🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨
📃 *आजची प्रेरणादायी पोस्ट* 📜
*भाग* - 4⃣8⃣2⃣
*LMOTY 2019: जिल्हा परिषद शाळेत डिजिटल क्रांती; हायटेक शिक्षकाचा 'लोकमत'कडून गौरव*
By ऑनलाइन लोकमत | Follow | Published: February 20, 2019 06:35 PM
मुंबई : सरकारी शाळांमधून फळा आणि खडूच्या साह्याने शिकविले जाणारे धडे जिल्हा परिषदेच्या एका शिक्षकाने डिजिटल रुपात विद्यार्थ्यांना गिरवायला लावत मोठी क्रांती घडविली आहे. अशा या शिक्षक रणजितसिंह डिसले यांना 'महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' पुरस्कार प्रदान करण्यात आला. मुंबईत वरळीच्या भव्य एनएससीआय डोममध्ये रंगलेल्या दिमाखदार सोहळ्यात रणजितसिंह डिसले यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
रणजितसिंह डिसले हे सोलापूरमधील परितेवाडीयेथील जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षक आहेत. त्यांनी नाविन्यपूर्ण प्रयोगांनी फळा आणि खडूत अडकलेलं परंपरातगत शिक्षण बदलून टाकलं. देशाच्या शिक्षण क्षेत्रात तंत्रस्नेही क्रांतीची सुरुवात करणारे उपक्रम डिसले गुरुजींनी राबवले आहेत. 'क्युआर कोड' आणि 'व्हर्च्युअल फिल्ड ट्रीप'च्या स्मार्ट उपक्रमातून त्यांनी शिक्षण पद्धतीला डिजिटल रूप दिलं. त्यांच्या या उपक्रमाची दखल घेऊन जगप्रसिद्ध मायक्रोसॉफ्ट कंपनीने त्यांना 'मायक्रोसॉफ्ट इनोव्हेटिव्ह एज्युकेशन एक्सपर्ट' या किताबाने तब्बल चारवेळा गौरविलं आहे. प्रत्येक विद्यार्थ्याच्या पुस्तकातील प्रत्येक धड्यावर त्यांनी 'क्युआरकोड' चिकटवला आणि परितेवाडीच्या शाळेतील पुस्तकाच्या धड्यांना डिजिटल केले. या 'क्युआरकोड' समोर विद्यार्थ्याने मोबाईल धरला की धड्याची व्हिडीओ माहिती, कवितेची ऑडीओ क्लिप बोलू लागली. अभ्यासाच्या पद्धतीतील या बदलामुळे मुलांच्या समजण्या उमजण्याची क्षमता कैक पटीने वाढली.
याशिवाय 'व्हर्चुअल फिल्ड ट्रिप' द्वारे इतिहास जिवंत केला आहे. वर्गात शिकविलेल्या गोष्टीपेंक्षा अधिक माहिती विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून लाईव्ह ऐकली. विविध ठिकाणे, प्राण्यांची माहीती त्यांनी याद्वारे उपलब्ध करू दिली आहे. जगभरातील ८८ देशांच्या वेगवेगळ्या तज्ज्ञांनी परितेवाडीच्या मुलांशी लाईव्ह संवाद साधलाय. मुलांच्या प्रश्नांना उत्तरे देऊन शंका समाधान केलेय. अशा पध्दतीने ज्ञानदान करणारा भारत आठवा देश आणि भारतात परितेवाडी ही पहिली शाळा होती.
*हे होतं परीक्षक मंडळ*
केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, ज्येष्ठ गायिका आशा भोसले, पद्मभूषण डॉ. सुरेश अडवाणी, लोकमत ग्रूपचे चेअरमन विजय दर्डा, यूपीएल लिमिटेडचे ग्लोबल सीईओ जयदेव श्रॉफ, रॉनी स्क्रूवाला, फेसबुक इंडिया हेड(मीडिया) अंकुर मेहरा, क्रिकेटवीर अजिंक्य रहाणे, निर्माता-दिग्दर्शक महेश मांजरेकर, ज्येष्ठ अभिनेते सचिन खेडेकर, लोकमत समूहाचे एडिटोरियल अँड जॉइंट मॅनेजिंग डायरेक्टर ऋषी दर्डा, जेएसडब्ल्यू ग्रूपचे अध्यक्ष सज्जन जिंदल, आर के होम सोल्युशन्स मार्केटिंग आणि कन्सल्टन्सीचे एमडी राजेश खानविलकर.
http://m.lokmat.com/maharashtra/lokmat-maharashtrian-year-2019-ranjitsinh-disale-wins-best-teacher-award-education-category/?fbclid=IwAR1aMGDoI0uFQ-dKbqFKHjYX58M3jLd7pRF3IHh6XT5XSSm9atBMPm0U5dU
📚📕📗📘📙📔📒📚
*संकलन -*
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_
यापूर्वीचे भाग वाचण्यासाठी आपल्या .....
http://guruvarykm.blogspot.in/
या blog ला भेट द्या..