मद शरीफ यांचा पद्मश्री पुरस्काराने सन्मान करुन त्यांच्या जाती - धर्माच्या भिंती उद्ध्वस्त करणाऱ्या कामगिरीची दखल सरकारकडून घेण्यात आली असेच म्हणावे लागेल.

सध्या देशामध्ये धार्मिक आणि जातीय तेढ निर्माण झाल्याची अनेक उदाहरणे आपणास पाहायला मिळाली असतील. वेगवेगळ्या कारणांमुळे अशा समस्या अनेकवेळा आपल्याकडे उफाळून येतात. पण मोहम्मद शरीफांसारखे अवलिये याच देशामध्ये आढळतात. ज्यामुळे अशा विघातक गोष्टींना आळा घालण्याची प्रेरणा आपणास या व्यक्तींकडून मिळत असते.

माणूस आपणास अत्यंत महत्त्वाचा आहे. प्रत्येक व्यक्तीचा शेवट हा त्याच्या नातेवाईकांकडून सन्मानाने केला जातो. परंतु, बेवारस व्यक्तीचा शेवट सन्मानाचे होईल असे सागता येत नाही. म्हणून मोहम्मद शरीफ यांनी मरणानंतरही त्या माणसाचा सन्मान महत्त्वाचा ही एक भावना मनात ठेऊन बेवारस ५५०० लोकांचे अत्यंसंस्कार केले. ही गोष्ट करताना त्यांनी जात- पात- धर्म कधीही मध्ये येऊ दिला नाही.
याबाबत मोहम्मद शरीफ म्हणतात, ‘एका घटनेत माझ्या मुलाची २७ वर्षांपूर्वी हत्या करण्यात आली. याची माहिती मला एका महिन्यांनंतर कळाली. या घटनेनंतर मी बेवारस मृतदेहांचे अत्यंसंस्कार करु लागलो. आजपर्यंत मी ३००० हिंदू आणि २५०० मुस्लीम धर्मीयांच्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले आहेत.

https://www.pudhari.news/news/National/Mohammed-Sharif-performed-funeral-rites-on-5500-unidentified-bodies-of-all-religions/m/

📚📕📗📘📙📔📒📚
*संकलन -*  
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_