twitter
rss

🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳
✨⚡⚡ *गुरुवर्य ग्रुप* ⚡⚡✨

📃  *आजची प्रेरणादायी पोस्ट*  📜

*भाग* - 4⃣0⃣2⃣

*🚢जगप्रवासाला निघालेल्या भारतीय नौदलाच्या रणरागिणी*

Posted:  11/09/2017 by prashant chavan,Tarun Bharat

ऑनलाईन टीम / गोवा :

नौदलाच्या इतिहासात पहिल्यांदाज भारती नौदलाच्या सहा जिगरबाज महिला शिडाच्या बोटीतून जगप्रवासाला निघाल्या आहे.

लेफ्नंट कमांडर वर्तिका जोशी, प्रतिभा जामवला, स्वाती पी, विजया देवी, पायल गुप्ता, ऐश्वर्या बोड्डापती यांना खास प्रशिक्षित केले आहे. नाविका सागरी परिक्रमा या नावाने ओळखली जाणारी ही मोहीम गोव्याच्या समुद्रातून सुरू झाली. संरक्षण मंत्री निर्मिला सीतारामन यांनी या मोहिमेला हिरवा झेंडा दाखवला. अत्यंत आव्हानात्मक नेतृत्व लेफ्नंट कमांडर वर्तिक जोशी करत आहेत. गोव्यापासून सुरू झालेली ही मोहिम 165 दिवसांची असेल, सुमारे 21 हजार 600 सागरी मैलांच्या प्रवासात या महिला ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, फॉकलंड आणि दक्षिण आफ्रीका या चार देशातल्या बंदरात दुरूस्ती आणि रेशन पाण्यासाठी थांबतील. केवळ महिला संघाने समुदमार्गे जगाच्या परिक्रमेला निघण्याची संपूर्ण अशियातील ही पहिलीच घटना असून नौदलातल्या महिलांनी स्वीकारलेल्या या अव्हानामुळे प्रत्येक भारतीयाची छाती अभिमानाने भरून आली आहे.

📚📕📗📘📙📔📒📚

*संकलन -* 
_*गुरुवर्य ग्रुप कवठेमहांकाळ सांगली*_