🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨
📃 *आजची प्रेरणादायी पोस्ट* 📜
*भाग* - 4⃣8⃣3⃣
*अभिनंदनची बिग फाईट!*
Published On: Mar 01 2019 1:33AM
_जमावाने घेरताच गोळीबार करत अभिनंदन धावत सुटले. थोडा वेळ मिळताच खिशातील कागदपत्रे गिळून नष्ट केली अन् मग झुंजत राहिले जमावाशी..._
*मुंबई : पुढारी वृत्तसेवा*
एखाद्या हॉलीवूड युद्धपटाच्या नायकाप्रमाणे विंग कमांडर अभिनंदन वर्धमान चवताळलेल्या पाकिस्तानी तरुणांशी झुंजले. विमान कोसळल्यानंतर जखमी अवस्थेत असूनही, त्यांनी जे धाडस दाखविले, ते पाहून प्रत्येक भारतीयाच्या अंगावर रोमांच उभे राहतील. खिशात असलेली महत्त्वाची कागदपत्रे आणि नकाशे शत्रूच्या हाती लागू नयेत, म्हणून त्यांनी काही चक्क गिळून टाकली, तर काही पाण्यातून बुडवून नष्ट केली.
पाकिस्तानातील आघाडीचे वृत्तपत्र ‘डॉन’ने याबाबतचे वृत्त होरान गावच्या स्थानिक प्रत्यक्षदर्शीने कथन केलेल्या माहितीवरून प्रसिद्ध केले आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील होरान गावच्या आकाशात सकाळी पावणेनऊ वाजता आगीचे मोठे लोळ दिसले. त्यानंतर अभिनंदन पॅराशूटच्या मदतीने खाली उतरले. त्यांचे लँडिंग खूपच सफाईदार होते. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपासून हे ठिकाण सात कि. मी. अंतरावर आहे.
खाली उतरताच अभिनंदन यांनी स्थानिक तरुणांना हाक दिली आणि मी कुठे आहे; हा भारत आहे की पाकिस्तान, अशी विचारणा केली. त्यातल्या एका चालू तरुणाने ‘तू भारतातच आहेस’, असे सांगितले. ते ऐकताच अत्यानंद झालेल्या अभिनंदन यांनी भारतीय लष्कराच्या घोषणा दिल्या. भारतातील हे नेमके कोणते ठिकाण आहे, असे त्यांनी विचारले असताना एका तरुणाने सांगितले, हे किलान आहे. तोपर्यंतही अभिनंदन यांना आपण पाकव्याप्त काश्मीरमध्ये असल्याचा अंदाज आलेला नव्हता.
माझी पाठ प्रचंड दुखत आहे, मला थोडे पाणी द्या, अशी विनंती त्यांनी केली. मात्र, अभिनंदन यांनी दिलेल्या भारतीय घोषणांमुळे जमलेल्या तरुणांचा पोटशूळ उठला होता. त्यांनी अभिनंदन यांना पाणी तर दिले नाहीच, उलट ‘पाकिस्तान आर्मी झिंदाबाद’च्या घोषणा दिल्या आणि तेव्हा कुठे आपण पाकिस्तानच्या हद्दीत आहोत, याची जाणीव अभिनंदन यांना झाली. त्यांनी कमरेचे पिस्तूल काढले आणि हवेत गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल पाक तरुणांनी त्यांच्या दिशेने दगड भिरकावले.
हातात पिस्तूल घेऊन अभिनंदन सुमारे अर्धा किलोमीटर विरुद्ध दिशेने धावत राहिले. त्यांचा पाठलाग करणार्या तरुणांना घाबरवण्यासाठी अभिनंदन यांनी आणखी काही फैरी हवेत झाडल्या. याचदरम्यान ते एका पाण्याच्या डबक्याजवळ आले. तेथे थांबून त्यांनी खिशातली कागदपत्रे आणि नकाशे बाहेर काढली. काही कागदपत्रे त्यांनी गिळून टाकली आणि काही पाण्यात फेकून नष्ट केली.
तोपर्यंत पाठलाग करणारे तरुण त्यांच्याजवळ पोहोचले. त्यांनी अभिनंदन यांना त्यांच्याजवळचे पिस्तूल टाकून देण्यास बजावले. एकाने अभिनंदन यांच्या पायावर वार केला. इतरांनीही अभिनंदनना मारहाण करण्यास सुरुवात केली. काही जणांनी त्यांचे दोन्ही हात धरून त्यांना फरपटत नेले. या परिस्थितीतही अभिनंदन या तरुणांशी झटापट करत राहिले. तोपर्यंत पाक लष्कराचे सैनिक तेथे पोहोचले आणि त्यांनी अभिनंदन यांना ताब्यात घेतले. ‘अभिनंदन यांनी या तरुणांना मोठ्या धाडसाने खूपच झुंजवले’, असे प्रत्यक्षदर्शी महंमद रज्जाक चौधरीने सांगितले.
भारताचा शूर योद्धा अभिनंदन यांना गुरुवर्यचा सलाम.....!