🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨
📃 *आजची प्रेरणादायी पोस्ट* 📜
*भाग* -3⃣9⃣8⃣
*हेलिकॉप्टरमधून तुरुंगात जाऊन निर्णय देणारे डॅशिंग जज : जगदीप सिंग!*
*_कुठल्याही धमकीला भीक न घालता, संविधानाचं काटेकोर पालन करत, जगदीप सिंग यांनी अबला साध्वीला न्याय दिला. बलात्कारी बाबा राम रहीमला कोर्ट रुममध्ये रडकुंडीला आणून, राजसत्ता, अर्थसत्ता पायदळी तुडवणाऱ्या राम रहीमला गुडघे टेकायला लावणारा न्यायाधीश म्हणजेच जगदीप सिंग होय._*
By: सचिन पाटील, एबीपी माझा, मुंबई | Last Updated: > Monday, 28 August 2017
नवी दिल्ली/हरियाणा: लाखो आंधळे आणि त्वेषाने पेटलेले अनुयायी, तोडफोड आणि जीवाची धमकी या सर्व बाबींना न जुमानता, हेलिकॉप्टरमधून तुरुंगात जाऊन, बलात्कारी बाबा राम रहीमला दहा वर्षांची शिक्षा सुनावणारा निर्भिड पण मितभाषी, डॅशिंग पण तितकेच सुसंस्कृत न्यायाधीश म्हणजे जगदीप सिंग.
कुठल्याही धमकीला भीक न घालता, संविधानाचं काटेकोर पालन करत, जगदीप सिंग यांनी अबला साध्वीला न्याय दिला. बलात्कारी बाबा राम रहीमला कोर्ट रुममध्ये रडकुंडीला आणून, राजसत्ता, अर्थसत्ता पायदळी तुडवणाऱ्या राम रहीमला गुडघे टेकायला लावणारे न्यायाधीश म्हणजेच जगदीप सिंग होय.
न्यायाधीश जगदीप सिंग यांनी पेटलेल्या रोहतकमध्ये क्रांतिकारी निर्णय दिला. न्यायासाठी वाट पाहावी लागू शकते, ती अनेक वर्षांची असू शकते, पण न्यायदेवता कुणालाही रिकाम्या हाती जाऊ देत नाही, हे आजच्या निर्णयाने दाखवून दिलं.
लाखो गुन्हेगार सुटले तरी चालतील, पण एका निर्दोषाला शिक्षा होऊ नये असं न्यायव्यवस्थेचं ब्रीद आहेच. पण आर्थिक बळ, राजकीय ताकद आणि प्रसंगी भाडोत्री गुंड घेऊन माज दाखवणारा कोणीही राम रहीम असो, न्यायदेवता त्याच्या पापाचा घडा आपल्या तराजूत तोलतेच आणि ती जगदीप सिंगांसारखे न्यायाधीश आपल्या निकालातून अशा गुंडांचा उन्माद उतरवतात.
*शिक्षा सुनावण्यासाठी हेलिकॉप्टरमधून जेलमध्ये*
जगदीप सिंग यांनी बाबा राम रहीमला 25 ऑगस्टला दोषी ठरवलं होतं. या निकालानंतर बाबा राम रहीमच्या आंधळ्या अनुयायींनी हैदोस घातला. हरियाणात आगडोंब उसळला. या हिंसाचारात 38 जणांचे बळी गेले.
बाबा राम रहीमला दोषी ठरवणारा जज हा आंंधळ्या अनुयायींच्या केंद्रस्थानी होता. मात्र जगदीप सिंग हे कुचरले नाहीत. अनुयायी सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान करत असतील, तर बाबाच्या आश्रमाकडून त्याची भरपाई करुन घ्या, पोलिसांनी प्रसंगी हत्यार चालवण्यासही मागे-पुढे पाहू नये, असे आदेश जगदीप सिंग यांनी दिले.
शिक्षेच्या सुनावणीचा आजचा दिवस उजाडला. न्यायाधीश जगदीप सिंह यांना कडेकोट सुरक्षा पुरवण्यात आली होती. भक्तांचा उन्मत्तपणा पाहता न्यायाधीश थेट हेलिकॉप्टरमधून जेलमध्ये जाणार होते.
आज दुपारी दीडच्या सुमारे न्यायाधीश जगदीप सिंह हेलिकॉप्टरमधून जेलकडे रवाना झाले.
जेलमध्ये 10-10 मिनिटांचा वेळ
जेल परिसरातील हेलिपॅड ते प्रत्यक्ष जेलमध्ये जाण्यास काळ या दरम्यानचा जगदीप सिंग यांचा प्रवासही काटेकोर सुरक्षेत होता. जेलमध्ये पोहोचल्यानंतर जगदीप सिंग यांनी दोन्ही पक्षाच्या वकिलांना युक्तीवादासाठी दहा-दहा मिनिटांचा वेळ दिला.
यावेळी जेलमध्ये सीबीआयकडून 2, बचावपक्षाकडून 2 अधिक 1 (राम रहीम) 3, स्टाफ 2 आणि न्यायाधीश जगदीप सिंग असे 8 जण उपस्थित होते.
जगदीप सिंग यांनी दोन्ही पक्षाचा युक्तीवाद ऐकल्यानंतर, आपला निर्णय जाहीर केला. दोषी बाबा राम रहीमला 10 वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा सुनावली.
*कोण आहेत जगदीप सिंग?*
इमानदार पण कडक शिस्तीचा न्यायाधीश म्हणून जगदीप सिंग यांची ओळख आहे.
जगदीप सिंग यांनी 2002 मध्ये पंजाब विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली.
अल्पावधित वकिलीची चुणूक दाखवल्याने प्रकाशझोतात
2012 पर्यंत महत्त्वाचे दिवाणी आणि फौजदारी खटले लढवले
2012 मध्ये हरियाणा न्यायालयीन सेवेत रुजु
पहिल्यांदा सोनिपत कोर्टात नियुक्ती
हायकोर्टाने दखल घेत सीबीआयचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती
2016 मध्ये हिसार रस्त्यावर अपघातील जखमींना स्वत:च्या गाडीतून रुग्णालयात नेलं.
प्रामाणिक, मितभाषी, कडक शिस्तीचे आणि न्यायासाठी प्रसिद्ध
📚📕📗📘📙📔📒📚
*संकलन -*
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_