🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨
📃 *आजची प्रेरणादायी पोस्ट* 📜
*भाग* - 4⃣4⃣7⃣
*एका बेफाम जिद्दीची गोष्ट...*
*आजीबाई वनारसे खानावळ ..लंडन.*
राधाबाई,.....
यवतमाळ च्या रस्त्यावर भाजी विकणारी एक निरक्षर विधवा महिला. ५ मुली पदरात आणि अठराविश्व दारिद्र घरात.
अचानक एक दिवस इंग्लंडहून तिच्याच समाजातील एक माणूस उगवला. त्याची बायको नुकतीच देवाघरी गेली होती. समाजातील प्रथे प्रमाणे दुसरे लग्न करणे भाग होते. मग कोणा मध्यस्थाने दिला या दोघांचा पाट लावून.
.
नवीन नवरा हिला घेऊन बोटीने लंडनला गेला. बरोबर पाचातल्या दोन मुली घेतल्या. बाकीच्यांना नातेवाईकांच्या भरवशावर इथेच ठेवले.तिथे त्याच्या मुलांनी हिला ठेऊन घ्यायला नकार दिला. मग कसाबसा हा अजब संसार चालू राहिला.
एक दिवस आकाश कोसळले.
थोड्या आजाराचे निमित्त होऊन नवऱ्याचा मृत्यू झाला. नंतर काही दिवसातच घरातल्यांनी ह्या बाईच्या हातात बोटीची ३ तिकिटे आणि ५० पौंड ठेवले आणि घरा बाहेर काढले. ते ही ऐन हिवाळ्यात. बाईच्या हाताला धरून दोन लहानग्या मुली, एक वळकटी आणि जेमतेम चार इंग्रजी शब्द .यावर ही अशिक्षित ९ वारी नेसलेली बाई लंडन च्या बर्फात सुन्न होऊन उभी होती...
अशा अवस्थेत जवळच राहणाऱ्या एका भल्या ज्यू माणसाने तिला घरी नेले आणि कसाबसा संवाद साधत तुला काय येते विचारले. ही म्हणाली "स्वयंपाक". त्याने हिला आपल्या घरातील मोकळी जागा दिली आणि म्हणाला मग कर स्वयंपाक. तुझ्या देशातले लोक येतील बघ खायला.आणि असा "आजीबाई वनारसे खानावळ " या लंडन मधल्या खानावळीचा जन्म झाला.
लंडन मध्ये अस्सल मराठी जेवण मिळते हे कळल्यावर त्यांच्याकडे तिथे गेलेल्या मराठी मुलांची आणि कामाला गेलेल्या एकट्या बाप्यांची रीघ लागली, पुढे या बाईंनी कॉट बेसिस वर रहायला जागा द्यायला सुरवात केली, असे होता होता आजीबाईंची खानावळ इतकी प्रसिध्द झाली कि लंडनला जाऊन त्यांच्याकडे न गेलेला मराठी माणूस मिळायचा नाही.
.
पुल, अत्रे, यांपासून अनेक मराठी दिग्गज त्यांच्याकडे राहून, जेऊन गेले.
बाई ९ वारी साडी नेसून लंडन च्या मेट्रोने एकट्या प्रवास करीत. (शेवट पर्यंत त्या ९ वारी साडीच नेसत होत्या). स्टेशन ची नावे वाचता येत नसत म्हणून कितवे स्टेशन ते विचारून घेत आणि मोजून उतरत.
बाई वारल्या तेव्हा त्यांच्या मालकीची लंडन मध्ये ५ घरे होती. लंडन मधला गणेशोत्सव त्यांनी चालू केला. तिथले पहिले देऊळही त्यांनीच बांधले.त्यांच्या अंत्ययात्रेला राणीचा प्रतिनिधी म्हणून लंडनचा महापौर हजर होता. आणि सगळ्यात गम्मत म्हणजे त्या शेवटपर्यंत अशिक्षितच राहिल्या. जेमतेम RADHABAI अशी सही करीत.
राधा डहाके नावाची एक मुलगी विदर्भातील सावतेली समाजात, आडबाजूच्या एका खेडेगावात जन्माला आली. परिस्थितीचे टक्केटोणपे खात ती लंडनला पोहोचली. तिला तिथली भाषा येत नव्हती. माणसं-संस्कृती-परंपरा, इतिहास, काही माहीत नव्हतं. इथंही ती निरक्षरच होती; त्यामुळे लंडन हे गावाचं नाव आहे की देशाचं, असा संभ्रमही बरेच दिवस तिच्या मनाला असायचा! पण...
कालांतरानं ती लंडन शहरातील एक सन्माननीय व्यक्ती झाली. तिनं भरपूर पैसे मिळवले. भरपूर खर्चही केले. आपली माणसं, आपला धर्म, आपली जीवनपद्धती यांचं एक मूर्त चित्र स्वतःच्या आयुष्यात तिनं दाखवून दिलं. तिनं जीवनाचा निरोप घेतला तेव्हा तिच्या शवावर वाहण्यासाठी लंडनच्या गोर्या मेयरनं - मेयर ऑफ बारनेटनं फुलं पाठवली आणि लंडनमधल्या तिच्या भारतीय मुलांनी तिची शवपेटी प्रेमपूर्वक आपल्या खांद्यावर वाहून नेली !
तात्पर्य: फक्त शिक्षण व पैसे ह्या बाबी व्यवसाय करण्यासाठी इतक्या महत्वाच्या नाहीत. सर्वात महत्त्वाचे आहेत ते चिकाटीने प्रयत्न करणे, मेहनत घेणे व काहीतरी करून दाखवण्याची जिद्द.
१९५० च्या दशकात राधाबाई वनारसे (पूर्वाश्रमीच्या राधा डोमाजी डहाके) या लंडनला गेल्या आणि घरकाम करता करता त्यांनी भारतातून तिकडे गेलेल्या विद्यार्थ्यांसाठी ‘आजीबाईंची खानावळ’ सुरू केली. पुढे काही वर्षांनी ही खानावळ तेथील सामाजिक व सांस्कृतिक केंद्र बनले. या राधाबाई वनारसे यांच्या जिद्दीची ही कहाणी सरोजिनी वैद्य यांनी ‘कहाणी लंडनच्या आजीबाईं’ची या पुस्तकातून मांडली होती. राजहंस प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशित केले होते. पुस्तकाची पहिली आवृत्ती २४ सप्टेंबर १९९६ मध्ये प्रकाशित झाली होती. आजवर पुस्तकाच्या आठ आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत.
याच पुस्तकावर आधारित संतोष वेरुळकर यांनी ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांना घेऊन "लंडनच्या आजीबाई" हे नाटक दिग्दर्शित केलं होतं..
📚📕📗📘📙📔📒📚
*संकलन -*
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_