twitter
rss

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨
📃  *आजची प्रेरणादायी पोस्ट*  📜

*भाग* - 5⃣1⃣1⃣

*अभिमानास्पद! मराठमोळे हरीश साळवे आता ब्रिटनच्या महाराणीचे वकील*

Last Updated: Jan 17 2020 10:26AM

नवी दिल्ली : पुढारी ऑनलाईन

आंतरराष्ट्रीय कोर्टात भारताची बाजू प्रभावीपणे मांडणारे वरिष्ठ वकील हरीश साळवे यांची ब्रिटनच्या महाराणीचे वकील (क्वीन कांऊसिल) म्हणून नियुक्ती झाली आहे. ब्रिटनच्या न्यायमंत्रालयाने १३ जानेवारी रोजी प्रसिद्ध केलेल्या नियुक्त्या संदर्भातील यादीत साळवे यांच्या नावाचा समावेश आहे. कौतुकाची बाब म्हणजे हरीश साळवे हे मराठमोळे आहेत. त्यांच्या नियुक्तीची अधिकृत घोषणा १६ मार्च रोजी होईल. हरीश साळवे ब्रिटनच्या महाराणीसाठी कोर्टस ऑफ इंग्लंड आणि वेल्ससाठी वकील म्हणून काम पाहतील.

कायदा क्षेत्रातील तज्ज्ञ आणि कौशल्य असणाऱ्या व्यक्तींना क्वीन कांऊसिल म्हणून बहुमान दिला जातो. हरीश साळवे यांनी कुलभूषण जाधव यांची आंतरराष्ट्रीय कोर्टात बाजू मांडली होती. साळवे यांचे आंतरराष्ट्रीय कायदा क्षेत्रात मोठे योगदान राहिले आहे. त्यामुळे त्यांना क्वीन कांऊसिल हा बहुमान मिळाला आहे.

हरिश साळवे यांचा जन्म धुळे जिल्ह्यातल्या वरुड या गावात झाला. त्यांनी नागपूर विद्यापीठातून एलएलबीचे शिक्षण घेतले आहे. त्यांची १९९२ मध्ये दिल्ली हायकोर्टात वरिष्ठ वकील म्हणून नियुक्ती झाली होती. त्यांनी १९९९-२००० दरम्यान भारताचे सॉलिसिटर जनरल म्हणून काम पाहिले आहे. त्यांनी अनेक महत्वाच्या प्रकरणात आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची बाजू मांडली आहे.

https://www.pudhari.news/news/Mumbai-Thane-Raigad/Harish-Salve-appointed-as-Queen-s-Counsel-for-the-courts-of-England-and-Wales-/m/

📚📕📗📘📙📔📒📚
*संकलन -*  
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_