twitter
rss

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨

📃  *आजची प्रेरणादायी पोस्ट*  📜

*भाग* -3⃣7⃣5⃣

*👩🏻‍⚖ पहिली भारतीय अग्निशामक महिला*

By - Pudhari

_*अग्निशामक दलात आत्तापर्यत महिलांचा समावेश केला गेला नव्हता. पण 37 वर्षीय हर्शिनी कान्हेकर या पहिल्या महिला फायर फायटर  बनल्या आहेत.*_

आगीशी युद्ध हे जीवाशी खेळ असतो. अग्निशामक दलात आत्तापर्यत महिलांचा समावेश केला गेला नव्हता. पण 37 वर्षीय हर्शिनी कान्हेकर या पहिल्या महिला फायर फायटर  बनल्या आहेत. या तरुण महिलेने एकदम न घाबरता आगीशी खेळ करायचा कसे काय ठरवले असेल?

नेहमीच्या मध्यममार्गी आयुष्यातील सर्व प्रकारच्या भीती वागवत हर्शिनीचे आयुष्य सुरू होते.

मुलींच्या महाविद्यालयात हर्शिनी शिकत होती. पण कुणाच्या आठवणीतही न राहणारे आयुष्य मला जगायचे नव्हते त्यामुळे स्वतःला बदलायलाच हवे असे मला वाटत होते, असे हर्शिनी सांगते. त्यामुळे तिने एनसीसीत प्रवेश घेतला. तिच्यातील आव्हाने पेलण्याची क्षमता एनसीसीमुळे सहजपणे समोर आली. त्यानंतर तिने सैन्यदलात प्रवेश घ्यायचा ठरवला.

पदवी अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर तिने व्यवसाय व्यवस्थापनातील पदवीचा अभ्यासक्रम करता करता फायर इंजिनिअरिंगला एका मैत्रिणीच्या आग्रहाखातर प्रवेश घेतला. हर्शिनी सांगते, माझी मैत्रिण शिल्पा हिने देखील माझ्याबरोबर परीक्षा दिली मात्र ती पास होऊ शकली नाही. त्यानंतर काही काळाने या महाविद्यालयाच्या इतिहासातील हा अभ्यासक्रम पूर्ण करणारी मी पहिलीच मुलगी होते. अर्थातच तेव्हाची भावना अभिमानाची होती.

या परीक्षेत पास होण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागले. ही परीक्षा यूपीएससी सारखीच असते. पण त्यात फक्त तीस जागा असतात. त्यानंतर तिथे शिकायला जाणारी ती पहिलीच मुलगी होती. पाच वर्षं फक्त मुलींच्या कॉलेजमध्ये शिकलेली हर्शिनी थेट मुलांच्याच बरोबर शिकू लागली. त्यामुळे ते सोपे निश्‍चितच नव्हते. सात सेमिस्टरचा हा कोर्स करण्यासाठी विद्यार्थ्यांना तिथेच वसतिगृहात राहून पूर्ण करावा लागतो. हर्शिनी पहिली आणि एकमेव मुलगी असल्याने तिच्यासाठी वेगळ्या सोयी कराव्या लागल्या.

मुलांच्या बरोबरीने शिकताना एकमेव मुलगी असल्याने हर्शिनीला अर्थातच प्रसिद्धीही मिळाली. पण त्यामुळे तिच्यावर चांगली कामगिरी करण्याचा दबावही होताच. मला माध्यमांतून जी प्रसिद्धी मिळायची आणि माझी दखल घेतली जायची त्यामुळे माझ्या महाविद्यालयातील सर्वच मुले माझी चेष्टा करायची. त्यांच्यामते मी काही वेगळे करत नव्हते. पण हे सर्व हर्शिनी कान्हेकर या व्यक्तीविषयी नव्हते तर पुरुषांचे निर्विवाद वर्चस्व असणार्‍या क्षेत्रात स्त्रियांनी मारलेल्या भरारीची दखल घेतली जात होती हे त्यांना समजणे अवघड होते. आत्तापर्यंत कोणाही स्त्रीने न केलेल्या गोष्टी घडत असल्यानेच ही दखल घेतली जात होती. त्यामुळे हर्शिनीचे खरोखरच कौतुक केले पाहिजे.

📚📕📗📘📙📔📒📚

*संकलन -* 
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_