🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨
📃 *आजची प्रेरणादायी पोस्ट* 📜
*भाग* - 5⃣1⃣4⃣
*🇮🇳 जवानांना सलाम! लडाखमध्ये १७ हजार फुट उंचीवर फडकला तिरंगा*
Last Updated: Jan 26 2020 9:56AM
लडाख : पुढारी ऑनलाईन
संपूर्ण देशभरात प्रजासत्ताक दिनाचा उत्साह ओसंडून वाहत असताना, शौर्य, त्याग आणि साहसाचं प्रतिक असलेलं भारतीय सैन्य त्यापासून वेगळे कसे राहिल... लालकिल्यावर राष्ट्रपती तिरंग्याला मानवंदना देत असतानाच, तिकडे हिमालयात रक्त गोठवणाऱ्या उणे २० अंश सेल्सिअस तापमानात इंडो तिबेटीयन बॉर्डर पोलिसांनी मानाचा तिरंगा ध्वज फडकावला आहे.
देशभरात आज प्रजासत्ताक दिनाचा उत्साह आहे. मोठ्या उत्साहात ७१ वा प्रजासत्ताक दिवस साजरा केला जात आहे. प्रजासत्ताक दिनाचे अनेक फोटो, व्हिडीओ तुमच्या मोबाइलवर यायला सुरुवात झाली असेल, पण आता एएनआय या वृत्तसंस्थेने काही छायाचित्रे आपल्या ट्विटर हँडलवर प्रसिद्ध केली आहेत, जी पाहिल्यानंतर तुमच्या अंगावर अक्षरक्ष: काटा उभा राहिल. तुमची छाती अभिमानाने फुलेल आणि तुम्हाला भारतीय असल्याचा अभिमानही वाटेल.
हिमालयात १७ हजार फूट उंचीवर सर्व बाजूंनी बर्फाने वेढले असताना, उणे २० तापमानातही भारतीय जवानांनी आपले देशप्रेम दाखवून दिले आहे. इंडो-तिबेटिनयन सीमारेषा (आयटीबीपी) जवानांनी आज, रविवारी २६ जानेवारीला हाडे गोठवणा-या थंडीतही प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा केला. यावेळी जवानांनी तिरंगा फडकावला.
आयटीबीपीच्या शूर जवानांनी हातात तिरंगा घेतलेली काही छायाचित्र ट्विटरवर व्हायरल होत आहेत. फक्त ही छायाचित्रे पाहिल्यानंतर अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. इतक्या थंडीतही आपले जवान कसे काय सीमेची रक्षा करत असतील असे एक ना अनेक प्रश्न तुम्हाला पडल्याशिवाय राहणार नाहीत. छायाचित्रांमध्ये चारही बाजूला फक्त आणि फक्त बर्फ दिसत आहे. भारतीय जवान शिस्तबद्धपणे एका हातात बंदूक आणि तिरंगा घेऊन शांतपणे पुढे चालत जात आहेत.
https://www.pudhari.news/news/National/Ladakh-Indo-Tibetan-Border-Police-ITBP-soldiers-celebrating-RepublicDay-at-17000-feet-at-minus-20-degrees-Celsius-temperature/m/
📚📕📗📘📙📔📒📚
*संकलन -*
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_