twitter
rss

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨
📃  *आजची प्रेरणादायी पोस्ट*  📜

*भाग* - 5⃣1⃣0⃣

*📖आता सलूनच्या दुकानातही वाचा पुस्तके, ध्येयवेड्या तरूणाचा उपक्रम*

साभार- धर्मवीर पाटील,सकाळ वृत्तसेवा.

इस्लामपूर (जिल्हा सांगली) : सोशल मीडियाचे अनेक दुष्परिणाम चर्चिले जात असले तरी त्याचा सकारात्मक प्रभाव नाकारता येणार नाही. तामिळनाडू राज्यातील सलूनच्या दुकानातील पुस्तकांचा एक उपक्रम व्हाट्सअप्पवर व्हायरल झाला आणि त्या उपक्रमाच्या प्रभावातून तोच उपक्रम इस्लामपुरात देखील सुरू झाला आहे. त्यासाठी विक्रम झेंडे या युवकाने उत्स्फूर्तपणे पुढाकार घेतला आहे. सलूनच्या दुकानात आलेले ग्राहक वेटिंग रूममध्ये पुस्तके वाचत बसल्याचे अत्यंत वेगळे चित्र आता अनुभवायला मिळणार आहे.

'वाचाल तर वाचाल' या मार्गावर वाटचाल करण्यासाठी आपल्या ग्राहकांना ग्रंथाचा सहवास मिळावा यासाठी उपलब्ध जागेत आपल्या कल्पकतेने सलूनचा व्यवसाय सांभाळत विक्रम झेंडे यांनी आपल्या ग्राहकांसाठी पुस्तके उपलब्ध करून दिली आहेत. त्याच्या या विधायक उपक्रमाची परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे.

इस्लामपूर शहरातील आष्टा नाका परिसरात ओम जेन्टस् पार्लर नावाने विक्रम झेंडे यांचे सलूनचे दुकान आहे. केशकर्तन करण्याचा व्यवसाय असला तरी विक्रम उच्चविद्याविभूषित आहे. त्याने हिंदी विषयातून एमएबीएडची पदवी प्राप्त केली आहे. काही काळ शिक्षक म्हणूनही काम केले; परंतू संभाव्य संधी आणि वास्तव परिस्थिती याचा अंदाज घेऊन त्याने आपला पारंपारिक व्यवसाय निवडला. हा व्यवसाय करत असताना सुरवातीपासूनच ग्राहकांना अत्याधुनिक सुविधा आणि काहीतरी वेगळे देण्याची भूमिका घेतली. त्याच्यातील शिक्षक स्वस्थ बसू देत नव्हता. काही मित्रांच्या सल्यानुसार या जागेत नविन काही करावे असा संकल्प होता. यावेळी त्यांच्या डोक्यात तामिळनाडूतील तुतीकोरीन शहरातील केशकर्तनालयातील उपक्रमाची माहिती त्याला व्हाट्सअप्पवरून मिळाली. या विषयावर काही जाणकार लोकांशी चर्चा करून नव्या वर्षाच्या सुरुवातीला हा उपक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला. वाचकांची भुक भागवण्यासाठी खारीचा वाटा उचलण्यासाठी विक्रमने स्वखर्चातून विविध प्रकारची पुस्तके संकलीत केली. आपण हा उपक्रम राबविणार असल्याचे त्याने इतरांशी चर्चा केल्याने स्वतःहून काही मित्रांनी त्याला स्वतःजवळची पुस्तकेही देऊ केली. सलून मध्येच आतील बाजूस छोट्याशा जागेत वेटिंगरूम तयार करून त्यात या पुस्तकांसाठी कपाट थाटले. यात विविध विषयांवरील सुमारे १५ हजार रूपये खर्चाची पुस्तके उपलब्ध केली आहेत. कथा, कादंबरी, विनोदी, स्पर्धा परिक्षांच्या पुस्तकांचा त्यात समावेश आहे. त्याला सचिन खंडागळे, संतोष चौधरी, विजय भोसले, रामचंद्र बंडगर यांचे विशेष सहकार्य आहे. विक्रमने दुकानात यापूर्वी असलेला टीव्ही आता पूर्ण बंद केला आहे. केस, दाढी करण्यासाठी आलेले ग्राहक आता आपला नंबर येईपर्यंत पुस्तके चाळणार आहेत. यातून काही प्रमाणात का होईना लोकांना वाचनाची आवड निर्माण होईल, असा विश्वास विक्रमने बाळगला आहे.

*ग्राहकांना ज्ञानदान केल्याचे समाधान*

"सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या तामिळनाडूच्या पोन मारिअप्पन यांचा आदर्श घेऊन हा उपक्रम सुरू केला आहे. ग्राहकांना ज्ञानदान केल्याचे समाधान मिळेल शिवाय इथे येणाऱ्या ग्राहकांना काही प्रमाणात वाचनाची गोडी निर्माण होण्यास मदत होईल."

-विक्रम झेंडे, सलून व्यावसायीक.

https://www.esakal.com/paschim-maharashtra/books-salon-shops-sangali-249144

📚📕📗📘📙📔📒📚
*संकलन -*  
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_