🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨
🍍🍅 *आरोग्य-MANTRA* 🍋🍉
*भाग -* 2⃣8⃣5⃣
*बडिशेप खाण्याचे फायदे*
साभार ~ लोकसत्ता ऑनलाइन
महाराष्ट्रात जेवणानंतर आठवणीने दिला जाणारा पदार्थ म्हणजे बडिशेप. आता ही प्रथा काहीशी कमी झाली असली तरी आजही सणा-वाराला गोडाधोडाचे जेवण केल्यानंतर मात्र आपण बडिशेप खातोच. बडिशेप खाल्ल्यामुळे अन्नाचे पचन चांगले होते इतकेच आपल्याला माहित असते. मात्र बडिशेप खाण्याचे आणखीही अनेक फायदे आहेत. केवळ जेवणानंतर खाण्यासाठीच नाही तर दैनंदिन आहारातही आपण बडिशेपचा अतिशय चांगल्या पद्धतीने समावेश करु शकतो. तोंडाला येणारा दुर्गंध कमी होण्यासाठी बडिशेप उपयुक्त ठरते, याशिवाय पोटफुगीचा त्रास असणाऱ्यांनी बडिशेप खाल्ल्यास हा त्रास कमी होण्यास मदत होते. मासिकपाळीच्या दिवसात पोटात जास्त दुखत असेल तर महिलांनी आवर्जून बडिशेप खावी. पोटदुखी काही प्रमाणात कमी होण्यास मदत होते. वजन घटवण्यास आणि अॅनिमियाचा धोका कमी करण्यासही बडिशेपची मदत होते. शरीरासाठी आरोग्यदायी असणारा हा पदार्थ नेमका कोणकोणत्या बाबतीत उपयुक्त ठरु शकतो याविषयी…..
*आमटी* – रोजच्या जेवणात असणाऱ्या वरणात किंवा आमटीत बडिशेप घातल्यास त्याचा स्वाद चागंला लागतो. यामध्ये पूर्ण बडिशेप आवडत नसेल तर पूड करुनही वापर करु शकता. चवीसाठी आणि आरोग्यासाठी याचा फायदा होऊ शकतो.
*सॅलाड* – सॅलाडवर आपण ज्याप्रमाणे मिरपूड किंवा चाटमसाला टाकून खातो त्याचप्रमाणे बडिशेपच्या पूडचा वापर केल्यास चविष्ट लागते. बडिशेपची पावडर करुन ठेवलेली असल्यास ती जेवताना अशापद्धतीने पटकन वापरता येते. ही पावडर घरातील मिक्सरवरही उपयुक्त असते.
*लोणची* – जेवणात डाव्या बाजूचा पदार्थ असल्याशिवाय मजा नाही. मग यामध्ये चटणी, लोणचे असे काही ना काही तरी हवेच. या लोणच्यामध्ये जर बडिशेप घातली तर त्याला छान वेगळी चव येते.
*बडिशेप सरबत* – उन्हातून आल्यावर काहीतरी थंड प्यावेसे वाटते. अशावेळी बडिशेपचे वेगळे असे सरबत बनवता येऊ शकते. कपभर बडीशेपचे दाणे आणि कपभर साखर जवळपास ७ ते ८ ग्लास पाण्यात भिजत ठेवा. हे मिश्रण रात्रभर भिजत ठेवा, पाण्यात हळूहळू बडीशेपचा स्वाद उतरेल. उन्हाळ्याच्या दिवसात शरीरात थंडावा निर्माण होण्यासाठी बडीशेपाचे सरबत फायदेशीर ठरते. बडिशेपचा जास्त वास येत असेल तर गरजेनुसार त्यामध्ये पाणी मिसळा. साखरेऐवजी मधही घालू शकता.
*गोडाचे पदार्थ* – योगर्ट, फ्रूट सॅलाड, खीर यांसारख्या गोड पदार्थांमध्ये बडिशेपची पावडर मिसळल्यास चांगली लागते. याशिवाय, पुरणपोळीचे मिश्रण, पॅनकेक यांमध्येही बडिशेपची पूड चांगली लागते. मसाला दूधातही बडिशेप घातल्यास छान स्वाद येतो.
🍍🍎🍅🍇🍉🍋🍎🍍
*संकलन -*
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_