🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨
📃 *आजची प्रेरणादायी पोस्ट* 📜
*भाग* - 4⃣4⃣8⃣
*⛳सांगलीच्या १० वर्षीय उर्वीने सर केले ‘सरपास’ 🧗🏻♀*
May 16 2018 8:51PM
साभार : पुढारी वृत्तसेवा
हिमालयातील शिवालिक रेंजमधील 13 हजार 800 फुटांवरील काळाकुट्ट भोवताल... उणे 8 अंश सेल्सिअस तापमान आणि ताशी 30 ते 40 कि.मी. वेगाने वाहणारे वारे, तितक्याच वेगाने होणारी बर्फवृष्टी, कडाडणार्या विजा अशा पार्श्वभूमीवर मूळच्या सांगलीच्या व सध्या गोव्यात वास्तव्य करणार्या उर्वी अनिल पाटील या 10 वर्षांच्या मुलीने ‘सरपास’ हे शिखर सर केले आहे. एवढ्या लहान वयात सरपास सर करणारी ती पहिली महाराष्ट्रीय मुलगी ठरली आहे.
उर्वीने मंगळवारी महाराष्ट्र परिचय केंद्रास भेट दिली व आपल्या विक्रमाविषयी माहिती दिली. ती म्हणाली, सरपास ट्रेकची सुरुवात हिमाचल प्रदेशातील कसोल बेस कँपवरून 4 मे 2018 पासून झाली. पहिले तीन दिवस वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी छोटे-छोटे ट्रेक केले. पुढे 7 मेपासून प्रत्यक्ष ट्रेकला सुरुवात झाली.
*असे सर केले अवघड सरपास शिखर*
सरपास हे शिखर ट्रेकिंगसाठी अत्यंत अवघड मानले जाते. साधारणपणे 14 कि.मी.चा संपूर्ण प्रवास बर्फातला असून, अत्यंत धोकादायक आहे. मुख्य शिखर सर करण्याची सुरुवात पहाटे 2 वाजता होते. चहा आणि गरम पाण्याबरोबर गूळ व फुटाणे हा अल्पोपाहार करून ट्रेकिंगला सुरुवात केली. मात्र, याच वेळेस वातावरण अचनाक बिघडले आणि बर्फवृष्टीला सुरुवात झाल्याचे उर्वीने सांगितले. अशाही परिस्थितीत पुन्हा पहाटे 3.15 वाजता ट्रेकिंगला सुरुवात झाली. 200 मीटरच्या अत्यंत अवघड चढाईनंतर सरपासच्या पठाराला सुरुवात झाली. 14 मे 2018 ला पठारावर पोहोचल्याने सरपास सर केल्याचा आनंद मोठा होता.
*अशीही घेतली जोखीम*
सरपास या शिखराच्या ट्रेकिंगसाठी यूथ होस्टेल असोसिएशन ऑफ इंडिया या आयोजक संस्थेने ट्रेकिंगची वयोमर्यादा 15 वर्षे ठेवली आहे. यात मी जेमतेम 10 वर्षांची असल्याने मला ही संधी मिळणार नव्हती; पण मी मनाचा हिय्या केला आणि हा ट्रेक करण्याचे ठरवले. माझ्या वडिलांनी या संस्थेला सहमतीपत्र लिहून दिले आणि मला सरपासकडे मोर्चा वळविण्याची रीतसर परवानगी मिळाली, अशी माहिती तिने दिली.
*अशी केली तयारी*
हिमालयातील सरपास हा अवघड ट्रेक असल्याने मला मानसिक व शारीरिकरीत्या तंदुरुस्त राहणे गरजेचे होते. यासाठी आहार, व्यायाम व योगा यावर लक्ष केंद्रित केले. सकाळी दीड तास समुद्र किनारपट्टीवरील वाळूत चालायचे व अर्धा तास योगा व व्यायाम करायचे. आहारामध्ये प्रामुख्याने सीफूड व सुकामेवा घेत असे. हा प्रवास अत्यंत कडाक्याच्या थंडीत असल्याने अनेक लेअरची कपडे, गॉगल, ट्रेकिंग बूट, स्टीकही खरेदी केली त्याचा मला या प्रवासात खूप फायदा झाल्याचे उर्वीने आत्मविश्वासाने सांगितले. आता एव्हरेस्ट सर करण्यासाठी ती उत्सुक आहे.
📚📕📗📘📙📔📒📚
*संकलन -*
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_