twitter
rss

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨

🍍🍅 *आरोग्य-MANTRA*  🍋🍉

*भाग -*  2⃣8⃣8⃣

_*भारतात झिका व्हायरसचा प्रवेश*_

धोकादायक 'झिका' व्हायरसने देशात प्रवेश केल्याची कबुली केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने राज्यसभेत दिली आहे. मेंदू आणि मज्जासंस्थेवर अत्यंत गंभीर परिणाम करणाऱ्या झिका व्हायरसची लागण झालेल्या चार रुग्णांची नोंद झाल्याचे आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी राज्यसभेत दिलेल्या उत्तरात स्पष्ट केले. झिकाची लागण झालेले तीन रुग्ण गुजरात राज्यातील आहेत. यात एका गरोदर महिलेचा समावेश असून, चौथा रुग्ण हा तमिळनाडूतील कृष्णगिरी जिल्ह्यातला आहे.

युगांडाच्या झिका जंगलात सर्वात प्रथम माकडांमध्ये या आजाराची लक्षणे आढळली. त्यामुळे याला झिका असे नाव पडले. त्यानंतर एकट्या ब्राझीलमध्ये 2015 मध्ये जेव्हा या आजाराचा उद्रेक झाला तेव्हा 17 लाख रुग्णांची नोंद घेतली गेली. त्यापैकी 3500 मुलांच्या मेंदूवर त्यामुळे परिणाम झाल्याचे निदर्शनास आले. जगातील 70 देशांमध्ये या विषाणूने प्रवेश केला आहे. आतापर्यंत या आजाराने 40 लाख लोकांना झिकाने ग्रासले आहे.

_*झिकाची लक्षणे*_

ताप येणे

अंगावर पुरळ येणे

सतत अंगदुखी

असह्य डोकेदुखी

हातापायांत अशक्तपणा

श्वासोच्छ्वासात अडचण

🍍🍎🍅🍇🍉🍋🍎🍍

*संकलन -* 
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_

┄─┅━━Guruvarya Group ━━┅─┄
*樂♻ गुरुवर्य टिप्स् ♻樂*
_*आधार आणि मोबाईल जोडणी?*_

_ही काय भानगड आहे?_
सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार प्रत्येक सिम कार्ड हे आधार नंबरशी जोडणे सक्तीचे आहे.
आपल्यापैकी बहुतेक जणांनी आधार कार्ड घेताना मोबाईल नंबर दिला होता. ते झाले आधार कार्ड साठी OTP यावा म्हणून.
आता जी करायची प्रोसेस आहे तिला म्हणतात eKYC म्हणजे Know Your Customer (electronically).
*ह्यामुळे बोगस नावाने सिम कार्ड घेऊन स्त्रियांना फोनवरून त्रास देणे, खंडणी मागणे, आतंकवादी आणि राष्ट्रविरोधी कारवाया करणे ह्या गोष्टींना मोठ्या प्रमाणात आळा बसेल.*
ही प्रोसेस खालील प्रमाणे आहे आणि आपापल्या मोबाईल कंपनीच्या अधिकृत प्रतिनिधीकडे जाऊनच करायची आहे.
*ही प्रोसेस घरच्या घरी अथवा online शक्य नाही.*
1. आपल्याला मोबाईल कंपनीच्या प्रतिनिधी (जसे की vodafone store, BSNL exchange, IDEA gallery) कडे जाऊन त्यांना आपले आधार कार्ड दाखवायचे आहे
2. मग ते आपल्या मोबाईलवर एक मेसेज पाठवतील तो त्यांना दाखवायचा आहे
3. त्या नंतर आधार कार्ड नंबर टाकून फिंगर प्रिंट व्हेरिफिकेशन केले जाईल
4. 24 तासात आपल्याला आधार जोडणी यशस्वी झाल्याचा मेसेज येईलच.
अंतिम तारीख 6 फेब्रुवारी 2018 आहे.
*घरी अथवा फोन वरून जोडणी शक्य नाही त्यामुळे खोटारड्या लोकांच्या नादी लागू नका.*
हा मेसेज फॉरवर्ड नक्की करा म्हणजे लोकांना वेळेत आधार आणि मोबाईल लिंक करता येईल. कंपन्या स्वतःहून मेसेज पाठवत आहेतच.
आधार आणि मोबाईल नंबर लिंक नसल्यास आपले सिम कार्ड फेब्रुवारी 2018 नंतर बंद करण्यात येईल.
धन्यवाद...
_(वरील बातमी सर्व प्रतिष्ठित वृत्तपत्रांनी आधीच दिली आहे आणि आपणही google करून पडताळून पहावी म्हणजे शंकेला जागा राहणार नाही)_
*संकलन -* 
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨

📃  *आजची प्रेरणादायी पोस्ट*  📜

*भाग* -3⃣7⃣7⃣

*लग्नातील आहेराच्या रकमेतून वाडय़ात वर्गखोल्या*

_*१९९८ मध्ये सुरू झालेल्या या आश्रमशाळेत ६५० आदिवासी विद्यार्थी-विद्यार्थिनी शिकत आहेत.*_

By-रमेश पाटील, वाडा  July 20, 2017

लग्नसमारंभाच्या माध्यमातून मिळालेल्या आहेराच्या रकमेतून एका नवदाम्पत्याने आदिवासी भागातील एका शाळेच्या दोन वर्गखोल्या बांधून दिल्या आहेत.
ठाणे येथील रहिवासी शर्विन ठाणेकर आणि सायली ठाणेकर या नवदाम्पत्याने विवाहप्रसंगी मिळालेल्या आहेरातून वाडा तालुक्यातील नांदणी गायगोठा (कळंभई) येथे शंभर टक्के आदिवासी विद्यार्थी शिकत असलेल्या आश्रमशाळेत दोन वर्गखोल्या बांधल्या. इयत्ता ९ वी व १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी सुमारे साडेसहा लाख रुपये खर्चून या दोन वर्गखोल्या बांधून दिल्या आहेत.
ठाण्यातील मिलिंद आणि वीणा हे ज्ञाते दाम्पत्य गेली काही वर्षे वाडा तालुक्यातील नांदणी-गायगोठा या दुर्गम भागातील अरविंद स्मृती संचालित अनुदानित आश्रमशाळेला नियमित भेट देत आहेत. येथील आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. औषधे, अंथरुणे इतर वस्तू ते देत असतात.  १९९८ मध्ये सुरू झालेल्या या आश्रमशाळेत ६५० आदिवासी विद्यार्थी-विद्यार्थिनी शिकत आहेत. आश्रमशाळेत वर्गखोल्यांची कमतरता जाणवते. दोन वर्षांपूर्वी म्हणजेच २०१५ वीणा ज्ञाते यांची कन्या सायली हिचे ठाण्यातच राहणाऱ्या शर्विन ठाणेकर यांच्याशी लग्न ठरले. त्या वेळी त्यांनी शर्विनच्या घरच्यांशी संवाद साधून लग्नात मिळणाऱ्या अहेराची रक्कम आश्रमशाळेच्या वर्गखोल्या बांधण्यासाठी खर्च करण्यास प्रेरित केले आणि लग्नपत्रिकेतही आहेराची रक्कम या कार्यासाठी वापरणार असल्याची कल्पना अन्य आप्तांना  दिली.
या नवदाम्पत्याने  लग्नात मिळालेल्या अहेराच्या रकमेत  उर्वरित आवश्यक असणाऱ्या रकमेची भर घालून वर्गखोल्यांचे बांधकाम केले.

📚📕📗📘📙📔📒📚

*संकलन -* 
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨

📃  *आजची प्रेरणादायी पोस्ट*  📜

*भाग* -3⃣7⃣6⃣

*'त्या' अंध दाम्पत्याच्या मुलीसाठी सरसावले मदतीचे हात*

*समृद्धीच्या शिक्षणासह लग्नाचा खर्च उचलणार*

पिंपरी-चिंचवड | Updated: July 17, 2017

व्हॉट्सअॅपवरील व्हायरल पोस्टमुळे जगणं मुश्किल झालेल्या अंध दाम्पत्याला आता व्हाट्सअॅपमुळेच मदतीचे हात मिळाले आहेत. पिंपरी-चिंचवडमधील लोखंडे दाम्पत्यांनी सोशल मिडीयावरील लोकप्रिय असलेल्या व्हॉटसअॅपचे चांगले आणि वाईट असे दोन्ही अनुभव घेतले आहेत. धर्मेंद्र आणि शीतल लोखंडे हे दोघे एका चौकात त्यांची गोंडस मुलगी समृद्धीला घेऊन बसले होते. मात्र एका समाजकंटकाने ही मुलगी त्याची नसल्याचा तर्क लावला आणि एका पोस्टसह फोटो व्हायरल केला होता.
याच पोस्टने त्यांचं जगणं मुश्किल केल्याच्या बातम्या माध्यमांवर झळकल्या. व्हाट्सअॅपवर जशी चुकीची पोस्ट व्हायरल झाली तशीच त्याच्या सत्याचा उलगडा करणारी बातमी देखील वाऱ्यासारखी पसरली. त्यानंतर या कुटुंबियांच्या मदतीसाठी अनेक हात सरसावले आहेत. पिंपळे गुरवमधील मयूर नगरी वसाहत समृद्दीच्या लग्नापर्यंतचा आणि या कुटुंबाच्या पोटाचा प्रश्न सोडवणार आहे. यावेळी त्यांना अकरा हजार रुपयांचा धनादेश देण्यात आला. वाऱ्याच्या गतीने सोशल मीडियावर फिरणारा एक मेसेज अंध दांपत्याचा जीवनात अडथळा बनत होता. मात्र तोच मेसेज आता या दांपत्याच्या जीवनात नवसंजीवनी घेऊन आलाय.  गेल्या काही दिवसांपासून दाम्पत्त्याला नागरिकांनी जगणे मुश्किल केले होते.
या अंध दाम्पत्याला समृद्धी ही तीन वर्षांची मुलगी आहे. तिचा शिक्षणासह लग्नापर्यंतचा खर्च आणि कुटुंबातील अंध आई वडिलांचा खर्च पिंपळे गुरव येथील मयुरी नगरी वसाहत ही करणार आहे. या मदतीमुळे शीतल आणि धर्मेंद्र खूप खुश आहेत. ज्या मेसेजमुळे त्रास झाला, त्याच मेसेजने नवसंजीवनी दिल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला आहे. तसेच व्हॉटसअॅपवर मेसेज फॉरवर्ड करताना तो चुकीचा तर नाही ना याचा विचार करून तो पाठवावा, असे आवाहन अंध दाम्पत्याकडून करण्यात आले.

📚📕📗📘📙📔📒📚

*संकलन -* 
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨

📃  *आजची प्रेरणादायी पोस्ट*  📜

*भाग* -3⃣7⃣5⃣

*👩🏻‍⚖ पहिली भारतीय अग्निशामक महिला*

By - Pudhari

_*अग्निशामक दलात आत्तापर्यत महिलांचा समावेश केला गेला नव्हता. पण 37 वर्षीय हर्शिनी कान्हेकर या पहिल्या महिला फायर फायटर  बनल्या आहेत.*_

आगीशी युद्ध हे जीवाशी खेळ असतो. अग्निशामक दलात आत्तापर्यत महिलांचा समावेश केला गेला नव्हता. पण 37 वर्षीय हर्शिनी कान्हेकर या पहिल्या महिला फायर फायटर  बनल्या आहेत. या तरुण महिलेने एकदम न घाबरता आगीशी खेळ करायचा कसे काय ठरवले असेल?

नेहमीच्या मध्यममार्गी आयुष्यातील सर्व प्रकारच्या भीती वागवत हर्शिनीचे आयुष्य सुरू होते.

मुलींच्या महाविद्यालयात हर्शिनी शिकत होती. पण कुणाच्या आठवणीतही न राहणारे आयुष्य मला जगायचे नव्हते त्यामुळे स्वतःला बदलायलाच हवे असे मला वाटत होते, असे हर्शिनी सांगते. त्यामुळे तिने एनसीसीत प्रवेश घेतला. तिच्यातील आव्हाने पेलण्याची क्षमता एनसीसीमुळे सहजपणे समोर आली. त्यानंतर तिने सैन्यदलात प्रवेश घ्यायचा ठरवला.

पदवी अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर तिने व्यवसाय व्यवस्थापनातील पदवीचा अभ्यासक्रम करता करता फायर इंजिनिअरिंगला एका मैत्रिणीच्या आग्रहाखातर प्रवेश घेतला. हर्शिनी सांगते, माझी मैत्रिण शिल्पा हिने देखील माझ्याबरोबर परीक्षा दिली मात्र ती पास होऊ शकली नाही. त्यानंतर काही काळाने या महाविद्यालयाच्या इतिहासातील हा अभ्यासक्रम पूर्ण करणारी मी पहिलीच मुलगी होते. अर्थातच तेव्हाची भावना अभिमानाची होती.

या परीक्षेत पास होण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागले. ही परीक्षा यूपीएससी सारखीच असते. पण त्यात फक्त तीस जागा असतात. त्यानंतर तिथे शिकायला जाणारी ती पहिलीच मुलगी होती. पाच वर्षं फक्त मुलींच्या कॉलेजमध्ये शिकलेली हर्शिनी थेट मुलांच्याच बरोबर शिकू लागली. त्यामुळे ते सोपे निश्‍चितच नव्हते. सात सेमिस्टरचा हा कोर्स करण्यासाठी विद्यार्थ्यांना तिथेच वसतिगृहात राहून पूर्ण करावा लागतो. हर्शिनी पहिली आणि एकमेव मुलगी असल्याने तिच्यासाठी वेगळ्या सोयी कराव्या लागल्या.

मुलांच्या बरोबरीने शिकताना एकमेव मुलगी असल्याने हर्शिनीला अर्थातच प्रसिद्धीही मिळाली. पण त्यामुळे तिच्यावर चांगली कामगिरी करण्याचा दबावही होताच. मला माध्यमांतून जी प्रसिद्धी मिळायची आणि माझी दखल घेतली जायची त्यामुळे माझ्या महाविद्यालयातील सर्वच मुले माझी चेष्टा करायची. त्यांच्यामते मी काही वेगळे करत नव्हते. पण हे सर्व हर्शिनी कान्हेकर या व्यक्तीविषयी नव्हते तर पुरुषांचे निर्विवाद वर्चस्व असणार्‍या क्षेत्रात स्त्रियांनी मारलेल्या भरारीची दखल घेतली जात होती हे त्यांना समजणे अवघड होते. आत्तापर्यंत कोणाही स्त्रीने न केलेल्या गोष्टी घडत असल्यानेच ही दखल घेतली जात होती. त्यामुळे हर्शिनीचे खरोखरच कौतुक केले पाहिजे.

📚📕📗📘📙📔📒📚

*संकलन -* 
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_


✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨
 *आरोग्य-MANTRA*  
*भाग -*  2⃣8⃣6⃣
*निद्रासमस्या हे स्मृतिभ्रंशाचे लक्षण*
_*स्मृतिभ्रंश आजाराबाबतचे जैविक मार्कर यांचा परस्पर संबंध*_
पीटीआय, वॉशिंग्टन
कमी झोप येणे, झोपेमध्ये वारंवार अडथळे निर्माण होणे ही स्मृतिभ्रंश आजार होण्याची लक्षणे असू शकतात, असे एका अभ्यासामध्ये म्हटले आहे. झोपेमध्ये वारंवार येणारे अडथळे आणि स्मृतिभ्रंश आजाराबाबतचे जैविक मार्कर यांचा परस्पर संबंध असल्याचे संशोधकांना आढळून आले. त्यांना परस्पर संबंध असल्याचे मेंदूतील स्पायनल फ्लुइडमध्ये आढळून आले. झोपेमध्ये वारंवार अडथळे येणे यामुळे अनेक मार्गानी स्मृतिभ्रंश आजाराची वाढ होत असल्याचे मागील अभ्यासामध्ये दिसून आले होते, असे अमेरिकेतील विस्कॉनिन्स-मॅडिसन विद्यापीठाचे बारबारा बी बेंडलीन यांनी म्हटले आहे. झोपेमध्ये आलेला वारंवार अडथळा अथवा कमी झोप यामुळे अ‍ॅमेलॉइड प्लाक वाढवतो. त्यामुळे झोपेमध्ये होणाऱ्या क्रियेवर परिणाम होतो.  आमच्या अभ्यासामध्ये फक्त अ‍ॅमेलॉइडकडे न पाहता इतर जैविक मार्कर, स्पायनल फ्लुइडकडे लक्ष देण्यात आले होते, असे त्यांनी सांगितले.
संशोधकांनी सरासरी ६३ वयाच्या १०१ लोकांच्या स्मृतिक्षमतेचा अभ्यास केला. यामध्ये त्यांच्यामध्ये विकसित होत असलेल्या स्मृतिभ्रंश आजाराचा विचार करण्यात आला. सहभागी लोकांच्या झोपेचा दर्जा प्रथम तपासण्यात आला. त्यांना स्मृतिभ्रंश आजारासाठी जैविक मार्कर असणारे स्पायनल फ्लुइड तपासणी करून देण्यात आले.
ज्या लोकांची झोप अतिशय खराब दर्जाची होती, ज्या लोकांना झोप घेताना समस्या निर्माण होत होती आणि जे लोक दुपारी झोप घेत होते, त्यांच्यामध्ये स्मृतिभ्रंश आजाराची लक्षणे आढळून आली. लोकांनी ताणतणाव न घेता पुरेशी झोप घेतल्यास स्मृतिभ्रंश आजार दूर होण्यास मदत होते, असे संशोधकांनी सांगितले. स्मृतिभ्रंश आजार दूर करण्यासाठी उच्च प्रतीचा आहार घेण्याची आवश्यकता असून जीवनसत्त्वे, खनिजे देणारे पदार्थ खाणे आवश्यक आहे. ब्लूबेरी, अंडी, आले, ओट, काजू यांसारखी फळे खाल्ल्यास स्मृतिभ्रंश आजार दूर होण्यास मदत होते.

*संकलन -* 
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨

🍍🍅 *आरोग्य-MANTRA*  🍋🍉

*भाग -*  2⃣8⃣5⃣

*बडिशेप खाण्याचे फायदे*

साभार ~ लोकसत्ता ऑनलाइन

महाराष्ट्रात जेवणानंतर आठवणीने दिला जाणारा पदार्थ म्हणजे बडिशेप. आता ही प्रथा काहीशी कमी झाली असली तरी आजही सणा-वाराला गोडाधोडाचे जेवण केल्यानंतर मात्र आपण बडिशेप खातोच. बडिशेप खाल्ल्यामुळे अन्नाचे पचन चांगले होते इतकेच आपल्याला माहित असते. मात्र बडिशेप खाण्याचे आणखीही अनेक फायदे आहेत. केवळ जेवणानंतर खाण्यासाठीच नाही तर दैनंदिन आहारातही आपण बडिशेपचा अतिशय चांगल्या पद्धतीने समावेश करु शकतो. तोंडाला येणारा दुर्गंध कमी होण्यासाठी बडिशेप उपयुक्त ठरते, याशिवाय पोटफुगीचा त्रास असणाऱ्यांनी बडिशेप खाल्ल्यास हा त्रास कमी होण्यास मदत होते. मासिकपाळीच्या दिवसात पोटात जास्त दुखत असेल तर महिलांनी आवर्जून बडिशेप खावी. पोटदुखी काही प्रमाणात कमी होण्यास मदत होते. वजन घटवण्यास आणि अ‍ॅनिमियाचा धोका कमी करण्यासही बडिशेपची मदत होते. शरीरासाठी आरोग्यदायी असणारा हा पदार्थ नेमका कोणकोणत्या बाबतीत उपयुक्त ठरु शकतो याविषयी…..

*आमटी* – रोजच्या जेवणात असणाऱ्या वरणात किंवा आमटीत बडिशेप घातल्यास त्याचा स्वाद चागंला लागतो. यामध्ये पूर्ण बडिशेप आवडत नसेल तर पूड करुनही वापर करु शकता. चवीसाठी आणि आरोग्यासाठी याचा फायदा होऊ शकतो.

*सॅलाड* – सॅलाडवर आपण ज्याप्रमाणे मिरपूड किंवा चाटमसाला टाकून खातो त्याचप्रमाणे बडिशेपच्या पूडचा वापर केल्यास चविष्ट लागते. बडिशेपची पावडर करुन ठेवलेली असल्यास ती जेवताना अशापद्धतीने पटकन वापरता येते. ही पावडर घरातील मिक्सरवरही उपयुक्त असते.

*लोणची* – जेवणात डाव्या बाजूचा पदार्थ असल्याशिवाय मजा नाही. मग यामध्ये चटणी, लोणचे असे काही ना काही तरी हवेच. या लोणच्यामध्ये जर बडिशेप घातली तर त्याला छान वेगळी चव येते.

*बडिशेप सरबत* – उन्हातून आल्यावर काहीतरी थंड प्यावेसे वाटते. अशावेळी बडिशेपचे वेगळे असे सरबत बनवता येऊ शकते. कपभर बडीशेपचे दाणे आणि कपभर साखर जवळपास ७ ते ८ ग्लास पाण्यात भिजत ठेवा. हे मिश्रण रात्रभर भिजत ठेवा, पाण्यात हळूहळू बडीशेपचा स्वाद उतरेल. उन्हाळ्याच्या दिवसात शरीरात थंडावा निर्माण होण्यासाठी बडीशेपाचे सरबत फायदेशीर ठरते. बडिशेपचा जास्त वास येत असेल तर गरजेनुसार त्यामध्ये पाणी मिसळा. साखरेऐवजी मधही घालू शकता.

*गोडाचे पदार्थ* – योगर्ट, फ्रूट सॅलाड, खीर यांसारख्या गोड पदार्थांमध्ये बडिशेपची पावडर मिसळल्यास चांगली लागते. याशिवाय, पुरणपोळीचे मिश्रण, पॅनकेक यांमध्येही बडिशेपची पूड चांगली लागते. मसाला दूधातही बडिशेप घातल्यास छान स्वाद येतो.

🍍🍎🍅🍇🍉🍋🍎🍍

*संकलन -* 
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨

📃  *आजची प्रेरणादायी पोस्ट*  📜

*भाग* -3⃣7⃣4⃣

*🌴भाचीच्या लग्नात व-हाडींना 1,500 नारळ रोपांचे मामाकडून वाटप*

*सासवडचे संतोष जगताप व निलेश पवार यांचा उपक्रम*

सासवड (पुणे): सध्या पाऊसमान घटत आहे. वृक्षतोडीने व सिमेंट जंगल वाढीने पर्यावरणाचे पुरते संतुलन बिघडत आहे. त्यातून आपल्यापासून सुरवात म्हणून सासवड (ता. पुरंदर) येथील एका मामाने आपल्या भाचीच्या लग्नात किमती भेटवस्तू न देता.. आलेल्या सर्व व-हाडी मंडळींना तब्बल 1,500 नारळाची चांगली रोपे दिली. तसेच पर्यावरण संवर्धनाबाबत एक वेगळा संदेश लग्नमंडपात दिला.
पुणे सातारा रस्त्यावरील नसरापूर गावानजिक शिवशंभो लॉन्स मंगल कार्यालयात हा विवाह सोहळा नुकताच झाला. कुरंगवडी (ता. वेल्हे) येथील राजाराम शिळीमकर यांची कन्या चि. सौ. कां. तनुजा ही वधू आणि चि. विक्रांत निगडे हे वर.. यांचा विवाह होता. त्यात मुलीचे मामा व सासवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संतोष जगताप व त्यांचे मित्र निलेश पवार, तुषार शिळीमकर यांनी हा अनोखा उपक्रम अगदी उत्साहाने केला.
बहुतेक विवाह सोहळ्यात उपस्थित काही ठराविक मान्यवरांचा हार-तुरे, बुके, शाल देऊन सत्कार होतो. भलीमोठी भाषणबाजी होते. मात्र गरजेचे उपक्रम होत नाही., ही खंत संतोष जगताप यांना होती. त्यामुळे त्यांनी भाचीच्या विवाहात हे हार तुऱयांचे फक्त सत्कार न करता.. विवाहात वधू-वरांना शुभार्शिवाद वा शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या सर्व मान्यवर व वऱहाडी मंडळी अशा साऱयांनाच प्रत्येकी एक नारळाचे रोप देण्याचा निर्णय घेतला. मुलीचे मामा संतोष जगताप हे मुळात निसर्गप्रेमी आहेत. ते दरवर्षी आपल्या घरात गौरी गणपतीत सुध्दा पर्यावरणावर आधारीत देखावा सादर करुन.. साऱया गावाला बोलावून जनजागृती करीत असतात. विविध सामाजिक व आरोग्य विषयक उपक्रम करीत असतात. त्यामुळे उपक्रमातून आपल्या भाचीचेही लग्न हुकवून दिले नाही. त्यांनी मित्र पवार, भाचे तुषारच्या मदतीने या सोहळ्याप्रसंगी दिड हजार नारळाच्या रोपांचे वाटप करून त्यांचे संवर्धन करण्याची विनंती केली. त्यामुळे लग्न समारंभात मान्यवरांच्या सत्कारासाठी होणारा वायफट खर्च टाळून संतोष जगताप यांनी केलेल्या या उपक्रमाची चर्चा चांगलीच रंगली.
संतोष जगताप म्हणाले, नुकत्याच झालेल्या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त अनेक ठिकाणी विविध कार्यक्रम झाले. यामध्ये दिवसेंदिवस होत असलेली वृक्षतोड, पर्यावरणाचा -हास यावर मोठ्या प्रमाणात भाषणबाजी झाली. मात्र, प्रत्यक्षात कृती कमी झाली. त्यामुळे मी पुढाकार घेत हा नारळ रोपे वाटण्याचा उपक्रम मित्राच्या मदतीने केला. लग्नमंडपात माणसांइतकीच रोपे दिसताना उपक्रमाचे सार्थक वाटले.

🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴

*संकलन -* 
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨

🍍🍅 *आरोग्य-MANTRA*  🍋🍉

*भाग -*  2⃣8⃣4⃣

😎 _*लहान मुलांच्या डोळ्यांवर चष्मा लागू नये म्हणून...*_

सध्याची पिढी स्मार्टफोन, मोबाईल, व्हिडीओ गेम, लॅपटॉप आणि टीव्हीच्या समोर वाढतेय. तंत्रज्ञानाचा अतिवापर यामुळे मुलांची दृष्टी कमी झालेली पहायला मिळते. त्यामुळे लहान मुलांच्या डोळ्यावर भल्या मोठ्या काचेचा चष्मा दिसतो. मात्र लहानग्या वयात मुलांच्या डोळ्यांवर चष्मा लागू नये, म्हणून काळजी घेणं आवश्यक आहे. त्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स जाणून घेऊयात...

मुलांची दृष्टी कमी होण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे पौष्टीक अन्नाची कमतरता. कमी प्रकाशात, अंधारात वाचण्यामुळे डोळ्यांना त्रास होतो. टीव्ही आणि मोबाईलसारख्या गॅझेटच्या अतिवापरामुळे मुलांच्या डोळ्यांवर परिणाम होतो. म्हणून मुलांच्या या सवयींकडे दुर्लक्ष करणे टाळले पाहिजे. त्यांना न दुखावता या समस्येतून बाहेर काढता येईल असे वातावरण तयार करा.....

1) डोळे हेल्दी ठेवण्यासाठी व्हिटॅमिन ए, बी, सी आणि डी ची गरज असते.

2) दृष्टी चांगली ठेवण्यासाठी भोपळा महत्वाचा आहे.

3) मुलांचे डोळे चांगले ठेवण्यासाठी त्यांना गाजर, बीट आणि रताळी खायला द्यावी.

4) चांगल्या डोळ्यांसाठी मुलांना अक्रोड भाजून द्या. तसंच अळशीच्या बियाही उपयुक्त ठरतात.

5) मुलांना त्या-त्या हंगामातील फळं खायला देणं आवश्यक आहे. त्यामुळेही दृष्टी चांगली राहते. आवळ्याचा मुरंबा मुलांच्या डोळ्यासाठी फायदेशीर ठरतो.

6) हिवाळ्यात मुलांना सूर्यप्रकाशात खेळू द्या.

7) सूर्यप्रकाशामुळे मुलांना व्हिटॅमिन डी मिळतो, जे डोळ्यांसाठी उत्तम असतं.

8) नजर चांगली ठेवण्यासाठी दूध आणि अंडीही महत्त्वाचा पर्याय आहे.

🍍🍎🍅🍇🍉🍋🍎🍍

*संकलन -* 
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨

📃  *आजची प्रेरणादायी पोस्ट*  📜

*भाग* -3⃣7⃣3⃣

*.....म्हणून जिल्हाधिकाऱ्याच्या मुलीचा सरकारी शाळेत प्रवेश!*

By: एबीपी माझा वेब टीम | Last Updated: > Thursday, 6 July 2017

नवी दिल्ली :  एकीकडे सरकारी अधिकारी आपल्या पाल्यांसाठी सरकारी शाळेऐवजी खासगी शाळेला पसंती देताना दिसतात. मात्र छत्तीसगडमधील एका जिल्हाधिकाऱ्याने आपल्या पाच वर्षांच्या मुलीची अॅडमिशन सरकारी शाळेत केली आहे. अवनीश कुमार असं या जिल्हाधिकाऱ्याचं नाव असून, त्यांच्याकडे छत्तीसगडमधील बलरामपूर जिल्ह्याची जबाबदारी आहे.

खरं तर अवनीश कुमार यांनी आपल्या मुलीला इंग्रजी माध्यमाच्या केजी शाळेऐवजी अंगणवाडीमध्ये दाखल केलं होतं. आता ती पाच वर्षांची झाल्यावर तिला बलरामपूरमधील प्रज्ञा प्राथमिक विद्यालयात दाखल केलं आहे.

प्रज्ञा प्राथमिक विद्यालयात विद्यार्थ्यांना हायटेक पद्धतीने शिक्षण देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी वर्गांमध्ये एलईडी मॉनिटर बसवण्यात आले आहेत. तसेच शिक्षकांनाही हायटेक शिक्षण देण्यासाठी प्रशिक्षण देण्यात आलं आहे.

सध्या जिल्ह्यातील सहा ब्लॉकमध्ये ही हायटेक शिक्षणाची व्यवस्था प्रशासनाच्या वतीने उपलब्ध करुन देण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या या पुढाकारानं सरकारी शाळांमधील शिक्षणाची स्थिती सुधारेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यामुळेच अवनीश कुमार यांच्या निर्णयाचं सर्वत्र कौतुक होत आहे.

📚📕📗📘📙📔📒📚

*संकलन -* 
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨

📃  *आजची प्रेरणादायी पोस्ट*  📜

*भाग* -3⃣7⃣2⃣

*👨🏻‍⚕ रुग्ण देईल ती फी स्वीकारणारा डॉक्‍टर..!*

साभार ~ टीम ई सकाळ

पुणे : 'डॉक्‍टरांकडे जायचं म्हणजे जरा खिशाला कात्री लागण्याचीच वेळ' अशी सर्वसाधारण भावना निर्माण झालेली असताना पुण्यातल्या एका डॉक्‍टरांनी वेगळीच भूमिका स्वीकारली आहे.. या डॉक्‍टरांकडे गेलात, तर तपासणीची फी त्यांची रिसेप्शनिस्ट तुम्हाला सांगत नाही.. उलट तुम्हाला हवी तेवढी, परवडेल तेवढी फी तुम्ही तिथं देऊ शकता.. कारण यांचा नियमच आहे तसा! हे डॉक्‍टर आहेत पुण्यातील पोटाच्या विकारांचे तज्ज्ञ डॉ. रघुनाथ गोडबोले.

काही दिवसांपूर्वी डॉ. गोडबोले यांच्या एका रुग्णाने त्यांच्या रिसेप्शन डेस्कवरील पाटीचे छायाचित्र काढून स्वत:च्या 'फेसबुक वॉल'वर टाकले. त्यातून डॉ. गोडबोले यांच्या या कार्याची माहिती सर्वदूर पसरली. 'रुग्णांना परवडेल तेवढी फी त्यांनी द्यावी' ही त्यांची भूमिका सध्या सोशल मीडियामध्ये 'व्हायरल' झाली असली, तरीही प्रत्यक्षात गेली साडेआठ वर्षं ते हे काम करत आहेत. अगदी अचूक तारखेनुसार सांगायचं, तर 1 जानेवारी 2009 पासून..

ही अशी भूमिका डॉ. गोडबोले यांनी का घेतली, त्यांच्या कुटुंबीयांचं आणि वैद्यकीय क्षेत्रातील इतर सहकाऱ्यांचं यावर काय मत होतं, याविषयी त्यांनी 'सकाळ'च्या 'फेसबुक लाईव्ह'मध्ये सांगितलं..

विशेष म्हणजे, ही सुविधा देऊनही काहीच फी न देणारा एकही रुग्ण भेटला नसल्याचे डॉ. गोडबोले यांनी आवर्जून सांगितले. तसेच, एका रुग्णाने तर तपासणी केल्यानंतर एका वर्षाने फी आणून दिल्याचा अनुभवही डॉ. गोडबोले यांनी सांगितला. डॉ. गोडबोले आज 61 वर्षांचे आहेत. अशीच तंदुरुस्ती कायम राहिली, तर वयाच्या 75 व्या वर्षापर्यंत ही प्रॅक्‍टिस करण्याची त्यांची इच्छा आहे.

http://www.esakal.com/kahi-sukhad-pune/marathi-news-pune-news-dr-raghunath-godbole-pune-doctor-gastroenterologist-56698

📚📕📗📘📙📔📒📚

*संकलन -* 
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_