twitter
rss

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨

📃  *आजची प्रेरणादायी पोस्ट*  📜

*भाग* -3⃣7⃣3⃣

*.....म्हणून जिल्हाधिकाऱ्याच्या मुलीचा सरकारी शाळेत प्रवेश!*

By: एबीपी माझा वेब टीम | Last Updated: > Thursday, 6 July 2017

नवी दिल्ली :  एकीकडे सरकारी अधिकारी आपल्या पाल्यांसाठी सरकारी शाळेऐवजी खासगी शाळेला पसंती देताना दिसतात. मात्र छत्तीसगडमधील एका जिल्हाधिकाऱ्याने आपल्या पाच वर्षांच्या मुलीची अॅडमिशन सरकारी शाळेत केली आहे. अवनीश कुमार असं या जिल्हाधिकाऱ्याचं नाव असून, त्यांच्याकडे छत्तीसगडमधील बलरामपूर जिल्ह्याची जबाबदारी आहे.

खरं तर अवनीश कुमार यांनी आपल्या मुलीला इंग्रजी माध्यमाच्या केजी शाळेऐवजी अंगणवाडीमध्ये दाखल केलं होतं. आता ती पाच वर्षांची झाल्यावर तिला बलरामपूरमधील प्रज्ञा प्राथमिक विद्यालयात दाखल केलं आहे.

प्रज्ञा प्राथमिक विद्यालयात विद्यार्थ्यांना हायटेक पद्धतीने शिक्षण देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी वर्गांमध्ये एलईडी मॉनिटर बसवण्यात आले आहेत. तसेच शिक्षकांनाही हायटेक शिक्षण देण्यासाठी प्रशिक्षण देण्यात आलं आहे.

सध्या जिल्ह्यातील सहा ब्लॉकमध्ये ही हायटेक शिक्षणाची व्यवस्था प्रशासनाच्या वतीने उपलब्ध करुन देण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या या पुढाकारानं सरकारी शाळांमधील शिक्षणाची स्थिती सुधारेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यामुळेच अवनीश कुमार यांच्या निर्णयाचं सर्वत्र कौतुक होत आहे.

📚📕📗📘📙📔📒📚

*संकलन -* 
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_