twitter
rss

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨

📃  *आजची प्रेरणादायी पोस्ट*  📜

*भाग* -3⃣9⃣3⃣

_*कवठेमहांकाळमधील रस्त्यावरचा देवदूत – हनमंत व्हानमोरे यांची पैशापलीकडची माणुसकी*_

मित्रानो,कवठे महांकाळ मध्ये अथवा पंढरपूर हायवे वर कोणाची मोटारसायकल पंक्चरसाठी किंवा कोठेही बंद पडली तर हा देवदूत तिथे धावून जातो. पंक्चर काढून देतो, हे व्यवसाय म्हणून ठीक आहे; पण रात्री-अपरात्री कितीही वाजलेले असू देत, कितीही पाऊस पडत असू दे किंवा थंडीने सारा परिसर गारठलेला असू दे, याला कोणी फोन केला तर, नाही हे उत्तर त्याच्याकडून कधी येत नाही हे त्याचे वेगळेपण आहे. कारण सेवा देणे हीच ईश्वेराची सेवा आहे, अशी त्याची भावना आहे.

नवरा, बायको, मुले मोटारसायकलवरून जात असतील आणि आडमार्गाला मोटारसायकल पंक्चर झाल्यावर त्यांची काय अवस्था होत असेल किंवा रात्रीच्या वेळी मोटारसायकल पंक्चर झालेला कोणीही एकटा कशा अवस्थेत उभा असेल, हा विचार त्याला स्वस्थ झोपूच देऊ शकत नाही. एखादा माणूस आपल्या आयुष्याकडे कशा वेगळ्या प्रकाराने पाहतो, याचे हे उदाहरण आहे.
पोपट उर्फ हनमंत व्हानमोरेनां पंक्चर काढण्यासाठी दिवसा तर फोन येतातच; पण एक-दोन दिवसाआड रात्रीचेही फोन येतात. किती वाजले आहे ते न पाहता ते आपल्या मोटारसायकलीवरून बाहेर पडतात. पाऊस असू दे, थंडी असू दे, जाग्यावर पोचतात.

पोपट मिस्त्री चा मोबाईल क्रमांक पोलिसांकडेदेखील आहे.या कामाबद्दल हनमंत मिस्त्रीनां खूप धावपळ करावी लागते. झोप अर्धवट सोडून जावे लागते; पण या कामातून मिळणाऱ्या पैशापेक्षा एखाद्याच्या अडचणीच्या काळात आपणाला मदत करायला मिळाली म्हणून समाधान मानतात. म्हटलं तर ते अडचणीत आलेल्याकडून एका पंक्चरला दोनशे रुपये आकारू शकतात; पण असा पैसा कधी मिळवायचा नसतो, असे ते नम्रतापूर्वक सांगतात.

*अनुभवाचा खजिनाचं*

हनमंत व्हनमोरेनांच्याकडे अनुभवाचा खजिनाच आहे. एकदा भर पावसात कोगनोळीच्यापुढे एक मोटारसायकल पंक्चर झाली. मोटारसायकलवर पाठीमागे महिला व तिची दोन मुले होती. त्यांना हनमंत व्हानमोरेचां मोबाईल क्रमांक मिळाला, त्यांनी फोन केला. अर्ध्या तासात व्हनमोरे तेथे गेले. त्यांनी पंक्चर काढले. फक्तं ५० रुपये घेतले; पण त्या पुढचा प्रसंग असा की ज्यांची मोटारसायकल पंक्चर झाली होती ते अक्षरश: व्हानमोरेनां देवदूत समजून पाया पडू लागले.हनमंतन व्हनमोरे या एका पंक्चरवाल्याची ही लाखमोलाची कथा आहे.

मित्रानो, आज गल्ली ते दिल्लीपर्यंतचा प्रत्येक सामान्य माणूसही पैशाच्या मागे लागलेला आहे. संस्कार, नितीमत्ता हे सारे शब्द बासनात गुंडाळून येनकेन प्रकारेण माया गोळा करण्याच्या मागे लागलेल्या आपल्याच लोकांच्यात हनमंत व्हनमोरे यांच्या सारखे असंख्य लोक आहेत. दुर्दैवाने त्यांच्या कार्याची दाखल मिडीया कधी घेत नाहि. त्यामुळे असं काही आपणही करावं असं स्वप्न पाहणार्यांची संख्या मर्यादित आहे. माणुसकीचा दिवा तेवत ठेवणाऱ्या हनमंत व्हनमोरे दीर्घायुष्य लाभो आणि त्यांच्या हातून अशीच सेवा घडो हीच ईश्वर चरणी प्रार्थना.

📚📕📗📘📙📔📒📚

*संकलन -* 
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_