twitter
rss

*_🌴 नारळाची मलाई 🥥_*

पुण्यातील आझम कॉलेजचा कॅम्पस् , वेळ दुपारी दोनची....
आमच्या प्रशिक्षणातील मधला ब्रेक झाला . कमी वेळेत खायला जवळ काही मिळत नसल्याने आम्ही दुपारच्या ऊसाचा रस प्यायचो,
पण आज नेमके रसवंतीगृह बंद होते , त्यावेळी काही जन चहा घेण्यासाठी गेले, मी आणि श्रीकृष्ण माळी सरांनी  नारळपाणी प्यायचे ठरवले, दोघांनी दोन नारळ घेतले तितक्यात तिथे MPSC online ची परीक्षा देवून एक मुलगा जवळ आला, त्यानेही एक नारळ घेतला आम्ही तिघेही नारळपाणी प्यायलो, या विक्रेत्याचे असे वैशिष्ट्य होते की तो नारळपाणी प्यायले की त्यातील खोबरे (इथे त्याला मलई म्हणतात) काढून देत असे . आम्ही त्याच्याकडे नारळ देणार तितक्यात त्या तरुणाचे लक्ष त्याच्या नारळाकडे गेले तर त्याच्या नारळात खोबरे नव्हते ,त्याने माझ्याकडे नारळाकडे पाहून म्हणाला ,'' सर,तुमच्या नारळात लई मलई आहे .'' नारळविक्रेत्याने त्याला त्याचे खोबरे काढता येत नाही असे सांगितले आणि आमच्या दोन नारळातील खोबरे काढून दिले ,त्यावेळी  श्रीकृष्ण माळी सरांनी एक नारळ त्या तरुणास दिला आणि उरलेला आम्ही खाल्ला..
त्या तरुणाने त्याची *मलई* संपल्यानंतर प्रसन्न चेहऱ्याने आम्हांस खुणावून तो निघून गेला.

....... नंतर श्रीकृष्ण माळी सरांनी मला असे सांगितले की नारळाचे तीन प्रकार असतात, पहिला पाण्याचा ,दुसरा खोबरे असलेला आणि तिसरा नारळ व पाणी दोन्ही असलेला... _पण ढिगातील नारळापैकी कोणता नारळ कोणत्या प्रकारचा आहे हे फक्त त्या विक्रेत्यालाचं माहित असते...._

_असचं काही तरी आपल्या जीवनाच्या बाबतीत असते ना, कधी कोठे जन्म घ्यायचा कोणाच्याच हातात नसते . पण आपल्याला मिळालेल्या मलईचा थोडा भाग ज्याला काहिच मिळालेला नाही त्यांला दिला तर.जग नक्कीच थोड फार बदलेल . ...._

*🖋 श्री.दीपक माळी , ९६६५५१६५७२.*