🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨
📃 *आजची प्रेरणादायी पोस्ट* 📜
*भाग* - 4⃣4⃣4⃣
*👩🏻💼शाब्बास ययाती; 6 वर्षे शाळेला दांडी न मारण्याचा रेकॉर्ड*
Published On: Apr 21 2018
दैनिक पुढारी,
डहाणू ग्रामीण : वार्ताहर
शाळेमध्ये 100 टक्के हजेरी हा राज्यस्तरीय रेकॉर्ड डहाणूतील ययाती शैलेंद्र गावडच्या नावावर आहे. या शालेय वर्षातही तिने एकही दिवस गैरहजर न राहता सलग सहाव्या वर्षी हा पराक्रम करून स्वतः चाच रेकॉर्ड ब्रेक केला आहे.
राष्ट्रीयस्तरावरील रेकॉर्ड भोपाळच्या मानसी दास या विद्यार्थिनीच्या नावावर असून सलग9 वर्ष एकही दिवस ती शाळेत गैरहजर राहिलेली नाही. त्यामुळे तिच्या रेकॉर्डशी बरोबरी करण्यासाठी ययातीला आणखी तीन वर्षे कष्ट घ्यावे लागणार आहेत. शैक्षणिक वर्ष 2012 -13 सालापासून दुसरी इयत्तेत असताना हजेरीपटावर तिने 100 टक्के उपस्थिती नोंदवली होती. नुकतीच तिने सातवीची परीक्षा दिली आहे.
बोर्डीतील गोखले एज्युकेशन सोसायटीच्या सुनाबाई पेस्तनजी हकीमजी विद्यालयाची विद्यार्थिनी असलेल्या ययातीने राष्ट्रीय विक्रमाशी बरोबरी करण्याचा विश्वास व्यक्त केलाआहे. विशेष म्हणजे ती महाराष्ट्र, गुजरात सीमेवरील चिखले या खेडेगावातील विद्यार्थिनी असून घर ते शाळा आणि शाळा ते घर हा सुमारे दहा किमीचा प्रवास ती एसटीने करते. नव्या विक्रमामुळे तालुक्यात तिचे कौतुक होत आहे.
पालकांचा सल्ला आणि शिक्षकांचे मार्गदर्शन यामुळे सलग सहाव्या वर्षी शाळेला एकही दिवस खाडा केलेला नाही. राष्ट्रीय विक्रमाला गवसणी घालण्याचा वसा घेतला असून आहार, खेळ आणि करमणुकीतून स्वतःला तंदुरुस्त ठेवण्याचा प्रयत्न करते.
- ययाती गावड
📚📕📗📘📙📔📒📚
*संकलन -*
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_