🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨
📃 *आजची प्रेरणादायी पोस्ट* 📜
*भाग* - 4⃣3⃣3⃣
*🛩अवनी चतुर्वेदी : महिलांसाठी नवा आसमंत खुला करणारी भारतीय वायुदलाची पहिली फायटर पायलट*
BY-BBC MARATHI
_19 फेब्रुवारीला एका महिलेने प्रथमच एका लढाऊ विमानातून झेप घेतली. ही झेप ऐतिहासिक होती, कारण ही केवळ तिची वैयक्तिक झेप नव्हती तर तिच्यासारख्या हजारों महिलांची होती, ज्यांचं स्वप्न एक फायटर पायलट बनण्याचं असतं._
त्यांच्यासाठी हा नवा आसमंत खुला करणारी ही महिला पायलट म्हणजे फ्लाईंग ऑफिसर अवनी चतुर्वेदी. म्हणूनच गेल्या दोन दिवसांपासून त्या सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे.
24 वर्षांच्या अवनी यांनी MiG-21 विमानातून केलेल्या 30 मिनिटांच्या उड्डाणाने महिलांनी आणखी एक नवं शिखर पादाक्रांत केलं आहे, आणखी एक चौकट मोडली आहे. वायुदलाचे प्रवक्ते अनुपम बॅनर्जी यांच्या शब्दांत सांगायचं तर "आज आणखी एक ग्लास सिलिंग तोडलं गेलंय."
अवनी या भारतीय वायुदलात दाखल होणाऱ्या पहिल्या तीन महिला वैमानिकांपैकी एक आहेत. त्यांचं ऐतिहासिक उड्डाण जरी 19 फेब्रुवारीलाच पूर्ण झालं असलं तरी अगदी कालपर्यंत ही बातमी सार्वजनिक करण्यात आलेली नव्हती.
अवनी यांनी जून 2016 साली भावना कांत आणि मोहना सिंगसमवेत आपलं प्रशिक्षण पूर्ण केलं होतं. लवकरच या दोघीही अशाच विमानात आपापली पहिली उड्डाणं पूर्ण करतील, असं वायुदलाने सांगितलं आहे.
सर्वांसाठी समान संधी उपलब्ध करून देण्यास आम्ही तत्पर आहोत, असं वायुदलाने म्हटलं आहे. "आणि हा क्षण त्याच दिशेनं टाकलेलं एक मोठं पाऊल आहे," असं बॅनर्जी म्हणाले.
भारतीय लष्करात महिलांचं प्रमाण 2016 सालापूर्वी केवळ 2.5 टक्के होतं. त्यातही बहुतांश जणींना प्रत्यक्ष लढण्यास पाठवलं जात नाही.
दुसरीकडे, पाकिस्तान वायुदलाने 2006 पासून महिलांनाही प्रत्यक्ष लढाईसाठी दाखल करण्यास सुरुवात केली होती. आज त्यांच्या वायुदलात 20 महिला फायटर पायलट आहेत.
📚📕📗📘📙📔📒📚
*संकलन -*
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_