🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨
📃 *आजची प्रेरणादायी पोस्ट* 📜
*भाग* - 4⃣8⃣7⃣
*🌀जैद बारस्करचा प्रामाणिकपणा...*
_*जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्याने परत केले सापडलेले २८००० रुपये*_
गुरुवर्य न्यूज,कवठेमहांकाळ.
दि.१४/०३/२०१९
नागज :- आज पैशाच्या मागे सर्वजण धावताना दिसतात. केवळ शेपाचशे रुपयांसाठी समाजात भांडणे लागल्याचे आपण पाहिले आहे. पण अठ्ठावीस हजार रुपयांची रक्कम सापडूनही परत करण्याचे औदार्य नागज येथील शाळकरी विद्यार्थ्याने दाखवले आहे.
ज्या वयात पैशासाठी हठ्ठ करायचा त्या वयात मोठी रक्कम सापडूनही ती रक्कम प्रामाणिकपणे परत जैदने परत केली आहे. स्वार्थी बनत चाललेल्या समाजात पैशांपेक्षाही प्रामाणिकपणा महत्वाचा असल्याचे या जिल्हा परिषद शाळेतील मुलाने सिद्ध केल्याने त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
जैद जहिर बारस्कर हा विद्यार्थी नागज येथिल जिल्हा परिषदेच्या उर्दू माध्यमाच्या शाळेत शिकत आहे, उन्हाळ्याचे दिवस असल्याने शाळा सकाळ सत्रात सुरु आहे.
काल संध्याकाळी ५ वाजता जैद नमाजला मशीदीमध्ये जात होता. या मशीद जवळ हाजी मुन्ना तांबोळी यांचे बांगड्यांचे दुकान आहे. या दुकानाजवळ जैद आला असताना त्याला रस्त्यावर पैशांचे पुडके पडलेले दिसले. काही क्षणासाठी तो थोडा घाबरला पण त्याने ते पैसे उचलले आणि त्या शेजारच्या दुकानातील मुन्ना तांबोळी यांना ते पैसे दिले. मुन्ना तांबोळी आणि गावकऱ्यांनी पैशाबद्दल चौकशी केली असता नागज गावात डाळींब आणि चिकू खरेदीसाठी नांदेड ,सोलापूर येथिल व्यापारी लोकं आले आहेत, ते व्यापारी नमाजला जाताना एका व्यापाऱ्याचे पैसे पडल्याचे समजले... पूर्ण चौकशी करून त्या व्यापाऱ्याला ते २८००० रुपये देण्यात आले.त्या व्यापाऱ्याने प्रामाणिकपणा दाखवल्याबद्दल जैदला ५०० रु बक्षीस म्हणून दिले...
आज शाळेमध्ये जैदचे त्याचे वर्गशिक्षक जुबेर पटेल आणि सर्व मित्रांनी अभिनंदन केले ,जैदच्या प्रामाणिकपणाचे संपूर्ण कवठेमहांकाळ तालुक्यात कौतुक होत आहे, खरोखरचं जैद बारस्कर याने कसलीही लालसा न दाखवता प्रामाणिकपण पैसेे परत करुन समाजापुढे नवा आदर्श निर्माण केला आहे.
जैद तुला गुरुवर्य ग्रुपचा सलाम...
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
*संकलन -*
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_