twitter
rss

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨

📃  *आजची प्रेरणादायी पोस्ट*  📜

*भाग* -3⃣9⃣6⃣

*👩🏻 ही आदिवासी मुलगी घडवणार इतिहास; पाड्यातून पहिलीच इंजिनिअर होणार!*

_*तिचा प्रवास नक्कीच सामान्य विद्यार्थ्यांसारखा नव्हता*_

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: August 22, 2017

JEE आणि Eamcet या परीक्षेत यश मिळवून तिने जवाहरलाल नेहरू तंत्रज्ञान विद्यापीठात प्रवेश निश्चित केला.

ज्या गावातील जवळपास सगळीच मुलं-मुली जेमतेम पाचवीपर्यंत शिकली आहेत, अशा आदिवासी पाड्यातून आलेल्या एका मुलीनं इंजिनिअर होण्याचं स्वप्न काही वर्षांपूर्वी पाहिलं होतं, हे स्वप्न कधी प्रत्यक्षातही येईल याची कल्पनाही कोणी केली नव्हती. पण ती मात्र आपल्या स्वप्नांचा पाठपुरावा करतच राहिली आणि अखेर यशालाही तिच्या जिद्दीपुढे नमतं घ्यावं लागलं. ही यशोगाथा आहे ती तेलंगणामधल्या आदिवासी कुटुंबात जन्मलेल्या कल्याणीची. तेलंगणामधल्या दुबारपेठ गावात अस्तंगत होत चाललेल्या थोटी या आदिवासी जमातीत तिचा जन्म झाला.

JEE आणि Eamcet या परीक्षेत यश मिळवून तिने जवाहरलाल नेहरू तंत्रज्ञान विद्यापीठात प्रवेश निश्चित केला. नुकतीच ती या विद्यापीठाच्या आवारात असणाऱ्या वसतिगृहात राहण्यासाठी आलीये. इथपर्यंत पोहोचण्याचा तिचा प्रवास नक्कीच सामान्य विद्यार्थ्यांसारखा नव्हता. कल्याणी आदिवासी पाड्यात लहानाची मोठी झाली, इथे शिक्षणाचं महत्त्व फार नाही, गावापासून शाळा खूपच लांब आहे. रोजचा प्रवास आणि शिक्षणाचा खर्च न परवडणाराच. त्यामुळे बहुतांश मुलींनी आपलं शिक्षण अर्ध्यावरच सोडलं. पण कल्याणीला मात्र शिकायचं होतं. अर्थात घरची परिस्थिती बेताची होती, वडिलांना घरखर्चातून शिक्षणाची फी परवडणारी नव्हती. पण वडील कृष्णा यांनी धडपड करून तिला शिकवलं. ‘इंडियन एक्स्प्रेस’नं कल्याणीशी तिच्या यशाबद्दल संवाद साधला. या यशाबद्दल आपल्याला खूपच आनंद होतो आहे. आदिवासी पाड्यातून इंजिनिअर होणारी मी पहिलीच मुलगी ठरणार आहे, असंही ती अभिमानानं सांगत होती.

📚📕📗📘📙📔📒📚

*संकलन -* 
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_