🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨
📃 *आजची प्रेरणादायी पोस्ट* 📜
*भाग* - 4⃣4⃣1⃣
_*ऑन ड्युटी २४ तास. ..!*_
*जेव्हा नक्षलग्रस्त भागातील विद्यार्थ्यांसाठी पोलीसच झाला शिक्षक*
लोकसत्ता ऑनलाइन , May 4, 2018
नक्षलग्रस्त भागात कार्यरत असणारे साहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद पासवान हे आपली ड्युटी संपल्यावर इथल्या गरीब मुलांना गणित विषय शिकवतात. समाजाची प्रगती साधायची असेल तर शिक्षण हे गरजेचं आहे. ‘शिक्षण हे सर्वात प्रभावी शस्त्र आहे, ज्याचा वापर करून तुम्ही जग बदलू शकता’, नेल्सन मंडेला म्हणाले होते. याच विचारांतून प्रभावित होऊन प्रमोद हे झारखंडमधल्या गुरबंदा गावात रोज गरीब मुलांना शिकवण्यासाठी जातात.
हा भागही नक्षलग्रस्त आहे. इथल्या मुलांना शिक्षणाचा मार्ग दाखवला नाही तर तेदेखील नक्षलवादाकडे ओढले जातील याची भीती प्रमोद यांना आहे म्हणूनच ते या गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी धडपडत आहेत. ‘या भागातील लोक गरीब आहे, त्यांना शिक्षणाची गरज आहे. म्हणूनच माझ्याजवळचं ज्ञान मी त्यांना वाटण्याचं ठरवलं आहे. ही मुलं शिकली तर ती नक्षलवादापासून दूर राहतील. या भागातील सगळेच सुशिक्षित झाले तर नक्षलवाद दूर होईल.’ असा विश्वास प्रमोद यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना व्यक्त केला.
प्रमोद विद्यार्थ्यांना गणित विषय शिकवतात. ड्युटी संपली की ते नचुकता शाळेत जातात. गणित हा विषय नेहमीच विद्यार्थ्यांना अवघड वाटतो पण, योग्य तंत्र वापरून तो शिकवला तर विद्यार्थ्यांना समजून घ्यायला वेळ लागणार नाही असंही ते म्हणतात. शिक्षण हेच या विद्यार्थ्यांचा विकास घडवू शकतं ही आशा त्यांना आहे आणि यासाठी ते गेल्या काही वर्षांपासून प्रयत्नशील आहेत.
📚📕📗📘📙📔📒📚
*संकलन -*
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_