✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨
*आरोग्य-MANTRA*
*भाग -* 2⃣8⃣6⃣
*निद्रासमस्या हे स्मृतिभ्रंशाचे लक्षण*
_*स्मृतिभ्रंश आजाराबाबतचे जैविक मार्कर यांचा परस्पर संबंध*_
पीटीआय, वॉशिंग्टन
कमी झोप येणे, झोपेमध्ये वारंवार अडथळे निर्माण होणे ही स्मृतिभ्रंश आजार होण्याची लक्षणे असू शकतात, असे एका अभ्यासामध्ये म्हटले आहे. झोपेमध्ये वारंवार येणारे अडथळे आणि स्मृतिभ्रंश आजाराबाबतचे जैविक मार्कर यांचा परस्पर संबंध असल्याचे संशोधकांना आढळून आले. त्यांना परस्पर संबंध असल्याचे मेंदूतील स्पायनल फ्लुइडमध्ये आढळून आले. झोपेमध्ये वारंवार अडथळे येणे यामुळे अनेक मार्गानी स्मृतिभ्रंश आजाराची वाढ होत असल्याचे मागील अभ्यासामध्ये दिसून आले होते, असे अमेरिकेतील विस्कॉनिन्स-मॅडिसन विद्यापीठाचे बारबारा बी बेंडलीन यांनी म्हटले आहे. झोपेमध्ये आलेला वारंवार अडथळा अथवा कमी झोप यामुळे अॅमेलॉइड प्लाक वाढवतो. त्यामुळे झोपेमध्ये होणाऱ्या क्रियेवर परिणाम होतो. आमच्या अभ्यासामध्ये फक्त अॅमेलॉइडकडे न पाहता इतर जैविक मार्कर, स्पायनल फ्लुइडकडे लक्ष देण्यात आले होते, असे त्यांनी सांगितले.
संशोधकांनी सरासरी ६३ वयाच्या १०१ लोकांच्या स्मृतिक्षमतेचा अभ्यास केला. यामध्ये त्यांच्यामध्ये विकसित होत असलेल्या स्मृतिभ्रंश आजाराचा विचार करण्यात आला. सहभागी लोकांच्या झोपेचा दर्जा प्रथम तपासण्यात आला. त्यांना स्मृतिभ्रंश आजारासाठी जैविक मार्कर असणारे स्पायनल फ्लुइड तपासणी करून देण्यात आले.
ज्या लोकांची झोप अतिशय खराब दर्जाची होती, ज्या लोकांना झोप घेताना समस्या निर्माण होत होती आणि जे लोक दुपारी झोप घेत होते, त्यांच्यामध्ये स्मृतिभ्रंश आजाराची लक्षणे आढळून आली. लोकांनी ताणतणाव न घेता पुरेशी झोप घेतल्यास स्मृतिभ्रंश आजार दूर होण्यास मदत होते, असे संशोधकांनी सांगितले. स्मृतिभ्रंश आजार दूर करण्यासाठी उच्च प्रतीचा आहार घेण्याची आवश्यकता असून जीवनसत्त्वे, खनिजे देणारे पदार्थ खाणे आवश्यक आहे. ब्लूबेरी, अंडी, आले, ओट, काजू यांसारखी फळे खाल्ल्यास स्मृतिभ्रंश आजार दूर होण्यास मदत होते.

*संकलन -*
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_