twitter
rss

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨
📃  *आजची प्रेरणादायी पोस्ट*  📜

*भाग* - 4⃣7⃣7⃣

*🏏मराठमोळी सांगलीची स्मृती जगात भारी!*

Published On: Feb 02 2019

दैनिक पुढारी,

दुबई : वृत्तसंस्था

भारतीय महिला क्रिकेट संघाची सलामीची फलंदाज स्मृती मानधनाने देशाची मान आणखी उंचावली असून, आयसीसीच्या महिला एकदिवसीय फलंदाजी क्रमवारीत स्मृती अव्वल स्थानावर विराजमान झाली आहे. आयसीसीने शनिवारी ही क्रमवारी जाहीर केली.

स्मृतीने न्यूझीलंड विरोधात तीन एकदविसीय सामन्यात दमदार फलंदाजी करत ‘प्लेअर ऑफ द सीरिज’चा पुरस्कार पटकावला होता. गतवर्षापासून चांगल्या फार्मात असलेल्या 2018 मध्ये स्मृतीने दोन शतकांसह आठ अर्धशतके झळकावली आहेत. नुकतेच तिला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने 2018 वर्षातील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटू म्हणून गौरविले आहे.

आयसीसीच्या क्रमवारीत स्मृतीने (751) 70 गुणांच्या आघाडीसह ऑस्ट्रेलियाच्या एलिसे पेरीला मागे टाकले आहे. ऑस्ट्रेलियाचीच मेग लॅनिंग 76 गुणांच्या पिछाडीसह तिसर्‍या स्थानावर आहे. भारतीय संघाची कर्णधार मिताली राज पाचव्या स्थानावर आहे. तिच्या खात्यात 669 गुण असून अव्वल दहा महिला फलंदाजांमध्ये भारताच्या दोनच खेळाडूंचा समावेश आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या सामन्यात नाबाद 81 धावा करणार्‍या जेमिमा रॉड्रीग्जच्या क्रमवारीतही सुधारणा झाली आहे. जेमिमाने 64 स्थानांची भरारी घेताना 61 वा क्रमांक पटकावला आहे. गतवर्षी मार्च महिन्यात वन-डे संघात पदार्पण करणार्‍या जेमिमाने आतापर्यंत केवळ सातच सामने खेळले आहेत.

भारताविरोधात तिसर्‍या सामन्यात उत्कृष्ट प्रदर्शन करणारी न्यूझीलंड संघाची कर्णधार एमी सॅटरवेटला दहा अंकाचा फायदा झाला आहे. एमी आता चौथ्या स्थानावर पोहोचली आहे. भारताची कर्णधार मितालीला एक क्रमचा फटका बसला आहे. मिताली चौथ्या स्थानावरून पाचव्या स्थानावर घसरली आहे.

📚📕📗📘📙📔📒📚
*संकलन -* 
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_