twitter
rss

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨

📃  *आजची प्रेरणादायी पोस्ट*  📜

*भाग* -3⃣7⃣2⃣

*👨🏻‍⚕ रुग्ण देईल ती फी स्वीकारणारा डॉक्‍टर..!*

साभार ~ टीम ई सकाळ

पुणे : 'डॉक्‍टरांकडे जायचं म्हणजे जरा खिशाला कात्री लागण्याचीच वेळ' अशी सर्वसाधारण भावना निर्माण झालेली असताना पुण्यातल्या एका डॉक्‍टरांनी वेगळीच भूमिका स्वीकारली आहे.. या डॉक्‍टरांकडे गेलात, तर तपासणीची फी त्यांची रिसेप्शनिस्ट तुम्हाला सांगत नाही.. उलट तुम्हाला हवी तेवढी, परवडेल तेवढी फी तुम्ही तिथं देऊ शकता.. कारण यांचा नियमच आहे तसा! हे डॉक्‍टर आहेत पुण्यातील पोटाच्या विकारांचे तज्ज्ञ डॉ. रघुनाथ गोडबोले.

काही दिवसांपूर्वी डॉ. गोडबोले यांच्या एका रुग्णाने त्यांच्या रिसेप्शन डेस्कवरील पाटीचे छायाचित्र काढून स्वत:च्या 'फेसबुक वॉल'वर टाकले. त्यातून डॉ. गोडबोले यांच्या या कार्याची माहिती सर्वदूर पसरली. 'रुग्णांना परवडेल तेवढी फी त्यांनी द्यावी' ही त्यांची भूमिका सध्या सोशल मीडियामध्ये 'व्हायरल' झाली असली, तरीही प्रत्यक्षात गेली साडेआठ वर्षं ते हे काम करत आहेत. अगदी अचूक तारखेनुसार सांगायचं, तर 1 जानेवारी 2009 पासून..

ही अशी भूमिका डॉ. गोडबोले यांनी का घेतली, त्यांच्या कुटुंबीयांचं आणि वैद्यकीय क्षेत्रातील इतर सहकाऱ्यांचं यावर काय मत होतं, याविषयी त्यांनी 'सकाळ'च्या 'फेसबुक लाईव्ह'मध्ये सांगितलं..

विशेष म्हणजे, ही सुविधा देऊनही काहीच फी न देणारा एकही रुग्ण भेटला नसल्याचे डॉ. गोडबोले यांनी आवर्जून सांगितले. तसेच, एका रुग्णाने तर तपासणी केल्यानंतर एका वर्षाने फी आणून दिल्याचा अनुभवही डॉ. गोडबोले यांनी सांगितला. डॉ. गोडबोले आज 61 वर्षांचे आहेत. अशीच तंदुरुस्ती कायम राहिली, तर वयाच्या 75 व्या वर्षापर्यंत ही प्रॅक्‍टिस करण्याची त्यांची इच्छा आहे.

http://www.esakal.com/kahi-sukhad-pune/marathi-news-pune-news-dr-raghunath-godbole-pune-doctor-gastroenterologist-56698

📚📕📗📘📙📔📒📚

*संकलन -* 
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_