twitter
rss

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨

📃  *आजची प्रेरणादायी पोस्ट*  📜

*भाग* -3⃣7⃣4⃣

*🌴भाचीच्या लग्नात व-हाडींना 1,500 नारळ रोपांचे मामाकडून वाटप*

*सासवडचे संतोष जगताप व निलेश पवार यांचा उपक्रम*

सासवड (पुणे): सध्या पाऊसमान घटत आहे. वृक्षतोडीने व सिमेंट जंगल वाढीने पर्यावरणाचे पुरते संतुलन बिघडत आहे. त्यातून आपल्यापासून सुरवात म्हणून सासवड (ता. पुरंदर) येथील एका मामाने आपल्या भाचीच्या लग्नात किमती भेटवस्तू न देता.. आलेल्या सर्व व-हाडी मंडळींना तब्बल 1,500 नारळाची चांगली रोपे दिली. तसेच पर्यावरण संवर्धनाबाबत एक वेगळा संदेश लग्नमंडपात दिला.
पुणे सातारा रस्त्यावरील नसरापूर गावानजिक शिवशंभो लॉन्स मंगल कार्यालयात हा विवाह सोहळा नुकताच झाला. कुरंगवडी (ता. वेल्हे) येथील राजाराम शिळीमकर यांची कन्या चि. सौ. कां. तनुजा ही वधू आणि चि. विक्रांत निगडे हे वर.. यांचा विवाह होता. त्यात मुलीचे मामा व सासवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष संतोष जगताप व त्यांचे मित्र निलेश पवार, तुषार शिळीमकर यांनी हा अनोखा उपक्रम अगदी उत्साहाने केला.
बहुतेक विवाह सोहळ्यात उपस्थित काही ठराविक मान्यवरांचा हार-तुरे, बुके, शाल देऊन सत्कार होतो. भलीमोठी भाषणबाजी होते. मात्र गरजेचे उपक्रम होत नाही., ही खंत संतोष जगताप यांना होती. त्यामुळे त्यांनी भाचीच्या विवाहात हे हार तुऱयांचे फक्त सत्कार न करता.. विवाहात वधू-वरांना शुभार्शिवाद वा शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या सर्व मान्यवर व वऱहाडी मंडळी अशा साऱयांनाच प्रत्येकी एक नारळाचे रोप देण्याचा निर्णय घेतला. मुलीचे मामा संतोष जगताप हे मुळात निसर्गप्रेमी आहेत. ते दरवर्षी आपल्या घरात गौरी गणपतीत सुध्दा पर्यावरणावर आधारीत देखावा सादर करुन.. साऱया गावाला बोलावून जनजागृती करीत असतात. विविध सामाजिक व आरोग्य विषयक उपक्रम करीत असतात. त्यामुळे उपक्रमातून आपल्या भाचीचेही लग्न हुकवून दिले नाही. त्यांनी मित्र पवार, भाचे तुषारच्या मदतीने या सोहळ्याप्रसंगी दिड हजार नारळाच्या रोपांचे वाटप करून त्यांचे संवर्धन करण्याची विनंती केली. त्यामुळे लग्न समारंभात मान्यवरांच्या सत्कारासाठी होणारा वायफट खर्च टाळून संतोष जगताप यांनी केलेल्या या उपक्रमाची चर्चा चांगलीच रंगली.
संतोष जगताप म्हणाले, नुकत्याच झालेल्या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त अनेक ठिकाणी विविध कार्यक्रम झाले. यामध्ये दिवसेंदिवस होत असलेली वृक्षतोड, पर्यावरणाचा -हास यावर मोठ्या प्रमाणात भाषणबाजी झाली. मात्र, प्रत्यक्षात कृती कमी झाली. त्यामुळे मी पुढाकार घेत हा नारळ रोपे वाटण्याचा उपक्रम मित्राच्या मदतीने केला. लग्नमंडपात माणसांइतकीच रोपे दिसताना उपक्रमाचे सार्थक वाटले.

🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴🌴

*संकलन -* 
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_