twitter
rss

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨

🍍🍅 *आरोग्य-MANTRA*  🍋🍉

*भाग -*  2⃣8⃣9⃣

*आपल्या मुलांना जर खरंच आपल्याला पुढे न्यायचं असेल तर त्यांच्या नाश्त्याकडे पुरवा जातीनं लक्ष*

By लोकमत न्यूज नेटवर्क 

ठळक मुद्देनाश्ता न केल्यामुळे मुलांच्या वाढीवर होतो विपरित परिणाम.३१.५ टक्के मुलांना किमान अत्यावश्यक प्रमाणातील लोह मिळू शकत नाही.१९ टक्के मुलांना किमान मात्रेतील कॅल्शियम मिळत नाही.२१.५ टक्के मुलांना त्यांच्या शरीराच्या वाढीसाठी जेवढ्या प्रमाणात आयोडिन पाहिजे तेवढंही मिळत नाही.

- मयूर पठाडे

आजकाल मुलांचं पण ना, किती करावं लागतं.. त्यांची शाळेची तयारी, अभ्यास, ट्यूशन, होमवर्क, एक्स्ट्रा करिक्युलर अ‍ॅक्टिव्हिटीज, स्पोर्ट्स.. मुलांचं करता करता पालकांचा, विशेषत: आयांचा जीव पार मेटाकुटीला येतो.

मुलंही वाघ पाठी लागल्याप्रमाणे धावत असतात. एक झालं की दुसरं, दुसरं झालं की तिसरं.. सगळ्याच गोष्टी करायच्या तर त्यासाठी धावावंच लागतं. पुढे जायचं तर त्याला गत्यंतर नाही, हे आता पालकांप्रमाणेच मुलांनाही माहीत झालं आहे आणि त्यासाठी सकाळपासून रात्रीपर्यंत त्यांची धावपळ सुरू असते.
मुलांच्या या साऱ्याच गडबडीत आणि पळापळीत पालकांनाही भाग घ्यावाच लागतो. त्याचबरोबर मुलांसोबतच नातं हेल्दी राहील यासाठीही त्यांना आटापिटा करावा लागतो. पण हा आटापिटा करत असताना मुलं खरोखरच हेल्दी आहेत का, याकडे बºयाचदा पालकांचं दुर्लक्ष होतं. काहीवेळा त्याला नाईलाजही असतो.
सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे नाश्ता. दिवसभराच्या पळापळीत नाश्ता ही अशी एक गोष्ट आहे जी मुलांच्या शरीर आणि मनाला ताकद पुरवू शकते, पण हीच गोष्ट अनेक मुलांच्या दिनचर्येतून सध्या हद्दपार होताना दिसते आहे. ‘उशीर होतोय, वेळ होतोय, आवडत नाही’ म्हणून मुलंही बºयाचदा नाश्त्याला दांडी मारुन शाळा, क्लासेसला पळतात.
संशोधकांनी याचबाबत पालकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. मुलांचा दररोज सकाळचा नाश्ता कधीही चूकवू नका असा सल्लाही त्यांनी पालकांना दिला आहे.

यासंदर्भात संशोधकांनी नुकताच एक अभ्यासही केला.

*काय सांगतो शास्त्रज्ञांचा अभ्यास?*

१) शास्त्रज्ञांनी अनेक शाळकरी मुलांची पाहणी केली. त्यात त्यांना दिसून आलं नाश्ता न केल्यामुळे अनेक मुलांचं आरोग्य धोक्यात आलं आहे.

२) नाश्त्याला दांडी मारल्यामुळे तब्बल ३१.५ टक्के मुलांना किमान अत्यावश्यक प्रमाणातील लोह मिळू शकत नाही.

३) १९ टक्के मुलांना किमान मात्रेतील कॅल्शियम मिळत नाही.

४) २१.५ टक्के मुलांना त्यांच्या शरीराच्या वाढीसाठी जेवढ्या प्रमाणात आयोडिन पाहिजे तेवढंही मिळत नाही.

५) ७.३ टक्के मुलांना किमान प्रमाणातील फोलेटही मिळत नाही.

त्याचवेळी जी मुलं दररोज नाश्ता करतात त्यांच्यात मात्र हे सारेच अत्यावश्यक घटक योग्य त्या प्रमाणात शास्त्रज्ञांना आढळून आले.
शास्त्रज्ञांनी हा अभ्यास करताना सकाळी सहा ते नऊ ही वेळ आणि शंभर कॅलरीचा नाश्ता हे घटक विचारात घेतले होते.
अनेक मुलं या चाचणीत फेल झाले. अर्थातच त्यांच्या भावी आणि वर्तमान आयुष्यातही त्यांना त्याचा फटका बसेल असं निरीक्षण नोंदवायलाही शास्त्रज्ञ विसरले नाहीत.

त्यामुळे एकवेळ मुलाचा क्लास बुडला तरी चालेल, पण त्याचा नाश्ता मात्र चुकू देऊ नका....

🍍🍎🍅🍇🍉🍋🍎🍍

*संकलन -* 
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_

यापूर्वीचे भाग वाचण्यासाठी.....